Posts

Showing posts from May, 2022
Image
  अपेक्षा,लोभ सांडून भक्ती केली तर ती भक्ती यशापर्यंत नेते :- ह.भ.प. रामदास महाराज पाटील गोवे-कोलाड (विश्वास निकम) सर्व प्राणी मात्रात माणूस हा असंतुष्ट प्राणी आहे.फक्त बोलायला आहे.समाधान सोडून बोला, वाढलेल्या अपेक्षा, वाढलेला लोभ, यामुळे तो यशापर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे जर अपेक्षा,लोभ,सांडून भक्ती केली केली तरच ती भक्ती यशापर्यंत नेते असे मत रायगड भूषण ह.भ.प. रामदास महाराज पाटील यांनी वागणी येथील कार्यक्रमात व्यक्त केले. भक्ती आम्ही केली सांडूनी  उद्वेग l पावलो हे सांग सुख याचे ll१ll आंम्हा जाले धरिता यांचा  संग l पळाले उद्वेग सांडूनिया ll२ll तुका म्हणे सुख बहू जाले जिवा l पडली या सेवा विठोबाची ll३ll या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे रोहा तालुक्यातील रायगड भूषण ह.भ.प दळवी महाराज गुरुजी यांच्या अमृतमोहोत्सवा कार्यक्रमा निमित्त आयोजित किर्तनरुपी सेवेतून ते प्रबोधन  करत होते .          ३७३ वर्षापूर्वीचा काल त्या काळात प्रबोधन संत तुकाराम महाराज यांचे होते. तर प्रशासन शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे होते.तेव्हा समृद्धी कारण होते  म्हणजेच प्रबोधन कर्ते व प्रशासनकर्ते
Image
  तरुण आणि जेष्ठ यांनी एकमेकांचा आदर केला तर समाजाची घडी बसायला वेळ लागणार नाही:-प्रा. सुनिल देवरे गोवे-कोलाड (विश्वास निकम ) ज्या संघटनेला भरारी घ्यायची असेल तर युवकांनी हा विचार केला पाहिजे कि मी उद्याचा जेष्ठ आहे.व जेष्ठानी असा विचार केला पाहिजे कि मी कालचा तरुण होतो. तरुणांनी कार्यक्रमाचे आयोजन करावे परंतु त्यासाठी जेष्ठाचे मार्गदर्शन व सल्ला घेणे अधिक महत्वाचे आहे. कारण ते अनुभवाने मोठे आहेत.जेष्ठाना ही आव्हान आहे कि कृतीतून मार्गदर्शन केले पाहिजे.एखाद्या जेष्ठ उच्च पदावर असेल पण त्यांनी एखाद्या कार्यक्रमात पत्रावली उचलणायचे काम केले तर त्यातून दुसऱ्याला प्रेरणा मिळेल यामुळे तरुण जेष्ठ यांनी एकमेकांचा आदर केला तर समाजाची घडी बसायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन कोलाड विभाग आयोजित भव्य कुणबी मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहल्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुनिल देवरे यांनी केले. कुणबी समाजोन्नोती संघ मुबंई ग्रामीण शाखा रोहा ग्रुप कोलाड विभागाच्या वतीने आंबेवाडी कोलाड येथे आयोजित केलेल्या भव्य कुणबी समाज मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहल्याप्रसंगी ते विशेष मार्गदर्शनपर
Image
  रोहा तालुक्यातील भात खरेदी विक्री केंद्र बंद नाईलाजास्थव बळीराजा भात विक्रीसाठी  घेवाऱ्याच्या दारात, मनमानी नुसार शेकऱ्यांचा भात खरेदी, बळीराजा संकटात! कोलाड ( श्याम लोखंडे ) ईडा पीडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे ही म्हण सद्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी इतिहासात जमा झाली असल्याचे दिसून येत आहे एक ना अनेक संकट ही शेतकऱ्यांच्याच पाचवीला पुजली गेली आहेत शेतकरी हा आता नावापुरता बळीराजा राहिला आहे त्यामुळे राज्य सोडाच मात्र नशीबातली पीडा देखील सरता सरे ना संपूर्ण जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकऱ्याला आज मात्र अनेक संकटाला तोंड द्यावे लागत असून तालुक्यातील शासनाची भात खरेदी केंद्र बंद असल्याने नाईलाजाने बळीराजाला आपला धान घेऊन घेवाऱ्याच्या दारात विक्रीसाठी जावे लागत आहे त्यात घेवाऱ्याची मोठी मिज्जास त्याच्या मनमानी नुसार बळीराजाचा भात खरेदी करून घेत असल्याने त्यांच्यावर अधिक संकट ओढवले असल्याचे दिसून येत आहे. देशात रायगडची नोंद भाताचे कोठार म्हणून इतिहास आहे परंतु ती इतिहास जमा झाली की काय त्यामुळे बळीराजा अक्षरशः या ना त्या कारणांनी आता मेटाकुटीला आला आहे वाढती महागाई बदलत हवामान त्यात पीक क
Image
  सनातन संस्‍थेच्‍या वतीने पनवेल येथे २८ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडीचे'  आयोजन!    गोवे-कोलाड (विश्वास निकम ) सनातन संस्‍थेचे संस्‍थापक परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने संस्‍थेच्‍या वतीने हिंदु राष्‍ट्राच्‍या जागृतीसाठी ‘हिंदु राष्‍ट्र जागृती अभियान’ राबवण्‍यात येत आहे. या अभियानाच्‍या अंतर्गत *सनातन संस्‍थेच्‍या वतीने शनिवार, २८ मे २०२२ या दिवशी पनवेल येथील धूतपापेश्वर कॉर्नरजवळील स्वा. सावरकर चौक येथून सायंकाळी ५ वाजता 'हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्‍यात आले आहे.*  रायगड जिल्ह्यांतील विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना, सामाजिक संघटना, संप्रदाय, समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर यांच्यासह हिंदू बांधव मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी होणार आहेत.      आज कधी नव्हे एवढी हिंदू ऐक्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हिंदू धर्मीयांना जात, प्रांत, संप्रदाय आणि भाषा यांमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू ऐक्याचा विशाल अविष्कार दाखवून हिंदू बांधवांनी संघटित होणे आवश्यक आहे. भारतीय संस्‍कृतीचे दर्शन घडवत, संघटिपणाचा संद
Image
  ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपा  कटिबद्ध :-  आमदार ठाकूर प्रशांत ठाकुर रोहा देवकान्हे येथील शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपामध्ये जाहिर पक्ष प्रवेश कोलाड (श्याम लोखंडे ) आपल्या संपूर्ण परिसराला निसर्ग उत्तम साथ देत आहे. मोठ्या प्रमाणावर भरपूर पाऊस पडत आहे. अशी परिस्थिती असुनदेखील  शेतकऱ्यांची बिकट  परिस्थिती का  निर्माण झाली आहे. आज  शेतीसाठी उपयुक्त असलेले काळवे कोरडे पडलेले दिसत आहेत . अनेक योजना राबविल्या जात आहेत  परंतु आमचे कर्मदरिद्री पणा असा आहे की,  संबंधित खात्याचे मंत्री  मलई ओरबडून खातात त्यामुळे सर्वसामान्य जनतेला पाणी देण्याऐवजी त्यांच्या वाट्याला डोळ्यात अश्रू  येत आहेत , त्यामुळे आज तुमच्या आमच्या पैकी कुटुंबातील लोकांना नोकरीसाठी बाहेर जावे लागते .आज आमच्या हक्काच्या पाण्याबरोबरच विविध शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता आला असता तर आज आम्ही नशिबाचे स्वामी असतो. परंतु दुर्देवी असे ज्यांच्यामुळे ही आज परिस्थिती ओढवली ते राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना  व  काँग्रेस वाले गोरगरीब जनतेला विकासापासून वंचित ठेवाण्याचे काम करीत आहे. फक्त  पक्षपाती कारभार करून भाव
Image
  कोलाड ग्रुप कुणबी समाजाच्या वतीने भव्य कुणबी समाज मेळावा,व विद्यार्थी गुणगौरव सोहळा,ओबीसी प्रवक्ते सुनील देवरेंचे घडणार विद्यार्थी समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन कोलाड ( श्याम लोखंडे ) कुणबी समाजन्नोती संघ मुबंई संलग्न ग्रामीण शाखा रोहा ग्रुप कोलाड विभागाच्या वतीने भव्य कुणबी मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवारी 28 मे रोजी सायं ठीक 4 वाजता आयोजित करण्यात आले असून यावेळी ओबीसी प्रवक्ते तथा शिवसंस्कार प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा प्रा.सुनील देवरे यांचे समाज बांधव तथा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन घडणार आहे अशी माहिती देत यासाठी कोलाड विभागातील सर्व कुणबी बांधवांनी व गुणवंत विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोलाड ग्रुप विभागीय अध्यक्ष संदेश लोखंडे यांनी केले आहे.  कोलाड कुणबी समाज ग्रुप विभागाच्या वतीने भव्य कुणबी समाज मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित आंबेवाडी येथील मराठा पॅलेस चा बाजूला व घोणेमिल शेजारी या मेळाव्याचे व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून प्रसंगी शिव व्यख्याते व ओबीसी प्रवक्ते शिवश्री सुनील देवरे यांचे समाजाला तसेच विद्यार्थी
Image
  तळा पंचशील विकास संस्थेच्यावतीने गरिब गरजू  विद्यार्थ्याना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप व कौतुक सोहळा मोठ्या दिमाखात सपंन्न तळा (कृष्णा भोसले) किरणशेठ देशमुख सभाग्रह  येथे  समाजातील नोकरी व्यवसाय नसलेल्या बांधवाच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ई.पहिली ते दहावी विद्यार्त्यांसाठी डाँक्टर बाबासाहेब  आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने सन्मानिय अध्यक्ष मा. एन के. जगताप यांच्या अध्यक्षते खाली अतिशय स्तुत्य आणी प्रेरणार्थक उपक्रम प्रथमच हाती घेन्यात आला आहे. याचाच शुभारभं म्हणून 22 तारखेला. याची सुरुवात करण्यात आली आहे. महामानवाच्या प्रतिमेस वंदन करुन  उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन सदर कार्यक्रम सुरु झाला.  याच अनुषगांने कोरोनाच्या कठिण काळात सुद्धा महिला बचत गटाच्यावतिने 95 सभासद बनवून  समाजातील भगिनींना अर्थिक सहाय्यानें ऊभे रहाण्याची शक्ती दिली तसेच  दिड लाखाची पुंजी ऊभी केली याबद्द्ल त्यांचे सुद्धा कौतुक करन्यात आले तसेच पुढिल वाटचालीस चालना देण्यात आली सदर कार्यक्रमास तालुक्यातिल अनेक क्षेत्रातिल मान्यवर तसेच ग्रामस्थ मान्
Image
  राहुल मगर यांच्या शाही शुभविवाह सोहळ्यास खासदार सुनिल तटकरे यांची प्रमुख उपस्थिती  कोलाड नाका  (शरद जाधव) रायगड जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस ओ बी सी रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेशजी मगर यांचे सुपुत्र चिरंजीव राहुल यांचा शाही विवाह सोहळा सनई सुराच्या मंजूळ स्वरात मोठ्या थाटामाटात पार पडला.          चिरंजीव राहुल व चि सौ का पूनम (नामदेव जाधव धनगर आळी रोहा यांची कन्या) या दोन्ही उभयंतास शुभआशिर्वाद देण्याकरिता रायगड चे खासदार सुनिलजी तटकरे आमदार अनिकेत तटकरे आवर्जून उपस्थित  होते.       त्यांच्या समवेत कार्याध्यक्ष मधुकर पाटील. तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पासिळकर, रोहा तालुका समन्वय समिती सदस्य विजयराव मोरे, शंकरराव भगत, अनिल भगत, मारुतीराव खरिवले, माजी नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे, समीर शेडगे, लालताप्रसाद कुशवाह, समिरभाई सकपाळ, नितीन शेट तेंडुलकर, मयुर दिवेकर, महेश कोल्हटकर, शिवरामभाऊ शिंदे, बाळशेट खटावकर, पत्रकार महादेव सरसंभे, काशिनाथ धाटावकर, शिवरामभाई महाबळे खांडेकर सर, खेळू ढमाळे, वसंत मरवडे, अनंत मगर,अरविंद मगर, गुनाजी पोटफोडे, कुणबी समाजातील मान्यवर समाज बांधव मोठ्या संख्यने  उपस्थित  होते.
Image
तळा तालुक्यातील    शेणाटे येथे मागील भांडणाच्या रागातून एकास जबर मारहाण! जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील शेणाटे येथे मागील भांडणाच्या रागातून एकास जबर मारहाण करण्यात आली असून जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की शेणाटे येथील दिनेश बटावले हे रिक्षातून तळा येथे येत असताना  मौजे खांबवली गावच्या स्मशानभूमीजवळ आरोपी रुपेश बटावले व गणेश बटावले हे अचानक रिक्षाच्या समोर येऊन त्यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करीत दिनेश बटावले हे बसलेल्या रिक्षाची  समोरील काच दगड मारून फोडली.तसेच रिक्षा चालक बाहेर पडल्यानंतर दोन्ही आरोपींनी दिनेश बटावले यांना बाहेर काढून हाता बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दिनेश बटावले यांना जवळच असलेल्या स्मशानभूमीजवळ ढकलत घेऊन जात त्यांना खाली पाडले व दोन्ही आरोपींनी मोठमोठ्या दगडांनी त्यांच्या उजव्या पायावर मारून पाय मोडला शिवाय डोक्याला देखील गंभीर दुखापत करून दमदाटी केली व तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी घट
Image
  पाण्याचा इतर स्रोत नसल्याने महिलांना जीव मुठीत धरून आणावे लागते पाणी! तळे तालुक्यातील कोंडखोल आदिवासी बांधवांची व्यथा! तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील कोंडखोल आदिवासी वाडी येथे असलेली विहीर धोकादायक स्थितीत असून या विहिरीमुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोंडखोल आदिवासीवाडी येथे पाण्याची समस्या अत्यंत गंभीर आहे.वाडीत पाण्याच्या नळाची व्यवस्था नाही.कोणताही धरण अथवा तलाव नाही पाण्याचा कोणताही स्रोत नाही.वाडीत केवल दोन विहिरी असून त्यातील एका विहीरितील पाणी उन्हाळ्यामुळे आटले आहे.तर दुसऱ्या विहिरीत पाणी आहे परंतु विहीर धोकादायक स्थितीत असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. कोंडखोल येथील आदिवासी महिलांना पाण्याचा इतर पर्याय नसल्यामुळे जीव मुठीत धरून या विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोंडखोल आदिवासी वाडीसाठी पाईपलाईन टाकून नळाद्वारे पाणी येईल अशी व्यवस्था करावी किंवा एखादी बोअरिंग मारून द्यावी अशी  मागणी येथील  खोंडकोल आदिवासी बांधवांनी केली आहे.येथील विहीर धोकादायक स्थितीत असूनही पा ण्याचा ईतर स्रोत नसल्याने महिलांना जीव मुठीत धरून आणावे लागते पाणी लागते.
Image
  ध्येय मोठे ठेवले तर माणूस मोठा होऊ शकतो:- पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर    गोवे-कोलाड ( विश्वास निकम ) आपण सत्य, शांतता, अहिंसा या प्रगतीच्या मार्गाचे पालन करत आहोत याचबरोबर आपल्यात मतभेद असतील ते बाजूला ठेऊन प्रगतीचा मार्ग कसा प्राप्त करता येईल याचे भान ठेवला पाहिजे.विविध सरकारी योजना  आहेत त्यांचा लाभ घेतला पाहिजे. पोलिस भरतीसाठी कलेक्टर साहेबांनी शनिवार,रविवार ऑनलाईन क्लासेसचे प्रशिक्षण सुरु केले आहेत त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे ध्येय मोठे ठेवले तर माणूस मोठा होऊ शकतो.१२ वी नंतर पोलिस भरती, पदवीधर नंतर युपीएससी,एमपीएससी परीक्षा देऊ शकतो.यासाठी सर्वांना सारखी संधी दिलेली आहे यात टक्केवारीची अट नाही यामुळे एकत्र येऊन जयंती साजरी केली तर स्पुर्ती मिळते असे मत सिद्धार्थ विकास संघ गोवे येथे भगवान गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ संयुक्त जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पोलिसनिरीक्षक प्रमोद बाबर यांनी व्यक्त केले.    तर नरेश गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आपण शिकलो, संघटित झालो परंतु आपल्याला संघर्षकुठे कराय
Image
  दादर येथे ‘हिंदू एकता दिंडीत हिंदु राष्ट्राचा हुंकार!    २५ हिंदुत्वनिष्ठ व सामाजिक संघटना, संप्रदाय आणि मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग!    गोवे-कोलाड (विश्वास निकम ) सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त दादर, मुंबई येथे २१ मे या दिवशी संपन्न झालेल्या हिंदू एकता दिंडीत हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचा हुंकार दिला. या दिंडीमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हयांतील १ हजार ५०० हून अधिक हिंदू बांधव सहभागी झाले होते.    या फेरीमध्ये शिवसेनेचे आमदार श्री. दिवाकर रावते, भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर, सनातन संस्थेच्या सद्गुरू (सुश्री) अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेच्या संत पू.(सौ.) संगीता जाधव, वसई (मेधे) येथील श्री परशुराम आश्रमाचे संचालक भार्गवश्री बी.पी.सचिनवाला, गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री. प्रवीण कानविंदे आदी मान्यवरांची वंदनीय उपस्थिती लाभली. हिंदु राष्ट्र सेना, राष्ट्रीय बजरंग दल, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ, हिंदू गोवंश रक्षा समिती, हिंदू हेल्पलाईन, भारत स्वाभिमान, भगवा गार्ड,
Image
  महाराष्ट्राच्या  विधिमंडळात संभाजी राजांची प्रतिमा,  आमदार अनिकेत तटकरे यांनी रायगड वासियांची मान उंचावली! कोलाड़ नाका (शरद जाधव)  लोकप्रतिनिधी कसा असावा. त्याच्याकडे दूरदृष्टी कोन असावा.विविध बारकावे हेरण्याची कला असावी.आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी विधिमंडळाच्या सभागृहात आमचे दैवत छत्रपती संभाजी राजे यांची प्रतिमेचा फोटो लावन्यात यावा ही मागणी केली. अणि ती मागणी तत्काळ मान्य देखील झाली. अणि रायगड वसियांची मान उंचावली. या मागणीचे खरोखरच कौतुक होत असुन वा भाई तुम्ही कमालच केलीत अशी चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे.           महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या सभागृहात थोर महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.परंतु  महाराष्ट्राचे आराध्य दैवत दुसरे छत्रपती संभाजी राजे यांची प्रतिमा कुठेही लावण्यात आली नाही असे लक्षात येताच आमदार अनिकेतभाई तटकरे यानी सभापती महोदय यांच्याकडे मागणी केली, व मागणी तत्काळ मान्य करित संबधीताणा कार्यवाहीसाठी आदेश दिले.त्यामूळे विधीमंडळाच्या सभागृहात लवकरच संभाजी राजांची प्रतिमा स्थापन होइल. थोर महापुरुषांनी केलेले कार्य आपल्या कायम स्मरणात रहावे त्यांची स्फुर्ती आ
Image
  रोहा सांगडे येथील मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद 150 हुन अधिक रुग्णांनी घेतला लाभ, निदानावर केले जाणार  मोफत उपचार! खांब (नंदकुमार कळमकर ) रोहा तालुक्यातील सांगडे येथे लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा ,पनवेल हॉस्पिटल पनवेल, तक्षशिला बौद्ध विकास संघ सांगडे यांच्या विद्यमाने व ग्रामस्थ महिला व युवक मंडळ सांगडे यांच्या सहकार्याने तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते याला येथील रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यात 150 हुन अधिक रुग्णांची तज्ञ डॉक्टरांच्या वतीने मोफत तपासणी करण्यात आली तर पिवळे व केसरी रेशनकार्ड धारक यांच्या निदानावर पनवेल हॉस्पिटल पनवेल यांच्या मार्फत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले जाणार आहेत . भगवान गौतमबुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून सर्व आजारांवर विशेषतः स्रियांच्या विविध आजारांवर आयोजित केलेल्या या मोफत शिबिरात रक्तातील साखरेचा प्रमाण व ब्लेड प्रेशर तसेच महिलांच्या विविध आजारांच्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मोफत तपासणी करण्यात आली तसेच त्यांच्यावर मोफत उपचा
Image
  जग तारण्याचे कार्य अखंडितपणे संतांनी केले:- ह.भ.प.भरत महाराज जोगी     गोवे-कोलाड (विश्वास निकम ) ज्या ज्या वेळी  जगावर संकटे आली त्याच्या वेळी जगाला तार ण्याचे महान कार्य संतांनी केले. जग भरपूर पुढे गेला आहे कि आता पायात बुटे घालून जेवायला लागला आहे आता पन्नास टक्के सुधारला आहे.दहा वर्षानंतर हे बुटात भात घेऊन खातील म्हणजे शंभर टक्के सुधारले.कपडे सुधारले कडक इस्त्रीचे कपडे हजार लफडे, बोली भाषा सुधारली आपले दुर्भाग्य आहे. भगवंतांचे एवढे उपकार आहेत हा देह त्यांनी बनविला व संतांनी भगवंताची ओळख करुन दिली म्हणून जग सुधारण्याचे कार्य संतांनी केले असे प्रतिपादन ह.भ.प.भरत महाराज जोगी बीड,परळी वैजिनाथ यांनी केले. आतां तुम्ही कृपावंत l साधूसंत जिवलग ll१ll गोमटे ते करा माझे l भार ओझे तुम्हासी ll२ll वंचिले पाया-पाशी l नाही याशी वेगळे ll३ll तुका म्हणे सोडविल्या गाठी दिली मिढी पायासी ll ४ll या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे स्पष्ट केले.   म्हणून ज्ञानदेवा सारखा संत नाही,ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदाया सारखा पंथ नाही.बाकी आले तसे गेले हा मात्र अनाधिकाळापासून जशाच तसे
Image
        तळा चरई आदीवासीवाडीवर तहसिलदारांची  तातडीची मदत,तर समाजसेवक कृष्णा महाडीक घर बांधून देणार ?   न्यूज आज तक मराठीच्या पाठपुराव्याला यश!  तळा( कृष्णा भोसले  ) रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील चरई आदीवासीवाडीवर 19मे रोजी पहाटे 4:15 वाजता भिंत कोसळुन आदिवासी मुलगी जागीच ठार तर अन्य तीन जण जखमी झाल्याची बातमी न्यूज आज तक मराठीने सर्वप्रथम दिली होती या बातमीचा विविध अधिकाऱ्यांनी  समाजसेवकांनी दखल घेतली असून आदिवासी कुटुंबावर कुटुंबावर झालेल्या  दुःखद घटनास्थळी तातडीने धाव घेत त्यांना तातडीची स्वखर्चातुन मदत करणारे तळा तहसिलदार अण्णाप्पा कन्नशेटटी यांनी कुटुंबाला थोडाफार आधार दिला असून रायगड भूषण समाजसेवक कृष्णा महाडिक हे  या कुटुंबाला घर बांधून देण्यास मदत करणार आहेत.      कुटुंबांवर झालेला हा आघात कधिही भरून न निघणारा आहे.त्यात एक आठ वर्षांची मुलगी दगावली असुन अन्य जखमींवर उपचार चालू आहेत. अशा कुटुंबाला सावरण्यासाठी शासकीय मदतीची गरज आहे.जे जे काय देता येईल ते सुद्धा पहाण्याची गरज असल्याचे अनेकांच्या तोंडून शब्द निघत आहेत.   आदिवासी विकास प्रकल्प अधिकारीनीं भेट न दिल्याने रायगड जिल्
Image
  चरई आदिवासी वाडी येथे भिंत कोसळून ८वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू तर, तीन जण जखमी! तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील चरई आदिवासी वाडी येथे भिंत कोसळून आठ वर्षाची मुलगी मृत पावली असून तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की चरई आदिवासी वाडी येथे रहात असलेल्या सुनिता अशोक मुकणे या आपल्या चार मुलांसह घरी रात्री झोपल्या असता सकाळी ४.१५ च्या सुमारास मोठा आवाज झाल्याने त्या जाग्या झाल्या असता भिंत कोसळून त्याखाली सुवर्णा मुकणे( वय ८)  संतोष मुकणे(वय १०) ,तन्वी मुकणे(वय ४),तुषार मुकणे(वय ८),ही आपली मुले ढिगाऱ्याखाली अडकल्याचे त्यांनी पाहिले.व तात्काळ त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.त्यांचा आवाज ऐकूनच शेजारी रहात असलेले ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले व त्यांनी ढिगारा बाजूला करून सर्व जखमींना बाहेर काढले.यावेळी डॉक्टरांना बोलावले असता डॉक्टरांनी गंभीर जखमी झालेली सुवर्णा अशोक मुकणे वय वर्षे ८ ही मृत झाल्याचे सांगितले तसेच दोघा जखमी मुलांना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथून असून दोघांना मुंबई येथे हालविण्यात आले आहे.
Image
  कोलाडातील महिला असुरक्षित भरवस्तीत गळ्यातील दागिने लंपास!  कोलाड नाका (शरद जाधव) मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड नाक्यावर भरवस्तीत एका महीलेच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकारामुळे सर्वत्र भितिचे वातावरण पसरले असुन कोलाड़ातील महिला असुरक्षीत असल्याची भावना नागरिक व्यक्त करित आहेत.             सविस्तर वृत असे की कोलाड़ आर डी सी  बँक जवळ राहणारी महिला सुनिता यशवंत महाबळे या दुपारच्या सुमारास हळदी सभारंभातून घरी पोहचल्या. घराचा जिना चढत असताना चोरट्यांनी त्याना गाठले. व दागिने कशाला घालताय? चोरी होते हे तुम्हाला माहित आहे ना, असे म्हणताच त्या महिलेने गळ्यातील दागिने काढले. व क्षणात मोठ्या शिताफ़ीने त्या दोन चोरट्यांनी सुमारे दिड लाखाचे गळ्यातील दागिने लंपास केले.व हेल्मेट घालुन पसार झाले.             दरम्यान कोलाड़ला आता पोलिस स्टेशनचा दर्जा प्राप्त झाला आहे.त्यामूळे या ठिकानी पोलिस टिम आहे.असे असताना चोरीच्या गुन्ह्याचा शोध लावण्यास पोलिसाना यश येत नाही.मागिल दिड वर्षात भिरा रोडवर एका महिलेच्या गळ्यातील दागिने चोरले होते, तर एका घरातूनच दागिने लंपास करण्य
Image
  सिद्धार्थ विकास संघ गोवे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन!     गोवे-कोलाड (विश्वास निकम ) सिद्धार्थ विकास संघ गोवे (रजि.)मुंबई यांच्या विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती शनिवार दि २१ मे २०२२ रोजी गोवे येथे विनोद शांताराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असून या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.         यानिमित्ताने सकाळी ९.००वा.बौद्ध उपासक योगेश जाधव पहूर यांच्या सुभेहस्ते ध्वजारोहण व बुद्ध पूजन,सकाळी ११ वा.सांस्कृतिक कार्यक्रम,सायंकाळी ४.०० वा.नविन बौद्धवाडी ते शिवाजी महाराज स्मारकापर्यंत भव्य मिरवणूक,रात्री ७.०० वा. जाहीर सभा रात्री ९.०० वा.हृतिक कांबळे आणि संच मुंबई यांचा ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात येणार असून यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद बाबर पो.नि. रोहा,सुभाष जाधव सहा. पो. नि. कोलाड,विकास शिंदे बौ.पं. स.रोहा तालुका अध्यक्ष,महेंद्र पोटफोडे आदर्श सरपंच गोवे,नरेंद्र जाधव विभागीय अध्यक्ष,नरेश गायकवाड सचिव युवा
Image
  तळा नगर पंचायत पाणी,विज प्रश्नावरुन  भाजपा नेते रविभाऊ मुंढे पत्रकार परिषदेत क डाडले?     भाजपातर्फे साखळी उपोषणाचा इशारा! त ळा (कृष्णा भोसले)   नगर पंचायत ह तळा द्दीतील पाणी,विज प्रश्नावरुन भाजपा नेते रविभाऊ मुंढे कडाडले असुन येत्या काही दिवसांत भाजपा तर्फे   साखळी उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. तळा शहराला नव्याने पाणीपुरवठा योजना व्हावी. यासाठी आम्ही नगरपंचायत सत्तेत असताना प्रयत्न करुन ९९ टक्के काम जवळपास मंजुरी साठी पुर्णत्वास आले नगरपंचायत निवडणुका आचार संहितेत हे काम थांबले पण आजतागायत हे काम का होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या कामांचे श्रेय तुम्ही घ्या परंतु  जनतेला पिण्याचे पाणी मुबलक मिळु द्या.असेही त्यांनी म्हटले.या कामात पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आम्हाला  मंत्रालयात या कामी मदत केली हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितले. तळा शहरात रस्ते विकास महामंडळाच्या दिघी पोर्ट कडे जाणारा रस्ता होत असताना त्यांच्या सहकार्याने हायमिस्ट दिवे चौदा पोल उभारुन लावण्यात आले आहेत.परंतु हे दिवे सुरू केल्यास यांचे लाइट बिल कोण भरणार असा प्रश्न निर्माण करून आजपर्यंत हे दिवे सुरू