Posts

Showing posts from February, 2023
Image
        केंद्र पुरस्कृत किसान सन्मान निधी वाटप कार्यक्रम     पाहण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद! तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील सोनसडे तलाठी  सजा मार्फत सोनसडे ग्रा. पं. कार्यालयात सोनसडे सजाचे तलाठी किशोर मालुसरे यांनी केन्द्र पुरस्कृत किसान सन्मान निधी वाटप कार्यक्रम दाखविला  हे पहाण्यासाठी लाभार्थी शेतकरी बंधु भगिनी उपस्थित होते.       पंतप्रधान नरेंद मोदी यांनी किसान सन्मान निधीचे वाटप  13वा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे वितरणाचा शुभारंभ केला. याकार्यक्रमाचे प्रसारण  थेट दुरदृश्य प्रणालीव्दारे दाखविण्यात आला. हा कार्यक्रम शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविण्याचे शासनाचे आदेश होते.  तळा तहसीलदार ए. एम. कनशेट्टी यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मडंळअधिकारी नेहा ताबंडे,   कृषी सहाय्यक योगेश कोळी, दत्तात्रय दुधाटे, सरपंच माधुरी पारावे,सदस्य  प रशुराम वरंडे, सोनसडे गावातील पदाधिकारी, लाभार्थी शेतकरी बांधव भगिनी या कार्यक्रमात उपस्थित होते.
Image
मालक होण्यापेक्षा विष्णुचे दास झालेत तर आपले जिवन सुखी होईल :- ह.भ.प.विठ्ठल महाराज चवरे   कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) जन्माला आल्यापासून मरेपर्यंत  माणूस मालक होण्यासाठी जगत असतो.मालक होण्यासाठी शिक्षण,कामधंदा,नोकरी,करीत असतो तरीही सुखी होत नाही परंतु तुम्ही विष्णुचे दास झालेत तर आपले जिवन सुखी होईल असे नागोठणे येथील किर्तन सेवेत ह.भ.प.विठ्ठल महाराज चवरे यांनी व्यक्त केले.     कायावाचामने झाला विष्णु दास l काम क्रोध त्यास बाधिती ना ll विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता l सकल भोगीता होय त्याचे ll तुका म्हणे चित्त करावे निर्मळ l येऊनि गोपाळ राहे ll या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या आधारे स्पष्ट करतांना ह.भ.प. विठ्ठल महाराज चवरे यांनी सांगितले कि माणूस कितीही विद्वान असला तरी त्याच्या जवळ काम,क्रोध,मोह,लोभ,मद,मत्सर यापैकी कोणतेही  विकार असतील त्याला देव दिसणार नाही.पराशय ऋषीचे आश्रमातील काम संपल्यानंतर ते गावात गेले गावातील काम संपल्यावर ते आश्रमात निघाले मधी नदी आडवी होती दुपारची वेळ होती सर्व नावाडी जेवायला गेले. तेथे एक नावाड्याची मुलगी आली तीने महाराजांना नमस्कार केला व  ती मुलगी म
Image
  रोहा तालुक्यातील पुगाव येथील वाचनालयास मुक्त पत्रकार राजेश हजारे यांनी दिली पुस्तकांची भेट   खांब (नंदकुमार कळमकर)आताच्या आधुनिक विज्ञानाच्या काळात वाचन संस्कृती मागे पडत असताना ही वाचन संस्कृती पुन्हा रुजावी व ती खेडोपाड्यात शेवटच्या माणसापर्यंत पोचावी कुणी निरक्षर राहू नये. खेडोपाड्यात,दुर्गम भागात राहणा-या अभ्यास करू ईच्छीणा-या  होतकरू तरूणांना प्रोत्साहन व सर्वतोपरी पुस्तकांच्या माध्यमातून मदत व्हावी त्याचे व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे तसेच दुर्गम भागातील गरीब वंचिताचे जिवन,राहणीमान स्वयंपूर्ण व्हावे या उदात्त  हेतूने कार्यरत असलेले शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांनी स्वर्गीय हरिभाऊ लक्ष्मण म्हसकर ग्रंथालयाची स्थापना रोहा तालुक्यातील  येथे पुगाव येथे 3 जुलै 2022रोजी स्थापना करण्यात आली.  या वाचनालयात कृषी, काव्य,इतिहास,अध्यात्मिक विभाग आदी विभाग कार्यरत आहेत तसेच स्पर्धा परीक्षा, रेल्वे रीक्रूटमेट,युपीएसी, एमपीएससी परीक्षेस लागणारी सर्व पुस्तके येथे उपलब्ध आहेत त्यामुळे खांब,कोलाड  येथील वाचक प्रेमींना त्याचा फायदा होताना दिसत आहेत. सदरील वाचन संस्कृतीची  चळवळ चालवणा-या शंक
Image
  तळा येथे जंगली प्राणी प्रतिबंध प्रात्यक्षिकाचे आयोजन      तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील भातपिक, कडधान्य, भाजीपाला व फळ पिकांचे दरवर्षी माकडे, डुकरे इत्यादी वन्य प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे बरेचशे शेतकरी शेती देखील करणे बंद करत चालले आहेत. सदर नुकसान टाळण्यासाठी कृषि विभागाच्या  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तळा तालुक्यातील मौजे पिटसई कोंड व रोवळा येथे मंकी रिपेलंट प्रात्यक्षिकाचे आयोजन पेस्टोमॅटिक कंट्रोल कंपनी अहमदनगर यांच्या मदतीने करण्यात आले होते.   यावेळी पेस्टोमॅटिक कंपनी अहमदनगर येथील श्री वसंत टाके, श्री. विनोद सुकेकर यांनी पेस्टोमॅटिक कंपनीने तयार केलेल्या औषधाचा वापर करून उग्रवास व कडूचव या तत्वाचा वापर करून जंगली प्राण्यांना कोणतीही इजा होऊ न देता त्यांना कशा प्रकारे गावापासून, पिकापासून पळवून लावू शकतो याबाबत माहिती दिली. तसेच माकडांसाठी वेगवेगळ्या प्रकारे या औषधाचा उपयोग कसा करायचा याची माहिती देऊन मुरमुर्यामध्ये हे औषध चोळून माकडांना खाऊ दिले व प्रत्यक्ष माकडांची प्रतिक्रिया उपस्थितांना दाखावण्यात आली. या औषधामुळे मा
Image
  ऐनघर ग्रामपंचायतीच्या अपहाराबाबत ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचा अंतिम निर्णय होऊन देखील न्याय मिळण्यास विलंब होत असल्याकारणाने अखेर ऐनघर हद्दीतील ग्रामस्थांनी केले एक दिवशीय लाक्षणिक उपोषण!     आम्हाला न्याय मिळेपर्यंत हा लढा अखेरच्या श्वासापर्यंत लढू :- बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष-दिनेश कातकरी कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत ऐनघर मध्ये २०१५ ते २०२० या कालावधीमध्ये घडलेल्या अपहाराचे बाबतीत अंतिम निकाल सन्माननीय. ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. यांनी देऊन सुद्धा गटविकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांनी ४ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल करण्यास व पुढील कार्रवाई करण्यास विलंब करीत असल्याकारणाने तसेच पुढील कार्रवाईस होणारे विलंबाचे कारण लक्षात येत नसल्याकारणाने आणि आज प्रत्यक्षात काम करीत असणारे सदस्य यांच्यावर त्वरित ३९(१) ची कार्रवाई व्हावी याकरिता ऐनघर पंचक्रोशी हद्दीतील ग्रामस्थ आणि ऐनघर पंचक्रोशी ग्रामीण युवा बेरोजगार संघटनेचे कार्यकर्ते यांनी मंगळवार दि.२२/२/२०२३ रोजी पंचायत समिती
Image
  पृथ्वीचा संतुलन ठेवायचा असेल तर एक  झाड लावा व लेकी वाचवा:-ह.भ.प.संजीवनीताई शिंदे   कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण) १९८० च्या दशकात मुलीकडून हुंडा म्हणून रेडिओ  मागितली जात असे तर १९९०च्या  दशकात हुंडा म्हणून मुलीकडून टुव्हिलर मागतली जात होती परंतु २०१० च्या दशकात हुंडा म्हणून मुलीकडून फोरव्हिलर गाडी मागितली जात होती परंतु २०२० च्या दशकात  मुलीची गर्भाशयातच स्त्रीभून हत्या झाल्यामुळे मुलींची संख्या कमी झाली आहे यामुळे या दशकात लग्नासाठी लग्न करण्यासाठी मुलगी मिळत नसल्याने तुम्ही फक्त मुलगी द्या  बाकी खर्च आम्ही करू अशी बोलण्याची वेळ आली आहे.त्याच प्रमाणे दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे पृथ्वीचा संतुलन बिघडत चालला आहे यासाठी पृथ्वीचा संतुलन ठेवण्यासाठी एक झाड लावा व लेकी वाचवा असे मत ह. भ.प.संजीवनीताई शिंदे यांनी पुगांव येथील आयोजित किर्तन सेवेत व्यक्त केले.      तसेच ज्याचा स्वभाव भोळा आहे तो कितीही मोठा झाला तरी तो बदलत नाही हे शिव भोळा चक्रवती l त्याचे पाय माझे चित्ती ll वाचे वदता शिवनाम l तया न बाधी क्रोधकाम ll धर्म अर्थ काम मोक्ष l शिव देखता प्रत्यक्ष l एका जनार्दनी शिव l निवारी कळीकाळ
Image
  शिवतेज मित्रमंडळ आमडोशी आयोजित कबड्डी स्पर्धेत चोंडेश्वरी कडसुरे संघ विजेता     कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) शिवतेज मित्रमंडळ आमडोशी यांच्या विद्यमानाने शनिवार  १८ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हा व नागोठणे विभाग कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात चोंडेश्वरी कडसुरे संघाने जय हनुमान आमडोशी संघावर विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर जय हनुमान आमडोशी संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरला.तसेच शिवशंकर वांगणी संघ तृतीय तर  वरदायनी कोंडगाव संघ चतुर्थ क्रमांकाचे मानकरी संघ ठरले. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू दिवेश महाडिक,उत्कृष्ट खेळाडू हरेश भोसले, उत्कृष्ट पक्कड प्रणित तेलंगे, तर पब्लिक हिरो प्रणय शिंदे यांना देण्यात आले.     कबड्डी स्पर्धेचे उद्धघाटन वांगणी ग्रामपंचायत सरपंच सोनम भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य संजय भोसले,उपसरपंच सुनिता जांबेकर, माजी उपसरपंच लहू तेलंगे,एकनाथ ठाकूर,सामाजिक कार्यकर्ते वासुदेव जांबेकर,नरेश दळवी,एकनाथ दळवी, मोरेश्वर तेलंगे,वर्षा जांबेकर सर्व कबड्डी यशश्विकरण्यासाठी
Image
  महादेववाडी येथील नववसाहतीचे शिवसमर्थ नगर नामकरण रोहे (प्रतिनिधी) माजी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाशी ग्रामपंचायत मधील महादेववाडी येथील नवीन वसाहतीचे शिवसमर्थ नगर नामकरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी सरचिटणीस सुरेश मगर,उपसरपंच अरविंद मगर,रोठ बुद्रुक माजी सरपंच ज्ञानेश्वर साळुंखे,मंगेश देवकर,रमेश जोगडे,रमेश बर्डे,अध्यक्ष रत्नाकर चव्हाण,उपाध्यक्ष संदीप मगर,उपाध्यक्ष प्रज्योत गुरव,सेक्रेटरी जगदीश जाधव,खजिनदार सुनील जाधव,पूजाताई गुरव, संचिता मगर, प्रियंका खांडेकर, रसिका जाधव तसेच शिव समर्थ ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ, शिवसमर्थ नगर, महादेव वाडी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजीमंत्री आदिती तटकरे यांनी ग्रामस्थांच्या समस्या सोडविणार असे आश्वासन दिले. सांयकाळी स्थानिक ग्रामस्थांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले,
Image
  शिव ऊर्जा मित्र मंडळ अंधारआळी रोहा गडसंवर्धन मोहीम यशस्वीरित्या पार!   रायगड (भिवा पवार /राजेश हजारे) इतिहास नुसताच पुस्तकातून नव्हे, तर प्रत्यक्षात सुद्धा आपल्या मुलांनी बघितला पाहिजे. हे गड चढले पाहिजेत, तिथे फिरले पाहिजे, त्याच्या आजूबाजूचे वातावरण अनुभवले पाहिजे आणि स्थापत्त्यकलेचा नमुना अभ्यासला पाहिजे. गडाचे संवर्धन जतन केले पाहिजे कारण आजचा महाराष्ट्र हा याच इतिहासाच्या कर्तबगारीवर उभा आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेतून बोध घेऊनच आपण आपले भविष्य घडवू शकतो. आणि आपली पुढची पिढी कालचा हा उज्ज्वल इतिहास जाणूनच उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवू शकते. आणि म्हणूनच गडांचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे याच उद्देशाने प्रेरित झालेल्या रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील शिव ऊर्जा मित्र मंडळ अंधारळी रोहा यांच्या विद्यमाने महाशिवरात्रीचे  औचित्य साधून १८  फेब्रुवारी रोजी  शिवपूजनाने मित्र मंडळ यांनी घोसाळगडावर पहिली गड संवर्धन मोहीम नियोजनपूर्वक यशस्वीपणे पार पडली. हिमालयाचा रुद्र उतरला सह्याद्रीच्या कड्यावर, चारही धाम अवतरले एकल्या विरगडावर... शांत भग्न पण उग्र असा दगडात झंझावात शतकांचा, त
Image
  दिल्ली येथे आयोजित "आदि महोत्सवात" सहभागी रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या श्री समर्थ पुरूष बचतगटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक! अलिबाग,(जिमाका)रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजातील श्री समर्थ पुरूष बचतगट, मु.श्रीगाण, पो.कामार्ले, ता.अलिबाग, जि.रायगड या बचतगटाने मेजर ध्यानचंद स्टेडीयम, दिल्ली येथे आयोजित आदि महोत्सवात सहभाग घेतला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्टॉलला भेट दिली आणि बचतगटाचे अध्यक्ष दत्ता नाईक यांच्या वारली पेंटींग व कलाकुसरीचे दिलखुलास कौतुक केले.  तसेच दिल्लीमधील नागरिकांनीही या स्टॉलला मोठ्या प्रमाणावर भेट देऊन उत्तम प्रतिसाद दिला.      एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पेण,जि.रायगड यांच्यामार्फत  श्री समर्थ पुरूष बचतगट, मु.श्रीगाण, पो.कामार्ले,ता.अलिबाग, जि.रायगड या बचतगटास वारली पेंटिंग करून विविध वस्तू निर्मिती करण्यासाठी न्यूक्लिअर बजेट योजनेंतर्गत रू. 3 लाख अनुदान मंजूर करण्यात आले होते.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट झाल्याने याप्रसंगी श्री.दत्ता नाईक यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पे
Image
  बॅसिलिक फ्लाय स्टुडिओजचे ग्रामीण भागातील कार्य कौतुकास्पद : सुरेश मगर रोहा (प्रतिनिधी) महादेववाडी येथील प्रियंका गुरव या पुणे येथे आयटी कंपनीत कामासाठी गेले असताना सुद्धा त्यांचे आपल्या गावाकडची ओढ पाहता सामाजिक जाणीव यातून आपले उत्तरदायित्व दाखवत महादेववाडी शाळेतील विद्यार्थ्यांना बॅसिलिक फ्लाय स्टुडिओज पुणे कंपनीच्या माध्यमातून क्रीडा व शालेय साहित्य सी.एस.फ माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. शहरात आयटी कंपनीच्या माध्यमातून ॲनिमेशन चे काम करणारे बॅसिलिक फ्लाय स्टुडिओज चेन्नई आणि पुणे यांनी शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त असे साहित्य क्रीडा व शालेय साहित्य दिल्याने विद्यार्थ्यांना निश्चित त्याचा फायदा होईल असे सांगत कंपनीचे ग्रामीण भागातील सी एस एफ माध्यमातून केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर यांनी व्यक्त केले. रोहा तालुक्यातील आय एस ओ जिल्हा परिषद शाळा महादेववाडी येथे बॅसिलिक फ्लाय स्टुडिओज चेन्नई आणि पुणे यांच्या वतीने क्रीडा व शालेय साहित्य विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यासह कचराकुंडी बांधण्यासाठी निधी देण्यात आले.या कार्यक्रमप्रसंगी सुरेश
Image
रोहा तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत ऐनघर येथील सरपंच, सदस्य,ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यावर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे ग्रामविकास मंत्री यांनी आदेश देऊन सुद्धा अजूनही गुन्हा दाखल नाही!     ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील तरुण २२ फेब्रुवारी २०२३ रोजी करणार लाक्षणिक उपोषण!           ग्रामपंचायत अपहार  प्रकरणी अभय देणारा कोलाड विभागातील मोठा पुढारी कोण? सर्वत्र चर्चेला उधाण..... रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचा पाठिंबा!   रायगड (विशेष प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निधी अपहार प्रकरणी कारवाईबाबत ग्राम विकास मंत्रींनी आदेश देऊनही कोणतीच  कारवाई न झाल्याने अखेर संतप्त झालेल्या ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील युवकांनी 22 फेब्रुवारी रोजी रोहा पंचायत समितीसमोर  लक्षणिक उपोषण करणार असल्याचे पत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांना दिलेअसून या निवेदनाची प्रत त्यांनी जिल्हाधिकारी रायगड अलिबाग, पोलीस अधीक्षक रायगड, कार्यकारी अधिकारी रा.जि.प. अलिबाग, उपकार्यकारी अधिकारी रा.जि.प.अलिबाग (ग्रामपंचायत विभाग) उपविभागीय अधिकारी रोहा, तहसीलदार रोह
Image
  गोवे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रंजिता जाधव यांची बिनविरोध निवड   कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण ) रोहा तालुक्यातील गोवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच भावना भरत कापसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी शुक्रवार दि.१०/२/२०२३ रोजी रंजिता राजेंद्र जाधव यांनी अर्ज दाखल केला.उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे गोवे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रंजिता राजेंद्र जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विकासाचे महामेरू खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नातून,आ.आदितीताई तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच महेंद्र पोटफोडे यांच्या माध्यमातून गोवे ग्रामपंचायतीतील गोवे, मुठवली,शिरवली या तीन ही गावातील अंतर्गत रस्ते,नळ पाणीपुरवठा योजना,समाजमंदिर,स्मशानभूमी,व इतर विविध कामे करण्यात आली. या विकासाच्या जोरावर गोवे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली.यावेळी ही उपसरपंच पदी रंजिता जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.         यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खांब-कोलाड जिल्ह
Image
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यस्तरीय वेंगुर्ला येथे अधिवेशन,   रायगडातील सर्व शिक्षकांनी अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन!  रायगड (प्रतिनिधी)"न्यायाची चाड अन्यायाची चीड" हे ब्रीद घेऊन 1962 पासून राज्यातील प्राथमिक शिक्षक व शिक्षणाचे प्रश्न घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कार्यरत आहे या संघटनेचे सतरावे त्रैवार्षिक महा अधिवेशन 15 व 16 फेब्रुवारी रोजी वेंगुर्ला  येथे संपन्न होणार असल्याची माहिती शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष  राजेश जाधव व सरचिटणीस विजय येलवे यांनी माहिती  दिली.  1960 च्या दशकात विद्यार्थी शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अपुऱ्या विद्यावेतनाच्या प्रश्न गंभीर प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी भा.वा.शिंपी( नाशिक)वि.भा. येवले (सोलापूर ) रॉबिन हेंड्रिंग्ज अशा कार्यकर्त्यांनी राज्यातील हजारो छात्र शिक्षकांना सोबत घेऊन मोठा लढा उभारला पुण्यातील शनिवार वाड्यासमोर झालेल्या आमरण उपोषणाला राज्यातील तत्कालीन अनेक समाजवादी व डाव्या चळवळीतील नेत्यांनी हजेरी लावून या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने राज्य सरकारने नरमाईची   भूमिका घेत विद्यावेतनात पुरेशी वाढ केली पुढे या