जूनी पेन्शन हक्क संघटना माणगाव विद्यमाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर सरकार सकारात्मक विचार करेल असे आश्वासन! रायगड (भिवा पवार) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत लागलेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शासनाने 100% अनुदान हा निकष वापरून नाकारले .मात्र असे शिक्षक कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्रात फारच कमी आहेत. अशा शिक्षक कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी म्हणजे फक्त पंचवीस हजार आहे .त्यामुळे शासनाला अशा कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना देण्यास फार खर्च येणार नाही. तसेच काही शिक्षक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत ,तर काही दिवंगत झाले आहेत. त्यांच्या कुटुंबाचे खूपच हाल होत आहेत.संबंधित कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या डिसीपीएस व एनपीएस या योजना सरकारला व संबंधित कर्मचाऱ्यांना किती तोटयाच्या आहेत हे पटवून देण्यासाठी माणगाव तालुका जूनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष राजन पाटील , सचिव विदयाधर जोशी ,उपाध्यक्ष तथा माणगाव तालुका शिक्षकेत्तर कर्मचारी अध्यक्ष गणेश पवार ,माणगाव तालुका शिक्षक सेना अध्यक्ष चद्रकांत आधिकारी आदी मान्यवरांसह अनेक सदस्य महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत
Posts
Showing posts from October, 2021
- Get link
- X
- Other Apps
आमडोशी येथील श्री समर्थ कृपा बचत गटाचा रांगोळी व्यवसाय, ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद गोवे-कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील आमडोशी येथील श्री. समर्थ बचत गटाचा विविध सण उत्सवासाठी नेहमी व्यवसाय सुरु असतो रक्षाबंधन साठी राखी बनवणे, लग्न समारंभ यासाठी पापड, लोणचे,विविध वस्तू,कोरोना काळापासून मास्क बनवून विविध संस्थेला विक्री करणे असे विविध उपक्रम या श्री समर्थ कृपा बचत गटाचा उपक्रम वर्षभर सुरु असतो याचप्रमाणे सद्या दिवाळी साठी लागणारे विविध प्रकारच्या कलरच्या रांगोळी बनवून त्या विक्री साठी उपलब्ध आहेत. रोहा तालुक्यातील आमडोशी येथील श्री समर्थ कृपा संयम साहय्यता बचत गटाच्या विविध प्रकारच्या व्यवसायामुळे मागील वर्षी या बचत गटाचा रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे. यामुळे रोहा तालुक्यातील इतर बचत गटांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. या विविध व्यवसायासाठी आमडोशी येथील श्री समर्थ कृपा बचत गटाचाअध्यक्षा, संपदा जांबेकर,उपाध्यक्षा रसिका गोळे,सचिव दिक्षीता जांबेकर.सिआर पी दीपाली गोळे,बँक सखी वर्षा जांबेकर,अपर्णा जांबेकर ,वृषाली जांबेकर ,साधना जाधव, रोहिणी गोळे, कविता जांबेकर,प
- Get link
- X
- Other Apps
रोहा तालुक्यातील शिक्षकांनी केला शिक्षक अजय कापसेंचा सन्मान , कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक अजय कापसे (निमंत्रित सदस्य ,रा जि प जिल्हा शिक्षण व क्रीडा समिती) यांचा रोहा तालुका वरिष्ठ वेतनश्रेणी गट व शिक्षकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. अजय कापसे यांची रायगड जिल्हा शिक्षण समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्या नंतर जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची विविध प्रलंबित असलेली कामे मार्गी लागले आहेत.यात प्रामुख्याने वरिष्ठ वेतनश्रेणी , मेडिकल बिल, पदवी परवानगी, भविष्य निर्वाह निधी सह प्रकरणे व इतर कामे अतिशय जातीने लक्ष घालून जिल्हा परिषदेतून पूर्ण केले आहेत ,तसेच विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्न संदर्भात सातत्याने मेहनत घेऊन ते काम निस्वार्थ भावनेने व प्रामाणिकपणे पूर्णत्वास घेऊन जात आहेत.त्यामुळे तालुक्यातील रोहा तालुक्यातील शिक्षक मंडळींनी अजय कापसे सरांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले.व त्यांनी केलेल्या कामांची दखल घेत सन्मान कर्तृत्वाचा म्हणून शिक्षक अजय कापसे (निमंत्रित सदस्य ,रा जि प जिल्हा शिक्षण व क्रीडा समिती) यांचा सन्मान रोहा
- Get link
- X
- Other Apps
रोटरी क्लब रोहा तर्फे ई-कचरा संकलन मोहीम रोहा शहर व आजूबाजूचा परिसर ई कचरामुक्त होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ रोहाचा स्तुत्य उपक्रम, गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोटरी क्लब ३१३१ व रोटरी क्लब ऑफ रोहा यांच्या पुढाकाराने रविवार दि.२४ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता रोहा शहरातील विविध ठिकाणी ई-वेस्ट इलेक्ट्रॉनिक कचरा संकलन करण्याचा पुढाकार घेऊन कचरा जमा करण्यात आला आहे. या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी व या कचऱ्याच्या संकटातून रोहा शहराला बाहेर काढण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न या संस्थेमार्फत या पुढे करण्यात येणार आहे. या कचर्याच्या संकटातून रोहा शहराला बाहेर काढण्यासाठी सर्व नागरिकांना रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर वीरेंद्र नुला यांनी आवाहन केले आहे की, आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करीत आहोत की, तुमच्या घरातील ई कचरा या संकलन मोहिमेमध्ये आणून द्या. आणि त्याचा योग्य पुनर्वापराची हमी आम्ही देतो. तरी रोहावाशीयांनी जास्तीत जास्त संख्येने या मोहिमेमध्ये सहभागी होऊन पर्यावरण संरक्षणास मदत करू या. असे त्यांनी सर्वांना आवाहन केले आहे. रोहा शहरातील मार
- Get link
- X
- Other Apps
महापुराच्या काळात मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपणारे खरे योद्धे : खासदार सुनिल तटकरे रोह्यात माणुसकीचा पुर गौरव सोहळा ! कोलाड (श्याम लोखंडे ) गेल्या दोन वर्षात रायगड वासियांना कोरोना महामारी, निसर्ग चक्रिवादळ, तोक्ते चक्रिवादळ तसेच महाडमध्ये महापुराने थैमान घातले. 22 जुलै रोजी रात्रिच्या वेळी पावसाचा जोर वाढत असतानाच आ.अनिकेत तटकरे हाफ पँट घालून घराच्या बाहेर अंधा-या रात्री पडताच मी त्याला विचारले आता रात्री कुठे चाललास? त्यावर आ.अनिकेत तटकरे म्हणाले पावसाचा जोर वाढत आहे आणि महाडच्या नागरिकांना पुराचा विळखा बसत चालला आहे त्यांना ख-या अर्थाने मदतीची गरज आहे. त्यामुळे मी मदतीला बाहेर निघत आहे.माझी काळजी करु नका. त्याचबरोबर ना.अदिती तटकरे गुडघाभर पाण्यातून मदत कशी करता येईल याचा प्रयत्नात पुढे आली. अश्या परिस्थीतीत सकाळपासूनच मदतीचा ओघ महाडवासियांना सुरु झाला. त्यात पाण्याच्या बाटल्या, बुस्किटे प्रथम मदत पोहचत रायगडच्या तमाम सामाजिक संस्था व कार्यकर्ते आणी दानशूर व्यक्तिमत्व पुढे आले. या सर्वांची साथ घेत पुढे अनिकेत तटकरे आणी अदिती तटकरे पुरग्रस्थाना मदत करत होती.त्याचबरोबर चिखल
- Get link
- X
- Other Apps
किरण लडगे यांच्या लक्ष्मी पाईप कंपनीचे कार्य उल्लेखनिय आमदार अनिकेत तटकरे गोवे-कोलाड ( विश्वास निकम ) सुतारवाडी येथील लक्ष्मी पाईप कंपनीचे मालक किरण लडगे यांच्या लक्ष्मी पाईप कंपनीतून तयार होणारे सिमेंट पाईप हे उत्तम दर्जाचे असून गेली अनेक वर्षे या कंपनी मार्फत उत्पादित होत असलेले सिमेंट पाईप जिल्ह्याबाहेर ही विक्रिसाठी उत्तम दर्जामुळे गेलेले आहेत. लक्ष्मी पाईप कंपनीचे कार्य उल्लेखनिय असल्याचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी हरे कृष्ण कार्पोरेशन सुतारवाडी यांच्या एच.डी.पी.ई. पाईप व पी.व्ही.सी. पाईप सुपर स्टॉकिस्ट नेमणुकीचे सर्टिफिकेट वितरण आणि वितरण विभागाचे उद्घाटन प्रसंगी सांगितले. या वेळी रायगड च्या पालकमंत्री आदिती तटकरे तसेच येरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच विमल दळवी, सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते कुडली, सुतारवाडी, कोलाड, धाटाव, रोहा, नागोठणे विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते. किरण लडगे यांनी सुतारवाडी परिसरात लक्ष्मीपाईप कंपनी ही अनेक वर्षापूर्वी सुरु करून स्थानिकांसह अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. या कंपनी मार्फ
- Get link
- X
- Other Apps
समाजसेवक निलेश भाई महाडीक यांच्या तर्फे कोलाड कुष्ठरोगी रूग्णांना फळे वाटप, गोवे-कोलाड(विश्वास निकम ) पुई येथील समाजसेवक व युवा नेते निलेश भाई महाडीक यांनी रविवार दि.२४ ऑक्टोबर २०२१रोजी कोलाड येथील कुष्ठरोगी दवाखान्यात सदिच्छा भेट देऊन तेथील रुग्णांना नेहमी प्रमाणे फळांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासून तसेच समाजकार्यातून त्यांचे हे कार्य अतिशय उत्कृष्ठ आहे.समाजातील गरजु नागरिकांसाठी त्यांचे मद्दतीचा हात नेहमी तत्परतेने पुढे असुन त्यांच्या या कार्याबद्दल कुष्ठरोगी दवाखान्यातील मा श्री, दिपक भोसले यांनी त्यांचे आभार मानले, यावेळी या फळे वाटप कार्यक्रमात समाजसेवक युवा नेता निलेशभाई महाडिक,ईकिदंर शेवाळे,गौरव नाईक,संजय कणघरे, राजु सुतार,सचिन सागळे,महेश अधिकारी, यांच्यासह कोलाड कुष्ठरोगी दवाखान्यातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
सरकारी तांत्रिक अडचणीमुळे रायगडातील शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी महागाई भत्त्यापासून वंचित, पे-युनिटचे अक्षम्य दुर्लक्ष! शिक्षक संघटना मूग गिळून गप्प, नेतृत्व पडतय कमी! रायगड (विशेष प्रतिनिधी) 1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्ती होऊनही केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना D.C.P. S व नंतर काही काळांनी NPS ही योजना लागू केली.खर तर ही योजना 2005 नंतर शासकीय सेवेत लागणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असताना देखील रायगड जिल्ह्यात मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे लागू झाली आहे. तुलना करता राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती नाही. इतर जिल्ह्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचे P F कपात सुरळीतपणे सुरु आहे .हा केवढा फरक आहे. त्यातही रायगड जिल्ह्यातही काही शाळांतील कर्मचाऱ्यांचे P F कपात सुरळीतपणे सुरू आहे. ही पे -युनिट ची विरोधी ,दुटप्पीपणाची भूमिका आहे. दिवाळी सणाचा आनंद घेण्यासाठी शासनाने दिवाळी पूर्वी सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव 5% महागाई भत्याचा फरक देण्यासाठी परिपत्रक काढले.हा महागाईचा फरक सर्व कर्मचाऱ्यांना दयायचा होता मात्र रायगड ज
- Get link
- X
- Other Apps
विद्यार्थ्यांचें शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हूणन एस.टी. बस सुरु करणेबाबत कुमशेत परिसरातील ग्रामस्थांनी दिले माणगाव आगार प्रमुखांना निवेदन रायगड (भिवा पवार) गोरेगाव येथे शाळा तसेच महाविदयालयीन शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या शिरवली,कुमशेत,ढाकशेळी, मांजरोने बाट्याचीवाडी, आंबेगाणी,वडघर मुद्रे, या परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून साई- कुमशेत मार्गे गोरेगाव ही एसटी बस सुरू करावी यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी माणगाव आगार प्रमुखांना निवेदन दिले आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की कुमशेत, मौजे शिरवली, ढाकशेळी, शिरवली, बाट्याचीवाडी, मांजरोने वडघर आंबेगाणी या गावातील बहुसंख्य विद्यार्थी हे गोरेगाव येथे शाळा व कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी गोरेगाव जातात कॉलेजची वेळी 7: वाजता असल्यामुळे त्यांना कॉलेजला जाण्यासाठी वाहन नसल्यामुळे विद्यार्थी शाळा कॉलेजला वेळेवर जाता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक नुकसान होत आहे. गोरेगाव कुमशेत मार्गे मांजरोने साई ही एसटी बस ही 6:30 वाजता एसटी बस सेवा सुरू कराव
- Get link
- X
- Other Apps
हरवलेल्या रस्त्याच्या शोधात गटविकास अधिकाऱ्यांसह बांधकाम अभियंते पोहोचले करंबेळी ठाकूरवाडीत, मात्र अभियंत्यांना ग्रामीण मार्ग सापडेना अखेर ग्रामस्थांनी दाखविला त्यांच्या वहिवाटीचा मार्ग खालापूर ( महेश झोरे) खालापूर तालुक्यातील करंबेली ठाकूरवाडी आणि खडई धनगरवाडा येथील आदिवासी बांधवां ना रहदारीसाठी मार्ग उपलब्ध नसतानाही रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने वरिष्ठांकडे चुकीचे माहिती देत ग्रामीण मार्ग क्रमांक 132 करमळी ठाकुरवाडी आणि खडई धनगरवाडा या गावांसाठी जोड रस्ता असल्याचे कळविले होते परंतु ह्या वाड्यांना जोडणारा मार्ग प्रत्यक्षात उपलब्धच नसल्याने येथील आदिवासी आणि धनगर समाज बांधवांनी सहा ऑक्टोबरला ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेवर मोर्चा नेला होता या मोर्चा दरम्यान आदिवासी बांधवांनी त्यांचा रस्ता शोधून द्या अन्यथा दहा नोव्हेंबरपासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिल्या नंतर आपल्या कार्यालयातून बाहेर न पडणारे खालापूर उप अभियंता गोपणे खालापूर प.स.शाखा अभियंता नागेश टाकणे यांच्यासह खालापूर प.
- Get link
- X
- Other Apps
सुकेळी येथून मोबाईल चोरीला चोराचा फोटो कॅमेऱ्यात कैद हाच तो मोबाईल चोरी करून गेलेला चोर कॅमेरात कैद गोवे-कोलाड (विश्वास निकम ) सुकेळी येथील आशिर्वाद पान शॉप येथून रेलमी सी.२५ हा १००००रु. किंमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला असून चोरट्याचा फोटो कॅमेऱ्या कैद झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि बुधवार दि.२० ऑक्टोबर रोजी सुकेळी येथील जिंदल कंपनी समोर असणाऱ्या आशिर्वाद पान शॉप येथून सुनिल कुमार उर्फे दिप कुमार यांचा रेलमी सि.२५ हा १०००० रु. (दहा हजार रु.) किंमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला आहे.त्याचा फोटो कॅॅमेऱ्यात कैद झाला.हा मुलगा दोन दिवसपूर्वी आशिर्वाद हॉटेल येथे कामाला आला होता.तो आपले कपडे घरून घेऊन येतो.असे कारण सांगून मोबाईल लंपास करुन गेला. हा मुलगा इंदापूर तळा या भागातील असुन त्याचे नाव मात्र समजू शकले नाही. परंतु फोटो मधील मुलगा जर कोणाला दिसुन आला तर सुकेळी आशिर्वाद पान येथील सुनील कुमार यांच्या संपर्क साधावा असे सांगण्यात येत आहे. दिवसेंदिवस चोरी व घरफोडी यांचे प्रकार वाढत चालले असून कोणी अनोळखी व्यक्तीला कामावर ठेवण्यासाठी कमीत कमी त्या व्यक्तीच
- Get link
- X
- Other Apps
विनयभंग करणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी म्हूणन चिरंजीवी संघटनेने दिले माणगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले निवेदन माणगाव (प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव जवळील कुशेडे गावात ८ वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला म्हूणन आरोपीवर कडक कारवाई व्हावी ह्यासाठी चिरंजीवी संघटनेच्या राज्यध्यक्षा नेहा भोसले व इतर कार्यकर्ते यांनी माणगाव उपविभागीय पोलिस अधिकारी यांना भेट दिली. तसेंच यापुढे असे प्रकार घडू नये ह्यासाठी प्रशासन व्यवस्था अजून मजबूत करावी असेही सांगितले. चिरंजीवी संघटना ही बाललैंगिक शोषण ,बालमजुरी,बालभिकारी, आणि बालविवाह, अशा अनेक विषयावर गेल्या ८ वर्षापासून काम करत आहे.संघटना ही रचनात्मक आणि संघर्षात्मक काम करते. साकिनाका येथे घडलेले प्रकरण असेल,डोंबिवली येथील घडलेले प्रकरण ज्यात 9 महिने त्या मुलीवर बलात्कार होत राहिला. त्याचबरोबर नुकतच रायगड मधील गोरेगाव येथील दोन अल्पवयीन मुलींचा एका ७५ वर्षाच्या माणसाने विनयभंग केला ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. रोज अश्या घटना ऐकून तळमळून उठायला होत, तरीही समाज मात्र झोपलेलाच आहे. ह्यावर को
- Get link
- X
- Other Apps
चिरंजीवी संघटनेच्या माध्यमातून माणगाव मध्ये शाळा कॉलेजमध्ये बालमजुरी बालभिकारी, बालविवाह बाबत जनजागृती माणगाव (प्रतिनिधी ) चिरंजीवी संघटना ही जिज्ञासू बालकांची मानवतावादी संघटना आहे असून संघटना बालमजुरी,बालभिकारी, बालविवाह आणि बाल लैगिंक शोषण अशा अनेक विषयांवर गेली ८ वर्षांपासून काम करत आहे. दिवाळी मध्ये सर्वच फटाके फोडतात.पण फटाके बनवण्यासाठी लहान मुलांचा-मुलींचा वापर करून त्यांचे आयुष्य संपवत असतात.ह्यासाठीच वेगवेगळ्या विभागांमध्ये, शाळा-कॉलेजांमध्ये जाऊन मुलांमध्ये जनजागृती करत, आम्ही फटाके फोडणार नाही फोडू देणार नाही असा नारा देतो.असे संघटनेच्या राष्ट्रीय सचिव श्वेता पाटील यांनी सांगितले. या मध्ये ग. रा. मेहता शाळा, द.ग.तटकरे महाविद्यालयात त्याचबरोबर जुन्या माणगाव मधील विविध आदिवासी पाड्यात देखील हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे संघटनेचे भार्गव पाटील यांनी सांगितले. फटाक्यांचे दुष्परिणाम सांगितले त्याचबरोबर फटाक्यांमुळे प्रदूषणाची समस्या वाढत आहे.फँक्ट्ररी मध्ये काम करणाऱ्या मुलाचे शिक्षण थांबते हे सांगितले गेले आहे.त्याना बालमजुरी करण्यासाठी प्रवृत्त करतात.आणि त्यान
- Get link
- X
- Other Apps
रायगड जिल्हा आदिवासी कातकरी समाज संघटनेचे अध्यक्ष भगवान नाईक यांना पुत्रशोक, कै.भावेश भगवान नाईक रायगड (भिवा पवार ) जिल्हा आदिवासी कातकरी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच आदिवासी समाजाच्या न्याया हक्कासाठी सदैव तत्पर असणारे भगवान नाईक यांचे मोठे चिरंजीवाचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. जिल्हाध्यक्ष भगवान नाईक यांचे मोठे चिरंजीव कै.भावेश भगवान नाईक वय 27वर्षे हे कावीळ या आजाराने त्रस्त होते. दिनांक 20/10/2021 रोजी राहत्या घरी वरंडे पाडा चौल येथे त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 27 वर्षे होते. त्यांचे दिवस कार्य वार शुक्रवार दि.29 /10 /2021रोजी वरंडेपाडा चौल येथे होणार आहेत. कै. भावेश नाईक यांच्या अकाली निधनाने रायगड जिल्ह्यात आदिवासी बांधवांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाज दुःखात सहभागी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील. दोन भाऊ असून या दुःखा बाबत आदिवासी समाजात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
- Get link
- X
- Other Apps
येरद(शितोळ)आदिवासी वाडीतील 150 आदिवासी बांधवानी घेतली कोवीड लस, लसीची कंपनीचे नाव, लसीची मुदत दिनांक, सांगण्यास आरोग्य कर्मचाऱ्यांची टाळाटाळ संतप्त आदिवासी तरुणानीं लसीकरण थांबविले लसीचे नाव, दिनांक, कंपनीचे नाव विचारले असता पुन्हा माहिती देण्यास टाळाटाळ, लस बाटलीचे फोटो काढण्यास केली मनाई, पत्रकारांनी आरोग्य अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, शिपायाने दिले उद्धटपणाची उत्तरे शिरवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभाराबाबत कर्मचाऱ्यांच्या कामचुकाराबाबत अनेक तक्रारी, आदिवासी बांधव करणार जिल्हा आरोग्य अधिकारी, व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे करणार तक्रार, रायगड (भिवा पवार ) याबाबत सविस्तर वृत्त अशी की दिनांक 18 ऑक्टोबर रोजी माणगाव तालुक्यातील निजामपूर जवळील येरद (शितोळ) आदिवासी वाडीवर प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवली यांच्या वतीने कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अंगणवाडी सेविका,सुजाता साबळे, आशा सेविका,अपर्णा दबडे, किर्लोस्कर,व अन्य आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी होते येरद शितोळ या आदिवासीवाडीतील तरुणमंडळाचे अध्यक्ष तसेच रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी
- Get link
- X
- Other Apps
माणगावमध्ये गोरक्षा व गोसंवर्धन समितीची स्थापना अध्यक्ष पदी ॲडव्होकेट अनिकेजी ठाकूर यांची एकमताने निवड माणगाव ( प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी माणगाव व तळा तालुक्यात गोमाता व गोवंश हत्या झाल्या होत्या.त्यावेळी संपूर्ण माणगाव तालुक्यातून पक्षभेद व पंथभेद विसरून केवळ हिंदूत्व म्हणून संपूर्ण माणगाव तालुक्यातील हिंदू समाजाने गोवंश हत्या करणाऱ्यावर शासनाने व प्रशासनाने कठोर कारवाई करावी म्हणून मोठे आंदोलन केले होते. त्याची व्यापकता वाढावी व संपूर्ण तालुक्यातील गोमाता व गोवंश हत्या थांबावी याकरिता माणगावमध्ये गोरक्षा व गोसंवर्धन समितीची स्थापना करण्यात आली खरे मंगल कार्यालयात झालेल्या या सभेसाठी सर्वपक्षिय कार्यकर्ते ३५ गोरक्षक उपस्थित होते. यामध्ये गजानन आधिकारी,सुजित शिंदे ,रा.स्व . संघ रायगड जिल्हा सहकार्यवाह प्रशांत ढेपे आदी मान्यवरांसह अनेक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य हजर होते. या समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते ॲडव्होकेट अनिकेतजी ठाकूर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी अण्णा कोदे,सरचिटणीस पदी संजोग मानकर ,प्रदिप कदम सहसचिव पदी योगेश पालकर ,प्रचार व प्रसिद्धी पदी प्
- Get link
- X
- Other Apps
रोहा तालुक्यातील कवळटे आदिवासीवाडी ग्रामस्थ्यांचे पुनर्वसन करावे आदिम जमात कातकरी समाज संघटनेकडून तहसीलदारांना निवेदन रायगड (भिवा पवार ) जंगल दऱ्यांमध्ये राहणारा आदिवासी समाज आज देशाचा मूळ मालक आहे. मात्र या देशाचा मूळ मालक असून सुद्धा आज येथील आदिवासींना राहण्यासाठी जागा मिळत नाही तो बेघर झाला आहे ही शोकांतिका आहे. देश स्वतंत्र होऊन 74 वर्षे झाली तरी आज आदिवासी समाज हलाखीचे जीवन जगत आहे. आदिवासीना हक्काची जागा मिळावी विविध शासनाच्या योजना मिळून ती आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनावे यासाठी रोहा तालुक्यातील कवळटे आदिवासीवाडी येथील लोकांचे पुनर्वसन करून त्यांना शासनाच्या विविध घरकुल सारख्या योजना मिळाव्यात म्हूणन तालुका रोहा आदिम जमाती कातकरी समाज संघटनेकडून रोहा तहसीलदार कविता जाधव यांना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी रोहा तहसीलदार कविता जाधव, यांनी कवळटे आदिवासीवाडीचा पुनर्वसनाचा विषय लवकरच मार्गी लावण्याचे अभिवचन दिले. यावेळीं आदिम जमात कातकरी समाज संघटना रोहा अध्यक्ष श्री पांडुरंग वाघमारे, सर्वहारा जनआंदोलन संघटनेचे कार्यकत्ते अंकुश वाघमारे आदिम स
- Get link
- X
- Other Apps
आ.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. शाळा आंबेवाडीनाका व आंबेवाडी शाळेत बिस्किटे व मास्कचे वाटप कोलाड (प्रतिनिधी) विधानपरिषद आ.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळाआंबेवाडी नाका, तसेच रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेवाडी गाव या शाळांमध्ये रितेश ( बंटी) पलंगे, व पलंगे परिवारा मार्फत विद्यार्थ्यांना बिस्किटे व मास्क चे वाटप करण्यात आले. या वेळी शुभागी पलंगे आंबेवाडी ग्रामपंचायत माजी सरपंच, सुरेश महाबळे सरपंच आंबेवाडी ग्रामपंचायत तसेच रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला अध्यक्षा प्रीतम पाटील,अवि पलंगे,ग्रा.सदस्यआंबेवाडी कुमार लोखंडे ग्रामपंचायत सदस्य आंबेवाडी,श्रीकांत चव्हाण उपसरपंच ग्रामपंचायत आंबेवाडी, वृषाली लोखंडे सदस्य आंबेवाडी ग्रामपंचायत, राकेश लोखंडे, चंद्रकांत बाईत, मोरे, ग्रामस्थ उपस्थित होते. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान परिषदेचे आमदार.अनिकेत सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रायगडात कोरोना काळातील गरज ओळखून विद्यार्थ्यांना मास्क चे वाटप केल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहणार आहे.तर
- Get link
- X
- Other Apps
रोहा अष्टमी त्वष्ठा कासार समाजाचे माजी अध्यक्ष श्रीनिवास वडके यांचे निधन रोहा (राजेश हजारे) रोहा अष्टमी त्वष्ठा कासार समाजाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास चंद्रकांत वडके यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निवासस्थानी निधन झाले ते 71 वर्षांचे होते. बांधकाम क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी अनेक तरुणांना मार्गदर्शन केले होते. त्वष्ठा कासार समाजासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे. ते रोहा - अष्टमी सहकारी बँकेचे पदाधिकारी होते उत्कृष्ट पेटी वादक म्हणून त्यांची ख्याती होती. समाजसेवेचे व्रत अंगी करून संगीत भजन आधी छंद जोपासून लोकांना काही चांगले देण्याचा ती नेहमी प्रयत्न करत असायचे रोह्यातील तील अनेक भजनी मंडळा मध्येही पेटी वादक म्हणून त्यांनी काम केले. अत्यंत शांत स्वभाव अध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात, त्यांनी उल्लेखनीय काम केले एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीनिवास वडके त्यांच्या अचानक जाण्याने अष्टमीकरांना मोठा धक्का बसला असून भजनी मंडळातील सदस्य हळहळ व्यक्त करीत आहेत. श्रीनिवास वडके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, अस
- Get link
- X
- Other Apps
रोह्यात भरले छोटेखानी कविसंमेलन, जुन्या आठवणींना उजाळा रायगड (भिवा पवार ) मोबाईल मुळे अनेक लोक जोडले गेले खरे परंतु इंटरनेटच्या मायाजालात मध्ये माणूस पूर्णपणे गुरफटला आहे. पूर्वीसारखा समोरासमोर संवाद होत होता तो मात्र दुरावला आहे. प्रत्येक कार्यक्रमात व शुभ प्रसंगी माणूस हजर राहत होता पण आता मात्र माणूस मोबाईल इंटरनेटच्या सहा यांनी साहाय्याने व्हाट्सअप, फेसबुक ट्विटर अशा अनेक माध्यमातून संदेश पाठवत आहे.त्या मुळे पूर्वीसारखी माया, आपुलकी, प्रेम,भावना, लोप पावत आहे केवळ मोबाईल वरच नाते राहिले आहे पुढच्या पिढीला आपली लोक कोण आहेत ती माहीत पडणार नाहीत नातेसंबंध संपुष्टात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे पण याला अपवाद आहे तो रोहा येथील कवी बंधूचा रोहा येथिल जुने सर्व कवीनीं एकत्र येऊन एक छोटेखानी कवी संमेलन भरवून सर्वांनी एकत्र येऊन आपल्या नव नविन कविता, गझल, चारोळी, आशयघन कविता, एकमेकांना ऐकविल्या. काल एक छोटेखानी संम्मेलन रोह्याचे जेष्ठ साहित्यीक,पत्रकार श्रीनिवास गडकरी यांचे निवासस्थानी घेण्यात आले वेळातवेळ काढून मोजके कवी या संमेलनात जमले होते. गझ
- Get link
- X
- Other Apps
रोहा अष्टमीकर जनतेसमोर जाईपर्यंत विकास कामांचे झंझावात सुरू राहील खासदार सुनील तटकरे रोहा अष्टमी( नरेश कुशवाहा ) रविवार दिनांक 10ऑक्टोंबर रोजी रोह्यात खासदार सुनील तटकरे व पालक मंत्री आदिती तटकरे यांनी नवरात्र उत्सवात विराजमान झालेल्या देवी आदी शक्तीचे अनेक ठिकाणी दर्शन घेतले तद्नंतर रोहा अष्टमी नगर परिषदेने म्हाडा वसाहती मध्ये बांधलेल्या वुमन्स क्लब हाऊस , डोंगरी मोहल्ला रस्ता व रोहा उर्दू शाळा नुतनीकरणाचे उद्घाटन केले या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या वेळी यांच्या समवेत नगराध्यक्ष संतोष पोटफोडे उपनगराध्यक्षा रिदवाना शेटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष मधुकर पाटील , प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाशीलकर, तहसीलदार कविता जाधव , मुख्याधिकारी दयानंद गोरे , रोहा नगर परिषदेचे सर्व सभापती नगरसेवक नगरसेविका , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती तालुका अध्यक्षा रविना मालुसरे ,आदी उपस्थित होते ते पुढे म्हणाले रोहा सह अष्टमीत सुद्धा अनेक विकास कामे सुरू आहेत रोहा अष्टमी नगर परिषदेला सद्या सुगीचे दिवस आहेत रो
- Get link
- X
- Other Apps
रोहा दिवा पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार सुनील तटकरे रोहा अष्टमी (नरेश कुशवाहा) दिवा रोहा मेमू पॅसेंजर गाडी चालू करण्याबाबत व पूर्वीच्या गाड्या थांबत होते त्या गाडयांना रोहा रेल्वे स्थानक थांबा मिळणे आदी मागण्यांसाठी रेल्वे प्रवासी संघर्ष समिती रोहा रायगड यांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आहे . रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांना रोहा रेल्वे प्रवासी संघर्ष समिती रोहा रायगड अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे , उदय मोरे, महेंद्र मोरे , उल्लास मुद्राळे,विनोद सावरकर , विश्वनाथ जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी खासदार सुनिल तटकरे यांची भेट घेऊन दिले या वेळी पालकमंत्री अदिती तटकरे जिल्हा कार्याध्यक्ष मधूशेठ पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर नगराध्यक्ष संतोष पोटफोडे नगर परिषद सभापती समीर सकपाळ सभापती महेंद्र दिवेकर गट नेते महेंद्र गुजर शहर अध्यक्ष अमित उकडे सभापती पूर्वा मोहिते यांच्या सह नगरसेवक नगर सेविका व संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी रेल्वे प्रवासी संघर्ष
- Get link
- X
- Other Apps
रोह्यात महाविकास आघाडीचे बंद यशस्वी रोहा अष्टमी (नरेश कुशवाहा ) उत्तर प्रदेश च्या लखिमपुर खीरी येथे केंद्रीय मंत्री च्या मुलानी किसान आंदोलन च्या ठिकाणी अंधाधुंद पणे गाडी चालवत आंदोलन कारी शेतकरयांना चिरडून ठार मारले होते केंद्रीय मंत्र्यांच्या मुला च्या या दुष्कृत्या च्या विरोधात किसान आंदोलाकानी आज भारत बंदची घोषणा केली होती त्याच्या समर्थनार्थ रोह्यात महाविकास आघाडीने बंद पुकारला होता तो पुर्ण पण यशस्वी झाले चित्र रोहा शहरात दिसुन आले . हा बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील , प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे , तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पासलकर , जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर , शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे , ॲड मनोज कुमार शिंदे ,उपतालुका प्रमुख महादेव साळवी , आदी उपस्थित राहुन बंद यशस्वी केले.
- Get link
- X
- Other Apps
पुगाव शिव मंदीर व ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गोवे कोलाड ( विश्वास निकम ) श्री.कमलेश्वर शिवमंदिर व पुगाव ग्रामस्थांच्या वतीने ग्राम पंचायत पुगाव शनिवार दि .०९/१०/२०२१ रोजी सांयकाळी ठीक ४.०० वाजता शैक्षणिक वर्ष २०२०/२१ मध्ये आपल्या गावातील इयत्ता १०वी आणि १२वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. पुगाव ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक कळागुणांना वाव मिळावा म्हणून अनेक वर्षांपासून गुणगौरव सोहळा मोठया कार्यक्रमात आयोजित करण्यात येतो परंतु कोरोना विषाणूमुळे दोन वर्षापासून धार्मिक उत्सव या कार्यक्रवर बंदी घालण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा न थांबता तो मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुरु आहे ही कौतुकास्पद उपक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात इयत्ता १० मधील १७ व बारावी मधील १५ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ.नेहा म्हसकर सरपंच पुगाव,श्री नारायणराव धनवी, श्री बबन म्हसकर, श्री सुधीर शेळके, सौ आदिती झोलगे, सौ.अनिता खामकर, सौ.निशिगंध
- Get link
- X
- Other Apps
संजय दादा कणघरे यांना आदर्श युवक समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार गोवे-कोलाड ( विश्वास निकम) तामसोली गावचे आदर्श युवक, समाज सेवक , युवा सेना रोहा तालुका उपअधिकारी आणि तरुण तडफदार , धडाडीचा कार्यकर्ता तसेच क्रीडाक्षेत्रातील मानलेला हिरा मा, श्री, संजय दादा कणघरे यांना त्यांच्या एकंदरीत सर्व कामांबाबत व समाजसेवक बाबत मुंबई येथे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने दखल घेऊन २०२०_२०२१ या वर्षीचा राज्यस्तरीय गुणजन गौरव महासम्मेलनात श्री संजय दादा कणघरे यांना राज्यस्तरीय आदर्श युवक, महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, कोरोणाचा पाश्वभूमीवर हा समारोह ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला होता, राज्यातील अनेक युवकांची या पुरस्कारामध्ये निवड झाली होती, त्या मध्ये तामसोली गावचे सुपुत्र श्री संजय दादा कणघरे यांची निवड झाली, त्यांच्या या यशाबद्दल मा, श्री जिल्हा परिषद सदस्य किशोर भाई जैन मा, श्री युवासेना रायगड जिल्हाधिकारी सुधीर ढाणे, पंचायत समिती सदस्य संजय भोसले, कट्टर शिवसैनिक निलेश भाई महाडीक, पेन विधानसभा महिला संघटीका दर्शना ताई जवके
- Get link
- X
- Other Apps
तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीच्या अनागोंदी कारभाराला जबाबदार कोण? ग्राम सभा ठराव नसतांना शासकीय इमारत पाडली,कोण करणार कारवाई? कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यात अनागोंदी कारभारात ऐनघर ग्राम पंचायत पाठोपाठ आता तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायत पुढे असल्याचे संकेत मिळत असून चक्क सदरच्या ग्राम पंचायतीत कोरोना काळात गेली दोन वर्षे कोणतीही ग्राम सभा नाही याचा सरास थेट सरपंच गैर फायदा घेत अनागोंदी कारभार करत असल्याचे समोर आले असून चक्क कामाचा व तसेच जुनी शासकीय इमारत पडण्याचा कोणताही ठराव नसताना या ठीकाणी असलेली जुनी ग्राम पंचायत इमारत पडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून चालत असलेल्या हुकूम शाही आणि आनागोंदी कारभाराला जबाबदार कोण ? यावर कोणाचे नियंत्रण आणि कोण कारवाई करणार असे तर्क वितर्क केले जात आहेत, या बाबत हाती आलेल्या माहिती नुसार सदरच्या ग्राम पंचायतीत पंचायत मालकीची जुनी असलेली इमारत नंबर १११ सदरच्या सदस्यांना विश्वासात न घेता तसेच कोणत्याही ठरावाची मंजुरी नसतांना व त्यातच शासनाची परवानगी ही इमारत एका खाजगी कामाच्या हव्यासापोटी तोडली आहे असे सर्वत्र बोलले जात आहे तसेच या इ
- Get link
- X
- Other Apps
गाड्या अंगावर घालुन बळीराजाला चिरडणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध:-पालकमंत्री आदिती ताई तटकरे गोवे कोलाड (विश्वास निकम) उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांवर गाड्या घालून बळीराजाला चिरडणाऱ्या केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व इतर घटक पक्षांनतर्फे जाहीर निषेध करीत आहोत असे मत राज्य मंत्री तथा रायगडच्या पालक मंत्री आदिती ताई तटकरे यांनी आंबेवाडी नाका येथील महाराष्ट्र बंद च्या मोर्चाच्या वेळी आपले मत व्यक्त केले. खिरी येथील शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालुन क्रूर कर्माच्या वाईट भावनेने केलेल्या हत्तेच्या कटाचा आम्ही केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत असुन यापुढे आम्ही बळीराजावर करण्यात येणाऱ्या कोणत्याही अन्याय खपवून घेणार नाही.आम्ही नेहमीच शेतकऱ्यांचा पाठीशी उभे राहू असे मत रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केले. यावेळी रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या महिला अध्यक्ष
- Get link
- X
- Other Apps
कोलाड मध्ये महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांचा पूर्णपणे पाठींबा,सर्वत्र शुकशुकाट गोवे-कोलाड (विश्वास निकम ) उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवार दि.१० ऑक्टोबर २०२१ रोजी शेतकऱ्यांसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद कोलाड व्यापाऱ्यांनी पूर्णपणे पाठींबा दिला.यामुळे मुंबई गोवा हायवे वरील इतर दिवशी गजबलेले असणारे कोलाड मध्ये पूर्णपणे शुकशुकाट दिसत होता. या बंदला महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस व इतर घटक पक्षांनी महाराष्ट्र बंदचे अहवान करण्यात आले होते. याला कोलाड येथील व्यापारी वर्गानी अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे पाठींबा दिल्या.