सामाजिक कार्यकर्तेअमित लाडगे यांचे दुःखद निधन
गोवे - कोलाड (विश्वास निकम )रोहा तालुक्यातील मेढा येथील रहिवासी अमित (आप्पा )अनंत लाडगे यांचे गुरुवार दि.१ जून २०२२ रोजी आकस्मित दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ३५ वर्षांचे होते.त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वरूपाचा होता. तरुण वयात त्यांचे आकस्मित निधन झाल्यामुळे त्याच्या कुटूंबावर दुःखाचे सावट पसरलेले आहे.
त्यांच्या पश्चात त्यांचे आई,वडील,पत्नी, एक मुलगी, दोन भाऊ, असा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.१० जून व उत्तरकार्य विधी रविवार दि.१२ जून २०२२ रोजी होणार आहेत.
Comments
Post a Comment