Posts

Showing posts from April, 2023
Image
  पत्रकार समीर बामुगडे यांना पितृशोक!   रोहा:(प्रतिनिधी) रोहा तालुक्यातील निवी येथील जेष्ठ आदर्श शेतकरी रामा रामजी बामुगडे यांचे गुरुवारी 27 एप्रिल रोजी अकस्मात निधन झाले मृत्यु समयी ते 89 वर्षाचे होते  प्रेस संपादक व पत्रकार सेवासघाचे माजी कोकण उपाध्यक्ष समीर बामुगडे आणि दिलीप बामुगडे ,विठ्ठल बामुगडे, संतोष बामुगडे यांचे ते वडील  होत,   स्व,रामा बामुगडे यांच्या पश्चात त्यांच्या मुले सुना नातवंडे तसेच भावकी परिवार आहे त्यानी शून्यातून विश्व निर्माण करुन निवी गावात त्याचा एक वेगळा ठसा उमटवला होता,तसेच रामा बामुगडे यानी निवी ग्रामस्थांचा 25 वर्ष खजिनदार पदाची जबाबदारी सभाळली होती त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच निवी  येथील त्यांच्या निवास्थानी मोठा जनसमुदाय लोटला होता त्यांच्या निवास्थानी अंत्यदर्शन घेऊन बामुगडे परिवाराचे सांत्वन केले त्यांच्या अंत्ययात्रेत विविध स्तरातील मान्यवरांसह उपस्थित होते  त्याचे दशक्रियाविधी शनिवार दि 6/5/2023रोजी महादेव मंदिर येथे होणार असून तर उत्तरकार्य रविवारी दि7/5/2023मे रोजी निवी येथील निवासस्थानी होणार आहेत,
Image
  आम्ही गिरगांवकर"आणि ''श्री रविप्रभा मित्र संस्था" रायगड यांनी संयुक्तपणे केली जिल्हा परिषदेच्या शाळांची पाहणी! साई /माणगांव (हरेश मोरे ) "आम्ही गिरगावकर" टीम पुरस्कृत'रंग दे माझी शाळा' हा सामाजिक उपक्रम घेऊन आम्ही गिरगावकर टीम आणि श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड संयुक्तपणे शनिवार, दि.२२ एप्रिल २०२३ रोजी आम्ही गिरगावकर टीमचे अध्यक्ष गौरव सागवेकर, सचिव मिलींद वेदपाठक, महिला सचिव शिल्पा नाईक यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळा इमारती व स्वच्छता गृहांची पाहणी केली. राज्यात अनेक जिल्ह्यातील तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची व स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली पहायला मिळत आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सोयीसुविधांबाबतीत विशेष लक्ष देणे गरजेचे असून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम कसे राहील यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. या महत्त्वाच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 'रंग दे माझी शाळा
Image
  रानवडे येथे श्री वरद विनायक मंदिर वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न  साई /माणगांव (हरेश मोरे) माणगाव तालुक्यातील रानवडे येथे मिती वैशाख शुक्ल पक्ष तृतीया, अक्षय तृतीया शके १९४५, अक्षय तृतीया दिनाच्या निमित्ताने रानवडे ग्राम विकास मंडळ, समस्त ग्रामस्थ आणि महिला मंडळ, श्री गणेश क्रिकेट क्लब, श्री वरद विनायक मंदिर वर्धापन दिन सोहळा सर्वांच्या सहकार्याने शनिवार दि.२२ एप्रिल २०२३ रोजी अक्षय तृतीया दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन उत्साहात संपन्न झाला. सकाळी ५ वाजता काकड आरती, सकाळी ६ वाजता अभिषेक, सकाळी ६:३० वा. महाआरती, सकाळी ७ वा श्रींच्या पालखीची मिरवणूक, दुपारी २वा. महाप्रसाद,४ ते ५:३० वा. प्रवचन, सायं.६ ते ७ हरिपाठ  रात्रौ.७ ते ९ हरि किर्तन, रात्रौ.९ ते १० महाप्रसाद. याप्रमाणे दिवसभरामधे विविध कार्यक्रम घेण्यात आले.     अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्ता पैकी एक पूर्ण मुहुर्त हे अक्षय तृतीयेचे महत्त्व आहे. अक्षय तृतीयेला जे काही आपण दान धर्म करू. ते अक्षय होत असतं. म्हणजेच अविनाशी, या दानाचा कधीही क्षय होत नाही आणि हे पुण्य आपल्याला फलदायी ठरत असतं. हे पुन्हा कधीही नष्ट
Image
  डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे युवासेना उध्दव बाळासाहेब ठा करे पक्षाच्या युनिटची स्थापना साई /माणगांव (हरेश मोरे ) रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे युवासेनेचे कॉलेज युनिटचे उदघाटन गुरुवार दि.20 एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले.यावेळी विद्यापीठातील युनिट कक्ष अध्यक्ष प्रतिक साळुंके,उपाध्यक्ष देवांग उत्तेकर,सचिव सुधीर सोनावणे,उपसचिव अंकित भोईर,चिटणीस रणजीत बावणे, सरसिटणीस कुणाल तवले यांची निवड व फलकाचे अनावरण तसेच विद्यार्थ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर वसतिगृह, ऍडमिशन व ईतर विषयांवर विद्यापीठ प्रशासनाला शिवसेना स्टाईलने धारेवर धरत निवेदन ही देण्यात आले.महाड विधानसभा समन्वयक रोहित पारधे यांच्या अथक प्रयत्नाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास संजय कदम द.रायगड जिल्हा संपर्कप्रमुख,अनिल नवगणे, द.रायगड जिल्हा प्रमुख,सुधीर ढाणे, युवासेना महाराष्ट्र विस्तारक,चेतन पोटफोडे युवासेना द.रायगड जिल्हाधिकारी, रोहित पारधे महाड विधानसभा समन्वयक,यतीन धुमाळ. युवासेना रायगड जिल्हा चिटणीस,राकेश मोरे, युवासेन
Image
  कोणत्याही पुढाऱ्यांनी येऊन दहशत दाखविण्याचे दिवस संपले त्यामुळे भविष्य काळात कोलाड परिसरातील लोकांनी कडी लावून बसण्याची आवश्यकता नाही:-माजी आ.धैर्यशील पाटील,   शेकडो पुई ग्रामस्थांनी केला भाजप मध्ये प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का!   कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण)    गेले ते दिवस ! एक काळ असा होता कि प्रत्येक गावात एक खोत किंवा पाटील असायचा तो कुणाला बोलुन देत नव्हता परंतु आता कोण कुणाचे ऐकत नाही.समाजात जे परिवर्तन घडत आहे. ते महाराष्ट्राच्या व भारताच्या राजकारणात घडत आहे.कोणत्याही राजकीय पुढऱ्याने यावे व कोणाला तरी दशहत दाखवावी ते दिवस संपले पुई कराना भीती बाळगण्याचे कारण भविष्य  काळात कोलाड परिसरातील लोकांनी कडी लावून बसण्याची अवशक्यता नाही.मी एवढ्याचसाठी सांगू शकतो राजकारणातील मोठया घराण्याच्या नंतरच्या पिढीने जनतेची नाळ तशीच ठेवली तर ते पुढे जातील नाहीतर मीच बोलेलं ते असे बोलायची वेळ आली तर प्रत्येक गावात पुई गावासारखी वेळ आल्याशिवाय राहणार नाही असे मत पुई गावातील शेकडो ग्रामस्थांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर मार्गदर्शन करतांना माजी आ. धैर्यशील पाटील यांनी व्य
Image
  तळा तालुका तहसीलदार पदी श्रीमती स्वाती पाटील तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्याचे तहसीलदार ए. एम. कनशेट्टी यांची बदली झाल्याने नव्याने रुजू झालेल्या  तहसीलदार श्रीमती स्वाती पाटील यांनी आपला पदभार स्विकारला आहे.     तहसीलदार झोपडपट्टी व पुनर्वसन प्राधिकरण पिंपरी चिंचवड क्षेत्र व पुणे तहसीलदार पदी  असलेल्या श्रीमती स्वाती पाटील यांची तळा तहसीलदार पदी शासनाने नियुक्ती केली आहे. त्यांनी वार सोमवार १७ एप्रिल रोजी आपल्या  पदाचा कार्यभार घेऊन कामकाजाला सुरवात केली आहे.        प्रशासनाचा उत्तम अभ्यास असलेल्या स्वच्छ प्रतिमेच्या व स्मितहास्य असलेल्या तहसीलदार तळा सारख्या  दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या तालुक्यात जनतेची सेवा, प्रशासनावर वचक ठेऊन शिस्तबद्ध पद्धतीने  कामकाज करतील अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.   तळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तळा तहसीलदार श्रीमती स्वाती पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना अध्यक्ष कृष्णा भोसले,व कार्याध्यक्ष सौ संध्या पिंगळे, सरचिटणीस श्रीकांत नांदगावकर, छायाचित्रात दिसत आहेत.
Image
  माणगावचे पत्रकार महेश शेलार यांना पितृशोक! साई / माणगाव ( हरेश मोरे)   माणगांव तालुक्यातील खर्डी खुर्द गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेले पत्रकार श्री.महेश केशव शेलार यांचे वडील कै.केशव गोविंद शेलार यांचे निधन सोमवार दि.१७ एप्रिल 2023 रोजी सकाळी सुमारे ०१:४५ वा. हृदयविकाराच्या तीव्र झ्टक्याने तसेच अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले. कै.केशव गोविंद शेलार हे तालुक्यातील खर्डी खुर्द येथील रहिवाशी. मृत्यू समयी ते 68 वर्षाचे होते. ते सामाजिक व धार्मिक कार्यात  नेहमी अग्रेसर असायचे त्यांची नेहमीच कोणत्या ना कामासाठी सतत धावपळ असायची. संपूर्ण आयुष्य त्यांनी गावदेवी मातेची पूजा-अर्चा करण्यात घालविले. तसेच कष्ट, मेहनत करून घर कुटुंब चालविला. तसेच सांस्कृतिक नाच मंडळामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. लहान मोठ्या सोबत मिळून मिसळून  राहणारे, आज पर्यंत कधीही कोणाला वेडेवाकडे बोलले नाहीत. तसेच आदिवासी व धनगर समाजाबद्दल त्यांची वेगळीच माया होती.           तसेच खर्डी खुर्द कुणबी समाज गाव कमिटीचे अध्यक्ष पदही भूषविले होते. ते गवंडीचा काम करत असताना आदिवासी समाजातील लोकांची घरे बांधले परंतु त्यांनी त्
Image
  घोसाळगड उर्फ विरगड किल्ल्यावर शिव छत्रपतींच्या जयघोषात शिवऊर्जा मित्र मंडळाची गडसंवर्धन स्वच्छता मोहीम!   रोहा (राजेश हजारे) रोहा येथील शिवऊर्जा मित्र   मंडळाच्या सभासदांनी  गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहिमेंतर्गत विरगड किल्ल्यावर नुकतीच स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमाबद्दल सहभागी सर्व शिवप्रेमींचे अभिनंदन केले जात आहे.दुर्गसंवर्धन आणि स्वच्छता मोहीम याअंतर्गत शिवऊर्जा मित्र मंडळाच्या सभासदांनी महा दरवाजा परिसराच्या पुर्वेकडील खालील भागात  बुरुजाचे निखळलेले चिरे हे मातीतुन बाहेर काढण्यासाठी मुलांनी अथक श्रमदान केले तसेच अनेक ठिकाणी तटबंदीत आलेले तण आणि झुडुपे काढून तटबंदी मोकळी करण्यात आली.  तर, महादरवाजा जवळील परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच शाळेच्या उन्हाळी सुट्टीत शिवऊर्जा मित्र मंडळातील छोट्या  बाल-गोपाळांनी गडावरील बाटल्या, प्लास्टिक बॉटल, रॅपरचा कचरा जमा करून गडाखाली आणण्यात आला.दुर्गसंवर्धन आणि स्वच्छता मोहिमेंतर्गत शिवऊर्जा मित्र मंडळाकडून  अनेक महीने सातत्याने हा उपक्रम विरगड किल्ल्यावर राबवत आहे. या मोहिमेत अनेक शिवप्रेमींनी सहभाग घेतला.  सदर मोहिमेंतर्गत किल्ल्यावर लोकसहभागात
Image
  सोनसडे ग्रामपंचायतीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी!   तळा (कृष्णा भोसले)  तळा सोनसडे तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सोनसडे येथे १४ एप्रिल 2023 रोजी सकाळी ९:३० वाजता सरपंच माधुरी पारावे यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला  पुष्प मालिका  अर्पण करून जयंतीला सुरवात झाली. यावेळी माजी सरपंच तथा सदस्य परशुराम वरंडे, सोनसडे अध्यक्ष देवजी गावडे, वावेहवेली अध्यक्ष महादेव  पारावे, जेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग माळी, बौद्ध पंचायत समिती तालुका अध्यक्ष अनंत मोरे, समता सैनिक प्रशांत माळी, चांगुल  माळी, महीला बंधू भगिनी, ग्रामस्थ, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.           यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर अनंत मोरे, ग्रामपंचायत सदस्य परशुराम वरंडे, ग्रामसेवक उमाजी माडेकर, जेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग माळी, देवजी गावडे, सरपंच  माधुरी पारावे, पत्रकार कृष्णा भोसले आदीनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे केली.  डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात कार्यक्रमाची  सांगता झाली.
Image
  संघर्ष आपापसात न करता समाजात चाललेल्या चुकीच्या गोष्टीसाठी करा:-आ.अनिकेत तटकरे     कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती असून आजचा दिवस आनंदाचा आहे.कारण त्यांच्यामुळे  आपण मोकळेपणाने श्वास घेऊ शकतो. मुक्त पणाने संचार करू शकतो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बोलायचे झाल्यास एक दिवस ही कमी पडेल इतके त्यांचे महान कार्य आहे. कारण त्यांनी घटनेपासून, संविधान, व मतदानाचा अधिकार मिळवून दिला.महाडचा सत्याग्रह केला.तर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या त्याच्या विचारावर आजची पिढी संघटित होत आहे.परंतु संघर्ष करायचा असेल तर आपापसात न करता समाजात चालत असलेल्या चुकीच्या गोष्टीसाठी संघर्ष करा असे मत आ. अनिकेत तटकरे यांनी भीमज्योत नगर गोवे येथील बुद्धविहाराचे उद्धघाटन प्रसंगी व्यक्त केले.   तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून  समाज घटकाला १५% निधी अभिप्रत असतो.तो योग्य पद्धतीने देऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला असून यामुळे हा लोकार्पण सोहळा पार पडत आहे.तसेच ज्यांनी बुद्धविहारासाठी जागा ते मधुकर गायकवाड यांचे ही विशेष अभिनंदन कारण आज कोणीही ह
Image
  गोवे येथे श्री.हनुमान जयंती उत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रम     कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण )  रोहा तालुक्यातील निसर्ग रम्य परिसरातील गोवे येथे श्री. हनुमान जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून बुधवार दि.५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. श्री. सत्यनारायणाची महापूजा,सायं.६ ते ७ वा. किल्ला व कोलाड विभाग वारकरी संप्रदाय यांचा हरिपाठ,रात्री ९ ते ११ वा.श्रीमत भागवतगीता ज्ञानेश्वरी कंठ भुषण ह.भ.प.अशोक महाराज जाधव (खोपोली )रात्री ग्रामस्थ मंडळ गोवे यांचा हरि जागरण होईल.   गुरुवार दि.६ एप्रिल २०२३ रोजी सायं.४ वा.श्री.हनुमान पालखी सोहळा व भव्य मिरवणूक आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून सर्व कार्यक्रम यशश्विकरण्यासाठी गावाकमेटी अध्यक्ष नामदेव जाधव, सचिव श्रीधर गुजर,खजिनदार कमलाकर शिर्के,उप सचिव प्रविण पवार,सहखजिनदार सुरेश जाधव,सदस्य राजेंद्र जाधव,बळीराम जाधव, शंकर दहिंबेकर,शांताराम घरट, नथुराम मांजरे, व समस्त ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व तरुण वर्ग मेहनत घेत आहेत.
Image
  श्री.रा.ग. पोटफोडे (मास्तर)खांब या विद्यालयातील सन १९९८-९९ च्या एस.एस.सी. माजी विद्यार्थ्यांकडून माजी शिक्षकांचा सत्कार व सिलिंग फॅनचे वाटप   कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) रोहा तालुक्यातील नवजिवन प्रसारक मंडळ खांब संचालित श्री.रा.ग पोटफोडे (मास्तर )विद्यालय व कै.द.ग.तटकरे कनिष्ठ महाविद्यालय खांब या विद्यालयातील सन १९९८-९९ मधील माजी विद्यार्थ्यांकडून माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याबरोबर या विद्यालयास १२ सिलिंग फॅन भेट म्हणून देण्यात आले.         शनिवार दि.१ एप्रिल २०२३ रोजी ज्या विद्यालयात आपण शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली  शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात नोकरी व विविध व्यवसाय करू शकलो.त्या विद्यालयातील शिक्षकांची सामाजिक बांधिलकी राखत सन १९९८-९९ च्या एस.एस.सी मधील माजी विद्यार्थी यांनी माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच नवजीवन प्रसारक मंडळ खांब या विद्यालयास भेट वस्तू म्हणून १२ सिलिंग फॅन वाटप करण्यात आले.तसेच गेल्या वर्षी याच विद्यार्थ्यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीत शिक्षकांसाठी लॉकर दिले होते.                                    यावेळी माजी विद्यार्थी अलं
Image
    दहावी,बारावी नंतर काय..?   करिअर व उच्च शिक्षण मार्गदर्शन शिबिरामध्ये सहभागी होण्याचे उद्योजक रोहितदादा पारधे यांचे आवाहन! साई /माणगांव (हरेश मोरे) कोकणातील विद्यार्थी हे उत्तम प्रकारे शिक्षण क्षेत्रात नेहमी अग्रेसर असतात. परंतु शिक्षण घेतल्या नंतर कोणत्या रोजगार व नोकरी कडे लक्ष द्यायचे या विचारात असतात. यासाठी युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाड विधानसभा समन्वयक रोहितदादा पारधे यांनी करिअर व उच्च शिक्षण मार्गदर्शन शिबीर  कुणबी भवन माणगांव येथे रविवार दि.9 एप्रिल रोजी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत आयोजित केले आहे. इयत्ता दहावी व बारावी नंतरच्या पारंपारिक अभ्यासक्रमाबरोबर अनेक नवीन अभ्यासक्रम सुरु झालेले आहेत. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या विविध प्रकारच्या नवीन अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थी आणि पालकांना पुरेशी नसते. त्यामुळे या अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थी पालकांचा गोंधळ होत असतो. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांची क्षमता असूनही त्यांना चांगल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून करीअर करण्याची संधी मिळू शकत नाही.विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता यावा या उद्देशाने रोहितदादा पारधे यांनी शिबी