शिवराज्याभिषेक शुभदिनी 'बा रायगडच्या' सदस्यांना किल्ले रायगडावरती दृष्टीस पडली ऐतिहासिक तोफ राज्यभिषेक सोहळ्याप्रसंगी तोफ दिसल्याने 'बा रायगड' परिवारात नवा उत्साह!

कोलाड (श्याम लोखंडे ) बहुजन प्रतिपालक वंदनीय महाराष्ट्राचे आराध्य दैवत शूर वीर पराक्रमी योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून रोजी रायगड किल्ल्यावर भव्य असा 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न झाला . औत्सुक्याने आणि आदराने हा सोहळा जगभर पाहिला जातो .या सोहळ्याचे ऐतिहासिक मूल्य पाहता शिस्तबद्धतेच्या काळजीसह प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक असा हा अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला आहे.

मात्र, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा ' गड किल्ले संवर्धन 'बा रायगड' परिवाराला मोठा प्रेरणादायी व उत्साह वाढवणारा ठरला असून छत्रपती शिवराय हे मनामनात शिवराज्याभिषेक घराघरांत' ही संकल्पना घेऊन किल्ले रायगडावर अत्यंत भव्यदिव्य प्रमाणात हा सोहळा साजरा झाला. शिवराज्याभिषेक शुभदिनी' बा रायगडच्या' सदस्यांना किल्ले रायगडावरती दृष्टीस पडली ऐतिहासिक तोफ ,राज्यभिषेक सोहल्याप्रसंगी तोफ दिसल्याने 'बा रायगड' परिवारात नवा उत्साह निर्माण झाल्याने शिवप्रेमींचा आनंद गगनाला भिडले असल्याचे दिसून येत आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की दुर्गदुर्गेश्वर रायगडाचा आशिर्वाद रायगडावर एका तिव्र उतारावरील कपारीत ,गड किल्ले संवर्धन बा रायगड परिवाराचे सदस्य, मावळा व शिवप्रेमी तथा रोहा तालुक्यातील बाहे गावचे पोलीस पाटील मनोज थिटे यांना मातीत गाढलेली काहीतरी ऐतिहासिक वस्तू दिसली ती नक्की वस्तू काय आहे याची शहानिशा व खातरजमा करण्यासाठी त्वरित त्यांनी त्यांचे सहकारी सौरभ घरट, योगेश शिर्के,आनंद सानप, रोहित देशमुख, संतोष आलम इत्यादींना बोलवले आणि आजू बाजूचा थोडा पालापाचोळा व माती बाजूला करून त्यांना आनंदित करणारी वस्तू दिसली ती वास्तू म्हणजे एक नवी ऐतिहासिक तोफ आहे याची खात्री पटली की कित्तेक दशके मातीत गाढलेली ती तोफ पुन्हा सर्वांसमोर आली व ती नजरेस पडताच 'बा रायगड' परिवरांच्या सदस्यांना मोठा आनंद झाला आणि एवढेच नव्हे तर चक्क शिराज्यभिषेक दिनी ही ऐतिहासिक तोफ नजरेस पडताच त्यांचा आनंद द्विगुणित झाला असल्याची माहिती 'बा रायगड' टीम ने दिली आहे .

तसेच अधिक माहिती देतांना सांगितले आहे की रायगडावरील महादेवाचा माळ(मदारमोर्चा) या ठिकाणी एका तीव्र उतारावर ही तोफ कालारुपनुसार गाढली गेली आहे. गडाखालील ही सपाट जागा म्हणजे तोफांचा मोर्चा लावत संरक्षण करण्याची जागा हा या जागेचा सरळ व सोपा उप़योग म्हणता येईल.मोर्चा म्हणजे,थोडक्यात चौकी किंवा काही शिबंदीचा त्या ठिकाणावर असलेला पहारा.किल्ले रायगडालाही ही निसर्गता लाभलेली व संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची ठरलेली माची.या जागेचे निट निरीक्षण केल्यास तुम्हाला तेथे तोफ दिसेल.काही उध्वस्त घरांचे चौथरे दिसतील.तेथे असलेली तोफ ही त्या ठिकाणी आणखी असलेल्या तोफांची साक्ष देते.महादरवाजाखालील हे अत्यंत महत्वाचे व लढाऊ ठिकाण होय.नाणे दरवाजातून निघालेला राजपथ व पाचाडखिंड या तोफांच्या मार्यात होती.चित्त दरवाजा अथवा नाणे दरवाजाला लगट करु पाहणार्या गनिमावर या तोफांचे रसरसित तोफगोळे बरसणार होते.तोफांच्या सहाय्याने गड काबिज करु पाहणारा गनिम रोखता येऊ शकत होता.या अशा माचीवर एकूण चार तोफा होत्या. नागिण, भवानी,धाकटी तोफ व लांडा कसाब.इ.स.१७७३ मध्ये पेशव्यांचा सेनापती आपाजी हरी यांनी विठ्ठल यशवंत पोतनीस यांच्याकडून रायगड घेतला. पेशवे दप्तरातील एका अप्रकाशित कागदानुसार पेशव्यांच्या नूर महंमद या बाणदाराने मदार मोर्चावर बाण टाकले व मदार मोर्चा ताब्यात घेतला व तेथील तोफा हस्तगत केल्या.यांतील एक तोफ सांप्रद मदार मोर्चावर आपण सर्वांनी पाहिलीच असेल असे म्हटले आहे.

मदार मोर्चाच्या एका अतिशय अवघड अशा ठिकाणी परिवाराच्या सदस्यांस पुर्णपणे मातीत गाडली गेलेली एक तोफ निदर्शनात आली.थोडीशी माती बाजूला केल्यावर निकामी केलेली पोर्तुगीज बांधणीची अत्यंत मोठी तोफ समोर आली.

दिनांक ६ जून २०२२ रोजी 'बा रायगड' परिवारास शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त महादरवाजा ते नाणे दरवाजा व चित्त दरवाजा असे गर्दी नियंत्रणाची जबाबदारी दिली होती.५ जून दुपार पासून चे ६ जून सायंकाळी ६ वाजेपर्यंत लाखो शिवप्रेमींनी शिवराजाभिषेक दिनानिमित्त दर्गदुर्गेश्वर रायगडास भेट दिली व हा आनंदाचा सोहळा अनुभवला.मागिल वर्षांतील काही घटनांचा आढावा घेतल्यास झालेले आपघात व शिवप्रेमींची गैरसोय होऊ नये संभाव्य अपघात टाळता यावेत यासाठी बा रायगड परिवार २०१९ पासून या सेवेसाठी कार्यरत आहे.याहि वर्षी साधारण ४०० सदस्य या सेवा मोहिमेत सहभागी झाले होते.दिवसभर पुर्ण सेवा केल्यानंतर या सेवेचे अनपेक्षितपणे फळ मिळाले.बा रायगडाने त्यांच्याच लेकरांस त्यांच्या कार्याप्रती असलेल्या निष्ठेची जणू दिलेली पोच पावतीच होय.

शिवराज्यभिषेकदिनी किल्ले रायगडावर मिळालेली ऐतिहासिक तोफ 'बा रायगड' परिवाराला छत्रपती शिरायांचा आशीर्वाद असून हि कुठलीही शोध मोहिम नव्हती.तरीही अत्यंत सहजपणे हि तोफ परिवाराच्या मुलांच्या निदर्शनास आली आहे.आमचा यात कुठलाही मोठेपणा नाही दुर्गदुर्गेश्वर बा रायगडाने त्याच्याच अंगाखांद्यावर धुलिकण होऊन बागडणाऱ्या त्याच्याच लेकरांस दिलेला आम्ही हा अशिर्वाद समजतो असे 'बा रायगड' परिवाराचे रायगड विभाग प्रमुख मनोज थिटे यांनी ही माहिती दिली.'बा रायगड' परिवाराचे अध्यक्ष वैभव खाटपे यांनी पुरातत्व खाते, रायगड प्राधिकरण यांना संपूर्ण माहिती दिली आहे. सर्वांच्या माध्यमातून तोफेचे जतन संवर्धन येत्या काळात होईल असा विश्वास व्यक्त केला. या आधी २०१६ ला अवचितगडावरील अनेक वर्षे गायब असलेली तोफ आणि २०१७ किल्ले घोसाळगडावरील एक पूर्ण गाळाने बुजलेली अपरिचित गुहा रायगड जिल्ह्यातील विरगळ, सतीशीला, समाध्या मनोज थिटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकाशात आणल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog