Posts

Showing posts from June, 2022
Image
  कोलाड-रोहा रस्त्यावर ट्रॅक्टरचा चाक साईड पट्टीत रूतला!   निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुनाच समोर आला! सुतारवाडी ( हरिश्चंद्र महाडिक) मे महिन्यात कोलाड-रोहा या रस्त्याच्या साईट पट्या भरण्याचे  काम वेगाने सुरु होते.  रस्त्याच्या दोन्हीही बाजुंनी साईड पट्टा  भरल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले होते,  मात्र या साईड पट्ट्या भरताना माल वापरला की नाही याची शाश्वती आली असून , वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या बाबतीत सविस्तर माहिती अशी की, पहूर ( ता. रोहा ) येथील श्री प्रेम चव्हाण यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्र. एम. एच. 06 सी.डी. 4095 हा रोहा कडे जात असताना , संभे बस थांब्या पासून अर्धा कि.मी.अंतरावर  गेल्या नंतर ट्रॅक्टरचा चाक साईड पडीत रूतला जवळ-जवळ  निम्या पेक्षा जास्तच चाक साईड पट्टीत रूतला गेला होता.  ट्रॅक्टरच्या  ऐवजी ट्रक क्रेन एस. टी.असती तर पलटी झाली असती असे अनेकांनी बोलून दाखवले.  साईड पट्टी मध्ये रूतलेल्या  ट्रॅक्टरच्या चाकाला वर काढण्या करिना क्रेन बोलवून अर्थिक तोटा सहन करून चाक वर काढण्यात आले. ज्या ठिकाणावरुन साईड पट्टी टाकली आहे आणि जीथ पर्यंत साईड पट्टी
Image
  सुतारवाडी हायस्कूलचे विद्यार्थी १२ वर्षांनी एकत्र सुतारवाडी :- ( हरिश्चंद्र महाडिक ) सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडीच्या सन २००९-२०१० च्या बॅचचे विद्यार्थी १२ वर्षानंतर एकत्र जमले आणि त्यांनी जुन्या आठवणींना उजाला दिला. मोबाईल व्हाट्सअप द्वारे ग्रुप करून नियोजन केल्यानंतर सर्वांनी एकत्र येण्याचे ठरविले. त्याप्रमाणे प्रथम सर्वजण द. ग. तटकरे विद्यालयाच्या इमारती समोर एकत्र आले. (त्या वेळी इमारत बांधलेली नव्हती) आपल्या शाळेची भव्य इमारत सभोवताली संरक्षक कठडे आणि ज्या मैदानात अनेक खेळ खेळून इयत्ता पाचवीतुन दहावीत गेलो त्या मैदानाकडे पाहुन सर्वांना जुन्या आठवणी आणि आपले शिक्षक आठविले.                 जुन्या इमारतीसमोर फोटो काढल्यानंतर धगडवाडी येथील निसर्गरम्य असलेल्या फार्ममध्ये जाऊन प्रथम सर्वांच्या उपस्थितीत केक कापला आणि विविध खेळ खेळून जुन्या आठवणींना उजाळा देत. आणि गेट टुगेदर चा आनंद द्विगुणीत केला. मिथुन रेवाळे, स्वप्निल घाडगे, अक्षय कोरपे, प्रसाद गायकवाड, जागृती चंदने, श्वेता शिंदे, प्रिया पवार, मिनाक्षी तवटे, उर्मिला शेपोडे, कल्पेश शिर्के, स्
Image
  रोह्यात शिवसैनिकांत चलबीचल, तर राष्ट्रवादीचा गोटात सन्नाटा, मंत्री पदाचे काय? चर्चेला उधाण... कोलाड नाका  (शरद जाधव) महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालत होण्याची चिन्हे असुन याकडे पुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होणार का?आणखी काय,  याची धाकधुक सर्वाना लागली आहे. रोहा तालुक्यात मात्र शिवसैनिकात कोणता झेंडा घेऊ हाती अशी चलबीचल परिस्थिती असुन या बंडाने सत्ता गेली तर  अदिती तटकरे यांच्या  मंत्री पदाचे काय, याची चर्चा असुन या बंडाच्या घडामोडीत राष्ट्रवादीच्या गोटात सुधा  संनाटा पसरला असल्याचे दिसून येत आहे.             अडीच वर्षापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत रायगडात शिवसेनेला चांगले यश मिळुन त्याचे 3 आमदार निवडून आले. या निवडणुकीत जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या शेकाप ला पराभवाला सामोरे जावे लगले. लोकसभेत जनतेने शिवसेनेला नाकारले असले तरी मात्र विधानसभेत शिवसेनेला चांगला कौल दिला.    शिवसेना व भाजप युती होणार सेनेला मंत्री पद मिळनार असे चित्र एकंदरीत असताना अचानक राष्ट्रवादी व सेना युती होउन राजकारणात संधी ज्यांच्या मागे गेली अनेकवर्ष धावत आहे. अशा सुनिल तटकर
Image
  गोवे रस्त्याला चिखल व खड्डयांचे साम्राज्य, विद्यार्थ्यांनासह,जेष्ठ नागरिक, कामगार वर्ग यांच्या जिवाला धोका!   कोलाड (विश्वास निकम ) मुंबई-गोवा हायवे वरून गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून या रस्त्याला पहिल्याच पावसात चिखल व खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले असून विद्यार्थ्यांसह जेष्ठ नागरिक, कामगार वर्ग यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.                    या मार्गावर गोवे येथे श्रीमती गिता द. तटकरे पॉलिटेक्निक कॉलेज,आय.टी.आय, बी. एस. सी, बी. कॉम, बी. ए कॉलेज असल्यामुळे येथे असंख्य विद्यार्थी ये-जा करीत असतात. तर गोवे येथील असंख्य विद्यार्थी द.ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड येथे ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षक घेण्यासाठी येजा करीत असतात तसेच कोलाड येथे बाजारपेठेच्या ठिकाणी जाणारे असंख्य नागरिक व धाटाव औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठी येजा करणारे असंख्य कामगार वर्ग याच मार्गावरून येजा करीत असतात.यामुळे या चिखलातून व खड्डयातून प्रवास करतांना टुव्हीलर गाड्या स्लिप होत आहेत.               मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरुन गोवे गावाकडे जा
Image
  तळगडावरून कोसळलेल्या दगडांमुळे दोन घरांचे नुकसान,     एक महीला जखमी   तहसीलदारांनी घटनास्थळी  घेतली तातडीची भेट! ( तळा कृष्णा भोसले) तळा शहरातील जोगवाडी येथे तळगड किल्ल्यावरून कोसळलेल्या दोन मोठ्या दगडांमुळे दोन घरांचे मोठे नुकसान होऊन एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की तळा शहरातील तळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जोगवाडी गावात सकाळी साडे आठ च्या दरम्यान तळगड किल्ल्यावरून दोन मोठे दगड जोरदार वेगाने खाली कोसळले व यातील एक दगड गणपत रामभाऊ शिंदे यांच्या तर दुसरा दगड सुमित्रा शशिकांत शिंदे यांच्या घरावर येऊन आदळल्याने या दोन्ही घरांचे मोठे नुकसान झाले. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला असलेल्या गावातील नागरिकांनी धाव घेतभराव बाजूला करण्यास सुरुवात केली असता यावेळी घराजवळ असलेल्या बंदिनी मंगेश शिंदे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्या जखमी अवस्थेत पडल्या असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.ग्रामस्थांनी तातडीने जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी दवाखान्यात हलविले.  घटनेची माहिती मिळताच तहसीलदार ए.एम.कनशेट्टी,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी घटनास्थळी
Image
  सावरवाडी येथील कुमार सिद्धेश शिर्के याचा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मान! सुतारवाडी :- (हरिश्चंद्र महाडिक) महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग रायगड महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग रायगड यांच्या वतीने जागतिक ऑलिम्पिक दिना निमित्त रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ठ खेळाडूंचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी कु.सिद्धेश दिपक शिर्के या दिव्यांग खेळाडूला क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री.अशोकजी दुधे साहेब यांच्या शुभहस्ते विशेष असे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले या प्रसंगी पोलिस मुख्यालयाच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अतुलजी झेंडे साहेब, रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रवींद्र नाईक साहेब  व श्री.सचीन निकम साहेब, तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती अंकिता मयेकर मॅडम, महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्
Image
  रोहा वनविभागाची धडक कामगिरी अवैद्यरित्या लाकडी कोळसा वाहतूक करणारा पिकअप टेम्पो केला जप्त, कोलाड (श्याम लोखंडे ) अवैध वृक्षतोड करून तयार केलेल्या लाकडी कोळशाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती रोहा वनविभागाला मिळताच विभागाने तातडीने घटना स्थळावर जाऊन लाखो रुपये किंमतीचा लाकडी कोळशासह पिकअप टेम्पो गाडी जप्त करून या बाबतचा गुन्हा नोंदविला आहे.         याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उपवनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल रोहा मनोज वाघमारे व स्टाफ प्रमोद पवार वनपाल मेढा,निलेश वाघमारे वनपाल गोफण, तेजस नरे वनरक्षक शेणवई,ज्योती मिरगणे वनरक्षक निडी,योगेश देशमुख वनरक्षक मेढा, जयवंत वाघमारे वनरक्षक यशवंतखार,वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम,पोपट करांडे, वनरक्षक रोहा विकास राजपूत,वनरक्षक ताम्हणशेत वैभव बत्तीसे,लेखापाल प्रदीप इनामदार यांनी दिनांक 25 जून 2022 रोजी रात्री 09.00 वाजता मिळालेल्या गुप्त माहितीवरून वरून रोहा तालुक्यातील मौजे अष्टमी येथील एच पी पेट्रोल पंपासमोर बोलेरो पीकअप क्रमांक MH/06/AG/5975 ची तपासणी केल
Image
  लांबलेल्या पावसाची दमदार सुरवात बळीराजा सुखावला सर्जा, राजाची जोडी घेऊन भात पेरणीसाठी बळीराजा सज्ज,   खांब (नंदकुमार कळमकर) संपुर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात जुन महिना संपता संपता पावसाने  समाधानकारक हजेरी लावली आहे. खरिपाच्या लांबलेल्या पेरणीला जोरदार बळीराजाने सुरवात केली असून तो शेतीकामात आता व्यस्त झाला असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे बळिराजामध्ये देखिल आंनदाचे वातावरण पसरले आहे. या समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामांना देखिल चांगल्या पद्धतीत सुरुवात झाली असून सर्जा राजाची जोडी बळीराजा आता नांगरणीसाठी सज्ज झाला असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पाऊस अधिक लांबला त्यामुळे बळीराजाची खरीप हंगामातील भात पेरणी देखील लांबली परंतु ऊशिरा का होईना पावसाने सोमवारी सकाळपासूनच दमदार हजेरी लावत सुरुवात करून सर्वच ठिकाणी पाणीच पाणी झाले . या पावसाच्या दमदार हजेरीमुळे बळिराजाची लांबलेली पेरणी करत शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. तर गरमीच्या वातावरणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाच्या आगमनामुळे चांगला दिलासा मिळाल्याने उष्म्यापासून सुटका झाली आहे. सोमवार पासून दररोज हलक्या हलक्या सरी स
Image
  कोलाड -रोहा मिनिबससेवा सुरु करा, विद्यार्थी, पालकवर्गासह प्रवाशांची मागणी         गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा-कोलाड मिनिबससेवा ही अनेक महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे परंतु ती मिनिबससेवा अद्याप सुरु करण्यात आली नाही यामुळे विद्यार्थी, पालकवर्ग व प्रवाशी वर्गातून रोहा-कोलाड मिनीबससेवा सुरु करण्यात अशी मागणी केली जात आहे.                     १३ जून पासून शाळा कॉलेज नियमितपणे सुरु झाले असून कोलाड रोहा मार्गावर कै द.ग तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ग्रीग्रोरियन स्कूल, एम. बी. मोरे, राठी स्कूल, डॉ सी.डी.देशमुख कॉलेज तसेच इतर कॉलेज असल्यामुळे या मार्गावरून कोलाड कडून रोहा कडे व रोहा कडून कोलाड कडे शाळा कॉलेजला जाणारे येणारे हजारो विद्यार्थी येजा करीत असतात कोरोनामुळे शाळा कॉलेज बंद करण्यात आले होते तसेच एस टी संप यामुळे कोलाड रोहा मिनिबससेवा बंद करण्यात आली होती. परंतु सर्व परिस्थिती पूर्व पदावर आली आहे.                तसेच याशिवाय या मार्गावर औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे असंख्य कामगार वर्ग, रोहा कडे तहसील कार्यालय व इतर कामासाठी जाणारे तरुण वर्ग, जेष्ठ नागरिक, याच मार्गा
Image
  रोहा मेहेंदळे हायस्कूल "दहावीचा वर्ग" माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्सहात संपन्न स्नेहसंमेलनात सामाजिक बांधिलकी म्हणून आपत्ती काळात सर्वाना सहकार्य करण्याचा निर्णय! रोहा (राजेश हजारें ) "दहाविचा वर्ग" या समूहातील मेहेंदळे हायस्कूल माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळा 19 जून रोजी समूहातील मित्र नितीन पिंपळे याच्या यशकांचन फार्महाऊस येथे आनंदी, उत्साही वातावरणात संपन्न झाला.       सदरील कार्यक्रमात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते समूहातील कोरोना काळात मृत्यू पावलेल्याना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाड येथें निसर्ग आपत्तीच्यावेळी  समूहाने सामाजिक बांधिलकी राखत केलेले उत्स्फूर्त कार्य त्याप्रती निभावलेलं कर्तव्य, आणि ज्या, ज्यावेळी असे प्रसंग समूहातील मित्र मैत्रिणीवर, समाजावर येतील त्यावेळी आपण सारे एकत्र येऊन अशीच मदत करत राहू असा विचार मांडण्यात आला. त्या नंतर आपापली ओळख करून देत असताना सरून गेलेल्या जीवनामद्ये घडून गेलेले सुख, दुःखाचे अनुभव या माजी विद्यार्थांनी कथन करून कधी हसवले कधी भावानिक केले. त्या नंतर गाणी, भेंड्या, खेळ, भोजन समूहातील मित्र नितीन पिंप
Image
  अहिल्या कन्येची गरुड झेप  कुमारी दर्शना राजू आखाडे पेण तालुक्यात अव्वल!   पेण (महेश झोरे ) पेण तालुक्यातील मीरा डोंगर भागातील देऊळवाडी या गावात धनगर वाडी वस्तीत जन्मलेली कुमारी दर्शना राजू आखाडे ही वस्ती शाळेत व वेताळ पट्टी देऊळवाडी या शाळेत शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या कुमारी दर्शना राजू आखाडे या विद्यार्थिनीने एस.एस.सी. २०२२ मध्ये ९२.४०% गुण मिळवून शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेची कामगीरी केली. पेण तालुक्यात असणारे शाळा सार्वजनिक विद्यामंदिर व जूनियर कॉलेज यामध्ये प्रथम क्रमांकाने येऊन तालुक्यात बाजी मारली. अत्यंत डोंगराळ भागात असणाऱ्या पेण तालुक्यातील महाल मिर्‍या डोंगर भागातील देऊळवाडी या गावात धनगर वस्ती जन्मलेली कुमारी . दर्शना राजु आखाडे प्राथमिक शिक्षण रा. जि. प. शाळा तरणखोप व माध्यमिक शिक्षण सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज पेण या विद्यालयात झाले. महाल मीरा डोंगर देऊळवाडी हा भाग अत्यंत डोंगराळ असून सोयी-सुविधांचा अभाव नसताना सर्व परिस्थितीवर मात करून कुमारी दर्शना राजू आखाडे हिने एस. एस. सी. मध्ये ९२.४०% गुण मिळवून शाळेत प्रथम येऊन गावाचे व समाजाचे नाव रोशन
Image
  द.ग.तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडीचा शालांत परीक्षेचा निकाल 97.56 टक्के सुतारवाडी :( हरिश्चंद्र महाडिक ) सु. ए. सो, च्या . द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडी या विद्यालयाचा एस. एस. सी. परीक्षेचा निकाल 97.56 टक्के इतका लागला असून कुमारी. केतकी राकेश तवटे हिला 85.80 टक्के मिळाले. ती विद्यालयात प्रथम आली तर कुमारी. आकांक्षा विनोद पाटील हिला 83.60 टक्के मिळून ती द्वितीय आली तर कुमारी. खुशबू दत्ताराम मोरे हिला 83 टक्के मिळून तृतीय आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष श्री. वसंतराव ओसवाल, कार्याध्यक्षा गीताताई पालरेचा, सचिव श्री. रविकांत घोसाळकर त्याच प्रमाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. जी. काळेसर , सर्व शिक्षक आणि स्कूल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय हे डोंगराळ ग्रामीण भागात असून या विद्यालयात विविध परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या विद्यालयाचा एस. एस. सी. परीक्षेचा निकाल दरवर्षी उत्तम लागतो. या वर्षीही विद्यालयाचा निकाल उत्तम लागला असून दशक्रोशितील पालकांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. काळेसर आणि सर्व शिक्षक शिक्षकेत
Image
  कै.द.ग.तटकरे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय कोलाड एस. एस.सी. निकाल ९३.७५% सौरभ पुजारी ९१.८०% गुण मिळवून प्रथम   एस.एस.सी.परीक्षेत कु.सौरभ पुजारी प्रथम,     गोवे-कोलाड (विश्वास निकम ) १७ जून रोजी एस. एस. सी दहावी) परीक्षेचा निकाल  जाहीर झाला असून या परीक्षेत कै. द. ग. तटकरे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय कोलाडचा निकाल ९३.७५% लागला असून या विद्यालयातील ९६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत बसले होते यातील ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.   एस.एस. सी. परीक्षेत कु.साई सावंत द्वितीय,   या विद्यालयात दहावीच्या परीक्षेत सौरभ  सचिन पुजारी ९१.८०% गुण मिळवून प्रथम,साई राकेश सावंत ८८.८०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक,तर पायल प्रशांत बाईत  ८७.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल,कार्याध्यक्षा गिताताई पालरेचा, सचिव रविकांत घोसाळकर, स्कूल कमेटी अध्यक्ष सुरेश महाबळे प्राचार्य शिरीष येरुणकर, उपप्राचार्य शकील मोरवे, घोसाळकर सर,अविनाश माळी, व सर्व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
Image
  आमदार अनिकेत तटकरे यांच्या निधीतून होणार उडदवणे बसस्थानक  कोलाड़ नाका  (शरद जाधव) रोहा तालुक्यातील उडदवणे येथे आमदार अनिकेत तटकरे यांच्या निधीतून बसस्थानक उभे रहाणार असुन सदर कामाचे भुमीपूजन त्याच्या हस्ते नुकतेच पार पडले.         यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर, रोहा तालुका समन्वय समिती अध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, माजी सभापती हेमंत कांबळे, माजी उपसभापती अनिल भगत, लिलाधर मोरे, रोठ सरपंच गीता जनार्दन मोरे, घनश्याम कराळे सागर ठाकुर, सरपंच रसिका मालुसरे, उपसरपंच योगेश शिंदे, निलेश मालुसरे, महेश तुपकर, मारुती तुपकर, रविंद्र ठाकुर, दमयन्ती ठाकुर, रोहिदास कोल्हटकर, सरिता गायकर, संतोष गायकर, किशोर ठाकुर, पांडूरंग कासारे, गणपत गायकर, चांगदेव गायकर, संदीप कोल्हटकर, प्रदीप कासरे, तुकाराम गायकर व महिला वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.       यावेळी गेली अनेक वर्ष रखडलेल्या पालदाड रस्त्याचे काम अनिकेत भाई यांच्या प्रयत्नातून झाल्याने उडदवने वासिया तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. तर यावेळी उडदवने अन्तर्गत रस्ता ,पाण्याच्या टाकीचे तसेच विविध
Image
  एस.एस सी. परीक्षेत झळकल्या वांगणी हायस्कूलच्या 'पंचकन्या'    नागोठणे (प्रतिनिधी)  रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय वांगणी या शाळेने दहावीच्या उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. या वर्षी झालेल्या एस.एस. सी. परीक्षेचा या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून पहिल्या पाच क्रमांकावर मुलींनीच बाजी मारली आहे. या ' पंचकन्यां ' चे सर्वत्र कौतुक होत आहे. या पंचकन्या पुढीलप्रमाणे आहेत : प्रथम - कु. रिया सुभाष मोरे ( ९२.२० % ) , द्वितीय- कु. पायल संदीप भोसले ( ९० .८० % ) , तृतीय - कु. प्रज्ञा अनिल सुतार ( ८६.८०% ) , चतुर्थ - कु. श्रुती वसंत जाधव ( ८६.४० % ) , पंचम - कु. सानिका शांताराम भिसे ( ८३. ६० % ) कु. रिया मोरे ही नागोठणे केंद्रात पहिली आली आहे.  विशेष म्हणजे ही शाळा ग्रामीण भागात असून कोणतीही खासगी शिकवणी न लावता या मुलींनी हे दैदीप्यमान यश मिळवले आहे. कोरोनामुळे उशीरा सुरु झालेल्या शाळा , कोरोना संक्रमणामुळे धास्तावलेले पालक व विद्यार्थी या सर्व गोष्टींवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शाळेतील मुख्याध्यापक व श
Image
  नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संस्थेचा इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के कु. मृदुला साळवी 90 टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम  कु.मृदुला  मधुकर साळवी  खांब (नंदकुमार कळमकर ) महाराष्ट्र राज्याचा एस एस सी बोर्डाचा निकाल नुकताच ऑनलाइन जाहीर झाला असून संपन्न झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालात कोकण हा पुन्हा अव्वलस्थानी असल्याचे दिसून येत आहे , तर रायगडमध्ये नावलौकिक असलेल्या रोहा तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेली खांब येथील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब येथील संस्थेच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी नेहमी प्रमाणे बाजी मारत संस्थेचे नाव उंचावत शंभर टक्के निकाल देत मोल मजुरी करणाऱ्या गरीब कुटूंबातील कु. मृदुला मधुकर साळवी हिने 89 टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम क्रमांकाने आल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित रा. ग.पोटफोडे (मास्तर) विद्यालय खांब,श्रमिक विद्यालय चिल्हे,द न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी ,या तीनही शाळांचा यंदाचा इयत्ता दहावीचा निकाल हा शंभर टक्के लागला असून यात श्रमिक विद्यालय
Image
 . एस.ए.६ आसनी रिक्षा पासिंग संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांना निवेदन   गोवे-कोलाड (विश्वास निकम ) जे.एस.ए.६ आसनी रिक्षा ही गाडी पासिंग होण्यासाठी परवानगी मिळावी या संदर्भात मंगळवार दि.१४ /०६/२०२२ रोजी मिनिडोअर चालक मालक संघटना रायगडचे सदस्य विश्वास मधुकर बागुल, सुरेश जगनन्नाथ घरत व इतर सदस्य यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण,रायगड यांना निवेदन देण्यात आले.                   शासनाने आदेशपारित केलेली इको फोर व्हिलर गाडी ही सर्वसामान्य माणसाला न परवडणारी असल्यामुळे या गाडीला पर्याय म्हणून जे.एस.ए. निर्मित पेट्रोल व सि. एन. जी गाडी पासिंग होण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मिनिडोअर चालक-मालक संघटना रायगडचे सदस्य विश्वास बागुल (८४४६८८४५१)व सुरेश घरत (९२०९६४४०७१)यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण, रायगड यांना नुकताच देण्यात आला आहे.
Image
  रा.ग.पोटफोडे विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के कु.प्रज्वल झोलगे 88.60% गुण मिळून सर्व प्रथम    कु.प्रज्वल झोलगे  खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ संस्था खांब संचालित रा.ग.पोटफोडे (मास्तर) विद्यालय खांब या शाळेचा यंदाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयातील कु.प्रज्वल अशोक झोलगे हिने 88.60% गुण मिळवून सर्व प्रथम क्रमांकाने आला आहे. एस एस सी बोर्डाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेचा इयत्ता दहावीचा निकाल 17 जून रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून या वर्षीचा रा.ग.पोटफोडे (मास्तर) विद्यालय खांब हायस्कूल चा निकाल हा शंभर टक्के जाहीर झाला आहे.सदर जाहीर झालेल्या निकालात कु. प्रज्वल अशोक झोलगे 88.60% याने गुण मिळवून सर्वात प्रथम आली आहे तर कु.नम्रता नंदकुमार कापसे 87.80% गुण मिळवून ही द्वितीय क्रमांकाने आली तर कु.संचिता हरिश्चंद्र मोरे 87.40% गुण मिळवून तृतीय तसेच कु.नीलम नामदेव वरगुडे 87.20%  हिने गुण संपादित करत चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाली . या संस्थेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याने येथील विद्यार्थ्यांचे
Image
  रोहा खरबाची आदिवासी वाडी ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळाले, वृत्तपत्रासह तहसीलदारांचे मानले ग्रामस्थांनी आभार,   जे लबाड पुढाऱ्यांनांही जमले नाही ते पत्रकारांनी केले आदिवासी बांधवांनी केले पत्रकारांचे खास अभिनंदन! कोलाड (श्याम लोखंडे ) जेव्हा बंदुकीतील गोळ्या संपतात, तलवारीची धार काहीच काम करत नाही, तेव्हा लेखणीच कामाला येते. याची प्रचिती रोहा तालुक्यातील खरबाचीवाडी येथील आदिवासी बांधवांच्या बाबतीत पाणीटंचाईच्या संदर्भात आली. आदिवासी बांधवांना वर्षानुवर्षे पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. पाण्याबाबत पुढार्‍यांच्या दाराचा उंबरठा झीजवताना हे सर्व आदिवासी बांधव मेताकुट्टीला आले. परंतु गेंड्याची कातडी असलेल्या पुढाऱ्यांना  ना जनाची, ना मनाची, यांच्या हृदयाला पाझर फुटलेच नाही. अखेर या ग्रामस्थांनी पत्रकारांशी संपर्क साधला माहिती मिळताच सदर  ठिकाणी पत्रकार श्याम लोखंडे,पत्रकार विश्वास निकम, व न्यूज आज तक मराठीचे संपादक भिवा पवार यांनी खरबाचीवाडी येथे भेट देऊन सदर पाणीटंचाई बाबत न्यूज आज तक मराठीने सर्व प्रथम बातमी प्रसिद्ध केली. तसेच पत्रकारांनी सुद्धा वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध के
Image
  जिथे कमी तिथे आम्ही, तटकरे पँटर्न  युती काळातील पालदाड पुलाला राष्ट्रवादीकडून मुलामा    कोलाड़ नाका  (शरद जाधव) ग्रामीण विकासाच्या बाबतीत फक्त बोला, कमी तेथे आम्ही हा विकासाचा तटकरे  पँटर्न   चा अनुभव धामणसाई उडदवने, देवकान्हे परिसरातील ग्रामस्थाना आला आहे. साहेब, ताई, भाई याना फ़क्त शब्द टाकला.अणि अनेक वर्षाच्या पालदाड़ पुलाच्या रस्त्याचा गंभीर प्रश्न मार्गी लागला असुन युती काळातील झालेल्या पालदाड पुलाला मुलामा         लावन्याचे काम राष्ट्रवादी ने  केल्याने परिसरातील नागरिकांत आनंदाचे वातवरण पसरले असल्याची माहिती राष्ट्रवादी कार्यकर्ते महेश तुपकर यानी दिली        पुर्वी कुंडलिका नदीच्या अलिकडील अनेक गावतील लोकाना धाटाव, रोहा येथे जाण्याकरिता नदीवरील छोट्या पकटीवरुन जावे लागत असे त्यामूळे पावसाळी लोकाना कसरत करावी लागत असे या पकटी वरुन अनेकजन वाहवुन गेल्याच्या घटना घडल्या होत्या अखेर त्यावेळी उडदवने व या परीसरातिल ग्रामस्थांच्या पुढाकारातून युती सरकारच्या काळात पालदाड पुलाचा प्रश्न मार्गी लागला होता.               मात्र कितेक वर्ष या पुलावरिल रस्त्याचा प्रस्न मार्गी लागला नव्हता. दर पाव
Image
  माजी सभापती, मोतीराम तेलंगे यांच्या वाढदिवसा निमित्त बस थांब्याचा लोकार्पण सोहळा सुतारवाडी :(हरिश्चंद्र महाडिक) रोहा पंचायत समितीचे माजी सभापती अत्यंत गोड स्वभावाचे तसेच प्राथमिक आरोग्यकेंद्र आंबेवाडी चे सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष श्री. मोतीराम तेलंगे यांच्या ६८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कै. शंकर दगडु तेलंगे यांच्या स्मरणार्थ एम. जे. टी. इन्फ्रा यांच्या सौजन्याने वाळंजवाडी येथे एस.टी. बस थांब्याचे लोकार्पण करण्यात आले.    यावेळी पहूर सरपंच श्री. मंगेश कदम, श्री. दर्शन तेलंगे त्याचप्रमाणे वाळंजवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. मोतीराम तेलंगे यांनी अनेक वर्ष रोहा पंचायत समीतीचे सभापती पद भूषविले होते. तसेच त्यांनी आंबेवाडी प्राथमिक केंद्राच्या सल्लागार समितीचे अध्यक्षपद भूषवून आरोग्य सेवकांच्या समस्या व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेडसावणाऱ्या समस्या सोडवून अनेक सुधारणा केल्या त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या. 
Image
  रोहा चिंचवली तर्फे आतोणे खरबाची आदिवासी वाडीवर मोठी पाणी टंचाई! चिखलमय पाण्याचा करावा लागतो प्राशन, तहसीलदार,गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन,   तत्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल तहसीलदारांचे आश्वासन! कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत चिंचवली तर्फे आतोने ग्राम पंचायतीचा अजब कारभार हद्दीतील खरबाची वाडी ,वडाची वाडी,धनगर माळ, मोठी वाडी,आशा या आदिवासी वाड्यांवरील नागरिकांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत असून देशात व या राज्यात देश स्वातंत्र्य काळात आदिवासी महिलांना आज देखील दोन कोस दूरवर पायपीट करत पाणी भरावे लागते तर एवढेच नव्हे तर भल्या मोठ्या पाणी टंचाईला सामना करत नाइलाजास्तव जीवन जगण्यासाठी चिखलमय पाणी पाशन करावा लागत असल्याने येथील आदिवासी ग्रामस्थांनी आज 13 जून रोजी याबाबतचा पाढा रोहा तहसीलदार व गट विकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांच्या समोर मांडत निवेदन देत ताबडतोब आम्हाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करा अशी  मागणी या आदिवासी भगिनी माता व ग्रामस्थ नागरिकांनी केली याला तात्काळ दुजोरा देत रोहा तहसीलदार श्रीमती कविता जाधव व गट विकास अधिकारी श्रीमत
Image
रोहा तालुक्यातील घटना!  डोळवहाळ धरणाच्या खाली पोहायला आलेल्या 21 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू    कोलाड/खांब  (विश्वास निकम, नंदू कळमकर)             रोहा तालुक्यातील  कोलाडच्या  नजीक असणाऱ्या डोळवहाळ धरणाच्या खालच्या बाजूस पुई गावाच्या हद्दीतील पोहायला गेलेल्या इसमाचा पोहत असतांना खोल पाण्यात भवऱ्यात अडकून पाण्यात बुडून मृत्यू झाला.                सविस्तर वृत्त असे कि शुक्रवार दि.१० जून २०२२ रोजी डोळवहाळ धरणाच्या खाली पुई गावाच्या हद्दीत आपली मावशी मोमीन खातून, मावस भाऊ एजाज खान व अय्यज खान, मावस बहीण बुसरा हाफीजूर रहमान खान धारावी यांच्या सोबत फिरायला आलेला  मोहम्मद असिफ अब्दुल रहमान खान वय वर्षे २१, दुसरा मजला,गुलाब रबानी बिल्डिंग,९०/एच/४/१, डॉ. सुधीर बोस रोड, कोलकत्ता, वेस्ट बंगाल येथील इसम डोळवहाळ धरण्याच्या खाली पुई गावाच्या हद्दीतील  नदीच्या पाण्यात पोहत असताना खोल पाण्यात भावऱ्यात अडकून पाण्यात बुडून मयत झाला.           या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ए. जाधव,पोहवा एन.जी.पवार ,बंदुगडे ,अशोक म्हात्रे ,सय्यद राऊळ यांनी तसेच स्थानिक ग्रा
Image
  नितीन पाटील आरोग्य खात्यातून सेवा निवृत सुतारवाडी :- (हरिश्चंद्र महाडिक) नितीन रामचंद्र पाटील आरोग्य खात्यात वाहन चालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपली सेवा ३७ वर्षे २ महिने ११ दिवस एवढी करून शासनाच्या नियमाप्रमाणे सेवानिवृत झाले. शालेय जीवनात असताना सुंदर हस्ताक्षर, गोड आवाज आणि सर्वांशी आदराने वागणाऱ्या नितीन पाटील आरोग्य खात्यामध्ये वाहन चालकाची नोकरी स्विकारून सेवा निवृत्ती पर्यंत विना अपघात उत्कृष्ट सेवा केली. ९ जानेवारी १९८५ साली आरोग्य खात्यात रुजू झाल्यानंतर प्रथम अलिबाग नंतर पनवेल त्यानंतर पुन्हा अलिबाग येथे बदली झाली. १९८५ च्या काळात रस्त्यांची अवस्था बिकट होती. कुटुंब नियोजनाच्या रुग्णाला घरोघरी जावून पोहचवावे लागत असे रात्री अपरात्री कधी ही ग्रामीण भागात जावे लागत असे वाहनाला कधी धक्का मारुन सुरु करावे लागत होते तर कधी वाहन पंक्चर तर कधी लाईट खराब अशा बिकट परिस्थितीतही नितीन पाटील यांनी कधीही रूग्णांना मध्येच रस्त्यावर सोडले नाही.                  नितीन पाटील यांच्या सेवा काळात देवी निर्मूलन, नारु निर्मूलन, कुष्ठरोग निर्मूलन तसेच पल्स पोलिओ निर्मूलन च्या वेळी उत्तम सेवा
Image
  सामाजिक कार्यकर्तेअमित लाडगे यांचे दुःखद निधन कै.अमित(आप्पा) लाडगे         गोवे -  कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील मेढा येथील रहिवासी अमित (आप्पा )अनंत लाडगे यांचे गुरुवार दि.१ जून २०२२ रोजी आकस्मित दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ३५ वर्षांचे होते.त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वरूपाचा होता. तरुण वयात त्यांचे आकस्मित निधन झाल्यामुळे त्याच्या कुटूंबावर दुःखाचे सावट पसरलेले आहे.                        त्यांच्या पश्चात त्यांचे आई,वडील,पत्नी, एक मुलगी, दोन भाऊ, असा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.१० जून व उत्तरकार्य विधी रविवार दि.१२ जून २०२२ रोजी होणार आहेत.
Image
  शिवराज्याभिषेक शुभदिनी 'बा रायगडच्या' सदस्यांना किल्ले रायगडावरती दृष्टीस पडली ऐतिहासिक तोफ राज्यभिषेक सोहळ्याप्रसंगी तोफ दिसल्याने 'बा रायगड' परिवारात नवा उत्साह! कोलाड (श्याम लोखंडे ) बहुजन प्रतिपालक वंदनीय महाराष्ट्राचे आराध्य दैवत शूर वीर पराक्रमी योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून रोजी रायगड किल्ल्यावर भव्य असा 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न झाला . औत्सुक्याने आणि आदराने हा सोहळा जगभर पाहिला जातो .या सोहळ्याचे ऐतिहासिक मूल्य पाहता शिस्तबद्धतेच्या काळजीसह प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक असा हा अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला आहे. मात्र, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा ' गड किल्ले संवर्धन 'बा रायगड' परिवाराला मोठा प्रेरणादायी व उत्साह वाढवणारा ठरला असून छत्रपती शिवराय हे मनामनात शिवराज्याभिषेक घराघरांत' ही संकल्पना घेऊन किल्ले रायगडावर अत्यंत भव्यदिव्य प्रमाणात हा सोहळा साजरा झाला. शिवराज्याभिषेक शुभदिनी' बा रायगडच्या' सदस्यांना किल्ले रायगडावरती दृष्टीस पडली ऐतिहासिक तोफ ,राज्यभिषेक सोहल्याप्रसंगी तोफ दिसल्याने 'ब