येरद आदिवासी वाडीत हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतीदिन मोठ्या उत्साहात साजरा माणगाव (प्रतिनिधी )माणगाव तालुक्यातील निजामपूर जवळ असणाऱ्या येरद आदिवासींमध्ये चिरनेर जंगल सत्याग्रहाचे प्रेरणेते व 1930 चे जंगल सत्याग्रहांमध्ये हुतात्मा पत्करलेले हुतात्मा नाग्या महादू कातकरी तथा नाग्याबाबा यांचा 25 सप्टेंबर रोजी स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे जिल्हा सचिव तथा वनमित्र व आदर्श शेतकरी राम कोळी यांच्या हस्ते नाग्याबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी एकलव्य संघटनेचे जिल्हा सचिव राम कोळी यांनी उपस्थित बांधवांना नाग्या बाबांचा जीवनातील अनमोल माहिती देऊन मंत्रमुग्ध केले आपला आदिवासी समाज गरीब आहे, तो लाचार नाही, लढाऊ आहे, याची साक्ष इतिहासाची पाने देत असून याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे चिरनेर जंगल सत्याग्रहाचे प्रेरणेते नाग्या बाबा आहेत असे सांगून "कधीही स्वाभिमान विकू नका" पोटाच्या भाकरी पेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे हे नाग्या बाबांनी आपल्याला दाखवून दिले आहे. तेव्हा सर्वांनी एकजुटीने राहा असे सांगितले. यावेळी वनम
Posts
Showing posts from September, 2024
- Get link
- Other Apps
रायगडातील पाली- खोपोली रोडवर बस व कारचा अपघात! बसमध्ये एनसीसीचे 48 विद्यार्थी किरकोळ जखमी पाली पोलिसांची घटनास्थळी तत्काळ धाव, सुदैवाने जीवित हानी नाही! रायगड -(प्रतिनिधी)खोपोली महामार्गावर बस व कारचा अपघात झाला आहे . दिनांक 17 सप्टेंबर मंगळवारी एसटीचा रॉड तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. एसटी बस MH -20 BL3367 ही कर्जत – खोपोली मार्गे माणगावला जात होती. तर सेलोरिया कार MH -14HD 5325 ही पालीकडून खोपोलीच्या दिशेने जात होती. दापोडे गावाच्या हद्दीत एसटी बस आणि कार यांच्यात धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की एसटी बस पलटी झाली. लगेचच आजुबाजूचे लोक आणि पाली पोलीस ठाण्याचे पोलीस मदतीला धावून आले. एसटी बसमध्ये 48 एनसीसीचे विद्यार्थी होते. त्या सर्वांना बसच्या मागील काच फोडून बाहेर काढण्यात आले.तर कार मध्ये प्रवासी गंभीर जखमी असल्याचे समजते. रायगड जिल्ह्यात वारंवार एसटी बसचे अपघाताचे प्रमाण वारंवार वाढत असून त्यामुळे रायगडकरांची चिंता वाढले . मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा एसटी बसचा अपघात झाला आहे. पाली – खोपोली मार्गावर दापोडे गावाजवळ एसटी बस आणि कारचा भ