सावरवाडी येथील कुमार सिद्धेश शिर्के याचा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मान!

सुतारवाडी :- (हरिश्चंद्र महाडिक)महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग रायगड महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग रायगड यांच्या वतीने जागतिक ऑलिम्पिक दिना निमित्त रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ठ खेळाडूंचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी कु.सिद्धेश दिपक शिर्के या दिव्यांग खेळाडूला क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री.अशोकजी दुधे साहेब यांच्या शुभहस्ते विशेष असे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले या प्रसंगी पोलिस मुख्यालयाच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अतुलजी झेंडे साहेब, रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रवींद्र नाईक साहेब व श्री.सचीन निकम साहेब, तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती अंकिता मयेकर मॅडम, महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री.सूर्यकांत ठाकूर सर, राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त श्रीमती तपस्वी गोंधळी मॅडम, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक श्री.निशांत राऊतेला सर, महाराष्ट्र शासनाचा एकलव्य पुरस्कार प्राप्त ( दिव्यांग खेळाडू ) श्री.संदीप गुरव सर, दिव्यांग पॉवर लिफ्टर श्री.विनोद देवकर सर, कुस्ती क्रीडा मार्गदर्शक श्री.मोकल सर, श्रीमती.मनीषा मानकर, श्री. सिद्धार्थ खंडाळे व इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog