मराठी भाषा संवर्धनासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांचा पुढाकार, वडघर हायस्कूलमध्ये पुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न गोरेगाव पोलीस ठाण्याचा स्तुत्य उपक्रम! रायगड (भिवा पवार) सध्याच्या युगात वाढलेली इंग्रजीचे स्तोम पाहता मराठी विषयाचे महत्त्व कमी होत आहे ही बाब लक्षात घेता शासनाने मराठी भाषेचा गोडवा तुला वाढावा याकरिता मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश दिले होते या उपक्रमाला अनुसरून शाळेतील विद्यार्थी अध्यापन करणारे शिक्षक पालक यांना मराठी भाषेचे महत्व कळावे मराठी भाषेचे संवर्धन व्हावे याकरिता गोरेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण संभाजी नावले पोलीस हवालदार श्री गणेशजी नरेंद्र समेळ,महिला पोलीस हवालदार सायली संतोष सानप,पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण अण्णा पाटील, पोलीस पवार आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शारदा मातेचे पूजन करण्यात आले त्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांच्या दातृत्वातुन वडघर मुद्रे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्वखर्चातून मराठी कथा, थ...
Posts
Showing posts from January, 2022
- Get link
- X
- Other Apps
आज गांधीविचारांची गरज आहे? आज गांधीजींच्या विचारांची गरज आहे का ? या विषयावर माझे मत मांडत असताना मी प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानाला, या महात्म्याला शतश: प्रणाम करते. सत्याचा पुजारी तू अहिंसेचा भोक्ता माणसातल्या देवा तू दुबळ्यांचा दाता तुझ्या चरणी मी ठविते माथा । मित्रही, खरे तर गांधी तत्वज्ञान म्हटले की, आपल्यासमोर उभी रहातात ती समाजातली नभळट, घाबरट नामर्द, भित्री आणि अन्याय सहन करणारी माणसं आणि म्हणून आपण गांधीविचारांची, गांधीनत्वज्ञानाची टिंगल करत असतो कारण आपल्याला कधी गांधी समजलेच नाहीत. आपल्याला फक्त समोरच्याने एका गालात चापट मारली की दुसरा गाल पुढे करणे म्हणजे गांधी आणि एका भागात धक्का दिला की बुक्का मारण म्हणजे टिळक एवढ्यातच गांधी आणि टिळकांना आपण गुंडाळलं. आज गांधीविचारांची गरज आहे का? याविषयी सांगण्यापूर्वी मी प्रथम गांधीजींचे तत्वज्ञ...
- Get link
- X
- Other Apps
रोहा येथे मराठी भाषा संवर्धनासाठी साहित्य मैफल उत्साहात साजरी रोहा (राजेश हजारे) सध्याच्या युगात वाढलेले इंग्रजीचे स्तोम पाहता मराठी विषयाचे महत्व कमी होत आहे ही बाब लक्षात घेता शासनाने मराठी भाषेचा गोडवा पुन्हा वाढावा. या करीता मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश दिले होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अशा दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून साहित्य मित्र रोहा, नक्षत्रांचे देणे रोहा, आणि मराठी भाषा संवर्धन कट्टा, यांचे संयुक्त विद्यमाने नुकतेच साहित्य मैफल प्रधान क्लासेस रोहा येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमास श्री शेरमकर सर, श्री मकरंद बारटक्के, सौ आरती धारप, सौ सायली जोगळेकर, सौ अचला धारप, श्री सुधीर क्षीरसागर डॉक्टर रोहन भेंडे, श्री नितीन प्रधान, श्री हनुमंत शिंदे, श्री रणजीत सर, हे रोह्यातील नामवंत साहित्यिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमात उपस्थित साहित्यिकांनी आपल्या सुंदर साहित्य रचना सादर केल्या. तसेच श्री मकरंद बारटक्के यांनी मराठी भाषा संवर्धनाचे महत्व विशद केले. डॉक्टर रोहन भेंडे यांनी मराठी भाषा संवर्धनातील समस्यांचा उहापोह केला. . साह...
- Get link
- X
- Other Apps
सुतारवाडी महिला मंडळातर्फे श्रीदत्त मंदिरात हळदीकुंकू सौ.वरदाताई सुनिल तटकरे यांची विशेष उपस्थिती सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडिक) सुतारवाडी येथील महिला मंडळातर्फे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन येथील महिला मंडळातील सर्व महिलांनी उत्तम प्रकारे केले होते. या वर्षीच्या हळदी कुंक कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे येथील कार्यक्रमास सौ. वरदाताई सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सौ. वरदाताई सुनिल तटकरे म्हणाल्या पूर्वी सुतारवाडी हे छोटेसे खेडेगाव होते. आता सुतारवाडी खूपच बदलली आहे सुतारवाडी नाक्यावर विविध प्रकारची दुकानं, हॉटेल्स तसेच अन्य महत्वाची दुकानं झाली आहेत. त्यामुळे दिवसें - दिवस सुतारवाडी बहरत असून सुतारवाडी गावाची वाटचाल प्रगती पथावर असून या परिसरातील मुलं - मुली उच्चशिक्षित आहेत . मी कुठल्याही पदावर नाही. कुटुंबाला सांभाळणे ही सुद्धा मोठी जबाबदारी असून येथील महिला ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. विशेष म्हणजे गृहिणी सर्वांना सांभाळू...
- Get link
- X
- Other Apps
ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब येथे भारताचा ७३ वा प्रजाकसत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा कोलाड (श्याम लोखंडे) भारताचा ७३वा प्रजाकसत्ताक दिनानिमत्त रोहा तालुक्यातील मंजुळा नारायण लोखंडे एज्युकशन अँड वेलफेअर सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब या शाळेचा खांब कोलाड देवकान्हे विभागातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब शैक्षणिक संस्थेतून सेवा निवृत्त शिक्षक तथा शैक्षणिक, सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मारुती खांडेकर,त्यांच्या पत्नी सौ मालती खांडेकर सहपत्नीक यांच्या शुभ हस्ते मोठ्या उस्ताह वातावरणात साजरा करण्यात आला. भारताचा ७३ वा गणतंत्र दिवस रोहा तालुक्यातील मंजुळा नारायण लोखंडे एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब या शालेचा ध्वजारोहण खांडेकर सहपत्नीक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित मार्गदर्शक हभप नारायण महाराज लोखंडे,शाळेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद वाटावे,उपाध्यक्ष सुरेश भोसले, संचालक सुधीर लोखंडे ,गजानन...
- Get link
- X
- Other Apps
रायगड जिल्ह्यात ऑनलाईन गणित संबोध परीक्षा संपन्न संग्रहित छायाचित्र गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रायगड जिल्हा गणित विज्ञान अध्यापक मंडळातर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी ऑनलाईन गणित संबोध परीक्षा रायगड जिल्ह्यात संपन्न झाली . कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गणित विषयातील संबोध व संकल्पना पक्क्या होउन त्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी म्हणून दरवर्षी रायगड गणित विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने या गणित संबोध परीक्षेचे आयोजन करण्यात येते. आठवीपर्यंतचा गणिताचा अभ्यासक्रम या परीक्षेसाठी निर्धारित करण्यात आला होता.ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची होती. ह्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातील ८८शाळांमधून १७५२ विद्यार्थी प्रविष्ट झाले . ही परीक्षा मराठी , इंग्रजीसोबतच उर्दू माध्यमातूनही घेण्यात आली . ह्या परीक्षेची प्रश्नपत्रिका रायगड जिल्ह्यातील अनु...
- Get link
- X
- Other Apps
विकासकामाच्या पोचपावतीमुळे कुटूंबात पाच आमदार एक खासदार, तुम्ही एकदा आमदार होऊन पुन्हा पंधरा वर्षांनी आमदार, गोवे ग्रामपंचायतीत कोट्यावधी निधीच्या विकास कामांचे भूमीपूजन करत केले प्रतिपादन, गोवे-कोलाड (विश्वास निकम ) राजकीयदृष्ट्या निवडणुका येतात जातात परंतु गाव संघटित असेल तर गावाचा विकास होणे थांबत नाही.मी गोवे गावात जरी १८ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आलो असलो तरी माझे मन मात्र दररोज तुमच्या गावात असते. गावच्या सर्वांगिक विकासासाठी तटकरे कुटूंब सैदैव तत्पर आहे यामुळे गोवे ग्रामपंचायत हद्दीतील विविध प्रकारची काही कोटीची विकास कामे झाली आहेत.अशा केलेल्या विविध विकास कामाच्या पोच पावतीमुळे माझ्या कुटूंबातील पाच आमदार व एक खासदार झाले आहोत .नागरिकांशी निगडित राहून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या गावचा सर्वांगिक विकास केला जात आहे असे प्रतिपादन खा. सुनिल तटकरे यांनी गोवे ग्राम पंचायत हद्दीतील विकास कामांचे शुभारंभ व उर्वरित कामांचे भूमिपूजन खा.तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी चिल्हे येथील आ. रविशेठ पाटील यांनी केल...
- Get link
- X
- Other Apps
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीची निवेदनातून मागणी रोहा तहसीलदारांसह संबधित पोलीस ठाण्यात दिले निवेदन! कोलाड (श्याम लोखंडे ) प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी शासनस्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रोहा तहसील कार्यालयात तसेच कोलाड पोलीस ठाणे,कै. द.ग.तटकरे ज्युनिअर कॉलेज कोलाड, तसेच माध्यमिक व प्राथमिक शाळेत निवेदन देत केली आहे. रोहा तहसील कार्यालय नायब तहसीलदार राजेश थोरे ,रोहा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पाटील व कोलाड पोलीस ठाण्याचे, पोलीस निरीक्षक सुभाष जाधव,यांना तसेच महाविद्याल शाळा कॉलेजात राष्ट्रीय ध्वजाचे अवमान व गैर प्रकार घडू नये या करिता हे निवेदन रोहा कोलाड येथील हिंदु जनजागृती समितीचे साधक प्रकाश मोरे, दिनेश खराडे,धर्माभिमानी संजय चोरगे, शांताराम देशमुख,रोहा तालुका शिवसेना उपतालुकप्रमुख चंद्रकांत लोखंडे ,जेष्ठ शिवसैनिक प्रवीण (आबा )शिंदे,कोलाड शिवसेना प्रमुख गणेश शिंदे,हिंदुवादी संतोष शिंदे,धर्माभिमानी जयेश जैतवाल,आदींनी य...
- Get link
- X
- Other Apps
महागांव येथे बांगडी भरण्याचे प्रशिक्षण कार्यक्रम उत्सहात संपन्न इंदापूर (प्रतिनिधी) अ.भा.सो.क्ष.कासार समाजोन्नती मध्यवर्ती युवक मंडळाचे महागांव (तळा)तालुका अध्यक्ष श्री.किरणजी साळवी यांच्या संकल्पनेतून व काळाची गरज म्हणून पारंपारिक व्यवसायाकडे पुन्हा वळण्यासाठी बांगडी भरण्याचे प्रशिक्षण कार्यक्रम महागांव येथील श्री.कालिका माता व विठ्ठल रखुमाई गणेश मंदिरात दि.20 जानेवारी रोजी संपन्न झाले. रायगड जिल्हा युवा अध्यक्ष गणेशजी साळवी व महिला अध्यक्षा रिया कासार यांच्या संयोजनातून *"बांगडी भरण्याचे प्रशिक्षण शिबीर"* व महागांव महिला मंडळ यांच्या माध्यमातून हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमात कोकण विभाग समाजोन्नती मंडळाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष श्री.दगडूशेठ साळवी, उपाध्यक्ष श्री.नारायणजी वारे, मध्यवर्तीचे विभागिय अध्यक्ष व कोकण विभाग समाजोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.विलास कासार गुरूजी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला...यांस बरोबर आसरे-कासारवाडीचे गावकी अध्यक्ष श्री.कृष्णाजी मांगले,श्री.पुरुषोत्तमजी अडसूळे,श्री.अरुणजी साळवी,श्री.गोपीनाथजी पोरे तसेच विलास कासार गुरूजी य...
- Get link
- X
- Other Apps
तटकरे कुटुंब गावच्या सर्वांगिक विकासाठी कटिबद्ध गोवे ग्राम पंचायत हद्दीतील विविध विकास कामांची वचनपूर्तता, उद्या विकास कामांचे शुभारंभ व भूमिपूजन! गोवे कोलाड (विश्वास निकम ) कोकणचे भाग्यविधाते विकासाचे शिलेदार रायगड रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे ,पालकमंत्री कु.आदीतीताई तटकरे,आ.अनिकेत तटकरे हे गावच्या सर्वांगिक विकासासाठी कटीबद्ध असून रोहा तालुक्यातील गोवे ग्राम पंचायत हद्दीतील विकास कामांची वचनपूर्तता करत उद्या २३ जानेवारी रोजी गोवे ग्राम पंचायत हद्दीतील मुठवली ब्रु. येथे सायं ५ वा. व गोवे येथे सायं ६ वा.दिलेल्या वचनांचे पालन करत गावातील जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या विकास कामांचा तसेच अंतर्गत रस्त्यांचा शुभारंभ व उर्वरीत विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकप्रिय खा.सुनील तटकरे यांचया प्रमुख उवस्थित व त्यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे तालुक्यात विकास कामात आघाडी घेत असलेल्या गोवे ग्रामपंचायत हद्दीतील गोवे व मूठवली ब्रु. येथे खा.सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते व आदितीताई तटकरे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रायगड, यांच्या अध्यक्षतेखाली व आ.अनिकेत तटकरे यांच्या उपस्...
- Get link
- X
- Other Apps
राष्ट्रीय स्तरावरील बालविज्ञान परिषदेसाठी रायगड जिल्ह्यातील तीन प्रकल्पांची निवड रायगड (भिवा पवार) भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद या वैज्ञानिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा , त्यांच्यामध्ये संशोधक वृत्ती वाढीस लागावी , त्यांना सर्वेक्षण पद्धतीचे आकलन होऊन त्यांच्यामध्ये जिज्ञासा , निरिक्षण, तर्कसंगत विचार हे गुण वृद्धींगत व्हावेत ह्या उद्देशाने ह्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन केले जाते . ' शाश्वत विकासासाठी विज्ञान ' हा यावर्षीच्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचा मुख्य विषय आहे. तालुका , जिल्हा , राज्य व राष्ट्रीय स्तरावर या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते . ह्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सहभागी विद्यार्थ्यानी ऑनलाईन पद्धतीने आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले .रायगड जिल्ह्यातील तीन प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावरील बालविज्ञान परिषदेसाठी निवड झाली आहे . हे तीन प्रकल्प व सहभागी विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत- १) कोको पीट गार्डनिंग ( अक्षरा ठाकूर व आर्या म्हात्रे - श्र...
- Get link
- X
- Other Apps
रोहा वांगणी ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी शेकाप युतीचे एकनाथ ठाकुर भरघोस मतांनी विजयी वाकण-नागोठणे (वर्षा जांबेकर ) रोहा तालुक्यातील नामवंत समजल्या जाणाऱ्या वांगणी ग्राम पंचायत मध्ये प्रभाग क्रमांक ३ मध्ये संपन्न झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी, शेकाप ,आघाडीचे एकनाथ गोपाळ ठाकूर हे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत . वांगणी ग्राम पंचायतीतील प्रभाग क्रमांक ३ चे सेना मनसे युतीचे ओबीसी म्हणून निवडून आलेल्या अधिकृत उमेदवार सौ कल्पना हिराचंद दळवी यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समिती कडून अपात्र ठरल्याने प्रशासकिय नियमानुसार त्यांचे सद्स्य पद रद्द करण्यात आले त्या जागेवर १८ जानेवारी २०२२ रोजी पोटनिवडणुक घेण्यात आली या करिता सेना मनसे युतीच्या माजी सदस्या सौ कल्पना दळवी यांचे पती हिराचंद येसूराम दळवी यांनी उमेदवारी अर्ज भरत उमेदवारी लढवली तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शेकाप आघाडीचे उमेदवार एकनाथ ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरत निवडणूक लढवली याचा निकाल १९जानेवारी रोजी हाती आला असून यात सेना मनसे चे उमेदवार हिराचंद दळवी यांचा तब्बल पन्नास मतांनी पराभव करत राष्ट्रवादी, शेकाप आ...
- Get link
- X
- Other Apps
तळा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घ वघवीत यश, शिवसेनेची पिछेहाट राष्ट्रवादी काँग्रेस १० जागांवर विजयी तर शिवसेनेचे ४ भाजपाला ३ जागांवर विजयी संपादन तळा(कृष्णा भोसले) तळा नगर पंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असुन १०जागावर उमेदवार निवडून आल्याने एकहाती सत्ता घेत दणदणीत विजय मिळवला आहे. या आधीच्या निवडणुकीत शिवसेना सत्तेवर आली होती.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फार मोठी खलबते होत होती.यावेळी खा.सुनिल तटकरें, पालकमंत्री अदिती तटकरे, विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी लक्ष घालून तळा नगरपंचायत मध्ये सत्ता स्थापनेचा चंग बांधला.येथील मतदारांनी सुद्धा त्यांच्या बाजूने कौल दिला.आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आल्याने विकासाची घौडदौड सुरू होईल अशी आशा तळेकरांच्या मनात आहे.ती पुर्ण करण्याची जबाबदारी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सोपवली आहे. तळा नगर पंचायत प्रभाग १ मध्ये राष्ट्रवादीच्या व...
- Get link
- X
- Other Apps
वरसगाव ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत सापया वरसगाव आघाडीच्या सौ. पूनम आंब्रूस्कर विजयी कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील नामवंत समजल्या जाणाऱ्या वरसगाव ग्राम पंचायत मध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये संपन्न झालेल्या पोटनिवडणुकीत सापया ग्राम विकास व शिवसेना, भाजप, शेकाप , आघाडीच्या सौ पुनमताई अजित आंब्रूस्कर ह्या भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत. वरसगाव ग्राम पंचायतीतील प्रभाग क्रमांक एक चे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सीताराम बागुल यांचे निधन झाल्याने या जागेवर 18 जानेवारी 2022 रोजी पोटनिवडणुक घेण्यात आली या करिता राष्ट्रवादीकडून विजय मधुकर बागुल यांच्या विरोधात आघाडीच्या उमेदवार माजी उपसरपंच अजित आंब्रूस्कर यांच्या पत्नी सौ पूनम आंब्रूस्कर यांच्यात ही चुरशीची निवडणूक झाली होती या निवडणुकीचा निकाल 19 जानेवारी रोजी हाती आला असून यात सापया वरसगाव गाव विकास आघाडी व शिवसेना ,भाजप, शेकाप आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ पूनम आंब्रूस्कर यांनी विजय बागुल यांचा पराभव करत भरघोस मतांनी विजयी निवडून आल्या आहेत , ग्राम विकासाचे शिलेदार कोकण विकासाचे भाग्यविधाते रायगड रत्नागिरी चे लोकप्रिय खासदार सुनील...
- Get link
- X
- Other Apps
खांब गावानजिक जीव घेणे खड्डे, खड्डयांमधून प्रवाशी जखमी झाल्यानंतर खड्डे भरण्यासाठी ठेकेदाराला जाग येते काय? प्रवाशी वर्गाची संतप्त प्रतिक्रिया गोवे-कोलाड (विश्वास निकम) मुंबई-गोवा हायवे वरील राष्ट्रीय महामार्ग १७ वरील खांब गावाच्या बायपास रस्त्याच्या बाजूकडून सनी धाब्या जवळून कोलाड कडे जाणाऱ्या रस्त्याला प्रचंड मोठया प्रमाणात पडलेल्या खड्डयांमुळे प्रवाशी वर्गाच्या जिवाला धोका निर्माण झाला असून या खड्डयांमधून प्रवाशी जखमी झाल्यानंतर खड्डे भरण्यासाठी ठेकेदारा जाग येते काय? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गाकडून केली जात आहे. मुंबई-गोवा हायवे वरील रस्त्याच्या चौपदरी करणाचे काम गेली बारा वर्षा पासून सुरु असून काम अद्यापही पुर्ण झाले नाही ही मोठी गंभीर समस्या आहे.व हे काम केव्हा पुर्ण होईल याची खात्री ही देता नाही.दोन महिना पूर्वी या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाढीव रक्कम ही मंजूर केली.परंतु तरीही या रस्त्याच्या कामाला सुरवात केलेली दिसत नाही.परंतु रस्त्याचे काम सुर...
- Get link
- X
- Other Apps
खोटी नारळं फोडून सत्तेचा उपभोग घेण्याचे तटकरेंचे महान कार्य, कुटूंबात पाच आमदार एक खासदार असल्याचे आ.रविशेठ पाटलांचे प्रतिपादन! खांब विभागात विकास कामांचा शेठने सुरू केला झंझावत! कोलाड (श्याम लोखंडे) गावच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्रित या एक संघटित राहिलात तर आपल्या गावचा विकास होण्यास वेळ लागणार नाही मी कॅबिनेट मंत्री असतांना चारशे ते पाचशे कोटींचा निधी उपलब्ध केला अनेक विकासकामे मंजुरी करून आणली मात्र त्याची खोटी नारलं फोडण्याचे काम तटकरेंनी केले मी दिलेल्या पत्रकाची स्थानिक पातळीवर अडवणूक करणे तसेच त्यांना ग्राम पंचायत मध्ये ठराव न देणे असे काम त्यांचे आहे एका कुटूंबात पाच आमदार आणि सहावे खासदार असा सत्तेचा उपभोग घेण्याचा तटकरेंचा महान कार्य आहे. असे प्रतिपादन खांब विभागातील तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायत हद्दीतील आम.रविशेठ पाटील यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे शुभारंभ व भूमिपूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते . रोहा तालुक्यात तसेच तटकरेंच्या बालेकिल्ल्यात खांब विभागात पेण रोहा सुधागडचे स्थानिक आ.रविशेठ पाटील यांनी विकास कामांचा झंझावत सुरू के...
- Get link
- X
- Other Apps
चिल्हे येथील लिलावती (पार्वती)महादेव महाडिक यांचे आकस्मित निधन, कै. लीलावती (पार्वती) महाडिक कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील विद्युत महावितरण महामंडळातून सेवा निवृत्त झालेले कर्मचारी कै. महादेव सुर्या महाडिक यांच्या पत्नी व तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीचे माजी सदस्य रमेश महाडिक यांच्या मातोश्री श्रीमती लिलावती (पार्वती ) महाडिक यांचे वयाच्या 78 व्या वर्षी 13 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले. चिल्हे गावातील व मोठ्या महाडिक परिवारातील लिलावतीबाई यांचा स्वभाव अतिशय शांत आणि मनमिळाऊ तसेच सर्वांच्यात मिळून मिसळून राहणाऱ्या लिलावती महाडिक यांचे अचानकपणे आकस्मित निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून महाडिक परिवारावर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे .त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,पुतणे,सुना,जावई, नातवंडे,पतवंडे,असा मोठा परिवार आहे तसेच त्यांचे पुढील दशक्रिया विधी शनिवार 22 जानेवारी व उत्तरकार्य तेरावा बुधवार 25 जानेवारी 2022 रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी मौजे चिल्हे येथे संपन्न होणार असल्याची माह...
- Get link
- X
- Other Apps
कोलाड विभाग शिवसेनेची आढावा सभा उत्सहात संपन्न गोवे-कोलाड (विश्वास निकम शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार महेन्द्र दळवी, शिवसेना सल्लागार तथा जि प सदस्य किशोर भाई जैन यांच्या मार्गदर्शना नुसार शनिवार दि. १५/०१/२०२२ रोजी शिवसेना ता प्रमुख समीर शेठ शेडगे यांच्या अध्यक्षते खाली कोलाड विभागाची शिवसेनेची आढावा सभा उत्सहात संपन्न झाली. सदर बैठकीला रोहा तालुका प्रमुख विष्णू भाई लोखंडे, उप तालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे,रोहा पं समिती सदस्या चेतना ताई लोखंडे, ग्रा. सं उप जिल्हा प्रमुख विजय बोरकर, विभाग प्रमुख कुलदिप सुतार, ग्रा. सं विभाग प्रमुख ज्ञानेश्वर खामकर, उप विभाग प्रमुख अजित चितळकर, राजेन्द्र यादव, संतोष पडवळ, सुनिल महाडीक, संजोत पडवळ तसेच शिवसेनेचे सर्व शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख, महिला आघाडी चे पदाधिकारी, ग्रा पंचायत सदस्य तसेच विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बैठकीत विभागतील मागील २ वर्षतील झालेल्या कामांचा, निवडूकांचा,प्रकर्षाने समोर आलेल्या समस्ये...
- Get link
- X
- Other Apps
कोलाडच्या आठवडा बाजाराला ४९ वर्षाची परंपरा सुतारवाडी :( हरिश्चंद्र महाडिक) कोलाड च्या रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराला गेल्या ४९ वर्षाची परंपरा आहे. कोरोना काळात गेल्या वर्षी हा बाजार पूर्णपणे बंद होता. यावर्षी कोरोनाचे नियम पाळून हा आठवडी बाजार आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सुरु आहे. रविवारी बाजार भरल्या नंतर व्यापाऱ्यांनी किंवा गिऱ्हाईकांनी तोंडाला मास्क लावले आहे किंवा नाही यावर कोलाड पोलीसांचे बारकाईने लक्ष असते. एखाद्याने मास्क लावलेला नसेल तर त्या व्यक्तीस मास्क लावण्यासंबंधी सुचना दिल्या जातात. गेल्या ४९ वर्षांपूर्वी कोलाड नाक्यावर फारशी लोकवस्ती नव्हती. त्यामुळे रविवारी भरणारा आठवडा बाजार रस्त्याच्या दुतर्फा भरायचा. कोलाड नाक्यावर फारशी दुकानंही नव्हती त्यामुळे रहदारी खूपच कमी होती. कोलाड पासून ८ कि.मी. अंतरावर धाटाव आहे. या ठिकाणी हळूहळू विविध कंपन्या सुरु झाल्या आणि खऱ्या अर्थाने या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत गेली. कोलाड हे मुंबई - गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे य...
- Get link
- X
- Other Apps
रोहा महीला मंडळ अध्यक्षपदी शैलजा देसाई यांची सर्वानुमते निवड कोलाड (श्याम लोखंडे) रोहा अष्टमी शहर महीला मंडळा ची जनरल सभा१०जानेवा री२०२२ रोजी रोहा येथील महीला उद्योग समीतीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सदरच्या सभेत शैलजा सुभाष देसाई यांची रोहा महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून शैलजा देसाई,कार्यकारी मंडळाच्या अन्य पदाधिकारी व सदस्यांसमावेत ज्योती सनलकुमार उपाध्यक्ष. साधना जोशी सचीव, वंदना राजे,दिपा भिलारे. नेहा कुलकर्णी,आरती धारप,सरला पाटील,श्रद्धा सकपाळ,निशा शिंदे, संगीता वेदपाठक या सर्वाची सर्व महिला मंडळांच्या वतीने यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आल्या. नवनिर्वाचित अध्यक्षा शैलजा देसाई यांनी यापूर्वि शासनाच्या महसुल खात्यात३०नोव्हें.२०१२ पर्यंत ३० वर्षे प्रामाणिक व सचोटीने काम केले त्यांनंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी सामाजिक काम करण्यास सुरुवात केली आहे.रोहा रायकर पार्क येथील विकास हौसिंग सोसायटच...
- Get link
- X
- Other Apps
कोलाड रोहा लायन्स क्लबच्या वतीने कोलाड गांधी हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्र तपासणी खांब (नंदकुमार कळमकर ) लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा, लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग,समता फाऊंडेशन मुबंई,गोदरेज फाऊंडेशन, लायन हेल्थ फाऊंडेशन व झोन चेअरपर्सन ,यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्सक्लब चे मार्गदर्शक लायन रविंद्र घरत यांच्या विशेष मार्गदर्शनातून तसेच लायन डॉ विनोद गांधी व डॉ मंगेश सानप,डॉ सपना गांधी यांच्या सहकार्यातून 13 जानेवारी रोजी गांधी नर्सिंग होम कोलाड आंबेवाडी येथे आयोजित केलेल्या मोफत नेत्र व मोती बिंदू तपासणी करण्यात आली. यावेळी तीसहुन अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. प्रसंगी यावेळी उपस्थित डॉक्टरांच्या वतीने रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली असून यामध्ये अकरा रुग्णांवर मोफत मोती बिंदू ,व पाच रुग्णांवर स्पेशल शस्त्रक्रिया करण्यात आली तर उर्वरीत रुग्णांना अल्प दरात श्रुती ऑप्टिकल कोलाड च्या वतीने अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले . यावेळी लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबागच्या डॉ वर्षा मॅडम,डॉ सुजीत पाटील, केळकर, क्लबचे सेक्रेटरी ला.रविंद्र लोखंडे,खजिनदार डॉ श्याम लोखंडे,उपाध्यक्ष डॉ मंगेश ...
- Get link
- X
- Other Apps
माणुसकीचा महामेरू सुरेंद्र(बंडया) येरूणकर यांचे दुःखद निधन चिंचवली पंचक्रोशीत शोककळा! कै.सुरेंद्र (बंड्या)येरुणकर रायगड (भिवा पवार) माणुसकी म्हणजे संस्कार, माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा आदर, माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात, आणि अखंडपणे माणुसकीचा संस्कार जपलेला माणुसकीचा चिंचवलीचा महामेरू सुरेंद्र उर्फ बंड्या येरूणकर यांचे ४जानेवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. चिंचवली तर्फे दिवाळी येथील हसमुख चेहरा सुरेंद्र येरुणकर यांचे वयाच्या ४५व्या वर्षी दुःखद निधन झाले. सुरेंद्रच्या निधनाची बातमी समजताच असंख्य मित्र परिवार तसेच येरूणकर परिवार आणि ग्रामस्थ यांना तीव्र दुखः झाले. सुरेंद्रच्या अचानक जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला. कै सुरेंद्र (बंडया) येरुणकर यांनी आपल्यकडे मदतीसाठी आलेल्यासआदिवासी गोरगरीब कोणासही कधीही रिकाम्या हाताने पाठविले नाही उपाशी पाठविले नाही. मनमिळाऊ स्वभाव असलेल्या बंडयाचे निधन झाल्याची बातमी समजली तेव्हा अनेकांना धक्का बसला...
- Get link
- X
- Other Apps
सुतारवाडी येथे एम . एस . इंटरप्रायझेस आणि सुरज बिल्डर्स च्या कार्यालयाचे उद्घघाटन सुतारवाडी ( हरिश्चंद्र महाडिक) मंगेश श्रीकांत सरफळे, आणि दिलीप उमाजी जांभळे यांच्या एम. एस. इंटरप्रायझेस आणि सुरज बिल्डर्स च्या सुतारवाडी नाक्यावरील कार्यालयाचे उद्घघाटन खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, सौ. वरदाताई सुनिल तटकरे, येरळ सरपंच सौ. विमल चिंतामण दळवी, जामगाव सरपंच सौ. दर्शना म्हशिलकर, कुडली सरपंच सौ. अश्विनी कामथेकर, सुतारवाडी महिला तसेच विविध परिसरांतील महिला कार्यकर्ते, उद्योजक, जेष्ठ नागरिक उपस्थित होते. सुरुवातीला सौ. शोभा मंगेश सरफळे यांनी मान्यवरांचे औक्षण केले. त्यानंतर कार्यालयाचे उद्घघाटन करण्यात आले. सुतारवाडी नाक्यावर श्री. मंगेशशेट सरफळे यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम सौ. वरदाताई सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या हळदीकुंकू कार्यक्रमात पंचक्रोशितील महिला उपस्थित होत्या. त्यांना भेटवस्तू देऊन कार्यक्र...
- Get link
- X
- Other Apps
कु.डॉक्टर प्रेमळ मुसळे हिचा रायगड जिल्हा भोई समाजा तर्फे सन्मान गोवे-कोलाड(विश्वास निकम) रोहा तालुक्यातील गोवे गावची सुकन्या कु.डॉक्टर प्रेमळ सुरेश मुसळे हीने (बि.ए.एम.एस.मुंबई )ही पदवी घेऊन डॉक्टर झाल्यामुळे तिचा रायगड जिल्हा भोई समाजा तर्फे सन्मान करण्यात आला. रायगड जिल्हा भोई समाज सेवा संस्था यांची ६२वी. वार्षिक परिषद व १७ वी वार्षिक अहवाल सभा शनिवार दि.८ जानेवारी २०२२ रोजी रोहा तालुक्यातील म्हस्करवाडी येथे संपन्न झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नाकर मधुकर कनोजे व कार्यक्रमाचे उदघाटक खा. सुनिलजी तटकरे हे होते.या कार्यक्रमात गोवे गावची सुकन्या व सध्या ठाणे येथे राहणारी कु. प्रेमळ सुरेश मुसळे ही बी.ए.एम.एस.मुंबई ही पदवी घेऊन डॉक्टर झाल्यामुळे म्हस्करवाडी येथील कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटक खासदार सुनिलजी तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि भोई समाज सेवा संस्था या समाजाचे कार्य दिवसेंदिवस प्रगती पथावर जात असून या समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहे व ...