रोजगारासाठी मुंबईला न जाता गावातच रोजगार निर्माण करणारे महत्त्वकांक्षी व्यक्तिमत्व:- चंद्रकांत खेडेकर माणगाव (प्रतिनिधी) आज रोजगार हा गंभीर आणि प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे गावात रोजगार नसल्याने गावच्या गाव ओस पडू लागलेआहेत. लोक रोजगारासाठी शहराकडे वळायला लागले आहेत मात्र याला अपवाद आहेत रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मांजरोने विभागातील वडघर परिसरातील वडाचीवाडी या गावातील चंद्रकांत गणपत खेडेकर आहेत. चंद्रकांत खेडेकर हे 40वर्षीय तरुण मुंबईला न जाता आपल्या गावातच रस्त्याच्या बाजूला चंदू वडापाव नावाचे हॉटेल चालू केले या हॉटेलमध्ये वडापाव, पॅटीस,मंचुरियन,मिसळ,भेळ,यांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असून चंद्रकांत खेडेकर यांच्या व्हेजिटेबल सुपला मोठ्या प्रमाणात मागणी असून हे सूप पिण्यासाठी माणगाव तालुक्यात तसेच साई, गोरेगाव, मोर्बा, दहीवली, मांजरोने चांदोरे नांदवी पुरार, म्हसळा, येथील अनेक खवय्ये सुप पीण्यासाठी येत असतात. ते सीझन पाहून सुद्धा व्यवसाय करता ते म्हणतात" शेतात काय पिकते व बाजारात काय विकते याला महत्त्व अस...
Posts
Showing posts from August, 2022
- Get link
- X
- Other Apps
नोकरी न मिळालेल्या तरुणांनी खचून न जाता व्यवसायाकडे वळावे:-डॉ. मंगेश सानप गोवे-कोलाड(विश्वास निकम) आधुनिक काळात शिक्षणाची प्रगती झाली.परंतु या स्पर्धेच्या युगात सर्वच तरुणांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे.यामुळे तरुण खचून जात असून निराश झालेले तरुण व्यसनाच्या आहरी जात आहेत.या तरुण वर्गानी खचून न जाता व्यवसायाकडे वळावे असे मत डॉ. मंगेश सानप यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. कोरोनामुळे अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या यामुळे तरुणांवर उपासमारीची वेळ आली.परंतु तरुणांनी खचून न जाता व्यवसायाकडे वळावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोळवण (इंदापूर )येथील सुपुत्र सचिन साखरे! ते नाशिक येथे चांगल्या पगाराची नोकरी करीत होते.परंतु कोरोना काळात त्यांची नोकरी गेली परंतु ते खचून न जाता सचिन साखरे यांनी जुई नगर (वाशी ) येथे वडापावाचा व्यवसाय सुरु केला. यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह उत्तम प्रकारे सुरु आहे. इतर राज्यातील नोकरी न मिळालेले तरुण खचून न जाता कोणताही व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उत्तम प्रकारे उदरनिर्वाह करीत आहेत मग आपले तरुण मागे का ...
- Get link
- X
- Other Apps
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत वाकण नाक्यावर मनसेचे चक्काजाम आंदोलन! प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे गोवे-कोलाड (विश्वास निकम) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ पळस्पे ते इंदापूर मार्गांवरील वडखळ, नागोठणे, कोलाड रस्त्याची दुरावस्था अतिशय बिकट झाली असून या महामार्गांवरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. या मार्गांवरून प्रवास करणारा प्रवाशी घरी सुखरूप जाईल याची खात्री देता येत नाही. शासनाने या महामार्गकडे दिलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ सोमवारी दि.२२ ऑगस्ट रोजी मनसेच्या वतीने वाकण नाक्यावर जनआंदोलन करण्यात आले. मनसेचे नागोठणे विभागाचे युवा नेते हरिचंद्र तेलंगे यांच्या नेतृत्वाखाली तसेच रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष देवेंद्र गायकवाड, दिलीप सांगळे, अमोल पेणकर, प्रल्हाद पारंगे, अक्षय रटाटे साईनाथ धुळे,दीपेश्री घासे,नम्रता भिसे, विनायक तेलंगे, अमित पवार, रोशन बावकर,पंकज लवटे, शशांत पारंगे, अर्चना तेलंगे, कमलाकर तेलंगे,शुभम तेलंगे, नरेंद्र भिसे, यांच्यासह असंख्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई-गोवा म...
- Get link
- X
- Other Apps
देवकान्हे येथील लक्ष्मीबाई भोईर यांचे दुःखद निधन कै.लक्ष्मीबाई भोईर गोवे-कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील देवकान्हे गावाच्या रहिवासी लक्ष्मीबाई होनाजी भोईर यांचे शुक्रवार दि.१२ ऑगस्ट २०२२ रोजी दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ८० वर्षांचे होते.त्यांचा स्वभाव प्रेमळ व परोपकारी स्वरूपाचा होता. त्या सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय होत्या. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,क्षेत्रातील असंख्य नागरिक, देवकान्हे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले,मुली,पुतणे,सुना,जावई,नातवंडे व मोठा भोईर परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी रविवार दि.२१ तर उत्तकार्य विधी बुधवार दि.२४ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांच्या राहत्या निवास्थानी होणार आहेत.
- Get link
- X
- Other Apps
गोवे गावच्या शारदा जाधव यांचे आकस्मित दुःखद निधन कै. शारदा जाधव कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील गोवे गावच्या रहिवाशी शारदा सहादेव जाधव यांचे सोमवार दि.८ ऑगस्ट २०२२ रोजी अल्पशा आजाराने आकस्मित दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ८२ वर्षांचे होते.त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वरूपाचा होता.सामाजिक कार्यात त्या नेहमी सक्रिय होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी शैक्षणिक,सामाजिक,राजकीय क्षेत्रातील असंख्य नागरिक,गोवे ग्रामस्थ उपस्थित होते त्यांच्या पश्चात दोन मुलगे,दोन मुली,सुना,दिर,पुतणे,नातवंडे,पतवंडे व मोठा जाधव परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि.१७ ऑगस्ट तर उत्तरकार्य विधी शनिवार दि.२० रोजी त्यांच्या राहत्या निवास्थानी होणार आहेत.
- Get link
- X
- Other Apps
कोलाड लघुपाटबंधारे विभाग कार्यालयात संगणकाची चोरी, तत्काळ चोरट्याला पोलिसांनी केले जेरबंद! गोवे-कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील पुई गावा नजिक असणाऱ्या लघुपाटबंधारे कार्यालयात शनिवार दि.१३ ऑगस्ट रोजी संगणक चोरीची घटना घडली कार्यालयात सलग आलेल्या सुट्टीचा फायदा घेत चोरट्याने ही संधी साधली. दि.१५ ऑगस्ट रोजी हा प्रकार लक्ष्यात येताच पाटबंधारे विभागाने तक्रार नोंदवली. कोलाड पोलिसांनी तत्काळ वेगाने चक्र फिरवून पुई गावातील चोरट्याला मुद्दे मलासह जेरबंद केले. कोलाड पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार कोलाड जवळील पुई गावाच्या हद्दीत असणाऱ्या लघु पाटबंधारे उपविभाग क्र.3 या कार्यालयात संगणक चोरी झाल्याची तक्रार दाखल केल्या नंतर कार्यालयाच्या मागील बाजूला असणाऱ्या व्हरांडयाच्या लोखडी ग्रील मधून प्रवेश करीत चोरट्यानी दरवाज्याची कडी उघडली त्यानंतर कार्यालयाच्या स्लाडींगची खिडकी उघडून आत प्रवेश केला व लिनोव्हा कंपनीचा २० इंची एलसीडी, फिगर कंपनीचा पिसियू लॉजिटेक कंपनीचा कीबोर्ड व माऊस केबलसह एकूण ४९५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून न...