Posts

Showing posts from December, 2021
Image
  रोह्याच्या अक्षय निकमची भारतीय दिव्यांग कबड्डी संघात निवड कोलाड (श्याम लोखंडे) कर्तुत्वाला आणि धेय्याला मेहनतीची जोड लाभली की यश हमखास गवसतेच. अंगभूत गुणांच्या जोरावर शारीरीक व्यंगालाही आपली ताकद बनवून धामणसई गावचा सीतारा राष्ट्रीय पातळीवर चमकला..             कठोर परीश्रमाने आणि चिकाटीने केलेल्या मेहनतीच्या जोरावर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धामणसई या छोट्याशा खेड्यात जन्माला आलेला कु.अक्षय दत्ता निकम याची दिव्यांग प्यारा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली.. अजमेर राजस्थान येथे झालेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघ उपविजेता ठरला.आपल्या बहारदार खेळाने अक्षयने उपस्थितांची मने जिंकली. गावच्या मातीतील कबड्डीला राज्य पातळीवर तसेच देश पातळीवर घेऊन जाण्याची किमया साधली ती धामणसई गावच्या या सुपुञाने. आणि रोहा तालुक्यातील कबड्डीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.. आज कबड्डीच्या खेळात राष्ट्रीय पातळीवर रोह्याचे नाव मानने घेतले जाते.  धामणसई गावच्या या सुपुत्राच्या खेळाने सगळेच प्रभावित झाले.. त्याच्या उत्कृष्ट खेळाने निवड समितीचेही ल
Image
  लायन्सक्लब आयोजित चिल्हे येथील नेत्र तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद 115 रुग्णांची तपासणी, 30 रुग्णावर होणार शस्त्रक्रिया, खांब (नंदकुमार कळमकर ) लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग,समता फाऊंडेशन मुबंई,गोदरेज फाऊंडेशन, लायन हेल्थ फाऊंडेशन व झोन चेअरपर्सन ,यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रुप ग्राम पंचायत तळवली तर्फे अष्टमी व चिल्हे ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून 30 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रियेला रुग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला यात 115 रुग्णांची तपासणी तर 30 रुग्णांवर मोफत केली जाणार आहे नेत्र चिकित्सा  या वेळी कोलाड रोहा लायन्सक्लबचे मार्गदर्शक तथा झोन चेअरपर्सन लायन रविंद्र घरत, कोलाड रोहा लायन्सक्लबचे अध्यक्ष डॉ सागर सानप, सेक्रेटरी रविंद्र लोखंडे,खजिनदार डॉ श्याम लोखंडे,बोर्ड ऑफ डायरेक्टर अनिल महाडिक,लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग डॉ स्मिता चौगले,डॉ सायली केणी, सुजित पाटील,शुभम जाधव, चेतना पॅथॉलॉजीच्या डॉ समृद्धी राणे,श्रुती ऑप्टिकल कोलाडचे विठ्ठल सावळे,ग्राम पंचायत सरपंच सौ रुपाली कोस्तेकर,उपसरपंच सौ मानसी लोखंडे,सदस्या स
Image
  रोहा कृषीधिकारी महादेव करे यांच्या शुभहस्ते बाहे येथे कृषी दिनदर्शिका २०२२ प्रकाशन कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानचा पाचवा वर्धापनदिन ३० डिसेंबर रोजी मौजे बाहे येथे साजरा करण्यात आला याचे औचित्य साधून त्या निमित्ताने २०२२ या सालाचे दिनदर्शिका रोहा तालुका कृषिधिकारी महादेव करे यांच्या शुभहस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन मोठ्या उत्साह व आनंददायी वातावरणात करण्यात आले . रोहा तालुक्यातील भाजी पाला व्यवसायात प्रगतीपथावर असलेले गाव बाहे येथील प्रगतिशील शेतकरी जगदीश थिटे यांनी विविध प्रकारची भाजी लागवड व केलेल्या फळबागायत व निसर्गरम्य शेतात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.प्रसंगी यावेळी प्रमुख मार्गदर्शक तथा तालुका कृषीधिकारी महादेव करे , कृषी तालुका विभागिय अधिकारी सुतार, नैसर्गिक शेती मार्गदर्शन धनंजय जोशी शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत,सह आदी मान्यवर व शेतकरी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसेच बहुसंख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता. यावेळी प्रमुख मान्यवर व मार्गदर्शक रोहा कृषी अधिकारी महादेव करे यांनी अंतर्गत पिके व गटात केलेल्या शेतीचे फायदे कसे असतात याबाबत म
Image
  ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोलाड पोलीस ठाण्यात निवेदन! गोवे-कोलाड (विश्वास निकम ) मागील २ वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला. या संकटाला आळा घालण्यासाठी शासन-प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यातून मार्ग काढत जनजीवन पूर्ववत जरी झाले असले तरी 'ओमिक्रॉन' सारख्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अशा वेळी ३१ डिसेंबरला पार्ट्यांच्या माध्यमातून 'ओमिक्रॉन'चा संसर्ग पसरण्याची शक्यताही अधिक आहे. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणार्‍या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’वर) बंदी घालावी ख्रिस्ती नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या निमित्ताने पर्यटनस्थळे, ऐतिहासिक अन् सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धुम्रपान, पार्ट्या करताना होणारे अपप्रकार रोखले जावेत यासाठी या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींसह विविध धर्मप्रेमींच्या वतीने कोलाड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. या         वेळी चंद्रकांत लोखंडे, विजय बो
Image
  कोलाड नाभिक तरुण संघाचे विभागीय अध्यक्ष एकनाथ मोहिते तर सलून कमिटी अध्यक्ष किरण खंडागळे   यांची निवड गोवे-कोलाड (विश्वास निकम )   रोहा तालुक्यातील कोलाड-संभे येथील रायगड जिल्हा नाभिक समाज मंदिरच्या कै.पा.रा. सकपाळ सभागृहात शनिवार २५ डिसेंबर रोजी विभागीय कार्याध्यक्ष प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखालीकोलाड विभाग नाभिक तरुण संघाची सभा घेण्यात आली. या सभेत कोलाड विभागाची २०२२ सालासाठी नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी एकनाथ मोहिते,उपाध्यक्ष – किरण खराडे,दुकान कमिटी अध्यक्ष- किरण खंडागळे,सचिव-चंद्रकांत हुजरे,खजिनदार- अशोक पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी विभागीय अध्यक्ष संजय सकपाळ , सलून कमिटी अध्यक्ष किशोर खंडागळे, गजानन खराडे,केतन पवार,उत्तम साळुंखे,चंद्रकांत दिवेकर,बाळाराम पवार,वसंत खंडागळे, यशवंत मोहिते,दीपक टके,विवेक मोरे,संदेश खराडे,नीलेश पवार,सुनील खराडे,समीर खंडागळे तसेच विभागातील समाज बांधव उपस्थित होते.
Image
  रोहा देवकान्हे येथील मोफत अस्थिरोग तपासणीला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! शंभरहून अधिक रुग्णांना मोफत दिली औषधे, खांब (नंदकुमार कळमकर ) रोहा तालुक्यातील देवकान्हे येथे लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा आणि दीपक फाऊंडेशन रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रुप ग्राम पंचायत देवकान्हे यांच्या सहकार्याने डॉ.नमिता दिघे,डॉ.प्रशांत गोसावी,डॉ.स्नेहल शेलार,डॉ. विनोद गांधी ,आशा तज्ञांमार्फत अस्थिरोग रुग्णांना प्राथमिक तपासणी तसेच त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यावेळी लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा चे उपाध्यक्ष डॉ.मंगेश सानप,दीपक फाऊंडेशन अजय आवाडे, देवकान्हे ग्राम पंचायत चे उपसरपंच सूरज कचरे,सदस्य दयाराम भोईर,शाळेचे मुख्याध्यापक टिकुळे, लायन्सक्लब कोलाड चे सेक्रेटरी रविंद्र लोखंडे,खजिनदार डॉ श्यामभाऊ लोखंडे ,बोर्ड ऑफ डायरेक्टर अनिल महाडिक,लायन महेश तुपकर,राजेंदर कोप्पू,विश्वास निकम,सौ पूजा लोखंडे,दीपक फाऊंडेशनचे सहकारी अश्विनी ऐत,अक्षरा जाधव,नाजुका चौलकर,मारुती निगडे,मल्लेश हंचली,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वास थिटे,आशा ताई,अंगणवाडी सेविका सह आदी मान्यवर व ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होते. प
Image
  ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथे संजय (आप्पा) ढवळे यांच्या शुभहस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील मंजुळा नारायण लोखंडे वेल्फेअर अँड एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथे माणगाव तालुका भाजपाध्यक्ष संजय (आप्पा)द्वारकानाथ ढवळे यांच्या शुभहस्ते क्रीडा स्पर्धेचे शुभारंभ 28 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साह वातावरण करण्यात आले . प्रसंगी यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे,स्थानिक कमिटी चेअरमन गोविंद वाटावे,हभप नारायण महाराज लोखंडे,विशाल गालांडे युवा माणगाव भाजपाध्यक्ष, बाबुराव चव्हाण इंदापूर विभाग भाजपाध्यक्ष,संजय जाधव निजामपूर विभाग भाजपाध्यक्ष, आत्माराम डवले माणगाव भाजप बुथ अध्यक्ष,तसेच वन विभागाचे भावसाहेब धनावडे,रघुनाथ कोस्तेकर सरपंच तळवली तर्फे अष्टमी ,सेवा निवृत्त शिक्षक अरुण खांबकर, कल्पेश माने ,पालक संतोष महाडिक, संदीप महाडिक,सौ सुचिता गोळे,श्रीमती अनुपमा चितळकर, सौ मानसी चितळकर,शाळेच्या मुख्याध्यापिका रिया लोखंडे , सहा शिक्षिका सोनाली शिंदे,ऋतुजा पवार,प्रतीक्षा धामणसे, शिक्षक विनायक
Image
  बाहे येथील आयोजित क्रिकेट सामन्यात शिरवली संघ अंतिम विजेता कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील गावदेवी बाहे आयोजित क्रिकेट सामन्यात रॉयल किंग शिरवली संघ ठरला अंतिम विजेता ठरला आहे अंतिम सामना शिरवली व धाकसुद चिल्हे यांच्यात झालेल्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अखेर रॉयलकिंग शिरवली संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला तर चिल्हे संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.तसेच स्पर्धेतील तृतीय क्रमांक गावदेवी बाहे हा संघ मानकरी ठरला. उत्कृष्ट सामनावीर शिरवली संघाचा संकेत लहाने स्पर्धेतील उकृष्ट गोलंदाज शुभम भोईर, तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून चिल्हे संघाचा संघाचा नितेश कोंडे यांना प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते गौरविण्यात आले . खांब विभागीय क्रिकेट असोसिएशन च्या मान्यतेने गावदेवी बाहे यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धा निसर्गरम्य महिसदरा पत्राच्या किनाऱ्यावरील प्रांगणात भव्य दिव्य असे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन उदघाटन प्रगतशील शेतकरी लिंबाजी थिटे, क्रीडाप्रेमी कपिल बामणे, देवकान्हे ग्रामपंचायत सदस्य रविंद्र राऊत,मोरया डी जे साउंड सर्व्हिस चे मालक ज्ञानेश्वर थिटे यांच्या शुभहस्
Image
  रोहा खारी येथील लक्ष्मीबाई म्हस्के यांचे निधन रोहा (विशेष प्रतिनिधी ) रोहा तालुक्यातील खारगाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजे खारी-काजुवाडी(दामाणी नगर) येथील लक्ष्मीबाई रघुनाथ म्हस्के यांचे बुधवार दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी वयोवृध्द काळाने व अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. सर्वांना सुपरिचित असणारे पत्रकार केशव म्हस्के यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई यांच्या निधनाची वार्ता समजताच रोहा-आरे दशक्रोशीतील त्यांचे नातलग व विविध स्तरातील समाज बांधव त्यांच्या अंत विधीसाठी जमले होते. सर्वांच्या परोपकारी पडणाऱ्या लक्ष्मीबाई यांचे अचानक निधन झाल्याने म्हस्के परिवारावर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककला पसरली असून मोठी पोकळी निर्माण झाली तसेच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलगे,तीन मुली,सूना, जावई,नातवंडे,पतवांडे असा मोठा म्हस्के परिवार आहे. त्यांचे दशक्रियाविधी शुक्रवार दि.३१ डिसेंबर रोजी सकाळी ०९:०० ते ११:०० वाजेपर्यंत स्वयंभू श्री शिवालय मंदिर काजुवाडी येथे होतील. तर अंतिम धार्मिक विधी बारावे रविवार दि.०२ जानेवारी २०२२ रोजी त्यांच्या राहत्या निवस्थानी खांब पंचक्रोशीचे वैभव त
Image
  स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड च्या दिनदर्शिकेचे सुतारवाडी येथे प्रकाशन       सुतारवाडी दि .27 ( हरिश्चंद्र महाडिक) स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांच्या वतीने सुतारवाडी येथील गीताबाग येथे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते दिनदर्शिका 2022 चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी श्री. मारुती राऊत, श्री. गोरखनाथ कुर्ले, श्री. अविनाश म्हात्रे, श्री. अशोक कदम, श्री. उदय राजपुरकर श्री. प्रवीण गांधी, श्री. शांताराम महाडिक, श्री. मोहन दोशी, श्री. खांडेकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
Image
रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन       सुतारवाडी : दि. 26 ( हरिश्चंद्र महाडिक ) रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आकर्षक कॅलेंडर प्रकाशित करण्यात आले. गेल्या बारा वर्षापासून नियमितपणे समाज बांधव दिनदर्शिका प्रकाशित करत आहेत. अध्यक्ष श्री. भालचंद्र रहाटे, कार्याध्यक्ष श्री. शांताराम दळवी, सचिव श्री. राजन रहाटे, खजिनदार श्री. संतोष रहाटे, उपाध्यक्ष श्री. विनायक तार्लेकर, उपाध्यक्ष श्री. रविंद्र निगडे , उपसचिव श्री. देवेंद्र राऊत, श्री. मोहन जाधव आणि नितीन जाधव, उप खजिनदार उत्तम निगडे, उपकार्याध्यक्ष रुपेश रहाटे कार्यालय प्रमुख श्री. तुकाराम जाधव, हिशोब तपासणीस श्री. संतोष दळवी, उपहिशोब तपासणीस श्री. अनिल उबाळे या पुरुष कमिटीने तसेच महिला अध्यक्षा सौ. सुरेखा देशमाने, कार्याध्यक्षा श्रद्धा महाडिक, सचिव सौ. भावना रहाटे, खजिनदार सौ सोनाली लांजेकर, सदस्या सर्वस्वी सौ. साक्षी उबाले, सौ. रोहिणी महाडिक, सौ. सीमा रहाटे, सौ. नेहा रहाटे, सौ. पुजा दळवी, सौ. अश्विनी रहाटे, सौ. सुजाता काळे, सौ. सुनिता जाधव, सौ. सुषमा रस
Image
  पुई गावाचे विठोबा महाडीक यांचे दुःखद निधन             गोवे-कोलाड (विश्वास  निकम )  रोहा तालुक्यातील पुई गावातील प्रगत शेतकरी विठोबा महादू महाडीक यांचे गुरुवार दि.२३ डिसेंबर २०२१रोजी वृद्धपाकाळाने निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ९९ वर्षाचे होते.ते प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वाना परिचित होते.व सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय होते. . त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधी साठी रायगड जिल्ह्यातील भोई समाज बांधव, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर,व समस्त पुई ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या पश्चात एक नातू, नात सून, एक मुलगी,पतवंडे, व मोठा महाडिक परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दि.१ जानेवारी तर उत्तकार्य विधी मंगळवार दि.४ जानेवारी २०२२ रोजी त्यांच्या पुई येथील निवास्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती यांकडून प्राप्त झाली आहे .
Image
  पनवेल येथे वीरशैव लिंगायत समाजाचा वधूवर मेळावा . गोवे-कोलाड (विश्वास निकम ) महाराष्ट्र वीरशैव सभा रायगड जिल्हा च्या वतीने २ जानेवारी रोजी कर्नाटक संघ हॉल शबरी हॉटेल समोर सेक्टर २ न्युज पनवेल येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वधुवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष महेंद्र बोडके यांनी दिली आहे. पनवेल येथे हा मेळावा सकाळी ११ वाजता सुरु होणार असून या मेळाव्यासाठी वीरशैव समाजातील जाती,पोटजाती व जंगम समाजातील बंधु भगिनींनी आपल्या उपवर मुला मुलींसोबत हजर रहाण्याचेआवाहन करण्यात आले आहे.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष महेंद्र बोडके, मार्गदर्शक हेमंत डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष एस.एम.बिराजदार,सचिव नितीन वाणी, महीला संघटक रेखा कोरे,वधुवर मंडळ संघटक मंगला बिराजदार, कोषाध्यक्ष चंद्रकांत शिवपुजे, सहसचिव रमेश पाटील,युवा संघटक शैलेंद्र अक्कलकोटे यासह पदाधिकारी परीश्रम घेत आहेत.
Image
  शिक्षण महर्षी उमाजी गोरीवले यांचे निधन! शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व हरपल्याने सर्वत्र शोककळा,   शिक्षण महर्षी कै. उमाजी गोरीवले   कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील तिसे गावचे भाग्य विधाते तालुक्याचे वैभव तथा शिक्षण महर्षी शैक्षणिक सामाजिक आध्यात्मिक सांस्कृतिक कला क्रीडा व राजकीय क्षेत्रात अग्रेसर हट्टी आणि करारी बाणा मलखंबा खेळाचे प्रमुख वीर हनुमान मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच ग्रुप ग्राम पंचायत तिसे चे माजी सरपंच पंधरा वर्षे सरपंच पद भूषविले कुडली विभाग शेतकरी सेवा संघाचे माजी अध्यक्ष अत्यन्त प्रतिकूल परिस्थितीत गावात माध्यमिक शाळा उभारण्यात यशस्वी त्यामुळे या परिसरातील विविध समाज घटकातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे या करिता सन 2000 साली दिनाभाई मोरे शिक्षण संस्था सानेगाव संचालित तिसे गावात स्वतःच्या मालकीची शेत जमीन देत कै कृष्णाजी संभाजी गोरीवले यांच्या नावाने पहिले माध्यमिक हायस्कूल केले असे महान कर्तबगार थोर बुद्धिमान व्यक्तिमहत्व असलेले उमाजी गोरीवले यांचे 24 डिसेंबर रोजी मध्यरात्री वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले त्यांच्या निधनामुळे गोरीवले क
Image
 रा.जि.प.शाळा भुवन येथे राष्ट्रीय छावा संघटना रायगड जिल्हाअध्यक्ष निलेशभाई महाडीक यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप,    कोलाड (श्याम लोखंडे) भुवन येथील रा. जि. प. शाळा शाळा भुवन येथे 21डिसेंबर सकाळी ११वाजता राष्ट्रीय छावा संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष निलेश भाई  महाडीक यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.          निलेशभाई महाडीक हे पुई  गावचे तरूण,असून   सामाजिक कार्यात अनेक युवकांचे प्रेरणास्थान असून आदर्श समाज सुधारक तसेच विविध क्षेत्रात त्यांचे नाव असुन त्यांना शिक्षणा विषयी प्रचंड आवड व तळमळ दिसुन येते . विद्यार्थी राष्ट्राचे आधारस्तंभ असून त्यांचा विकास हा लहान वयातच विद्यार्थी दशेतच व्हायला पाहिजे त्यासाठी सर्वांना  शिक्षण व शैक्षणिक साहित्य मिळणे गरजेचे आहे आणि हे मी माझे कर्तव्य समजतो असे त्यांचे मत आहे.        या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले शाळा ही जीवनातील महत्त्वाची गोष्ट आहे . खुप शिका, मोठे व्हा समाजाचे ऋण फेडा . तसेच आपल्या आई_वडिलांसोबत आपल्या गुरूचेही नाव कमवा . हे शिक्षण तुमचे फुकट जाणार नाही या कडे लक्ष दया . जीवनात व्यास
Image
  आदेश, सुवर्णा, विवाह प्रसंगी आमदार अनिकेत भाई तटकरे यांची उपस्थिती  कोलाड -हेटवणे ( संतोष निकम)    रोहा तालुक्यातील धाटाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश  भोकटे व धाटाव ग्रामपंचायतीच्या महिला अध्यक्षा सौ प्रमिला रमेश भोकटे  यांचे चिरंजीव आदेश रमेश भोकटे यांचे तळा येथील येथील कै.महादेव धाडवे यांची कन्या सुवर्णा हीच बरोबर नुकताच  कालिदास हॉल किल्ला येथे विवाह संपन्न झाला या विवाह प्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वांचे लाडके आवडते नेते आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी सदिच्छा भेट दिली व वधू-वरास भावी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या  याप्रसंगी आमदार अनिकेत भाई तटकरे यांचे भोकटे परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले या प्रसंगी धाटाव येथील मा. विनोदभाऊ पाशिलकर,मा. विजयराव मोरे, यदुरामजी रटाटे, तसेच वराचे मामा विजय निकम, संजय निकम, संतोष निकम,अजय निकम , युवराज निकम, राकेश निकम,अनिल निकम,  ललित मोरे, गजानन मोरे, अरुण मोरे तसेच संपूर्ण निकम परिवार व भोकटे  परिवार मुकेश भोकटे, नीलेश भोकटे गणेश भोकटे तसेच  रोहा तालुक्यातील अनेक  मान्यवर व धाटाव ग्रामपंचायतीचे अनेक मान्यवरांच्या  उपस्थितीती
Image
  स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांची वार्षिक सहल उत्सहात संपन्न . गोवे-कोलाड (विश्वास निकम) स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी कोलाड यांची वार्षिक सहल मंगळवार दि.२१ /१२/२०२१ रोजी मोठया उत्साही वातावरणात संपन्न झाली. . स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड या मंडळाची स्थापना झाल्यापासून दरवर्षी वार्षिक सहलीचे आयोजन करण्यात येते परंतु गेल्या वर्षी कोरोनामुळे सर्वत्र बंदी घालण्यात आली होती यामुळे गेल्या वर्षी वार्षिक सहलीचे आयोजन करण्यात आले नव्हते. परंतु या वर्षी सर्वत्र बंदी उठविल्यानंतर या वर्षी कोलाड जेष्ठ नागरिक मंडळाच्या वार्षिक सहलीचे आयोजन करण्यात आले. . यावेळी कोलाड जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष मारुती राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मुगावली येथील स्वयंभु गणपती मंदिर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन  येथील सोमजाई मंदिर,व दिवेआगर येथील सोन्याचा गणपती येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंडळाच्या १०० सदस्यांनी सहभाग घेतला.कार्यकारी मंडळ व सर्व सदस्य यांच्या पुढाकाराने ही वार्षिक सहल उत्साही वातावरणात संपन्न झाली. .
Image
  सनातनवरील आरोप खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित:-  सनातन संस्था, . गोवे-कोलाड (विश्वास निकम )   राज्याचे पर्यावरणमंत्री मा. आदित्यजी ठाकरे यांना मिळालेल्या धमक्यांचा सनातन संस्था तीव्र शब्दांत निषेध करते. या धमक्या देणार्‍या दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आम्ही करत आहोत; परंतु या चर्चेत कोणताही संदर्भ नसतांना आणि जी प्रकरणे अगोदरच न्यायप्रविष्ट आहेत, त्या संदर्भात महाराष्ट्राचे मंत्रीद्वयी नवाब मलिक आणि छगन भुजबळ यांनी विनाकारण सनातन संस्थेवर आरोप केले आहेत. त्यांचे सदर आरोप खोटे, तसेच राजकीय हेतूने प्रेरित आहेत. याद्वारे एका हिंदुत्ववादी संस्थेला पर्यायाने हिंदुत्वाला बदनाम करण्याचा हेतू दिसून येतो.  कोरोना महामारीच्या काळात निर्बंध असतांनाही हजारो लोकांचे मोर्चे काढून रझा अकादमीने केलेल्या दंगलीत महाराष्ट्र पेटला होता, त्यावर कारवाईची मागणी न करता; जितेंद्र नारायणसिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिजवी) यांचा शिरच्छेद करण्याची उघड धमकी देणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात न बोलता, कोणत्याही पुराव्याशिवाय सनातनवर देशव्यापी बंदी घालण्याची छगन भुजबळ मागणी करत आह
Image
  रोहा पाणीबाणी प्रकरण!   ठेकेदार आणि सल्लागार एजन्सीवर कारवाई करा सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सभापतींसह शिवसेनेने केली मागणी, कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा अष्टमी शहरात तब्बल सहा दिवस पाणी नव्हते. नवीन जलवाहिनी फुटल्याने प्रथमच पाणीबाणी सारखा प्रसंग ओढवला. जलवाहिन्यांचे काम दर्जाहीन झाल्याने हा प्रसंग घडला असल्याने संबंधीत ठेकेदार आणि सल्लागार एजन्सीची चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा अशी मागणी नगर पालिकेतिल सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या पाणीपुरवठा सभापती सुजाता चाळके यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी केली आहे. रोहा अष्टमीत पाणीबाणी स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांत प्रचंड संताप आहे. सहा दिवस अथक प्रयत्नातून रोहा शहराला पाणीपुरवठा पुन्हा नियमित सुरू झाला आणि नागरिकांनी निश्वास सोडला. अशात जलवाहिनी वारंवार दुरुस्त करावी लागते, जलवाहिनी फुटल्याने संबंध नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला, याची दखल घेत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापती सुजाता चाळके यांनी बुधवारी मुख्याधिकारी रोहा यांना निवेदन दिले. पाणीबाणीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास झाला त्यामुळे पाईप लाईन फुटीला
Image
  रोहा पहूर ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत शिवसेना उमेदवार विजय, राष्ट्रवादीला धक्का,   सुतारवाडी विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला!   मात्र जिल्ह्यात होतेय पहूर ग्रामपंचायतीचीच  चर्चा...   कोलाड( श्याम लोखंडे) 21 डिसेंबर 2021 रोजी रोहा तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका घेण्यात आल्या या पैकी पहूर ( ता. रोहा ) येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या जयवंती दत्तात्रेय तांदळेकर यांचे कोरानामुले निधन झाल्याने एका जागेसाठी 21 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक मतदान झाले या पोट निवडणुकीसाठी वार्ड क्र. 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निता बबन उमासरे तर शिवसेनेच्या ऐश्वर्या यशवंत शिंदे हे उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उभे होते मात्र या अटीतटीच्या लढतीचा आज 22 डिसेंबर रोजी निकाल हाती आला असून यात सौ ऐश्वर्या ने बाजी मारत राष्ट्रवादीच्या नीता उमासरे यांचा पराभव केला आहे .   सुतारवाडी विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मात्र जिल्ह्यात होते पहूर शिवसेनेची चर्चा.... सुतारवाडी विभाग हा प्रामुख्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो मात्र याच बालेकिल्ल्यात पुहुर ग्राम पंचायत मध्ये
Image
  नगरपंचायत निवडणुकीत मतदारांच्या रांगा   लोकशाहीतील मतदारांचा अमूल्य मत,        मतदानाचा टक्का वाढून ७३.८२%मतदान!         तळा - कृष्णा भोसले तळा नगरपंचायतनिवडणुकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावताना मतदान केंद्रावर रांगा लावलेल्या दिसत होत्या.    नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग ७ मध्ये शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.तर ओबीसी आरक्षण मुळे   चार जागांवर १८ जानेवारी.ला मतदान होणार असून आज १२ जागांवर ३५ उमेदवारांचे भवितव्य मतदानाव्दारे पेटीत सिलबंद होणार आहेत.या सगळ्यांचा निकाल १९ जाने.२०२२ ला लागणार आहे.  तळा नगरपंचायत निवडणुकीत ४१४१ मतदार असुन पुरुष मतदार २०७९ तर महीला मतदार२०६२ आहेत.या नगरपंचायत हद्दीत १२ मतदान केन्द्र असुन प्रशासनाने सर्व केन्दावर चोख बंदोबस्त ठेवला आहे. निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावला जात आहे. सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत ५९.७४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर ३.३० वाजेपर्यंत ६८.९२ टक्के मतदान झाले.तर त्यानंतर ५.३० वाजेपर्यंत ७३.८२ टक्के मतदान झाले आहे.   या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात याआधीच तळा पोलीस निरीक्षक गोविंद ओमास
Image
  हुश्श... रोहेकरांना तब्बल सहा दिवसांनी मिळाले पाणी!   नवीन जलवाहिन्यांच्या फुटलेल्या भागाची तात्पुरती दुरुस्ती पाणीपुरवठा मध्यम गतीने सुरू! कोलाड (श्याम लोखंडे ) गेल्या सहा दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणाऱ्या रोहेकरांना तब्बल सहा दिवसांनी अखेर पाणि मिळाले. नवीन जलवाहिन्यांच्या फुटलेल्या भागाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात यंत्रणेला यश आले असले तरी नवीन आले असले तरी नवीन आणि जुनी पाईपलाईनचा ताळमेळ होत नसल्याने या वाहिनीला प्रेशरमुळे भगदाड पडत असल्याने पाणि पुरवठा धीम्या गतीने सुरू करण्यात आले आहे. जलवाहिनीच्या फुटलेल्या भागांची गेले पाच दिवस सातत्याने दुरुस्ती केल्यानंतर सहाव्या दिवशी सकाळी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा सुरू झाला. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणाऱ्या आणि अंघोळीसाठी धडपडणार्‍या रोहेकरांचा जीव अक्षरशः भांड्यात पडला. रोहा नगरपालिकेने सुमारे 12 कोटी रुपये खर्च करून डोलवहाळ ते रोहे असे जलवाहिनीचे काम केले. गेल्या बुधवारी रोहा कोलाड रोड वरील क्लॅरियंट कंपनी जवळ या जलवाहिनीला पुन्हा एकदा भगदाड पडले. त्यामुळे रोहा नगरपालिकेला होणारा पाणीपु
Image
पहूर  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा  उमेदवार प्रचंड मताने  निवडून येणार:- मंगेश कदम       सुतारवाडी : - ( हरिश्चंद्र महाडिक ) 21 डिसेंबर 2021 रोजी रोहा तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका होत आहेत. पहूर ( ता. रोहा ) या ग्रामपंचायतीच्या सदस्या जयवंती दत्तात्रेय तांदळेकर या कोरानाने मृत्यु पावल्याने एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पोट निवडणुकीसाठी वार्ड क्र. 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निता बबन उमासरे तर शिवसेनेच्या ऐश्वर्या यशवंत शिंदे हे उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरले आहेत.         पहूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. मंगेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, खासदार सुनिल तटकरे पालकमंत्री अदितीताई तटकरे आणि आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास केला असून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार निता बबन उमासरे या प्रचंड मताधिक्याने निवडूण येतील यात शंकाच नसल्याचे सरपंच श्री. मंगेश कदम तसेच अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी सांगितले. निवडणुकीसाठी पह
Image
  सुतारवाडी येथे दत्तजयंती सोहळा उत्साहात पंचक्रोशितील भक्तांनी दर्शन आणि प्रसादाचा घेतला लाभ    सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडिक) सुतारवाडी येथील श्री दत्तमंदिरात गेल्या पस्तीस वर्षापासून दत्तजन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावाने आणि आनंदमय वातावरणात साजरा केला जातो. या वर्षी 36 व्या वर्षात उत्सवाने पदार्पण केले. दि. 18 डिसें. 2021 रोजी अभ्यंग स्नान श्री. विजय सावंत ( सुतारवाडी ) यांच्या हस्ते करण्यात आले. नेतृत्व ह.भ.प. किरण कुंभार, ह.भ.पू. श्री. श्रीकांत सरफळे महाराज यांनी केले. यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण करण्यात आले याचे नेतृत्व श्री. मोहन दोशी, श्री. विजय सावंत, श्री. श्रीकांत सरफळे यांनी केले.      ज्ञानेश्वरी सांगता श्री. रमेश सुर्वे यांनी केली. दुपारी 12 नंतर भोजनाचा आस्वाद भाविकांनी घेतला. हे भोजन श्री. दिलीप जांभळे व कै सुनंदा नथूराम मेहता यांच्या स्मरणार्थ श्री. विनोद मेहता यांनी दिले. दुपारी 3 ते 5 वा. द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडी आणि रा.जि.प. प्राथमिक शाळा सुतारवाडी च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये गजानना, गजानना, परिकथेच्या पऱ्या
Image
  देवकान्हे पिंपळवाडी येथे धर्मीक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी दत्तजयंती उत्साहात साजरी  खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील पिंपळवाडी- देवकान्हे येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवा अंतर्गत श्री गुरू दत्तात्रेय जन्मोत्सव, सायंकाळी रोहा तालुका कोकणदिंडी वारकरी सांप्रदाय यांचे हरिपाठ तद्नंतर महाप्रसाद व रात्रौ ९ वा. ह.भ.प. दिनेशमहाराज कडव यांचे सुश्राव्य हरिकिर्तन आदी धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांनी संपन्न झाले.  यावेळी देवकान्हे ग्राम पंचायत सरपंच वसंत भोईर ,राजकीय तथा उद्योजक विजयराव मोरे, रोहिदास शेठ पाशीलकर,ज्ञानेश्वर साळुंखे,नारायण कान्हेकर,वरसे ग्राम पंचायत सरपंच नरेश शेठ पाटील,रुपेश कर्नेकर, लीलाधर मोरे, मुकेश भोकटे, रणपिसे, धनंजय आठवले,प्रकाश कोळी,घनश्याम कारले,सुनील थिटे सर पत्रकार नंदकुमार मरवडे,डॉ श्यामभाऊ लोखंडे,शुभम हातकामकर,यांनी दर्शनाचा लाभ घेत ग्रामस्थ मंडळाला शुभेच्छा देत सर्वांचे आर्थिक सहाय्य या कार्यक्रमाला लाभले. तर विशेष सहकार्य म्हणून देवकान्हे ग्राम पंचायतीचे माजी सरपंच राजेश सुटे यांनी
Image
  रोहा दत्तनगर येथे दत्त जयंती उत्सव उत्सहात संपन्न!  हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ,   रोहा  (विशेष प्रतिनिधी) रोहा येथील भुवनेश्वर येथील दत्त नगर येथे दत्त जयंती उत्सव मोठया उत्सहात  साजरा करण्यात आला हजारो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रोहा येथील दानशूर व्यक्तिमत्व व सामाजिक कार्यकर्ते रामप्रकाश कुशवाह यांचे भुवनेश्वर येथील दत्तमंदिरात सालाबाद प्रमाणे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून हजारो दत्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. वेळी उत्सवमूर्ती रामप्रकाश कुशवाहा आणि त्यांचे कुटुंबीय जातीने सर्व भक्तांचे स्वागत करत होते.आज दत्त भक्तांच्या  चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता दत्त नामाच्या मधुर भजनात सारा आसमंत भरून गेला होता आबाल वृद्ध साऱ्यांनी या  उत्सवाला उपस्थित राहून अनेक वर्षे होत असलेल्या उत्सवाला नवे रंग रूप दिले. होते यावेळी अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांची पसंती असलेल्या न्यूज आज तक मराठी चॅनेलचे उपसंपादक राजेश हजारे यांनी ही दत्त मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले.   दत्त जयंती निमित्ताने दत्तनगर भुवनेश्वर येथे दत्त दर्शनासाठी
Image
  रोहा -अष्टमी शहरावर पाणीबाणी!           पिण्याच्या पाण्यासाठी रोहेकरांची फरपट !  चार दिवस झाले शहराचा पाणीपुरवठा बंद! नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका! कोलाड (श्याम लोखंडे) पिण्याच्या पाण्यासाठी रोहा अष्टमीकरांची गेली चार दिवस फरपट सुरू आहे. चार दिवस झाले शहरात पाण्याचा टिपूस नाही, लोक पाण्यासाठी वणवण करीत आहेत, शुक्रवार पासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी तो अपुरा असल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका नागरीकांना बसला आहे. वीस हजारांची लोकसंख्या असलेल्या रोहा शहराच्या कानाकोपऱ्यात गेल्या चार दिवसांपासून पाण्याचा टिपूस नाही. नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शहरवासीयांना हंडाभर पाण्यासाठी अक्षरशः खेडोपाड्यात फरफट करावी लागत आहे. प्रशासनाकडून पुरवठा केले जाणारे पाण्याचे टँकर अपुरे पडत असल्याने अनेक भागातील नागरिकांना आंघोळीसाठी अक्षरशः 'गोळी' घेण्याची वेळ आली आहे. आणखीन दोन दिवस भगदाड पडलेली जलवाहिनी दुरुस्ती करण्यास वेळ लागणार असल्याने रोहा शहरावर पाणीबाणी ओढवली आहे. रोहा हे तालुक्याचे ठिकाण असून या शहराला डोलवहाल धरणातून पाणीप
Image
  सोनाजी भाऊ दळवी यांचे अल्पशा आजाराने निधन         गोवे -कोलाड  विश्वास निकम आंबेवाडी नाका कोलाड येथील रहिवासी सोनाजी भाऊ दळवी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी १५ डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. विद्युत वितरण कंपनी मधून ते सेवानिवृत्त झाले होते.आपल्या सेवा काळात त्यांनी रोहा सह रायगड जिल्यातील बहुतांश तालुक्यामध्ये त्यांनी आपली सेवा उत्तमपणे बजावली. सेवानिवृत्ती नंतर ते कोलाड जेष्ठ नागरिक मंडळात कार्यरत होते.त्यांचे अंत्यविधी प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्यासंख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाचे , सुना नातवंडे मोठा कदम परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार २४ डिसेंबर रोजी उद्धर रामेश्वर येथे करण्यात येणार आहे. तर उत्तरकार्य रविवार २६ डिसेंबर रोजी आंबेवाडी नाका कोलाड येथील त्यांचे राहत्या घरी होणार असल्याचे माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
Image
  माणसाने आपल्या हितासाठी जागणे महत्वाचे नाही, तर त्याचे हित कशात आहे, हे जाणणे महत्वाचे:-ह.भ.प. रुपेश महाराज शेळके               गोवे-कोलाड (विश्वास निकम )             माणसाने आपल्या हितासाठी फक्त जागा रहाणे महत्वाचे नाही तर त्याचे हित कशात आहे.हे जाणणे महत्वाचे आहे असे मत गोवे येथील सुनिल नवघरे यांचा १० वर्षांचा सुपुत्र आळंदी येथे पायी जाऊन तुळशीची माळ घातली त्या निमित्ताने सत्यनारायणाच्या पूजेनिमित्ताने आयोजित किर्तन सेवेत ह.भ.प. रुपेश महाराज शेळके यांनी आपले मत स्पष्ट केले.                       अपुलिया हिता जो असे जागता l                      धन्य माता पिता तयाचिया ll१ll                       कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक l                       तयाचा हरिक वाटे देवा ll२ll                       गिता भागवत करिती श्रवण l                        अखंड चिंतन विठोबाचे ll३ll                        तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा l                         तरी माझ्या दैवा पार नाही ll४ll        या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या चार चरणाच्या आधारे स्पष्ट करतांना ह.भ.प.रुपेश महाराज शेळके यां
Image
  महाड मधून महिला बेपत्ता आढळल्यास संपर्क साधावा महाड  पोलिसांचे आवाहन!   महाड( विशेष प्रतिनिधी ) महाड तालुक्यातील 26 वर्षीय महिला बेपत्ता झाली असल्याची घटना घडली असून सदर महिला आढळल्यास याबाबत महाड पोलिसांशी  संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे   याबाबत महाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशी की महाड तालुक्यातील राहणार मौजे पांगारी मूळगाव तालुका महाड येथून महिला अपेक्षा प्रतीक मोरे वय 26वर्षे, ही महिला दिनांक 8 डिसेंबर रोजी 10: 15 वाजता महाड डॉक्टर कडे जाते असे सांगून गेली ती अद्याप घरी परतली नाही सदर महिला अंगाने मजबूत असून उंची 155 सेमी, रंग निमगोरा, केस काळे,अंगात आकाशी रंगाची साडी व आकाशी रंगाचा ब्लाउज तसेच पायात उंच टाचेची काळे रंगाची चप्पल, असे वर्णन असून महाड पोलीस ठाण्यात याबाबत मनुष्य मिसिंग रजि. नं.13/ 2021 नुसार नोंद करण्यात आली असून सदर वर्णनाची महिला आढळल्यास महाड तालुका पोलीस ठाणे पोना. टी.डी. लोळे मो. 8554086125 फोन.02145/222254 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन महाड तालुका पोलिस ठाण्याकडून  करण्यात आले आहे.