तळगडावरून कोसळलेल्या दगडांमुळे दोन घरांचे नुकसान,

    एक महीला जखमी

 तहसीलदारांनी घटनास्थळी  घेतली तातडीची भेट!

(तळा कृष्णा भोसले) तळा शहरातील जोगवाडी येथे तळगड किल्ल्यावरून कोसळलेल्या दोन मोठ्या दगडांमुळे दोन घरांचे मोठे नुकसान होऊन एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की तळा शहरातील तळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जोगवाडी गावात सकाळी साडे आठ च्या दरम्यान

तळगड किल्ल्यावरून दोन मोठे दगड जोरदार वेगाने खाली कोसळले व यातील एक दगड गणपत रामभाऊ शिंदे यांच्या तर दुसरा दगड सुमित्रा शशिकांत शिंदे यांच्या घरावर येऊन आदळल्याने या दोन्ही घरांचे मोठे नुकसान झाले.

मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला असलेल्या गावातील नागरिकांनी धाव घेतभराव बाजूला करण्यास सुरुवात केली असता यावेळी घराजवळ असलेल्या बंदिनी मंगेश शिंदे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्या जखमी अवस्थेत पडल्या असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.ग्रामस्थांनी तातडीने जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी दवाखान्यात हलविले.


 घटनेची माहिती मिळताच तहसीलदार ए.एम.कनशेट्टी,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच घडलेल्या घटनेचा आढावा घेतला.त्यानंतर प्रशासनाने डोंगरावर जाऊन या सर्व बाबींचा प्रत्यक्षदर्शीनी त्याची पहाणी करुनतळा तहसीलदार ए. एम. कनशेट्टी पुढील खबरदारी घेतअसल्याची माहिती त्यांच्या कडुन मिळाली आहे.

Comments

Popular posts from this blog