Posts

Image
रोहा तालुक्यातील घटना!    कालव्याच्या पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू,आंबेवाडी येथील घटना      कोलाड (विश्वास निकम )  सोमवार दि.७ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.२५ वाजता रोहा तालुक्यातील कोलाड जवळीलआंबेवाडी येथील गणेश नगर येथे कालव्याच्या पाण्यात तोल जाऊन एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार आंबेवाडी येथील गणेश नगर येथील कालव्याच्या पाण्यात तोल जाऊन गजानन लक्ष्मण जंगम वय ४८ वर्षे रा. आंबेवाडी,गणेश नगर येथील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असुन घटनास्थळी कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांनी भेट दिली.तसेच सहयाद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम दाखल झाली त्यांच्या मदतीने सदर मयत इसमाचा मृत्यूदेह कालव्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला.अधिक तपास कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा आंबेतकर करीत आहेत.
Image
  आरोग्य केंद्र इंदापूर अंतर्गत आरोग्य मंदिर रातवड येथे जागतिक हिवताप दिन संपन्न    हिवताप दिनाचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धेचे आयोजन! इंदापूर( प्रतिनिधी)   आरोग्य केंद्र इंदापूर अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदीर रातवड अंतर्गत माध्यमिक विद्यालय रातवड येथे नुकताच हिवताप जनजागृती करण्यात आली. सदर वेळी हिवताप अंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.मुलांनी सुंदर चित्र काढले.हिवताप आजारावरील आरोग्य शिक्षण देते वेळी येता कणकण तापाची करा तपासणी रक्ताची. गप्पी मासे पाळा,हिवताप टाळा. तसेच कोरडा दिवस पाळणे परिसर स्वच्छ ठेवणे. फुटलेली टायर,रिकामे डबे नारळ करवंटी, बादली, पाणी साचू देऊ नये. स्वच्छता राखावी परिसर स्वच्छ ठेवणे.आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.  सदर वेळी आयुष्यमान आरोग्य मंदीर रातवड येथील मा. सी. एच. ओ. चाटे साहेब आरोग्य सेविका सी. एन मोरे तसेच आरोग्य सेवक श्री. सुधीर गणपत खैरे आरोग्य सेवक रातवड यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी माध्यमिक विद्यालय रातवडचे मुख्याध्यापक संतोष कदम, डॉ. शारदा निवाते मॅडम सौ.भारती कांबळे मॅडम, भगत सर, गरधे सर, गायकव...
Image
  ग्रामपंचायत आंबेवाडी आदिशक्ती अभियान समिती अध्यक्षा पदी सौ.प्रितम ताई पाटील यांची निवड    कोलाड (विश्वास निकम)   नुकतीच माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. त्यातच महिला सक्षमीकरण करण्यासाठी राज्य सरकारने आदिशक्ती अभियान ही योजना ग्राम पंचायत स्तरावर सुरू केली आहे. या अभियाना अंतर्गत महिला विकास विषयक कार्ये म्हणजेच बालविवाह रोखणे, हुंडा पद्धती बंद करणे,महिला संरक्षण, गावातील एकल महिला, विधवा, परित्यक्ता व निराधार महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.  तसेच, महिला सक्षमीकरण विषयक कार्ये अंतर्गत महिला बचत गटांची निर्मिती व सक्षमीकरणासाठी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करण्यात येणार आहे.या अनुषंगाने आंबेवाडी ग्रामपंचायतीने आदिशक्ती अभियान समिती स्थापन केले असुन या समितीच्या अध्यक्ष पदी सौ.प्रितमताई निशिकांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.                                        ...
Image
  मुंबई-गोवा महामार्गांवरील सर्व दिशादर्शक फलका जवळ जीवघेणे खड्डे,  प्रवाशी वर्गाच्या जिवाला धोका,   लोकनेत्यांनी दिलेली डेडलाईन संपली,महामार्गाचे काम होईल तेव्हा होईल? खड्डे तरी भरा, प्रवाशी वर्गाची संतप्त प्रतिक्रिया!   कोलाड (विश्वास निकम )  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील ज्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.त्या सर्वच ठिकाणी एका बाजूकडून दुसऱ्या बाजुकडे जाणाऱ्या सर्वच दिशादर्शक फलकाजवळ मोठं मोठे खड्डे पडले असुन यामुळे प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या जुन २०२५ अखेर या महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी दिलेली डेडलाईन पुन्हा एकदा फेल ठरली आहे.यामुळे महामार्गाचे काम होईल तेव्हा होईल? महामार्गावर पडलेले मोठं मोठे खड्डे तरी पूर्ण भरा अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त केली जात आहे.   मुंबई-गोवा महामार्गवरील रस्त्याची अक्षरशः चाळन झाली आहे.या शिवाय या मार्गांवरील सर्वच दिशादर्शक फलका जवळ एका बाजु कडून दुसऱ्या बाजूकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना तर या मार्गांवरून प्रवास करतांना तारेवरची कसर...
Image
  कुंडलिका व महिसदरा नदीनी धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा, भातशेती पाण्याखाली!   कोलाड (विश्वास निकम) सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवार दि. १९ जुन रोजी सकाळी ९ वाजल्या पासुन कुंडलिका व महिसदरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असुन प्रशासना तर्फे नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा इशारा देण्यात आला आहे.   तसेच दोन दिवस सतत पडत असलेल्या तुफान पावसामुळे महिसदरा नदीचे पाणी गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आल्यामुळे गोवे गावाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला असुन सर्व भातशेती ही पाण्याखाली गेली आहे तसेच आंबेवाडी बाजारपेठेत पाणीच पाणी साचून यातून मार्ग काढतांना नागरिकांची तारंबल उडाली.  तुफान पडलेल्या पावसामुळे कुंडलिका, महिसदरा, तसेच गोदी नदिनी धोक्याची पातळी ओलांडली असुन पुराचे पाणी गोवे येथील आदिवासीवाडी,बौद्धवाडी,तसेच रस्त्यावर असणाऱ्या दुकानात तसेच गावातील काही घरात  पुराचे पाणी शिरूर मोठे नुकसान झाले आहे.तसेच आंबेवाडी येथील बाजारपेठेतील दुकानात पाणी शिरूर दुकानदारांचे ही मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही दिवसापूर्वी भात पेरणी केलेल्य...
Image
  विजेचा शॉक लागून मुलाचा दुर्दैवी मृत्यू! जिंदाल कॉलनी सुकेळी येथील नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील घटना!   सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली घटनास्थळी धाव!     कोलाड (विश्वास निकम) रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गत असणार्‍याहून नागोठणे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येअसणाऱ्या  सुकेळी येथील जिंदाल हॉस्पिटल जवळ असणाऱ्या  कॉलनीच्या आवारात खेळत असलेल्या मुलाला विजेचा खांबाचा शॉक लागून मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक ११ जून रोजी सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेत मानव कुमार मुकेश पवार वय वर्षे १३ रा. जिंदाल हॉस्पिटल कॉलनी सुकेली, मूळ गाव फतेहपूर ( राजस्थान) याचा मृत्यू झाला असुन या घटनेमुळे सुकेली परिसरात शोककळा पसरली आहे.   याच विजेच्या खांबाचा शॉक लागून दुर्दैवी 13वर्षीय मुलाचा अंत झाला. हे दाखविताना सामाजिक कार्यकर्ते दिनेश कातकरी व सतीश सुटे, प्राप्त झालेल्या माहिती नुसार मानव कुमार हा १३ वर्षाचा मुलगा जिंदाल हॉस्पिटल कॉलनीच्या बाहेर असलेल्या मैदानात कॉलनीतील इतर मुलांच्या सोबत खेळत होता.खेळताना त्यांच...
Image
  गुरूकडून ज्ञान वडीलांकडून  संघर्ष आईकडून संस्कार शिकलो म्हणून 39 वर्षात निष्कलंक सेवा करू शकलो:-उपनिरीक्षक राम पवार    सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी  रायगड :-(ओम पवार) पोलीस खात्यामध्ये 39 वर्षे सेवा करताना खूप अडचणी आल्या मात्र मागे हटलो नाही गुरूकडून ज्ञान,वडिलांकडून संघर्ष व आई कडून मिळालेले संस्कार व पत्नीने दिलेली साथ  या शिदोरीमुळेच पोलीस खात्यात 39 वर्षे निष्कलंकपणे सेवा करू शकलो असे प्रतिपादन  सुधागड पाली पोलीस ठाण्याचे सेवानिवृत्त कार्यतत्व कर्तव्यदक्ष व लोकप्रिय सेवानिवृत्त उपनिरीक्षक राम मारुती पवार यांनी काढले ते सेवानिवृत्ती समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की 39 वर्षात खूप काही शिकलो तुमच्या समाजाच्या सहकार्यामुळे 39 वर्षाच्या प्रवासात पुढे जाऊ शकलो आव्हानांशी सामना करण्याची प्रेरणा ही आपल्यासारख्या स्नेहांमुळेच मिळाली तुमचे सहकाऱ्यांचे, समाजाचे ऋण शब्दात मी व्यक्त करू शकत नाही. मी जरी  सेवानिवृत्त झालो असले तरी यापुढे सुद्धा अखंड समाजाची सेवा करण्याची अभिवाचन सेवानिवृत्त...