लांबलेल्या पावसाची दमदार सुरवात बळीराजा सुखावला सर्जा, राजाची जोडी घेऊन भात पेरणीसाठी बळीराजा सज्ज,
खांब (नंदकुमार कळमकर) संपुर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात जुन महिना संपता संपता पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. खरिपाच्या लांबलेल्या पेरणीला जोरदार बळीराजाने सुरवात केली असून तो शेतीकामात आता व्यस्त झाला असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे बळिराजामध्ये देखिल आंनदाचे वातावरण पसरले आहे. या समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामांना देखिल चांगल्या पद्धतीत सुरुवात झाली असून सर्जा राजाची जोडी बळीराजा आता नांगरणीसाठी सज्ज झाला असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी पाऊस अधिक लांबला त्यामुळे बळीराजाची खरीप हंगामातील भात पेरणी देखील लांबली परंतु ऊशिरा का होईना पावसाने सोमवारी सकाळपासूनच दमदार हजेरी लावत सुरुवात करून सर्वच ठिकाणी पाणीच पाणी झाले . या पावसाच्या दमदार हजेरीमुळे बळिराजाची लांबलेली पेरणी करत शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. तर गरमीच्या वातावरणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाच्या आगमनामुळे चांगला दिलासा मिळाल्याने उष्म्यापासून सुटका झाली आहे.
सोमवार पासून दररोज हलक्या हलक्या सरी सुरू असल्याने पेरणीसाठी लाभदायक अशी सुरवात असल्याचे बोलले जात आहे तर पावसाने सकाळची चांगळी सुरुवात केल्यामुळे कामगार वर्ग तसेच शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडत असली तरी पाऊस येत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होत आहे. तर पावसाची दमदार सुरवात होताच काही खवय्ये मुठे चिंबो-या मच्छी पकडण्यात दंग झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
Comments
Post a Comment