कै.द.ग.तटकरे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय कोलाड एस. एस.सी. निकाल ९३.७५%

सौरभ पुजारी ९१.८०% गुण मिळवून प्रथम

 एस.एस.सी.परीक्षेत कु.सौरभ पुजारी प्रथम, 

  गोवे-कोलाड (विश्वास निकम )१७ जून रोजी एस. एस. सी दहावी) परीक्षेचा निकाल  जाहीर झाला असून या परीक्षेत कै. द. ग. तटकरे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय कोलाडचा निकाल ९३.७५% लागला असून या विद्यालयातील ९६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत बसले होते यातील ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

 एस.एस. सी. परीक्षेत कु.साई सावंत द्वितीय, 
 या विद्यालयात दहावीच्या परीक्षेत सौरभ  सचिन पुजारी ९१.८०% गुण मिळवून प्रथम,साई राकेश सावंत ८८.८०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक,तर पायल प्रशांत बाईत  ८७.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल,कार्याध्यक्षा गिताताई पालरेचा, सचिव रविकांत घोसाळकर, स्कूल कमेटी अध्यक्ष सुरेश महाबळे प्राचार्य शिरीष येरुणकर, उपप्राचार्य शकील मोरवे, घोसाळकर सर,अविनाश माळी, व सर्व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog