Posts

Showing posts from May, 2023
Image
  सासू सुनेचा योगायोगाने एकाच दिवशी उत्साही वातावणात वाढदिवस साजरा   कोलाड (विश्वास निकम,रायगड भुषण )  चिल्हे गावातील सुनंदा गोविंद महाडिक यांचा ८० वा तर त्यांची सुन नेहा नथुराम महाडिक यांचा ४४ वा वाढदिवस मोठया उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.सासू सुनेचा वाढदिवस एकाच दिवशी येणे केवळ योगायोग असून असे क्वचितच घडू शकतो.     सुनंदा महाडिक या वयाच्या ८० वर्षी ही विविध प्रकारची कामे उत्तम प्रकारे करीत असून तरुण वयात त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या एक मुलगा व एक मुलगी यांचा मोठया मेहनतीने सांभाळ केला.परंतु त्यांच्या मुलीचे ही लग्न झाल्यानंतर तीन चार वर्षातच  मुलीला एक मुलगी व एक मुलगा झाल्यानंतर तरुण वयात मुलीचा ही मृत्यू झाला.परंतु त्यांनी सर्व दुःख विसरून न डगमगता नात व नातू यांना मोठे केले.व मुलाचे ही लग्न केले.      अशीच सर्व दुःख पाठीशी घालत मुला मुली नंतर नातवंडे यांचा उत्तम प्रकारे सांभाळ करणारी सुनंदा यांचा वाढदिवस साजरा करतांना आमची बय मायाळू,आमची बय सुगरण,आमची बय सोज्वळ,आमची बय कडक, आमची बय कर्तव्य दक्ष,आमची बय शिस्त प्रिय,आमची बय मायेची पाखरण,मुलगा व नातवंडे यांची ला