आमदार अनिकेत तटकरे यांच्या निधीतून होणार उडदवणे बसस्थानक
कोलाड़ नाका (शरद जाधव)रोहा तालुक्यातील उडदवणे येथे आमदार अनिकेत तटकरे यांच्या निधीतून बसस्थानक उभे रहाणार असुन सदर कामाचे भुमीपूजन त्याच्या हस्ते नुकतेच पार पडले.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर, रोहा तालुका समन्वय समिती अध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, माजी सभापती हेमंत कांबळे, माजी उपसभापती अनिल भगत, लिलाधर मोरे, रोठ सरपंच गीता जनार्दन मोरे, घनश्याम कराळे सागर ठाकुर, सरपंच रसिका मालुसरे, उपसरपंच योगेश शिंदे, निलेश मालुसरे, महेश तुपकर, मारुती तुपकर, रविंद्र ठाकुर, दमयन्ती ठाकुर, रोहिदास कोल्हटकर, सरिता गायकर, संतोष गायकर, किशोर ठाकुर, पांडूरंग कासारे, गणपत गायकर, चांगदेव गायकर, संदीप कोल्हटकर, प्रदीप कासरे, तुकाराम गायकर व महिला वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
यावेळी गेली अनेक वर्ष रखडलेल्या पालदाड रस्त्याचे काम अनिकेत भाई यांच्या प्रयत्नातून झाल्याने उडदवने वासिया तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. तर यावेळी उडदवने अन्तर्गत रस्ता ,पाण्याच्या टाकीचे तसेच विविध विकास कामाचे भुमीपूजन करण्यात आले
यावेळी भविष्यात उडदवने गावचा रखडलेला विकास करण्यास राष्ट्रवादी पक्ष कटिबद्ध असल्याचे आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी सांगितले.
यावेळी आमदार अनिकेत भाई तटकरे यांचे झालेले जंगी स्वागत पाहाता राष्ट्रवादीपक्ष या विभागात आघाडीवरच राहणार असल्याचे चित्र दिसून आले.
Comments
Post a Comment