दहीवली हायस्कूलमध्ये पुस्तक वाटप करून केला बालदिन साजरा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांच्या हस्ते पुस्तक वाटप संपन्न माणगाव (प्रतिनिधी )माणगाव तालुक्यातील तुकाराम साबाजी भोस्तेकर दहिवली या विदयालयात सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनी बालदिनानिमित्ताने गोरेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण संभाजी नावले यांच्या दातृत्वातून विद्यार्थ्यांना प्रेरणा म्हणून वर्तन बदल व संस्कारक्षम घडवून आणणारी पुस्तके वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व शारदामातेचे पूजन करून करण्यात आले याप्रसंगी त्यांच्या समवेत संस्थेचे चिटणीस चंद्रकांत चेरफळे पोलीस हवालदार सौ. सानप पो. हवालदार सौ. चव्हाण, पोलीस नाईक धाडवे, पोलीस हवालदार श्री गणेश समेळ शाळेचे मुख्याध्यापक श्री जगदाळे सर, राजन पाटील सर,तसेच आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते त्यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकांसह फुले वाटप करून मुलांचा आनंद द्विगुणीत करण
Posts
Showing posts from November, 2022
- Get link
- Other Apps
रायगडात जात निहाय जनगणनेसाठी ओबीसींची एकजूट,मेळावे,रॅली,सोशल मिडियाद्वारे प्रबोधन, पहिल्याच वेळा रायगड मध्ये ओबीसींमध्ये मध्ये प्रचंड एकजुट असल्याचे वातावरण! गावागावात, शाळकरी, शेतकरी, कॉलेज तरुणवर्ग, वयोवृद्ध, यांमध्ये रंगते18 नोव्हेंबर मोर्च्याचीच चर्चा! कोलाड (श्याम लोखंडे) ओबीसींची जात निहाय जनगणना करत त्यांच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येवु नये यासाठी ओबीसी जनमोर्चाचे राज्य अध्यक्ष प्रकाश आण्णा शेंडगे यांचे नेतृत्वाखाली राज्यभरातील ओबीसी पेटून उठला आहे.पालघर, रत्नागिरी येथील यासंदर्भातील मोर्चे राज्य कार्यध्यक्ष चंद्रकांत बावकर व जे.डी.तांडेल, दशरथ ठाकूर यांच्या नियोजनाखाली यशस्वी झाले.शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश मगर यांचे नेतृत्वाखाली रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंचा मोर्चा काढण्यात येणार आहे.यासाठी रायगड मधील अठरापगड जातींचे बारा बलुतेदार ओबीसी समाजबांधव एकजुटीने, एकदिलाने एकत्र आले आहेत.आपल्या न्याय्य व हक्काच्या मागण्या तळागाळातील ओबीसी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी विभागनिहाय मिळावे घेण्यात येत आहेत.भावी पिढीच्या सर्वांगीण हिताचे असणारे ओबीसी
- Get link
- Other Apps
सारीपाट व बनाटी खेळाचे खिलाडी सहादेव पांडुरंग खांडेकर यांचे दुःखद निधन कै. सहदेव पांडुरंग खांडेकर कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील खांब परिसरातील मौजे चिल्हे येथील सारीपाट खेळाचे खिलाडी,उत्कृष्ठ बनाटी बहाद्दर,प्रगतशील शेतकरी,सामाजिक शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्राची मोठी आवड बाहे विविध सोसायटीचे अनेक वर्षे चेअरमन पद भूषविलेले शेकापचे जेष्ट नेते सहादेव पांडुरंग खांडेकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी मंगळवारी पहाटे त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाल्याने खांडेकर परिवारावर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे. रोहा तालुका कुणबी समाजाचे उपाध्यक्ष व ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न जनमोर्चाचे जेष्ठ कार्यकर्ते व खांब विभागीय शेकापचे नेते मारुती खांडेकर सर यांचे वडील सहादेव खांडेकर यांनी कुणबी समाजनेते तथा माजी आमदार कै.पा. रा.सानप, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व शिक्षण महर्षी रा.ग.पोटफोडे (मास्तर) यांच्या खांद्याला खांदा लावत सामाजिक कार्य करत उत्तमरीत्या शेती व्यवसाय सांभाळले आपल्या शेती व्यवसायाबरोबरच त्यांनी शेतकरी कामगार पक्ष संघटना वाढीसाठी त्याकाळात अथक परिश
- Get link
- Other Apps
रायगड जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थाअलिबागच्या संचालक पदी बळीराम धनावडे यांची निवड कोलाड (श्याम लोखंडे) कर्मचारी वर्गासाठी विश्वसनीय असलेल्या रायगड जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था अलीबाग च्या संचालक पदी रोहा येथील बळीराम मारुती धनावडे ,यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबाबत सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे. बळीराम धनावडे यांचे मुळ गाव मालसई असुन ते रोहा येथे स्तायिक आहेत. रायगड जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग रोहा कार्यालयात ते कनिष्ट सहाय्य्क पदावर कार्यरत आहेत. अनेक वर्ष शासकीय सेवा करित असताना प्रमाणीक व तत्पर सेवा केली.शांत व मनमिळाऊ स्वभाव यामुळे रायगड जिल्हा परीषद पतसंस्था अलिबाग या सहकार क्षेत्रात अग्रगन्य असलेल्या व पारदर्शक कारभार करित असलेल्या संस्थेत त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड़ करण्यात आली. माझ्यावर जी पदाची जबाबदारी सोपवली त्या पदाला निचित साजेशे काम करनार असल्याचे बळीराम धनावडे यानी सांगितले.
- Get link
- Other Apps
रेल्वे प्रवासी संघ,मनसे च्या पाठपुराव्याला रोहेकरांची साथ, रोहा दिवा मेमुची वाढीव फेरी लवकरच सेवेत रोहे(श्याम लोखंडे) रोहे दिवा मेमु सेवा वाढवत लांबपल्याच्या गाड्यांचे रद्द केलेले थांबे पूर्ववत करावे यासाठी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, लोकशाही मार्गाने पाठपुरावा करत होते.यासंबंधी वेळोवेळी मध्य रेल्वे प्रशासनास निवेदने दिल्यानंतर सप्टेंबर महिन्यात सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली होती.रोह्या मधून रेल्वे सेवा वाढावी ही प्रत्येक सर्वसामान्य रोहेकराची मनोमन इच्छा होती. त्यामुळे यासाठी होणाऱ्या प्रत्येक कृतीला रोहेकरानी भरभक्कम साथ दिली. याला आता यश येताना दिसत आहे.मनसेने यासाठी राबविलेल्या सह्यांच्या मोहिमेचे निवेदन मध्य रेल्वे चे अप्पर विभागीय व्यवस्थापक (वाहतूक) एच जी तिवारी यांना दिल्यानंतर ६ ऑक्टोंबर रोजी यासंबंधी प्रस्थाव दाखल केला. त्यानुसार १४ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वे ने रोहे दिवा मार्गावर नवीन मेमु फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.यामुळे आता लवकरच रोहेकरांसाठी सकाळी सव्वापाच नंतर अजून एक वाढीव फेरी उपलब्ध होणार असल्याचे या जाहीर केलेल्या पत्र
- Get link
- Other Apps
इंदिरा येलकर यांचे दुःखद निधन कै. इंदिरा येलकर खांब/पुगांव(नंदू कळमकर) रोहा तालुक्यातील पुगांव गावच्या रहिवासी इंदिरा(धोंडी आका)काशिराम येलकर यांचे सोमवार दि ७ नोव्हेंबर २०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७८ वर्षांचे होते.त्या प्रेमळ व शांत स्वभावाने सर्वाना परिचित होत्या. त्यांचे माहेर व सासर गावातच असल्यामुळे त्यांना सर्वजन धोंडी आका या नावाने हाक मारीत असत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसहित समस्त पुगांव ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी नारायण धनवी व घनश्याम बागुल यांनी दुःख व्यक्त करतांना सांगितले. धोंडी आका ही अतिशय प्रेमळ होती परंतु त्यांच्या एकुलत्या एक मुलांचे तरुणपणी निधन झाले असतांना त्यांची सून सारिका हिने दोन लहान मुलांसह सासूची आपल्या आई प्रमाणे शेवट पर्यंत सेवा केली व समाजपुढे एक आदर्श ठेवला त्याच प्रमाणे त्यांच्या मुलींनी ही आईची सेवा केली. त्यांच्या पश्चात सून, दोन नातवंडे,एक मुलगी,जावईपुतणे,मोठा येलकर परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी बुधवार दि.१६ नोव्हेंबर तर उत
- Get link
- Other Apps
छत्रपती शिवरायांच्या प्रशासन व्यवस्थेचे आजच्या राजकारण्यांनी अनुकरण करावे ; प्राचार्य अतुल साळुंखे मराठा समाजाचे भव्यदिव्य किल्ले स्पर्धांचे आयोजन! कोलाड (श्याम लोखंडे) जे आज देश राज्यातील सर्वच क्षेत्रात उत्तम उदात्त आहे. ते सर्व छ. शिवरायांच्या प्रशासन व्यवस्थेत आहे. छ शिवरायांच्या काळातील अष्टप्रधान मंडळ, शास्त्र नियोजन, न्याय व्यवस्था सर्वच आदर्शवत आहे. दुसरीकडे आजचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्याचे मंत्रीगण, प्रधान मंडळ छ. शिवरायांच्या प्रशासन व्यवस्थेची देण आहे आणि म्हणूनच छ. शिवरायांच्या प्रशासन व्यवस्थेचे आजच्या राजकारण्यांनी अनुकरण करावे, तरच सुराज्य निर्माण होईल, असे अभ्यासू प्रतिपादन प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांनी केले. रोहा तालुका सकल मराठा समाज आयोजित तालुका स्तरीय भव्यदिव्य किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित सालाबादप्रमाणे यावर्षीच्या भव्यदिव्य किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमाला रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, सक
- Get link
- Other Apps
जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे:- सुरेश मगर खांब (नंदकुमार कळमकर ) ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात झंझावात सुरू आहे.आदरणीय प्रकाशअण्णा शेंडगे, चंद्रकांत बावकर,माजी आ.दशरथदादा पाटील, जे.डी. तांडेल यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीचे काम चालु आहे.ओबीसी समाजाचे आरक्षण कायमस्वरूपी टिकले पाहीजेत हे आरक्षण टिकले तरच भविष्यात ओबीसींच्या शहरासह ग्रामीण भागातील तरुणांना शैक्षणिक व नोकरीसह अन्य ठिकाणी लाभ होईल. ओबीसींची निश्चीत माहीती मिळावी यासाठी शासनाकडे ओबीसी समाजाची महत्त्वपुर्ण मागणी असेलेल्या जातीनिहाय जनगणना ही झालीच पाहिजे यासह अन्य मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर १८ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.यामोर्चासाठी तरुणांनी एकत्रीत येवून मोर्चात सामील होण्याचे आवाहन ओबीसी जनमोर्चा जिल्हाअध्यक्ष सुरेश मगर यांनी केले आहे. रोहा शासकीय विश्रामगृहात युवक पदाधिकारी निवडीच्या बैठकीत सुरेश मगर बोलत होते. यावेळी ओबीसी जनमोर्चा युवक जिल्हाध्यक्षपदी निलेश थोरे तर उपाध्यक्षपदी विपुल उभारे यांची निवड करुन त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले या बैठकीस जिल्हा कार्यकारणी सदस्य शिवराम
- Get link
- Other Apps
रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मा नवी साखळी आंदोलन करीत पत्रकारांनी वेधले शासनाचे लक्ष! उच्चस्तरीय समिती नेमून चौकशीची केली मागणी ; एक महिन्यात महामार्ग दुरुस्त करण्याचा दिला अलटीमेटम! आंदोलनाचे श्रेय राजकीय नेत्यांनी घेऊ नये जनतेची प्रतिक्रिया... कोलाड (श्याम लोखंडे) मुबंई गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्याने आणि दुरावस्था झालेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाका येथे मानवी साखळी आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधून घेतले. मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त, ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन करण्यात आले. मंजुरीनंतर तब्बल 11 वर्षे रखडलेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी व्हावी आणि दोषी ठेकेदार, अधिकारी व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सदरच्या मानवी साखळी आंदोलनात रायगड जिल्हा प्रेस क्लब पत्रकार आणि विविध सामाजिक संस्था व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्य
- Get link
- Other Apps
रस्त्या तुला शोधू कुठे? वाट दाखव देवा, सरकला बुद्धी दे देवा? मुबंई गोवा महामार्ग 12 वर्ष खड्ड्यात हरवला , उद्या कोलाड येथे रायगड पत्रकारांचे साखळी आंदोलन! रखडलेले मुंबई गोवा हायवे हा सर्वच राजकीय पक्षांचा पाप जनतेची प्रतिक्रिया... कोलाड (श्याम लोखंडे) मुबंई गोवा या राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते इंदापूर कोलाड नागोठणे वडखळ पेण दरम्यानच्या महामार्गावरून प्रवास करतांना प्रवाश्यांचा एकच बोध वाक्य रस्त्या तुला शोधू कुठे? वाट दाखवा देवा,सरकारला बुद्धी दे देवा, अशीच बोलण्याची वेळ आता आली असुन या महामार्गावरून प्रवास करतांना रस्त्याला पडलेल्या खड्डयांमुळे काही ठिकाणी रस्ताच गायब झाला असे चित्र तब्बल 12 वर्ष या मार्गाचे रखडलेले पहावयास मिळत आहे त्यामुळे उद्या सकाळी ठीक 11 वाजता पुन्हा यासाठी रायगड प्रेसक्लब च्या पत्रकारांचा कोलाड येथे साखळी आंदोलन होत आहे. गेली 12 वर्ष या महामार्गाचे भिजत घोंगड तर निद्रावस्तेत असलेल्या केंद्र सरकारसह राज्य सरकारला पुन्हा जागे करण्यासाठी अथवा मार्गावर होत असलेले अपघात रोखण्यासाठी सरकारने जलदगतीने पावल
- Get link
- Other Apps
ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब च्या विद्यार्थ्यांनी सुरगड केला सर साहसच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थी निसर्गाशी झाले एकरूप कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथील विद्यार्थ्यांनी साहस या उपक्रमांतर्गत ट्रेकिंग म्हणून एक आगळा वेगळा विषय घेऊन या परिसरातील शिवकालीन ऐतिहासिक ठेवा म्हणून ओळखला जाणारा रोहा तालुक्यातील खांब पंचक्रोशीतील वैजनाथ गावाच्या माथ्यावरील व घेरासुर गावाची ओळख असलेले सुरगड सर करत येथील निसर्गाशी एकरूप होण्याच्या एकदिवसीय आनंद लुटला. खांब परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथील इयत्ता पाचवी ते आठवी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी वर्गानी सुरगड सर करत येथील ऐतिहासिक माहिती घेत गडावरील अनसई देवीचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी गड परिसर येथील शिवकालीन बुरुज,तोफ,पाण्याची कुंड तलाव ,महाल,झाडे झुडपे,दगड गोटे, खाना खून ,झाडांवरील फाद्यांची ओळख ,त्याकाळात रस्ता मार्ग कसा शोधला जायाचा ही अभ्यासपूर्ण माहिती घेत येथील निसर्गाशी एकरूप होत याचा आनंद लुटला . यावेळी श
- Get link
- Other Apps
रंजना पाटील यांचे दुःखद निधन कै. रंजना पाटील कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील वरवठणे येथील रहिवासी रंजना रामचंद्र पाटील यांचे रविवार दि.३०/१०/२०२२ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४८ वर्षांचे होते. त्या अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वाना परिचित होत्या.त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटूंबावर दुःखाचे डोंगर पसरलेले आहे. त्याच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सामाजिक,राजकीय,वारकरी संप्रदायाचे असंख्य नागरिकांसह समस्त वरठवणे ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या पश्चात त्यांचे पती रामचंद्र पाटील,मुलगा प्रथमेश, मुलगी,दक्षता व मोठा पाटील परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी व उत्तर कार्य विधी दोन्ही एकाच दिवशी शुक्रवार दि.११/११/२०२२ रोजी त्यांच्या वरवठणे येथील निवास्थानी होणार आहेत.
- Get link
- Other Apps
सुकेळी खिंडीत खड्डा चुकवतांना कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर पलटी,सुदैवाने ट्रेलरचालक किरकोळ जखमी कोलाड (विश्वास निकम) रायगड भुषण ) मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील खांब गावच्या हद्दीत सुकेली खिंडीच्या उतारावर नागोठणे कडून पास्को कंपनीकडे कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्यातील खड्डे चुकवतांना ट्रेलर चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रेलर पलटी झाला यामध्ये सुदैवाने ट्रेलर चालक किरकोळ जखमी झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्याची भयानक अवस्था पाहता या महामार्गांवर दररोज अपघात होऊन अनेकांना नाहक प्राण गमवाया लागत आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवाशी वर्गातून केला जात आहे.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार नागोठणे कडून विळे येथे पास्को कंपनीकडे कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रेलर रस्त्यातील खड्डे चुकवतांना ट्रेलर गाडी नं. एमएच ४६ एएफ ५०१५ या क्रमांकाचा ट्रेलर सुकेली खिंडीत उतारावर आली असता पलटी झाली असून या ट्रेलचा चालक आझाद खान वय २६ वर्षे हा जखमी झाला असून त्याला वाकण महामार्ग पोलीस यांनी उपचारासाठी जिंदल रुग्णालयात हळविण्यात आले व त्यांच्या उपचार करुन सोडण्यात आले अधिक तपास महामार्ग
- Get link
- Other Apps
ओबीसी जनमोर्चाच्यावतीने जातीनिहाय जनगणनासाठी १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा न्यायी हक्कासाठी,भावी पिढीच्या उत्कर्षासाठी हजारो समाजबांधवाना मोर्चात सामिल होण्याचे सुरेश मगर यांचे आवाहन रोहा (श्याम लोखंडे) ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना होत नाही तो पर्यंत ओबीसींची संख्या कळणार नाही.त्यामुळे ओबीसीचे अपेक्षीत हक्क मिळणार नाही.यासाठी आपल्या न्यायाच्या हक्कासाठी जातीनिहाय जनगणना ची मागणी घेत ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चा च्या वतीने शुक्रवारी १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जातीनिहाय जनगणना सह अन्य मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांचा मोर्चा धडकणार असल्याने रोहा तालुक्यातील सर्व ओबीसी नेतेगण व कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष सुरेश मगर यांनी केले आहे. येत्या १८ नोव्हेंबर रोजी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी जिल्ह्याधिकारी अलिबाग येथे जनमोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर रोहा तालुका संघर्ष समन्वय समिती संलग्न ओबीसी जनमोर्चा स
- Get link
- Other Apps
प्राणी मित्र कुमार देशपांडे यांनी दिले अपघातग्रस्त गाईला जीवदान, रोहा कोलाड महामार्गावर अज्ञात वाहनांनी धडक दिलेल्या गाईवर केले उपचार दिले जीवदान, कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा कोलाड राज्य महामार्गावर धाटाव स्टॉप नजीक गाईला एका आज्ञात वाहनाने धडक दिल्याने ती गंभीर जखमी होत तिच्या पुढील पायांना मोठी दुखापत झाली तद्नंतर अनेकजनांचा घोळका झाला परंतु मालकाचा पत्ताच लागला नाही त्यामुळे जखमी झालेल्या गाईकडे पाहत अनेकांच्या डोळ्यातून अश्रूचे पाठ वाहत होते उपचार करणारे डॉक्टरांचा तपास कुठे लागेल या चिंतेत सारेजण पडले मात्र गर्भ धारण केलेली ही गो माता जखमी झालेल्या गाईला गंभीरपणे जखम झाल्याने तिला खूप वेदना जाणवत असल्याने ती अक्षरशः लोळपटे खात होती येथील दीपक नेट्राइट कारखान्यातील ट्रक चालक व किन्नर तसेच सामाजिक कार्यकर्ते यशवंत भोकटे गांगल आदी नागरिकांनी तिला बाजूला घेत पाणी पाजले. येथील जमलेल्या नागरिकांनी रोहा पशु वैद्यकीय अधिकारी यांना अनेकदा उपस्थित नागरिकांनी त्यांच्या मोबाईल वरून संपर्क साधला मात्र एकही कॉल संबधित अधिकारी वर्गाने उचलले नसल्याने अधिक उपस्थित नागरिकांची धाकधूक वाढली व तद्नं
- Get link
- Other Apps
रोहा सुकेळी खिंडीमध्ये घडले रानगव्याची दर्शन! पोलीस जनार्दन मेंगाळ यांच्या सतकर्तेमुळे अनर्थ टळला, परिसरातील नागरिकांनी जागरूक राहावे. सहाय्यक वनसंरक्षक अलिबाग संजय कदम यांचे आवाहन, रायगड (भिवा पवार) रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सुकेळी खिंड येथे येथे दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास रानगव्याचे दर्शन घडले. याबाबत सविस्तर वृत्त असे की रायगड ज़िल्हातील मुंबई गोवा महामार्गांवर असणाऱ्या सुकेळी खिंडीमध्ये 28 ऑक्टोबर रोजी पाचच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला नर जातीचा रानगवा दिसला यावेळी नागोठणे पोलीस ठाण्याचे पेट्रोलिंग साठी ड्युटीवर असणारे नागोठणे पोलीस ठाण्याचे कार्यतत्पर कर्तव्यदक्ष पोलीस जनार्धन मेंगाळ यांना दिसला पोलीस नाईक जनार्धन मेंगाळ यांनी प्रसंगवधान राखून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जागृत केले. तसेच याबाबत आपल्या मोबाईल मध्ये शूटिंग करून पत्रकारांना सुद्धा माहिती देण्यात आली. रानगवा रागीट प्राणी तसेच हिस्त्र प्राणी असल्याचे बोलले जात आहे.पोलीस जनार्दन मेंगाळ यांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जागरूक केले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. याबाबत सह
- Get link
- Other Apps
रोहा येथील हनुमान टेकडी शेजारील जंगल भागात बेवारस नवजात बालकाचा मृतदेह सापडला,दुर्दैवी घटनेने रोहा हादरला, कोलाड (श्याम लोखंडे) निर्देयी मातेची मौजमजा;पण कोवळा जीव संपला.या घटनेने संपूर्ण रोहा तालुका हादरला,तर रोहा पोलिस स्टेशनला झाली अज्ञात स्री विरोधात गुन्ह्याची नोंद त्यामुळे आई या शब्दाला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना हे वावग ठरणार नाही त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. रोहा शहरा लगत तसेच रोहा तांबडी घोसाळे भाळगाव मार्गावर हनुमान टेकडी शेजारील जंगल भागात मृतावस्थेत नवजात बालक सापडला असून सर्वत्र रोहा परिसर हादरून गेला आहे तर माता या शब्दाला काळीमा फासेल असे कृत्य सदरील मातेने केल्याचे समोर आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अष्टमी (मोहल्ला) येथील रहिवासी अफान शकील कासकर व त्याचे मित्र अमर इफ्तीखार सिद्दीकी असे दोघे बकऱ्यांना पाळा आणणेकरीता रोहा शहराच्या बाजूला असलेल्या हनुमान टेकडी जवळील जंगलभागात गेले असता सदर जंगलातील पायवाटेच्या बाजूला कोणीतरी अज्ञात स्रीने पुरुष जातीच्या नवजात अर्भकाला जन्म देऊन सदरची बाब तीचे नातेवाईक अगर इतर लोकांना समजू नये या करिता उद्देशपुर्वक सद
- Get link
- Other Apps
उत्तर भारतीय महासंघच्यावतीने रोह्यात सार्वजनिक छठ पुजा मोठ्या उत्साहात साजरी कोलाड (श्याम लोखंडे) उत्तर भारतीय यांचा महत्वाचा उत्सव छठपुजा रविवारी सायंकाळी व सोमवारी पहाटे कुंडलिका नदीच्या किनारी नदी संवर्धन येथे तालुक्यातील उत्तर भारतीय समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यासाठी सायंकाळी महीला मोठ्या संख्येने उपस्थित राहुन रविवारी मावळता सुर्य तर सोमवारी उगवत्या सूर्याची मनोभावी पुजा केली. रविवारी सायंकाळी मान्यवरांचे स्वागत उत्तर भारतीय संघाच्या वतीने करण्यात आले तर सोमवारी पुजा निमित्ताने उपासक महीलांचे उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह यांच्या वतीने साडी देवून सत्कार करण्यात आले . या कार्यक्रमास राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील, सरचिटणीस सुरेश मगर, सरपंच नरेश पाटील,रामाशेठ म्हात्रे,अमित मोहीते, मनोहर सुर्वे,आदर्श उत्तर भारतीय महासंघ अध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह, विश्वकर्मा सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष राजकुमार विश्वकर्मा,पुजा कमेठी अध्यक्ष बाबुलाल वर्मा,सचिव मुनेश्वर वर्मा,खजिनदार संतोष विश्वकर्मा,रामप्रकाश कुशवाह, सुरेंद्र मिश्रा,अमित पांडे,