Posts

Showing posts from August, 2021
Image
  कामगार नेते रजनीकांत कुर्ले, यांचे दुःखद निधन,        कोलाड ( विश्वास निकम )  रोहा तालुक्यातील आंबेवाडी नाका येथील रहिवासी रजनीकांत कुर्ले यांचे शनिवार दि.२८ ऑगस्ट २०२१ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६२ वर्षाचे होते.त्यांनी बिकॉम पर्यंत शिक्षण घेऊन मुंबई येथील भारत टेकसाईल कंपनीत ते नोकरी करीत होते.त्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडून धाटाव मधील बॉम्बे डाईंग कंपनी नोकरी केली.नोकरी करीत असतांना त्यांनी कामगारांच्या कल्याणकारी योजना राबवून कामगारांची कामे करुन त्यांची मर्जी सांभाळली यामुळे त्यांना सर्व कामगार,कामगार मास्तर या नावाने हाक मारत होते.       लहानपणा पासुन त्यांना समाजिक,शैक्षणिक,व सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याची आवड होती. त्यांनी आंबेवाडी येथील तरुणांना जमवून अमर ज्योत मित्र मंडळाची स्थापना केली व या मंडळाचे अध्यक्ष होते.तसेच ते सार्वजनिक गणपती उत्सवाचे अध्यक्ष, आंबेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रुप सरपंच होते. त्यांनी गोरगरीब गरजू व्यक्तीना विनामुल्य मद्त केली. त्यांनी विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे कामे केली. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्वत्र हळहळ व्
Image
  पालीचे नवनिर्वाचित  सहाय्यक पोलीस  उपनिरीक्षक, राम पवार यांची आदिवासी संघटनांनी घेतली सदिच्छा भेट, दिल्या शुभेच्छा,      पाली -सुधागड (दिनेश पवार )  रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना व दक्षिण रायगड हितरक्षक संघटनेच्या वतीने पाली सुधागड पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम मारुती पवार यांना 30 ऑगस्ट रोजी भेट दिली तसेच त्यांचे स्वागत करून सर्व आदिवासी बांधवांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी त्यांच्याशी सुसंवाद साधला त्यावेळी पाली पोलीस ठाण्याचे पोलीस  निरीक्षक विजय तायडे उपस्थित होते . खालापूर पोलीस ठाण्यात सेवेत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम मारुती पवार यांची सुधागड पाली येथे बदली झाली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम पवार हे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर पोलीस अधिकारी म्हणून जिल्ह्यात परिचित आहेत. शिस्तप्रिय म्हणून त्यांचे नावलौकिक असून खालापूर पोलीस ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सामाजिक कार्यातही नेहमी त्यांचा पुढाकार असतो. त्यांनी अनेक आदिवासी तरुणांना घडवले असून त्याच्या मार्गदर्शनाने अनेक तरुण पोलीस सेवेत अधिकारी पदावर कार्यरत आहेत. यावेळी रायगड
Image
 मुंबई-गोवा महामार्गावर मोकाट गुरांचा हैदोस, वाहन चालक त्रस्त ,अपघाताचा धोका वाढला,         गोवे-कोलाड (विश्वास निकम)       मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग १७ वरील कोलाड, खांब, सुकेळी वाकण दरम्यान मोकाट गु्रांच्या वाढत्या संख्येमुळे वाहन चालक त्रस्त झाले असुन यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे यामुळे संबंधित व्यक्तिकडून लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.         रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जवळील मोठ्या प्रमाणावर शेत जमीन मुंबई-पुणे येथील धनिकांना विकल्या असुन भाताचे कोठार म्हणून संबोधला जाणारा रायगड जिल्ह्यात भातशेतीची लागवड क्षेत्र कमी झाले आहे.ज्या शेतकरी वर्गाची शेती आहे त्यांनी आपली भात शेतीची लावणी पुर्ण झाल्यावर आपल्याजवळील असणारी गुरे मोकाट सोडलेली आहेत.     ज्या धनिकांना शेतकऱ्यांनी शेती विकल्या आहेत त्या धनिकांनी या शेतजमिनी भोवती तारेचे कुंपण घातले आहे. यामुळे गुरे चरण्यासाठी जागा उरली नाही. यामुळे मोकाट सोडलेली गुरे ही मुंबई गोवा हायवे वर रस्त्यातच बस्तान मांडत आहेत.यामुळे अगोदरच हायवेवरील खड्ड्यामुळे हैराण झालेले वाहन चालकांना रस्त्यात उभ्या असणाऱ्या मोकाट गु्रांमुळे म
Image
  हवामान खात्याचा रायगडला अतिवृष्टीबाबत "ऑरेंज" इशारा पुढील तीन दिवस संपूर्ण सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे प्रशासनाला निर्देश,तर जनतेला आवाहन, रायगड (भिवा पवार   ) : हवामान खात्याने पुढील तीन दिवस रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा "ऑरेंज" इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा प्रशासनाने गाफील न राहता पुढील तीन दिवस कमालीची सतर्कता बाळगावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत तर जनतेने शासनाच्या सूचनांचे पालन करीत सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी पुढील तीन दिवस होणाऱ्या संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज (दि.29 ऑगस्ट रोजी) "वेब एक्स" या ऑनलाईन दूरदृश्य प्रणालीद्वारे स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीबाबत संपूर्ण आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या ऑनलाईन बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील,पोलीस अधीक्षक अशोक दुधे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आप
Image
  कोरोना काळात येणारे सण, उत्सव, साधेपणात साजरे करावेत,पो.उपनिरीक्षक अनिल घायवत,    कोलाड (श्याम लोखंडे) गेली दोन वर्षे आपण सारेजन कोरोना संकटाशी सामना करत आहोत आज देखील त्याचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करत आहोत कोरोना संसर्ग कमी असेल परंतु धोके पुन्हा उद्धभऊ शकतात हिंदू संस्कृतीचे पुढे येणारे सण उत्सव हे आनंदाने साजरे करा परंतु कोरोना संसर्गाचा काटेकोरपणे तसेच शासकीय नियमांचे पालन करून ते साजरे करावेत असे प्रतिपादन कोलाड विभागीय पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक अनिल घायवत यांनी चिल्हे येथे केले. येणारे दहीहंडी व गणेशोत्सव सण उत्सव हे गावोगावी कोरोनाचे पालन करून करावेत तसेच अनुसूचित प्रकार घडू नयेत याकरिता कोलाड विभागात कोलाड विभागीय पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस पथक गावोगावी भेट देत याची माहिती देत असून रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील भेटी दरम्यान ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना कोलाड पोलीस उप निरीक्षक घायवत हे बोलत होते . यावेळी त्यांच्या समावेत पोलीस रामचंद्र ठाकूर गावचे पोलीस पाटील गणेश महाडिक ग्राम पंचायतीचे माजी सरपंच धनाजी लोखंडे ,म
Image
  धाटाव परिसरातसांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटली, दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका! धाटाव (प्रतिनिधी ) : धाटाव औद्योगिक परिसरातील कंपन्यांचे सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटल्याने येथे दुर्गंधीयुक्त पाणी पसरल्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.  धाटाव औद्योगिक परिसरातील डी.एम.सी., सॉल्वे, दानसनंद, डी.आर.टी.-2, अनसुल या कंपन्यांचे सांडपाणी वाहून नेणारी  पाईपलाईन फुटल्याने या परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. यामुळे रोठ खूर्द, रोठ बुद्रूक परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आधीपासूनच प्रदूषणाच्या समस्येने त्रस्त झालेल्या येथील नागरिकांपुढे आता दुर्गंधीचे नवीन संकट उभे राहिले आहे. दरम्यान, धाटाव औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष पी. पी. बारदेशकर हे या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
Image
 रोहा वनविभागाची धडक कारवाई;अंदाजे सहा लाख रुपयांची खैराची चोरी  पकडण्यात वनविभागाला यश, कोलाड (श्याम लोखंडे ) दि.२७ आॕगस्ट २०२१ रोजी उपवनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनखाली हि धडक कारवाई करण्यात आली. सदर मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहा कांबळी,वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम,वनरक्षक शेणवई .तेजस नरे,वनरक्षक मेढा,योगेश देशमुख वनरक्षक कुशेडे, किशोर वाघमारे,वनपाल माणगाव,गायकवाड व राऊंड स्टाफ माणगाव यांनी मौजे विघवली फाटा मुंबई गोवा महामार्गावर मोरया धाब्याजवळ टाटा ट्रक क्रमांक.MH.16.Q.7151 तपासले असता त्यामध्ये अवैध वृक्ष तोडीचा विनापरवाना वाहतूक केलेलं खैर सोलिव मालं ९.२२५ घमी किंमत १५,५३०/- व ट्रक अंदाजे किंमत रुपये पाच लाख मात्र, एकूण ५,१५,५३०/- इतका मुद्देमाल व आरोपी उमेश जयसिंग ढवळे रा.बारामती वडगाव निंबाळकर सह जप्त केला. तसेच या प्रकरणी आजूबाजूला तपास केला असता मौजे कशेणे गावाजवळ मुंबई गोवा महामार्गावर टाटा एस क्रमांक.MH.06.BG.0089 मागील ताडपत्री उघडून तपासले असता सदर टेम्पो मध्ये खै
Image
                                                                            श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि  कृष्ण जन्माष्टमी’ भक्तीभावाने कशी साजरी करावी  गोवे -कोलाड ( विश्वास निकम ) पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. त्याने बालपणापासून आपल्या असाधारण कर्तृत्वाने भक्तांवरील संकटे दूर केली. प्रतिवर्षी भारतामध्ये मंदिरे, धार्मिक संस्था येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. उत्सव साजरा करतांना प्रांता-प्रांतानुसार उत्सव साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. उत्सवाच्या निमित्ताने बरेच लोक एकत्र येऊन भक्तीभावाने हा उत्सव साजरा करतात. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी 30 ऑगस्ट या दिवशी आहे. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व पहाणार आहोत. यंदाही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्रीकृष्ण जन्माष्टमी नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा असू शकतात. प्रस्तुत लेखात आपत्काळातील (कोरोनाच्या संकटकाळातील) निर्बंधांमध्ये एकत्र न येताही आपापल्या घरीच श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करता येईल हे स
Image
  जिल्ह्यात 15 एप्रिल ते 23 ऑगस्ट या कालावधीत 14 लाख 97 हजार 341 शिवभोजन थाळींचे मोफत वितरण, रायगड (विशेष प्रतिनिधी ) : कोविड-19 दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जाहीर आर्थिक मदतीच्या अनुषंगाने राज्यात शिवभोजन थाळी मोफत वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.    या योजनेंतर्गत दि. 15 एप्रिल 2021 पासून दि.23 ऑगस्ट 2021 पर्यंत रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात कार्यरत असलेल्या एकूण 91 शिवभोजन केंद्रामार्फत मोफत वितरीत करण्यात आलेल्या शिवभोजन थाळींची संख्या 14 लाख 97 हजार 341 असून दि.23 ऑगस्ट 2021 रोजी मोफत वितरीत करण्यात आलेल्या शिवभोजन थाळींची संख्या 11 हजार 485 आहे, तसेच जुलै महिन्यात महाड आणि पोलादपूर तालुक्यात आलेल्या महापुरात पूरग्रस्तांसाठी शिवभोजन थाळींचे वाटप करण्यात आले होते. हे वाटप दि. 14 सप्टेंबर 2021 पर्यंत नि:शुल्क सुरु ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके दिली आहे.
Image
  रोह्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची रोहा प्रेस क्लबने घेतली सदिच्छा भेट ,दिल्या शुभेच्छा  कोलाड (श्याम लोखंडे )  रायगड प्रेस क्लबशी सलग्न असलेली रोहा    तालुक्यातील   सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य समाजसेवी संस्था रोहा प्रेस क्लबच्या वतीने रोहा पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना आज २६ ऑगस्ट रोजी रोहा प्रेस क्लबच्या वतीने सदिच्छा भेट दिली.दरम्यान भेटीत त्यांचे स्वागत करून सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सुसंवाद साधला रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडकर यांची अचानकपणे बदली झाली असल्याने या जागेवर नव्याने नुकतेच पदभार स्वीकारलेले नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना रोहा प्रेस क्लबच्या वतीने सदिच्छा देत त्यांना शुभेच्छा दिल्या ,    यावेळी रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष व रायगड प्रेस क्लबचे सचिव शशिकांत मोरे यांच्या कडून शुभेच्छा देण्यात आल्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती मराठी पञकार परिषदेचे पदाधिकारी मिलींद अष्टीवकर,रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,महेश बामुगडे,जेष्ठ पञकार अरुण करंबे,उपाध्यक्ष अल्ताफ चोरडेकर,कार्य
Image
  मुंबई-गोवा महामार्गवर धुळीचे साम्राज्य,प्रवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर,         गोवे-कोलाड (विश्वास निकम         मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील कोलाड,खांब,सुकेली,वाकण या मार्गावर मोठया प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असुन या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या महामार्गावर पडलेल्या खड्डयामुळे वाहन चालकासह प्रवासीवर्ग पुर्णपणे त्रस्त असतांना हे खड्डे बुजवीले जात असुन या खड्डयात माती मिश्रित खडी टाकल्याने पाऊस पडताच या महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते.या मार्गावरून चालतांना पादचारी ही पुर्णपणे त्रस्त झाले होते.  परंतु  चार ते पाच दि वस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महामार्ग पूर्णपणे सुकले असुन याचे रूपांतर धुळीत झाले आहे.ही सर्व धुळ प्रवाश्यांच्या व महामार्गावरील परिसरात असणाऱ्या गावातील नागरिकांच्या अंगावर उडत आहे यामुळे येथील नागरिकांच्या व प्रवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.ही धूळ नागरिकांच्या नाका तोंडात जाऊन सर्दी, खोकला, व श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.              मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदर
Image
  केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा कोलाड शिवसेनेकडून निषेध कोलाड (श्याम लोखंडे ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तसेच शिवसेना विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह उद्गार काढले. त्यानंतर राज्यभर शिवसैनिकांनी याचा निषेध करत नारायण राणे यांना अटक करावी अशी मागणी करत विविध ठिकाणी याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची बीजेपी जन आशीर्वाद यात्रा कोलाडात दाखल होताच रोहा कोलाड भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तसेच युवा पिढीने मुबंई गोवा महामार्गावरील कोलाड नाक्यावर जल्लोषात त्यांच्या आगमनाचे स्वागत करत कोकणचे केंद्रीय मंत्री म्हणून जय घोष केला मात्र हीच जन आशीर्वाद यात्रा रायगड पार करत रत्नागिरीत दाखल होताच मंत्री महोदय राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेले आक्षेपार्ह विधाने तीव्र पडसाद सर्वत्र उमटले आणि ज्या कोलाड नाक्यावर बिजेपीचे केंद्रीय मंत्री राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत केले त्याच ठिकाणी शिवसेने निषेध बाजी करत त्यांच्या शिक्षेची मागणी केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे य
Image
  लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाचा इनोग्रेशन इन्स्टॉलेशन आणि इंडक्शन मोठ्या उत्साहात संपन्न, कोलाड (श्याम लोखंडे )   फार्म हाऊसवर मोठ्या उत्साह वातावरणात नुकतेच संपन्न करलायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाचा इनोग्रेशन,इन्स्टॉलेशन आणि इंडक्शन कार्यक्रम सुतारवाडी कुडली सरफळेवाडी परिसरातील सुप्रसिद्ध रामशेठ वाचकवडे यांच्या फ़ार्म हाऊसवर मोठया उत्साह वातावरणात नुकतेच संपन्न करण्यात आले. , लायन अरविंद घरत रिझन चेअरपर्सन, लायन रविंद्र घरत झोन चेअरपर्सन, लायन नुरुद्दीन रोहावाला प्रेसिडन्ट रोहा   फस्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हव्हर्नर,एमजेएफ लायन भरत दत्त डिस्ट्रिलायन्सक्लब, लायन पराग फुकणे पीआरओ प्रसंगी यावेळी प्रमुख उपस्थित पीएमजे एफ लायन एल जे तावरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, एमजेएफ लायन मुकेश तानेजाक्ट कॉर्डिनेटर , जीएमटी लायन ज्योती नार्वेकर डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी, लायन नयन कवळे एक्झिकेटीव्ह डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी, लायन अनिल म्हात्रे एक्झिकेटीव्ह डिस्ट्रिक्ट ट्रेझरररोहा,लायन जयदेव पवार सेक्रेटरी रोहा,लायन प्रमोद जैन ट्रेझरर रोहा, लायन प्रदीप दामनी मेम्बरशिप चेअरपर्सन लायन यशवंत चित्रे डिस्ट्रिक्ट एज
Image
सामाजिक कार्यकर्त्यां सुरेखा पवार यांचे दुःखद निधन            गोवे -कोलाड (विश्वास निकम )           रोहा तालुक्यातील गोवे गावातील रहिवासी सुरेखा धर्मा पवार यांचे गुरुवार दि.१९/०८/२०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७४ वर्षाचे होते.त्या अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वरूपाने सर्वाना परिचित होत्या.त्या सर्वांशी मिळुनमिसळून राहत होत्या व सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय होत्या.                   त्यांच्या निधनाची वार्ता समजताiच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रायगड जिल्हा भोई समाजाचे कार्यकर्ते, तसेच बहुजन समाजाचे विविध स्थरावरील मान्यवर,आप्तस्वकीय व गोवे ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या पश्चात त्यांचे पती धर्मा पवार,मुलगा सहेंद्र ,तीन मुली, सुना, पुतणे, नातवंडे व मोठा पवार कुटुंब आहे. त्यांचे दशक्रिया विधी व उत्तरकार्य विधी दोन्ही एकाच दिवशी शनिवार दि.२८ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांच्या गोवे येथील राहत्या निवासस्थानी होणार आहेत.
Image
  कामत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनविल्या   आकर्षक राख्या, साजरा केला  रक्षाबंधन सण  कोलाड (श्याम लोखंडे )  रायगड जिल्हा परिषद शाळा कामथ ता. रोहा ,जि. रायगड येथील शाळेत मुलींनी स्व निर्मिती व सर्जनशीलता दाखवत रंगबेरंगी लोकर , मनी , कुंदन इ. विविध साहित्य वापरून राख्या बनवत शाळेत केला रक्षाबंधन साजरा . शाळेतील मुख्याध्यापक सौ रेशमा प्रशांत वाघचौरे सहशिक्षिका श्रीमती अंजली अरविंद गुंजोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी सर्जनशीलता दाखवत स्वतः आनंदाने राख्या बनवल्या तसेच मुलांना त्यांच्या आवडीच्या रंगाच्या राख्या बांधत शाळेमध्ये उत्साहात राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली मुलांचे कौतुक करण्यासाठी ग्रामस्थ श्री .राजाराम कोंडे (अण्णा) ,श्री विश्वास मेने ,सुमती निळेकर ,सविता निळेकर , सौ.सेजल सुतार, सौ. विद्या निळेकर आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ संगीता शिर्के उपस्थित होत्या. सर्वांनी मुलींचे भरभरून कौतूक केले. मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
Image
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते "पंचामृत वाचन पुष्प"चे जिल्हाधिकारी कार्यालयात उद्घाटन संपन्न जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून साकारले हे "पंचामृत वाचन पुष्प" रायगड (भिवा पवार) : जिल्हाधिकारी कार्यालयात "पंचामृत वाचन पुष्प" नावाच्या पुस्तकांच्या छोटेखानी पुस्तक दालनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते काल दि. 20 ऑगस्ट 2021 रोजी सद्भावना दिनानिमित्त संपन्न झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के- पाटील, जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक जगन्नाथ वरसोलकर, कर्मचारी संदीप भोईर हे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात सन 2012 पासून चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या, वाचनाचे प्रचंड वेड असलेल्या श्री. हेमंत हिरालाल पाटील यांच्या पुढाकारातून हे छोटेसे पुस्तकांचे दालन साकारण्यात आले आहे. सुरुवातीला छोट्याशा पेटीतल्या फक्त सहा पुस्तकांपासून सुरू झालेले हे "पंचामृत वाचन पुष्प" हे पुस्तकांचे दालन आज 256 पुस्तकांपर्यंत येऊन पोहोचले आहे. श्री.हेमंत हि
Image
शिरवली आंबेगाणी आदिवासी वाडी शाळेची दुरावस्था!  शासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष  रायगड (भिवा पवार) : माणगांव तालुक्यातील गोरेगाव पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिरवली आंबेगाणी जिल्हा परिषद शाळेची ३ जून २०२० च्या निसर्ग चक्रीवादळामध्ये शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली असून शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील गणपत पवार व अन्य ग्रामस्थांनी केला आहे.  वादळात नुकसान झालेल्या या शाळेकडे अद्याप कुणीही लक्ष दिलेले नाही. येथील शिक्षक व ग्रामस्थांनी शिक्षण विभागाला पत्रव्यवहार केल्याचे समजते. मात्र येथे शासनाचा कोणताही अधिकारी फिरकला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी कटिबद्ध असणारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण येथील अधिकाऱ्यांनी सुद्धा सदर शाळेला भेट दिली नाही. एकीकडे शासन म्हणतंय आदिवासींनी शिक्षण घेतले तरच त्यांचा विकास होईल, मात्र येथील शाळा वादळात पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे विद्यार्थी बसणार कुठे? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे उभा राहिलेला आहे. याबाबत रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना व दक्षिण रायगड आदिवासी संघटना यांनी या शाळेला भेट