कालव्याच्या पाणी प्रश्न आंदोलन 'अल्टीमेटम'ची प्रशासनाने घेतली दखल, पाणी प्रश्न सुटणार की पाणी पेटणार? जिल्ह्यात चर्चा! ग्रामस्थांचे निवेदन तातडीच्या बैठकांवर बैठका! खांब (नंदकुमार कळमकर) कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी किल्ला ते निवी विभाग कालव्याला आठदहा वर्ष पाणी सोडत नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल झालेत. उन्हाळ्यात पाण्याची भीषणता जाणवत आहे. भात, भाजीपाला, पूरक शेतीला पाणी नाही. गुरढोरे, पशु पाण्यासाठी ऐन तडफडत असतात. गावे दुष्काळाने होरपळून गेलीत. दुसरीकडे पाटबंधारेचे पाणी तालुका बाहेरील कंपन्यांना विकले जाते. धनधांडग्यांच्या राफ्टींगला सोडले जाते. हा राग ग्रामस्थांत असतानाच विभागातील बळीराजाला पाणी नाही म्हणून वाशी , लांढर, बोरघर, तळाघर, निवी हद्दीतील शेतीकरी, ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रमक झाले. रविवारी समन्वय समितीच्या बैठकीत ग्रामस्थ पाण्यासाठी प्रचंड संतप्त झाले. येत्या पंधरा दिवसात संबंधीत प्रशासनाने पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासन न दिल्यास मोठे आंदोलन उभे करू याच ग्रामस्थांच्या अल्टिमेटचा अखेर सर्वच प्रशासनाने दखल घेतली. बुधवारी कालव्याच्या पाण्याबाबत तहसीलदार रोहा, र
Posts
Showing posts from September, 2022
- Get link
- Other Apps
सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे शक्ती तुरा नाचाचे जंगी सामने कोलाड (विश्वास निकम ) खासदार सुनिल तटकरे,आ.अनिकेत तटकरे,रायगडच्या माजी पालकमंत्री तथा आ.अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली,संयोजक सुरेश महाबळे,व रामभाऊ टेंबे यांच्या उपस्थितीत सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे गुरुवार दि.२२/९/२०२२ ते शनिवार दि.२४/९/२०२२ रोजी शक्ती तुरा जंगी नाचाचे सामूहिक सामने आयोजित करण्यात येणार आहेत. गुरुवार दि.२२/९/२२ रोजी सकाळी ११ वा. चंडिका देवस्थान सभामंडप तळा येथे, शुक्रवार दि.२३/९/२०२२ रोजी सकाळी ११ वा. कुणबी भवन माणगाव येथे, तर शनिवार दि.२४/९/२०२२ रोजी द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड येथे सकाळी १२ वा शक्ती तुरा नाचाचे जंगी सामन्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून प्राप्त झाली आहे.
- Get link
- Other Apps
तटकरे कुटूंबियांची वचनपूर्तता पुगाव गावाला भरघोस निधींचा पत्र आमदार अनिकेत तटकरेंनी केला ग्रामस्थांना सुपूर्द खांब (नंदकुमार कळमकर ) रोहा तालुक्यातील एकसंघ एकनिष्ट असलेल्या पुगाव ग्रामस्थांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कोकणचे भाग्यविधाते तथा रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्याकडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गावात सुसज्ज नळपाणी पुरवठा व सामाजिक सभागृहाची मागणी केली होती या मागणीला तटकरे कुटूंबियांनी दिलेल्या वचनाचे तंतोतंत पालन करत केलेल्या मागणीला खासदार तटकरे साहेब यांनी दुजोरा देत आमदार तथा रायगडच्या माजी पालकमंत्री कु आदितीताई तटकरे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून येथील ग्रामस्थ महिला नागरिकांना नळपाणी योजनेचा व गावातील सामाजिक सभागृहाचा मंजुरी आशा भरघोस निधीपत्र आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी ग्रामस्थांना सुपूर्द केले. रविवार दिनांक ११/०९/२०२२ रोजी पुगाव गावातील जे काही मूलभूत प्रश्न होते त्या संदर्भात दोन्ही गावातील ग्रामस्थ महिला वर्ग यांनी एकत्रित येऊन आमदार अनिकेत भाई तटकरे तसेच आमदार तथा मा.पालकमंत्री अदितीताई तटकरे यांची भेट घेत आपल्या गावातील
- Get link
- Other Apps
रोहा भाजपा व हिंदू जनजागृती समिती तर्फे हिंदू राष्ट्र व लव्ह जिहाद विषयावर व्याख्यान संपन्न कोलाड(विश्वास निकम:-रायगड भुषण) हिंदू जनजागृती समिति व भाजपा रोहे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने रोहे शहरात हिंदू जनजागृती समितिचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेशजी शिंदे यांचे व्याख्यान भाजपाचे शहराध्यक्ष यज्ञेश भांड यांनी आयोजित केले. व्याख्यानाचा विषय लव जिहाद, हलाल जिहाद, हिंदू राष्ट्र का हवे? साधारण दोन तासाच्या कार्यक्रमासाठी रोहेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती, भाजपा रोहे शहर यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी रोह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक रायकर सर, तालुक़ा कार्यवाह संजीव कवितके, अविनाश दाते, रोहे तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा जयश्री भांड, भाजपा रोहे शहर उपाध्यक्ष राकेश गुंदेशा, डॉ. मनीष वैरागी, सनातन साधक प्रकाश मोरे व परिवार, उत्तमशेट मोरे, तुषार खरिवले, दिनकर खरिवले आदी मान्यवर उपस्थित होते.
- Get link
- Other Apps
शिक्षणप्रेमी प्रभाकर शिर्के यांच्या विद्यमाने वडघर परिसरात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप माणगाव (प्रतिनिधी) आपण ज्या मातेच्या उदरी जन्म घेतला तिने केलेल्या संस्कारातून घडलेले प्रभाकर शिर्के. तसेच ज्या भूमीत जन्म घेतला त्या समाजबांधवांविषयी, विद्यार्थ्यांविषयी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून सामाजिक बांधिलकी म्हणून गरीब गरजू व सर्वसामान्य परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे ,त्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शिलिम बौद्धवाडी गावचे रहिवासी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक्षणप्रेमी श्री.प्रभाकरजी शिर्के यांच्या सरस्वती विद्या मंदिर वडघर (मुद्रे) या विद्यालयास तसेच पळसप, हेदमलई, वडघर, परिसरातील विद्यार्थ्यांना 300 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मांजरोने देऊळवाडी आदिवासी वाडीवर जाऊन सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले आहे. माणगाव तालुक्यातील मांजरोने जवळील वडघर परिसर हा ग्रामीण भाग असून या परिसरातील अनेक शेतकरी, आदिवासी,व अनेक गरीब कुटुंबाची मुले शिक्षण घेत असतात या ग्रामीण भागामध्ये आपल्या परिसरातील उदयो
- Get link
- Other Apps
गोरेगाव पोलीस ठाण्याच्या गणरायाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन! कोल्हापूरच्या छावा मर्दानी आखाड्याने जिंकली गोरेगावकरांची मने! रायगड (भिवा पवार) रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या गणरायाला शनिवार खालूबाजा,लेझीम, ढोल यांच्या गजरात मंगलमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. समाजिक शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पार पडत असताना आपल्यालाही धार्मिक भावना व कर्तव्य असतात त्या पार पाडायचे असतात असा उदात्त दृष्टीकोन समोर ठेवून गोरेगाव पोलीस स्टेशन तर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेश उत्सव मोठया उत्सहात साजरा करण्यात आला. आला दहा दिवस गणरायाची यथोचित पूजा आरती सत्यनारायणाची महापूजा अशा माध्यमातून श्रीगणेशाची पूजन अर्चन करण्यात आले. रथामध्ये बाप्पांना स्थानपन्न करून खालुबाज्याच्या तालावर लेझीम खेळ भव्य मिरवणुकीने बाप्पांना गोरेगावच्या विष्णू तलावात भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावलेंसह सर्व अधिकारी कर्मचारी आणि त्यांचा परिवार तसेच गोरेगावचे नागरिक सहभागी झाले होते. दरवर्षी आपली कर्तव्य पार
- Get link
- Other Apps
सामाजिक कार्यकर्ते शरद कळमकर यांच्या कुटूंबियांच्या वतीने षष्टब्दी मोठ्या उत्साहात साजरी खांब(नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक तथा राजकीय क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेले पुगाव गावचे सुपुत्र शरद नारायण कळमकर यांची त्यांच्या कुटूंबियांच्या व समस्त कळमकर परिवार यांच्या वतीने षष्टब्दी मोठ्या उत्साह वातावरणात साजरी करत त्यांनी एकसष्ट वर्षात पदार्पण केले आहे . शरद नारायण कळमकर म्हणजे पुगाव गावातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचे लाडके 'भाऊ' या नावानेच अशी त्यांची ओळख आहे त्यांचा स्वभाव शांत आणि सर्वांची मनमिळाऊ प्रेमाने आदराने वागतात कळमकर कुटुंबाचा व परिवाराचा मोठा आधारस्तंभ व मार्गदर्शक समजले जातात आज त्यांचे वय ६० वर्ष पूर्ण झाले असल्याने त्यांच्या कुटूंबानी त्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरा केला . शरदराव कळमकर यांनी आपल्या जीवनात अनेक चढ उतार पाहिले आई वडिलांच्या आशीर्वादाने उच्च शिक्षण घेत चांगल्या शिक्षणाच्या जोरावर रोहा धाटाव येथील औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात उच्च पदीस्थ म्हणून अकाउंट खात्याचे उत्तमरीत्या कामकाज पाहिले कारखान्यात सर्वा
- Get link
- Other Apps
वारकरी संप्रदायची परंपरा जोपसणारा हिमेश धनावडेचा दुर्देवी मृत्यू जिवाला चटका लावून जाणारा! गोवे गावासह कोलाड परिसरात शोककळा! कै. हिमेश धनावडे गोवे कोलाड (विश्वास निकम )रोहा तालुक्यातील मौजे गोवे गावाचा रहिवासी हिमेश प्रफूल्ल धनावडे या १२ वर्षीय मुलाचा मंगळवार दि.६ सप्टेंबर रोजी झालेला दुर्देवी मृत्यू हा जिवाला चटका लावून जाणारा असून त्याच्या आकस्मित निधनाने गोवे गावासह संपूर्ण कोलाड परिसरात शोककला पसरली आहे. पाच दिवसाचे गणपती विसर्जनाच्या दिवशी मिरवणूकित हिमेश यांनी फाटक्याची अतिशबाजी केली होती व डीजेच्या तालावर मनोसोक्त नाचला होता व गणेश विसर्जनानंतर तो रात्री ८.३० च्या नंतर घरी आला व जेवणानंतर झोपला. नंतर रात्री ३ वाजता त्याच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्याला रोहा येथे डॉ. जाधव नर्गिस होम येथे नेण्यात आले तेथे उपचार करुन त्याला सकाळी ६.०० वाजता घरी आणला परंतु त्याची तब्बेत सकाळी ८.०० जास्त खालवली.त्यामुळे त्याला माणगाव येथील दवाखान्यात नेण्यात आला.डॉक्टरांनी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु ते असफळ ठरले. हिमेश हा एम.पि.एस. इंग्लिश स्कूल कोलाड येथे इ
- Get link
- Other Apps
गौरी गणपती उत्सवात खेळ रंगला पैठणीचा,पुगाव येथील पैठणीच्या खेळात मानकरी ठरल्या माहेरवाशीण सौ. रोशनी मोरे खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील मौजे पुगाव येथे गौरी गणपती उत्सवात खेळ रंगला पैठणीचा याला सासरवासीन माहेरवासीन महिलांनी भरभरून प्रतिसाद देत तसेच रंगतदार खेळात भाग घेत चढाओढीच्या खेळात अखेर पैठणीच्या विजेत्या ठरल्या माहेरवासीन सौ रोशनी कल्पेश मोरे तर उपविजेत्या ठरल्या माहेरवासीन सौ भारती सुधीर गोळे, येथील शिवतेज मित्र मंडळ व जय बजरंग मित्र मंडळ पुगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व गणेशोत्सव निमित्ताने, महिलांसाठी विशेष खेळ पैठणीचा कार्यक्रम येथील शिव छत्रपती चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात बहुसंख्येने महिलांनी सहभाग नोंदवला विशेषतः विविध खेळ खेळत महिलांनी भरभरून प्रतिसाद देत आनंद लुटला तर पैठणीच्या विजेत्या व उपविजेत्या ठरल्या त्या माहेरवासीन त्यामुळे शेवटी या रंगतदार कार्यक्रमाच्या खेळ पैठणीच्या विजेत्या व मानकरी ठरल्या विजेत्यांना सौ रचना कळमकर यांच्या हस्ते सौ रोशनी कल्पेश मोरे,यांना पैठणी देऊन सत्कार करण्यात आला तर उपविजेत्या सौ भारती सुधीर गोळे यांना सोन्
- Get link
- Other Apps
श्री क्षेत्रपाल मित्रमंडळ पुई तर्फे ३७ जेष्ठ नागरिकांचा सत्कार, गणेश उत्सवात अनोखा उपक्रम! गोवे-कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील पुई गावातील श्री. क्षेत्रपाल मित्र मंडळातर्फे सार्वजनिक गणेश उत्सवाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविले जात असून या वर्षी यानिमित्ताने पुई येथील ३७ जेष्ठ नागरिकांचा सत्कार करुन या तरुणांनी अनोखा उपक्रम राबविला आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाचे संस्थापक अनंत रामू सानप यांनी गावातील तरुणांमध्ये एकोपा निर्माण होण्याच्या उद्देशाने श्री. क्षेत्रपाल मित्रमंडळाची स्थापना करून सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला त्याला यावर्षी १५ वर्षे पुर्ण झाली असून हे मित्र मंडळ दरवर्षी विविध उपक्रम राबवीत आहे.यावर्षी ३७ जेष्ठ नागरिकांना गांधी टोपी व टॉयल भेट देऊन सत्कार करण्यात आला.या उपक्रमात मार्गदर्शन करतांना नायब तहसीलदार मोते,सामाजिक कार्यकर्ते शब्बीर शेठ सय्यद,तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर दिसले व इतर जेष्ठ नागरिकांनी या उपक्रमाबद्दल श्री.क्षेत्रपाल मित्रमंडळाचे कौतुक केले. या सर्व उपक्रम राबविण्यासाठी मंडळाचे संस्थापक अनंत कदम, अध्यक्ष विठ्ठल पवार,सचिव हरिचंद
- Get link
- Other Apps
कोलाड विभागातील २५४ जेष्ठा गौरी,११६३ गणपती बाप्पांचं जयघोषात विसर्जन खांब(नंदकुमार कळमकर ) : एक दोन तीन चार गणपती बाप्पाचा जयजयकार, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जय घोषात आला रे आला गणपती आला, गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला, उंदीर मामा की जय, आशा भावपूर्ण जयघोषात भक्तिमय व मंगलमय वातावरणात कोलाड परिसरातील भक्तगणांनी २५४ जेष्ठा गौरी व ११६३ आपल्या लाडक्या बाप्पांना यावेळी भावपूर्ण निरोप देण्यात आला. कोलाड परिसर व कोलाड विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांनी गणपतीपूर्वीच वीसर्जन घाट व जाणारा मार्ग तसेच तलाव व नदी परिसर स्वच्छता करण्यात आली होती. दुपारी चार वाजल्यानंतर वाजत गाजत,तर काही गुलाल उधळत, लेझिम, टाळ मृदुंग, ढोल ताशाच्या गजरात श्री गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती. एका मागुन एक घरगुती गणपती विसर्जनासाठी आपल्या परिसरातील नदी किनारी व तलाव ठिकाणी निघाले होते. तत्पुर्वी कोलाड पोलिस प्रशासनाच्या वतीने दुपारपासूनच कोलाड विसर्जन स्थळांकडे जाणारे मार्ग मोकळे रहावेत यासाठी गस्त घालण्यात आली. भक्तगणांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे गजर क
- Get link
- Other Apps
कोलाड-रोहा मार्गावर इर्टिगा कार दुचाकी स्वारावर धडकली, तीन जण गंभीर जखमी गोवे-कोलाड (विश्वास निकम) कोलाड रोहा मार्गावरील पाले बु .हद्दीतील माशन भूमिसमोर बुधवार दि.३१ऑगस्ट रोजी दुपारी ३.१० वाजण्याच्या सुमारास इर्टिगा कार क्र.एम एच ०६सीडी १६१२ही कार रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता विरुद्ध साईडला जोरदार वेगाने जात असताना रोहा बाजूकडील येणारी पॅशन प्रो.मोटार सायकल क्र.एम एच ४७/एम ४८८१हिस समोरून धडक दिल्याने यातील मोटार चालक स्वार व त्याचे दोन साथीदार यांना गंभीर दुखापत झाली असून सदर दुखापत ग्रस्थांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार कोलाड कडून रोहा कडे जाणाऱ्या दिपक दत्तात्रय नाईक आदर्शनगर,भुनेश्वर, रोहा यांच्या ताब्यातील इर्टिगा कार हिने रॉंग साईडला जाऊन रोहा कडून येणाऱ्या मोटार सायकलला धडक देऊन अपघात नरेश यशवंत कडव(वय ३६),गणेश गोविंद कडव (वय ३८), विनोद सखाराम दहिंबेकर (वय ४०)हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून अधिक तपास परी पोसइ श्री फडतरे व पोहवा आर आर राऊळ करीत आहेत.