रोह्यात शिवसैनिकांत चलबीचल, तर राष्ट्रवादीचा गोटात सन्नाटा, मंत्री पदाचे काय? चर्चेला उधाण...

कोलाड नाका  (शरद जाधव) महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालत होण्याची चिन्हे असुन याकडे पुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होणार का?आणखी काय,  याची धाकधुक सर्वाना लागली आहे. रोहा तालुक्यात मात्र शिवसैनिकात कोणता झेंडा घेऊ हाती अशी चलबीचल परिस्थिती असुन या बंडाने सत्ता गेली तर  अदिती तटकरे यांच्या  मंत्री पदाचे काय, याची चर्चा असुन या बंडाच्या घडामोडीत राष्ट्रवादीच्या गोटात सुधा  संनाटा पसरला असल्याचे दिसून येत आहे.

            अडीच वर्षापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत रायगडात शिवसेनेला चांगले यश मिळुन त्याचे 3 आमदार निवडून आले. या निवडणुकीत जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या शेकाप ला पराभवाला सामोरे जावे लगले. लोकसभेत जनतेने शिवसेनेला नाकारले असले तरी मात्र विधानसभेत शिवसेनेला चांगला कौल दिला. 

  शिवसेना व भाजप युती होणार सेनेला मंत्री पद मिळनार असे चित्र एकंदरीत असताना अचानक राष्ट्रवादी व सेना युती होउन राजकारणात संधी ज्यांच्या मागे गेली अनेकवर्ष धावत आहे. अशा सुनिल तटकरे यांच्या मुलीला अदितीताई तटकरे याना पालकमंत्रिपद तसेच विविध आठ खात्याचे मंत्रीपद मिळाले.  सेनेनी राष्ट्रवादीशी केलेला घरोबा रायगडातिल आमदारांना महाग पडला.व राष्ट्रवादीने  महाविकास आघाडी सरकारचा पूरेपूर  लाभ उठवीत जिल्ह्याच्या विकासासाठी करोडोचा निधी आणला. अदिती तटकरे जरी मंत्री म्हणून नवख्या होत्या तरी गेली 40 वर्ष राजकारण कोलून प्यायलेले खासदार सुनिल तटकरे यांचे मार्गदर्शनअदिती तटकरे याना या कामी मिळाले. राष्ट्रवादी वरचढ होते हे सेना आमदारा ना रुचले नाही. व त्यानंतर पालकमंत्री हटावच्या घोषणा ते करु लागले. मात्र अदिती तटकरे या महाविकास आघाडीच्या मंत्री होत्या हे सेना आमदार याना भान न रहाता आरोप प्रत्यारोप सुरु राहिले त्यामूळे अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या कालात रायगडात राष्ट्रवादी व शिवसेनेचे फारसे कधी जमले नाही. 

      तशी परिस्थिती महारास्ट्राच्या राजकारणात ठाकरे व शिंदे यांच्यात सुरु होती. व त्याचा स्फोट एकनाथ शिंदे यांच्या बंडातून झाला व त्यांच्या बंडात  रायगडातील सेना आमदारांनी उडी मारली. कुणाला वाटले देखील नव्हते.आमदार बंडात सामिल होतिल. जरी हे 3 आमदार सेना म्हणून आमदार झाले असले तरी त्याची त्यांच्या मतदार संघावर विशेष पकड असल्याने त्यांच्या मतदार संघाचा त्याना पाठिंबा असल्याचे दिसते. त्यामूळे एकिकडे शिवसेना संघटना तर दुसरीकडे स्थानिक आमदार त्यामूळे कुणाची साथ धरायची अशी चलबीचल अवस्था सेना कार्यकर्ते यांची झाली आहे. तर एकनाथ शिंदे यांचे महाविकास आघाडी विरोधात पुकारलेले बंड यशस्वी झाले तर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी चे व मंत्री पदाचे काय अशी चर्चा सुरू आहे .त्यामूळे या घडामोडीमूळे राष्ट्रवादी गोटात संनाटा पसरला असल्याचे दिसून येत आहे. त्यामूळे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लागले असले तरी  शरद पवार यांच्या राजकिय खेळीही महत्वाची असनार असुन पवार साहेब चमत्कार घडवणार असे राष्ट्रवादी कडून बोलले जात आहे.

Comments

Popular posts from this blog