मांजरवणे पद्मावती देवी चार एप्रिल रोजी यात्रौत्सव! साई /माणगांव (हरेश मोरे) माणगांव तालुक्यातील मांजरवणे विभागातील पद्मावती देवी हे जागृत देवी स्थान म्हणून परिचित आहे. मंगळवार 4 एप्रिल रोजी पद्मावती देवी यात्रौत्सव सालाबादप्रमाणे करण्यात येत आहे अशी माहिती श्री पद्मावती देवी मंदिर ट्रस्टचे सचिव सुरेश दगडू चव्हाण यांनी दिली आहे. यात्रेसाठी मांजरवणे व साई परिसरातील बहुसंख्याने भक्तगण उपस्थित राहतात. तसेच नोकरी निमित्त मुंबई, पुणे, गुजरात याठीकणी असलेले भक्तगण सुद्धा पद्मावती देवीच्या दर्शनासाठी मोठया संख्येने उपस्थित असतात.चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर असणाऱ्या यात्रेला भाविक हजर राहतात. यात्रेत परिसरातील गोवेल, चांदोरे, मुद्रे, बाट्याची वाडी, निगुडमाळ, वडाची वाडी या गावातून जत्र काट्या घेऊन भाविक या यात्रेत सहभागी होतात. हा यात्राउत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी श्री पद्मावती देवी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त व ग्रामस्थ मेहनत घेत असतात.
Posts
Showing posts from March, 2023
- Get link
- Other Apps
डॉ.सागर सानप यांना राष्ट्रीय आदर्श सामाजिक गौरव पुरस्कार प्रदान,सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव! कोलाड (विश्वास निकम,रायगड भुषण) रोहा तालुक्यातील तसेच कोलाड विभागातील पुई गावाचे सुपुत्र डॉ.सागर विठोबा सानप यांना गोवा येथे रविवार दि.२६ मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय आदर्श सामाजिक गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.डॉ. सागर सानप यांना या अगोदर दोन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून रविवार दि.५ मार्च २०२३ रोजी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र नवश्रमिक सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र निर्मिती फिल्मी क्लब व सोमवार दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच कोल्हापूर येथे राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. डॉ.सागर सानप हे कोलाड रोहा लायन्स क्लबचे अध्यक्ष असून ते मुंबई कुणबी समाज संघ ,रायगड जिल्हा कुणबी समाज,रोहा तालुका कुणबी समाज,ओबीसी समाज या कमेटीवर समाजहिताचे काम करीत आहेत.डॉ. सागर सानप यांनी कुणबी समाजासह बहुसंख्य समाजातील गरजु विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तके,दप्तर यांचे अनेक वेळा वाटप केले आहे.कुणबी समाजासाठी व ओब
- Get link
- Other Apps
पत्रकार श्याम लोखंडे रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार पुरस्काराने सन्मानित,विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव! कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) रोहा तालूका चिल्हे येथील ग्रामीण भागातून पत्रकारिता करणारे श्याम यशवंत लोखंडे यांना रायगड जिल्हा प्रेस क्लब कडून स्व.प्रभाकर पाटील यांच्या नावाने दिला जाणारा रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने रोहा तालुक्यासह कोलाड खांब देवकान्हे परिसरातून व सर्व स्तरानातून त्यांचे अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रायगड प्रेस क्लबचा 18 वा वर्धापन दिन पोलादपूर प्रेमक्लब च्या वतीने पोलादपूर येथील बालाजी हॉटेल या ठिकाणी 26 मार्च रोजी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त व रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार यांना सन्मानपूर्वक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . प्रसंगी यावेळी रोहा तालुक्यातील पत्रकार श्याम लोखंडे यांना रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार
- Get link
- Other Apps
काकडशेत ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग नागरीकांना सौर कंदील तसेच प्रत्येकी 500 रुपये वाटप! तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील निसर्ग रम्य वातावरणात वसलेल्या काकडशेत ग्रा पं मध्ये येथील प्रशासकीय अनुभव असलेल्या कर्तव्य दक्ष ग्रामसेवक उमाजी माडेकर याचें संकल्पनेतून व सरपंच हर्षदा तापकीर यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या दिव्यांग नागरीकांना सौर कंदील व त्यांचे बॅंक खात्यात 500 रुपये वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिव्यांग बंधू भगिनींना ग्रामपंचायतीचा 15 वा वित्त आयोग व ग्रामनिधी यातुन या योजनेचा लाभ देण्यात आला. यावेळी सरपंच हर्षदा तापकीर,ग्रा.पं सदस्य मंगेश काप, त्याचबरोबर सदस्या वंदना केळकर, प्राजक्ता राऊत, समिक्षा सपकाळ, लक्ष्मी दिवेकर, भारती साळवी आणि काकडशेत गावचे माजी अध्यक्ष अंकुश राऊत अपंग लाभार्थी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ग्रा. पं. हद्दीतील 26 लाभार्थींना याचा फायदा होणार आहे. यामुळे या दिव्यांग बंधू भगिनी यांचे चेहरयावरील हसु फुललेले दिसुन येत होते.
- Get link
- Other Apps
कुणबी राजकीय संघटनेच्या तळा तालुका सरचिटणीस पदी भास्करभाई कारे यांची निवड! श्री.भास्करभाई कारे तळा(कृष्णा भोसले) कुणबी राजकीय संघटनेच्या तळा तालुका सरचिटणीस पदी भास्करभाई कारे यांची निवड घोषित करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या सभेत त्यांच्या नावाची निवड जाहीर होताच त्यांच्या चाहत्यांकडून आनंद व्यक्त होत आहे. भास्करभाई कारे हे स्वराज्य प्रतिष्ठान रायगड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून कुणबी युवाचे माजी उपाध्यक्ष आहेत. कुणबी ब्रिगेडचे ते सल्लागार असुन कुशल संघटक म्हणून त्यांचेकडे पाहीले जात आहे. या पदाचा उपयोग ते समाजातील पिडीत, सुशिक्षित, बेरोजगार तरुणांनाच्या समस्याकडे लक्ष देऊन करतीलअशी आशा निर्माण झाली आहे. कुणबी राजकिय सघंटण समितीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
- Get link
- Other Apps
सोनसडे ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त आयोगाच्या अपंग निधीतून सौर कदिंल केले वाटप! शिवाय प्रत्येकी 500 रुपये रोख बँक अकाउंटला! तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील सोनसडे या ग्रा. पंचायतीने 15 वा वित्त आयोगातुन अपंग निधीतून सौर कंदील व पाचशे रूपये रोख देऊन अपंगाचा निधी खर्च केला आहे. या ग्रामपंचायतीचे कर्तव्य दक्ष ग्रामसेवक उमाजी माडेकर यांचे संकल्पनेतून व सरपंच माधुरी पारावे यांचे मार्गदर्शनानुसार 27 मार्च 2023 रोजी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सरपंच माधुरी पारावे, ग्रा. पं सदस्य भिमेश भेकरे, सौ. पोटले, परशुराम वरंडे, सामाजिक कार्यकर्ते महादेव पारावे पत्रकार कृष्णा भोसले, लाभार्थी बंधू भगिनी उपस्थित होते. या ग्रामपंचायत हद्दीत जवळपास 17 दिव्यांग लाभार्थी असुन या लाभामुळे दिव्यांग्यांच्या चेहऱ्यावर हसू आलेले दिसत होते. सौर ऊर्जेमुळे वीजबिल बचत होणार असून नियमित प्रकाश मिळणार आहे. त्याचबरोबर 500 रुपये प्रत्येकाच्या बॅंक खात्यात जमा होणार आहेत. ही आनंद देणारी हक्काची बाब आहे. दिव्यांग लाभार्थींना हक्काचा निधि आता मिळु लागला आहे. असे ला
- Get link
- Other Apps
संतोष सुतार श्रमिक पत्रकार पुरस्काराने सन्मानित! साई /माणगांव (हरेश मोरे ) माणगांव तालुक्यातील पळसगाव खुर्द येथील गावातील पत्रकार संतोष पांडुरंग सुतार यांना रायगड जिल्हा प्रेस क्लब कडून रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रायगड प्रेस क्लबचा 18 वा वर्धापन दिन पोलादपूर पोलादपूर येथील बालाजी हॉटेल या ठिकाणी 26 मार्च रोजी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त व रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.यावेळी माणगांव तालुक्यातील पत्रकार संतोष सुतार यांना रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी रायगड -रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख,लोकशाही वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. संतोष सुतार हे सन 2000 सालापासून पत्रकारिता करीत आहेत.त्यांच्या लेखणीची योग्य दखल घेऊन रायगड प्रेस क्लब कडून
- Get link
- Other Apps
पाली बाजारपेठेतील रस्ता सुसाट,परंतु गतिरोधक नसल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका! कोलाड ( विश्वास निकम,रायगड भुषण ) सुधागड तालुक्यातील पाली हे तालुक्याचे ठिकाण असून पाली ही नगरपंचायत झाल्यानंतर दिवसेंदिवस पालीचा विकास होतांना दिसत आहे.पाली बाजारपेठेतील रस्ते अनेक वर्षापासुन निकृष्ट दर्जाचे होते.परंतु या बाजारपेठेतील रस्ते दोन महिन्यांपूर्वी सुसाट बनवले आहेत.यामुळे या बाजारपेठेतून टूव्हीलर,थ्रीव्हीलर,फोरव्हीलर,वाहने रस्त्याला गतिरोधक नसल्यमुळे सुसाट वेगाने जात आहेत.त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच पाली येथे अष्टविनायक गणपती पैकी एक बल्लालेश्वराचे मंदिर असून येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येजा करीत असतात तसेच येथे शाळा कॉलेज असल्याने असंख्य विद्यार्थी,दूध विक्रेते,बाजारपेठेत येणारे असंख्य नागरिक येथूनच येजा करीत असतात.यामुळे वेगात जाणाऱ्या वाहनांमुळे मोठा अपघात होऊ शकतो.यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून सुसाट जाणाऱ्या वाहनांचे वेग कमी करण्यासाठी बाजारपेठेच्या चौका चौकात रस्त्याला
- Get link
- Other Apps
रामनवमी निमित्ताने महादेववाडी येथे अखंड हरीनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण कोलाड (विश्वास निकम,रायगड भुषण) गुरुवर्य वै.ह.भ प.अलिबागकर महाराज, वै.ह.भ.प. गोपाळ बाबा वाजे,वै. ह.भ.प. धोंडू महाराज कोल्हाटकर,वै.ह.भ.प सिताराम दाजी खामकर महाराज,वै.ह.भ.प.बाबू मालू बाईत,वै.ह.भ.प. श्रीधर महाराज बाईत,यांच्या कृपाआशिर्वादाने रामनवमी निमित्ताने अखंड नाम यज्ञ सोहळा, ह.भ.प.नारायण दादा वाजे यांच्या कुशल मार्गदर्शनानुसार गुरुवार दि.३० मार्च २०२३ ते रविवार दि.२ एप्रिल २०२३ पर्यंत महादेववाडी अखंड हरिनाम सप्ताह व श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायणाचे आयोजन करण्यात येणार आहे. यारे यारे लहान थोर l याती भलती नारी नर l करावा विचार l न लगे चिंता कोणाची ll गेली ६० वर्षाची अखंड यशश्वि परंपरा राखत महादेववाडी येथे होणारा धार्मिक व अध्यात्मिक भक्तिमय सोहळा महादेववाडी गावानी जतन करुन ठेवला असून दररोज पहाटे ४ ते ६ काकड्याचे भजन, सकाळी ८.३० ते १२.३० व दुपारी ३ ते ५ वा.श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण,सायं. ५.३० ते ६.३० वा. प्रवचन,सायं.६.३० ते ७.३० हरिपाठ,९ ते ११ ते किर्तन
- Get link
- Other Apps
पंचशील मित्र मंडळ बोर्ले यांच्याकडून पाणी वाटप साई /माणगांव (हरेश मोरे) तालुक्यातील मोर्बा विभागातील पंचशील मित्र मंडळ बोर्ले बौद्धवाडी यांच्या कडून सालाबादप्रमाणे 20 मार्च रोजी महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी ढालघर फाट्यावर पाणी वाटप करण्यात आले. महाड चवदार तळे सत्याग्रहाचा 96 वा वर्धापन दिनानिमित्त 20 मार्च रोजी महाराष्ट्र राज्यातून मोठया बहुसंख्येने चवदार तळे येथे भीम अनुयायी येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक संघटने कडून विविध उपक्रम या दिनी राबविले जातात. असा उपक्रम पंचशील मित्र मंडळ बोर्ले यांनी भीम अनुयायी यांच्यासाठी मुंबई गोवा हायवेवर माणगांव येथील ढालघर फाट्यावर दिवसभर वाहनातून येणाऱ्या अनुयायांना बिसलेरी पाणी वाटप केले. प्रखर उन्हामध्ये उभे राहून हा उपक्रम करण्यात आला. यावेळी पंचशील मित्र मंडळ बोर्ले यांचे अध्यक्ष अमोल मोहिते, सचिव संदेश कासारे, उपाध्यक्ष संदीप पवार, मुंबई मंडळाचे सचिव अशोक मोहिते, राजू गायकवाड विवेक मोहिते, संतोष मोहिते, महानंद मोहिते, देवेंद्र मोहिते, विलास मोहिते, धीरज मोहिते, सुहेल मोहिते, सौरभ मोहिते, सुनिल मोहिते, सुधीर मोहिते यांनी पाणी
- Get link
- Other Apps
महाड चवदार तळे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंकज तांबे व स्वप्निल शिर्के यांच्या हस्ते बुद्ध मूर्ती व संविधान देऊन सन्मान! साई -माणगाव(हरेश मोरे) महाड चवदार तळ्याचा 96 व्या सत्याग्रहादिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे हे रविवार दि.19 मार्च 2023 रोजी चवदार तळे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रात्री अकरा वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील गोळीबार मैदानातील सभा संपवून आले. त्यानंतर मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यावेळी बौद्ध धम्म सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष पंकज तांबे व संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्निल शिर्के यांनी मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांना बुद्धमूर्ती व भारतीय संविधान देऊन यथोचित सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. यावेळी सन्मान करताना मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाड, माणगांव, पोलादपूर विधानसभेचे कार्यसम्राट, पक्ष प्रतोद व शिवसेनेचे उपनेते मा.आ.भरतशेठ गोगावले, युवा सेना प्रमुख विकास गोगावले, भिक्कू गण, भीम अनुयायी व असंख्य सेन
- Get link
- Other Apps
संजय गांधी नगर येथे अखंड नामयज्ञ सोहळा कोलाड (विश्वास निकम,रायगड भुषण) गेली १६ वर्षांपासून चालत आलेल्या श्री. साती आसरा देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने तसेच सद् गुरु स्वामी गणेशनाथ महाराज यांच्या कृपाशिर्वादाने सद्गुरू स्वामी हरिचंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाने संजय गांधी नगर आंबेवाडी नाका येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या ९ व्या व १२ व्या अध्ययांचे पारायण व त्या निमित्ताने हरिपाठ,प्रवचन, किर्तन व भजन यांचे आयोजन करण्यात येणार आहे. सोमवार दि.२० मार्च २०२३ रोजी मंगळविधी, कळस स्थापना,माऊली पूजन, विणापूजन, अनुष्ठान पूजन, ज्ञानेश्वरी पूजन, गुरुपूजन, ध्वजारोहन, सकाळी १० ते १२वा. ज्ञानेश्वरीचे ९ व्या व १२ व्या आध्ययाचे पारायण, दुपारी १२ ते २ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ वा. कोलाड विभाग वारकरी संप्रदाय यांचा सामुदायिक हरिपाठ,६ते ७ वा.दिपोत्सव गुरुवर्य गुरुप्रसाद महाराज पाटील (उत्तराधिकारी खारपाले पेण), अदितीताई तटकरे (मा. राज्यमंत्री तथा मा. पालकमंत्री रायगड )अनिकेतभाई तटकरे (आ.विधान परिषद)ह.भ.प. ॲड. कृष्णा महाराज चवरे, ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत त
- Get link
- Other Apps
तळा आरोग्य विभागाचे वतीने आशा दिन उत्साहात साजरा! तळा( कृष्णा भोसले) आज आशा दिनाचे औचित्य साधत तळा आरोग्य विभागाचे वतीने आशा दिन साजरा करण्यात आला. सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला पुष्पहार घालुन दिप प्रज्वलन करीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. कुलदीप बोंगे गटविकास अधिकारी तळा यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी वंदन कमार पाटील, श्री देशमुख, तळा वैद्यकीय अधिकारी मोधे ,त्याचबरोबर आशा, गटप्रवर्तक, मादांड भानंग,तळेगाव, पिटस ई, येथील समुदाय संघटक, तळा आरोग्य सहाय्यक नांदगावकर, श्रीमती सुजाता जाधव, कानिटकर, नागरी आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, उपस्थित होते. यावेळी रांगोळी स्पर्धा, संदेशपर गिते, सावित्री ओवी, प्रबोधन गिते, आणि आशा नी आपली मनोगते व्यक्त केली. तालुका आरोग्य अधिकारी यांनी आशानी जास्त जास्त काम करून जास्त पैसे कमवावे असे आवाहन केले. तालुक्यात आशाचे काम हे चांगल्या प्रकारे चालले आहे. आशाना ठराविक मानधन नसुन त्यांना कामाचा मोबदला दिला जातो. आशा ही आरोग्याचा कणा आहे. तिचे कौतुक त्यानी केले. या का
- Get link
- Other Apps
अश्विनी समेळ यांना सुषमा स्वराज समाज सेविका पुरस्कार प्रदान माणगाव (प्रतिनिधी)लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असल्यामुळे विविध सामाजिक संस्था व शासकीय संस्था यांच्या माध्यमातून सौ. आश्र्विनी गणेश समेळ यांनी विविध सामाजिक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. नेहरू युवा केंद्र भारत सरकार यांच्या माध्यमातून युवक मंडळ तयार करणे, महिला सशक्तीकरण, समाजसेवा, बचत गट तयार करणे. ग्रामीण व शहरी भागातील युवकांना व महिलांना एकत्र करून त्यांना व्यवसाय मार्गदर्शन करणे व शासकीय योजनांची माहिती देणे त्यांच्याकडून सामाजिक उपक्रम करून घेणे अशा विविध सामाजिक विषयांवर उत्तम मार्गदर्शन केले आहे. राष्ट्रीय एकात्मिक कॅम्प कर्नाटक येथे घेण्यात आला त्यामध्ये महाराष्ट्र गटाचे नेतृत्व अश्विनी गणेश समेळ यांनी केले आहे. युथ क्लब एक्स्चेंज प्रोग्रॅम साठी गुजरात येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अश्विनी समेळ यांनी केले आहे. याचबरोबर ग्रामपंचायत व जिल्हा स्तरावर, महिला व बालकल्याण विभागा मार्फत, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या माध्यमातून अश्विनी समेळ नेहमी ग्र
- Get link
- Other Apps
श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवतेज मित्र मंडळ पुगांव येथे सांस्कृतिक स्नेह संमेलन, रसिकांची जिंकली मने! पुगाव- खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील पुगाव गावातील शिवतेज मित्र मंडळ यांनी श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंती आयोजन मोठ्या थाटामाटात साजरा करीत सर्व प्रथम शिवप्रतिमा पूजन करून गावातील जेष्ठ नागरिकांनी शिव छत्रपती शिवाजी महाराजाप्रती जीवनचरित्र व कामगिरी विषयी माहिती पटवून दिली. रात्री ७.३० वाजता रा.जि.प प्राथमिक केंद्र शाळा पुगाव च्या विद्यार्थी यांची सांस्कृतिक स्नेह संमेलन आयोजनामध्ये ४० विद्यार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारीत मराठी गाणी,हिंदी गाणी,चारोळया, नाटिका इ. एकूण ३२ कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा हा मानस ठेवून त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात प्रोत्सहन देत त्यास रोख रक्कम बक्षीस व टाळ्याच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. व विद्यार्थ्यांना ही रसिकांची मने जिंकली. यासाठी शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक झोलगे व सर्व सदस्य तसेच रा जि प प्राथमिक केंद्र शाळा
- Get link
- Other Apps
श्रीक्षेत्र पळस येथे १३ मार्च पासून २८ वा अखंड हरिनाम सप्ताह, महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची होणार किर्तन सेवा कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) रोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र पळस येथे श्री फळसाई मातेच्या कृपाछत्राखाली व सद्गुरू स्वामी गणेशनाथ महाराज तसेच सद्गुरू स्वामी हरिचंद्र महाराज पाटील यांच्या आशिर्वादामुळे फालगून कृ. श्रेष्ठी सोमवार दि.१३ मार्च ते फालगून कृ. नवमी गुरुवार दि.१६ मार्च २०२३ पर्यंत २८ वा.अखंड हरीनाम सप्ताह होणार असून या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची कीर्तनसेवा आयोजित करण्यात येणार आहे. इवलेसे रोप लावीयेले दारी l त्याचा वेणू गेला गगणावरी ll या संत महात्म्याच्या उक्ती प्रमाणे गेली २८ वर्षाची अखंड परंपरा राखत श्रीक्षेत्र पळस गावानी हा धार्मिक तथा अध्यात्मिक सोहळा जतन करुन ठेवला आहे.या निमित्ताने रोज सकाळी ५ वा. काकड आरती,सकाळी ९ ते १२ व २ ते ४ वा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण,सायं.५ ते ६ वा.हरिपाठ,६ते ७ वा.प्रवचन,रात्री ९.३० ते ११.३० वा हरिकिर्तन,नंतर हरिजागार होईल. सोमवार दि.१३/३/२३ रोजी सायं.५ ते ६ वा.विठ्ठल रखुमाई हरिपाठ मंडळ जांबोशी यां
- Get link
- Other Apps
वार्षिक तांत्रिक देखभाल व दुरुस्तीसाठी दिनांक १३ मार्च ते १७ मार्च २०२३ पर्यंत रायगड रोप-वे बंद राहणार! रायगड(प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर सबंध भारतातून रायगड किल्ला पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. रायगड किल्ला पहावा अशी अनेक शिवभक्तांची इच्छा असते. मात्र काही पर्यटक शिवभक्त हे वयोवृद्ध असल्याने पायऱ्या आणि खडतर अंतर पार करणे सर्वांना शक्य होत नाही त्यामुळे अनेक वयोवृद्धांना दिव्यांग लहान मुले, महिलावर्ग, यांना रायगड सहजा सहज पाहता यावे यासाठी रायगड रोप-वे तयार करण्यात आला आहे. या रायगड रोप-वे मुळे अनेकांना चार मिनिटात रायगडावर पोहोचणे शक्य होते. मात्र रायगड रोप-वे वार्षिक तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीसाठी दिनांक १३ मार्च ते १७ मार्च २०२३, ह्या कालावधीत रोप -वे बंद राहील. पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी रोप-वे प्रशासनाकडून हे निवेदन पत्रकाद्वारे देण्यात आल्याची माहिती रायगड रोप-वे प्रकल्प प्रबंधक राजेंद्र खातू यांनी प्रसिद्धीसाठी पत्रकारांना दिली आहे. पर्यटकांनी व शिवभक्तांनी अधिक मा
- Get link
- Other Apps
डॉ. सागर सानप व प्रा. माधव आग्री यांना सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान,सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव! कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) रोहा तालुक्यातील तसेच कोलाड विभाग पुई गावाचे सुपुत्र डॉ.सागर विठोबा सानप व तांबडी गावचे सुपुत्र प्रा. माधव आग्री यांना सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. रविवार दि.५ मार्च २०२३ रोजी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र नवश्रमिक सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र निर्मिती फिल्मी क्लब यांच्या तर्फे लायन्स क्लबचे कोलाड रोहाचे अध्यक्ष डॉ. सागर सानप व उपाध्यक्ष प्रा.माधव आग्री यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.या यशाबद्दल दोघांचे ही सर्वत्र शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे. डॉ. सागर सानप व प्रा. माधव आग्री या दोघांना ही तीन महिन्यांपूर्वी प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीने सोमवार दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान कर
- Get link
- Other Apps
आदिवासी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते शांताराम विष्णू पवार यांना पत्नीशोक! कै.सौ.जयश्रीताई पवार यांच्या निधनाने आदिवासी समाजात शोककळा! रायगड (प्रतिनिधी ) रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कटीबद्ध असणारे उरण येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम विष्णू पवार यांच्या पत्नी कै. सौ. जयश्री शांताराम पवार यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 45 वर्षे होते. नेहमी हसतमुख असणाऱ्या जयश्रीताई शांत व प्रेमळ स्वरूपाच्या सर्वांना परिचित होत्या. रायगडातील आदिवासी समाजाच्या चळवळीत कार्यकर्ते श्री शांताराम विष्णू पवार यांचे मोठे योगदान असल्याने आदिवासी समाजामध्ये मेळावे, मोर्चा, विविध बैठका आदिवासी समाजाचे विविध कार्यक्रम यामध्ये शांताराम पवार ही नेहमी उपस्थित असायचे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये जयश्रीताईंनी शांताराम पवार यांना खूप सहकार्य केले त्यांनी कधीही आपल्या संसारात कुरकुर केली नाही. आपल्या समाज बांधवांच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. त्यांच्या पश्चात तीन मुली असून तीनही मुली उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या निधनाची वार
- Get link
- Other Apps
शिमगो रंगलो गो लाले लाल, कोलाड ,सुतारवाडी,खांब, विभागात होळी उत्सव धुलेटीला मंगळवार बोकड मटणाच्या पोस्ताचा आस्वाद एक दिवस लांबणीवर, कोलाड (श्याम लोखंडे ) कोकणात शिमगा उत्सव व होळी उत्सवाला मोठा महत्व असून रोहा तालुक्यातील कोलाड, सुतारवाडी,खांब, विभागात शिमगोत्सव मोट्या उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला तसेच हवामनाच्या आनंदाजा नुसार रात्री अचानक ढगाळ वातावरण व वारा तसेच विजांचा कडकडाट सुरु झाल्याने काही ठिकाणी लवकर तर काही ठिकाणी उशिरापर्यंत होळींचे दहन करण्यात आले तर युवक मंडळानी काही विविध खेळांचे आयोजन केले होते तर त्यांचे मोठे या खराब हवामणामुळे व विजांच्या कडकडाटमुळे पूर्णतः त्यांची नाराजी झाल्याचे सर्वत्र ऐकवयास मिळत होते . सण हाय होळीचा सण हाय रंग पंचमीचा त्यामुळे शिमगो रंगला गो रंगला लाले लाल अशी लहान बालगोपालांकडून होळी रे होळी पूर्णाची पोळी म्हणत रंगाची उधळण मंगळवारी दिवसभर होत होती त्यात सोमवारी आली होळी व धुलेटीला मंगळवार त्यामुळे खवय्यांचा चिकन,बोकडाच्या मटणाचा खमंग पोस्त हा एकदिवसांनी लांबला त्यामुळे धुलेटी साजरी करणारे तळीराम देखील वेटिंगवर मात्र उद्याच बुधवार
- Get link
- Other Apps
दहावी बारावी परीक्षा संपेपर्यंत क्रिकेट स्पर्धा बंद करण्यासाठी पालक वर्गाची मागणी, या स्तुत्य उपक्रमाचे रोहा तालुक्यात सर्वत्र स्वागत! कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) सद्या दहावी व बारावीची परीक्षा सुरु असून या कालावधीत ही विविध असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धा सुरु आहे.विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात न गुंतता क्रिकेट कडे आकर्षित होतांना दिसत आहे त्यामुळे कमीत कमी दहावी बारावी परीक्षा संपेपर्यंत तरी क्रिकेट स्पर्धा बंद कराव्यात अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे. ३० वर्षांपूर्वी फक्त दहावी व १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी मिळत होती कोणत्याही टक्केवारीची गरज नव्हती सद्या स्पर्धेचे युग सुरु असून शिक्षणात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे परंतु असे असले तरी टक्केवारीला महत्व प्राप्त झाले असून पुढील शिक्षण घेण्यासाठी उत्तीर्ण होऊन उपयोग नाही यासाठी अभ्यास करणे महत्वाचे आहे. आधुनिक युगात निकालाची टक्केवारी पाहता मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे.उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा मुलींचे जास्त आहे.याचे कारण मुली खेळाकडे न वळता अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करीत आहेत त्यामुळ
- Get link
- Other Apps
बारा जिल्हा राजस्थान येथे झालेल्या त्रिकोणीय दिव्यांग क्रिकेट टी-20 स्पर्धेत महाराष्ट्र संघाची बाजी तळा (कृष्णा भोसले) बारा जिल्हा राजस्थान येथे १ व २ मार्च २०२३ रोजी उत्तर प्रदेश राजस्थान व महाराष्ट्र या दिव्यांग क्रिकेट संघाची त्रिकोणी दिव्यांग क्रिकेट टी २० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते उत्तर प्रदेश संघाने राज्यस्थान संघाला हरवून फायनलमध्ये आपली जागा पक्की केली महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन संघ फायनल मॅचमध्ये महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिकुन प्रथम फलंदाजी करण्यास सुरुवात केली महाराष्ट्र संघाने १२ षटकात ११५ धावा केल्या व ११६ रन्सचे मोठे आव्हान उत्तर प्रदेश दिव्यांग संघासमोर दिले व उत्तर प्रदेश या संघाने १२षटकात ११० रन्सवर रोखले व महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघ विजयाचा मानकरी ठरला. महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघाकडून संघाचे कर्णधार व अष्टपैलू खेळाडू कल्पेश तवळे यांनी संपूर्ण सिरीजमध्ये ८ विकेट व हॅट्रिक व्हिकेट व ४० रन्स कमलाकर कोळी ४ व्हिकेट आणि ६० रन्स वैभव सकपाळ ८० रन्स राजू वळवी 50 रन्स गोविंद वसावे ४९ रन्स केल्या आहेत तर भीमसेन मुंढे नागनाथ घोडके रमेश संकपाळ भास्कर
- Get link
- Other Apps
तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान! सर्व दासभक्त व स्वच्छता प्रेमी अधिकारी व पदाधिकारी यांचा मोठा सहभाग! माणगाव(प्रतिनिधी) संपूर्ण देशासह परदेशातही बैठकीच्या माध्यमातून व्यसनमुक्ती ,अंधश्रद्धा निर्मूलन या लोकजागृतीचे कार्य करणाऱ्या आदरणीय तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 1 मार्च रोजी महाराष्ट्र भुषण डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ.श्री.सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात प्रामुख्याने सर्व शहरातील रस्ते, गटार ,सार्वजनिक ठिकाणे,सरकारी कार्यालय ,प्राथमिक आरोग्य केंद्र ,सरकारी रुग्णालय इ.ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहे. माणगाव तालुक्याच्यावतीने समितीकडून माणगाव शहर ,निजामपूर शहर ,इंदापूर ,गोरेगाव यासह अनेक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यामध्ये हजारो टन ओला व सुका कचरा गोळा करण्यात आला आहे. हे अभियान यशस्वी होण्यासाठी सर्व दासभक्त याबरोबर माणगाव नगरीचे नगराध्यक्ष श्री.ज्ञानदेव पवार , माजी रा.जि.प.सदस्य तथा
- Get link
- Other Apps
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने रायगड युवा क्रांती संघटनेच्या वतीने मुंबई येथे भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न मुंबई(प्रतिनिधी)महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये तसेच समाज कार्यामध्ये सतत अग्रेसर असणाऱ्या रायगड युवा क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने भव्य रांगोळी स्पर्धा कोयना वसाहत गोरेगाव ईस्ट मुंबई या ठिकाणी घेण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला सदर स्पर्धा कोयना वसाहत गोरेगाव ईस्ट मुंबई या ठिकाणी संपन्न झाल्या या घेण्यात आलेल्या भव्य रांगोळी स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. साक्षी ढेबे, द्वितीय क्रमांक कु. साक्षी कदम, तृतीय क्रमांक कु. ज्योती शिर्के, तृतीय क्रमांक कु. पल्लवी दळवी, तृतीय क्रमांक कु.आयशा महाडिक यांनी पटकाविला. या कार्यक्रमाला संघटनेचे सर्व सभासद पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम कोयना वसाहत गोरेगाव ईस्ट मुंबई या ठिकाणी संपन्