नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संस्थेचा इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के कु. मृदुला साळवी 90 टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम 

कु.मृदुला  मधुकर साळवी 

खांब (नंदकुमार कळमकर ) महाराष्ट्र राज्याचा एस एस सी बोर्डाचा निकाल नुकताच ऑनलाइन जाहीर झाला असून संपन्न झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालात कोकण हा पुन्हा अव्वलस्थानी असल्याचे दिसून येत आहे , तर रायगडमध्ये नावलौकिक असलेल्या रोहा तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेली खांब येथील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब येथील संस्थेच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी नेहमी प्रमाणे बाजी मारत संस्थेचे नाव उंचावत शंभर टक्के निकाल देत मोल मजुरी करणाऱ्या गरीब कुटूंबातील कु. मृदुला मधुकर साळवी हिने 89 टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम क्रमांकाने आल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित रा. ग.पोटफोडे (मास्तर) विद्यालय खांब,श्रमिक विद्यालय चिल्हे,द न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी ,या तीनही शाळांचा यंदाचा इयत्ता दहावीचा निकाल हा शंभर टक्के लागला असून यात श्रमिक विद्यालय चिल्हे हायस्कूलची तसेच बाहे गावची सुकन्या कु.मृदुला मधुकर साळवी हिने 89 टक्के गुण संपादित करत सर्व प्रथम बाजी मारली आहे तर रा.ग.पोटफोडे (मास्तर विद्यालय खांब चा कु.प्रज्वल अशोक झोलगे याने 88.60 टक्के गुण मिळवून संस्थेत दुसरा आला तर कु.नम्रता नंदकुमार कापसे हिने 87.60 टक्के गुणांची बाजी मारली आहे .

कु.मृदुला मधुकर साळवी हीची घरची परिस्थिती अंत्यत हलाक्याची आहे मिळेल ती मोल मजुरी व कबाड कष्ट करणारे आई वडील शिक्षणासाठी पुरेसा शैक्षणिक साहित्याची देखील अपेक्षा केली नाही परंतु मनाशी एकनिष्ठेने जिद्द बाळगून तिने आपली शैक्षणिक पात्रता दाखवत आपल्या गरीब कुटूंबाचे गावचे तसेच संस्था शाळेचे नाव उज्वल केले गावातील युवक मंडळ तसेच इतर सामाजिक संस्था व श्रमिक विद्यालय चिल्हे येथील शिक्षक वर्ग यांच्या माध्यमातुन तिला जे शैक्षणिक साहित्य लाभले त्याचा पुरेपूर फायदा घेत तिने इयत्ता दवीच्या परीक्षेत 89 टक्के गुण मिळवून शाळेतच नव्हे तर नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेत प्रथम आली आहे. 

इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत कु.मृदुला मधुकर साळवी ही यशस्वी गुण संपादित करून प्रथम अल्याने तिच्यावर खांब चिल्हे,देवकान्हे विभागातून अभिनंदनचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर विशेषतः संस्थेच्या वतीने संस्थापक रा.ग.पोटफोडे मास्तर,अध्यक्ष महेंद्र पोटफोडे, तसेच संस्थेचे संचालक त्याच बरोबर प्राचार्य सुरेश जंगम खांब, दीपक जगताप मुख्याध्यापक चिल्हे,अनिल खांडेकर मुख्याध्यापक विठ्ठलवाडी ,यांनी सर्व विद्यार्थी वर्गाचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .

Comments

Popular posts from this blog