
भारतीय संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करा :-हिंदु जनजागृती समितीचे आवाहन गोवे-कोलाड (विश्वास निकम ) हिंदू बांधवांनी भारतीय संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली, म्हणून हा केवळ हिंदू धर्मियांचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा आरंभ दिन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतावर ब्रिटिशांची सत्ता असताना ‘१ जानेवारी हाच नववर्षारंभ दिवस आहे’, असा अपसमज निर्माण केल्याने स्वतंत्र भारतातही बहुतांश लोक १जानेवारीला ख्रिस्ती नववर्ष साजरे करत पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहेत. शास्त्र समजून घेऊन भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करणे हे नैसर्गिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक या सर्वच दृष्टीने श्रेयस्कर आणि लाभकारक आहे. यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरातील विविध राज्यांत सोशल मिडिया, फलक प्रसिद्धी, व्याख्याने आदी माध्यमांतून लोकांमध्ये जनजागृती करण...