माजी सभापती, मोतीराम तेलंगे यांच्या वाढदिवसा निमित्त बस थांब्याचा लोकार्पण सोहळा

सुतारवाडी :(हरिश्चंद्र महाडिक)रोहा पंचायत समितीचे माजी सभापती अत्यंत गोड स्वभावाचे तसेच प्राथमिक आरोग्यकेंद्र आंबेवाडी चे सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष श्री. मोतीराम तेलंगे यांच्या ६८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कै. शंकर दगडु तेलंगे यांच्या स्मरणार्थ एम. जे. टी. इन्फ्रा यांच्या सौजन्याने वाळंजवाडी येथे एस.टी. बस थांब्याचे लोकार्पण करण्यात आले.

   यावेळी पहूर सरपंच श्री. मंगेश कदम, श्री. दर्शन तेलंगे त्याचप्रमाणे वाळंजवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. मोतीराम तेलंगे यांनी अनेक वर्ष रोहा पंचायत समीतीचे सभापती पद भूषविले होते. तसेच त्यांनी आंबेवाडी प्राथमिक केंद्राच्या सल्लागार समितीचे अध्यक्षपद भूषवून आरोग्य सेवकांच्या समस्या व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेडसावणाऱ्या समस्या सोडवून अनेक सुधारणा केल्या त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या. 

Comments

Popular posts from this blog