Posts

Showing posts from June, 2023
Image
  घोसाळगडाच्या पायथ्यालगत मातीत लोप पावलेली चतुर्भुज विरगळाचे शिवऊर्जा मित्र मंडळाने केले पुनर्वसन!   इतिहासाला उजाळा देण्याचे शिवऊर्जा मित्र मंडळाचे कौतुकास्पद कार्य!   रोहा (राजेश हजारे) आपला इतिहास हा वास्तूचे रूपात जिवंत असतो तो कायम टिकवा त्याकरीता पुरातत्त्व विभाग काम करत आहे पण आपल्या  दैदीप्यमान इतिहास आहे तो जिवंत राहावा पुढच्या पिढीला याची माहिती व्हावी  म्हणून माझी भारतीय नागरिक म्हणून माझे काहीतरी कर्तव्य आहे जबाबदारी आहे आणि याच भावनेतून इतिहास जिवंत राहावा कायम टिकावा यासाठी शिव ऊर्जा मित्र मंडळ  गेली अनेक वर्ष झटत आहे.  नुकतेच घोसाळगडाच्या पायथ्यालगत मातीत लोक पावलेली चतुर्भुज  विरगळाची शिव ऊर्जा मित्र मंडळांनी पुनर्वसन केले असून या कामगिरीने संबंध रायगड जिल्ह्यातून शिव ऊर्जा मित्र मंडळावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.    याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वराज्याचा साक्षीदार असलेला घोसाळगड ऊर्फ विरगडाच्या पायथ्यालगत गावाबाहेर शिवमंदिर आहे  या शिवमंदिरा जवळच दोन पुरातन विहीरी व तलाव आहे त्याची पहाणी करीत असताना चौकोनी पुरातन विहीरीच्या बाजुस मातीमध्ये लुप्त झालेली विरगळ ही शिवऊर
Image
  पुण्यातील शिवराय आर्ट ला शिवप्रेमींची पाठीवर कौतुकाची थाप! स्वराज्याचा विठ्ठलाने त्या पायरीवर पाय ठेवावा, अन् चरणधुळीने माझ्या नावावर सदैव अभिषेक व्हावा एवढीच इच्छा! रायगड (राजेश हजारे, भिवा पवार ) ध्येय ऊराशी ठेवुन महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करणारे स्वराज्याचे रायगड बांधकाम प्रमुख हिरोजी इंदलकर यांच्याविषयी प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात आदर असतो. इतिहास हा बहुतेकांचा एक उत्सुकता असणारा विषय असतो तसा तो माझाही आहे. स्वराज्याच्या संबधीत बोलका इतिहास शिलालेखातुन आपल्या पर्यंत पोहचत असतो. असाच एक इतिहासातील भाग म्हणजे दुर्ग दुर्गेश्वर रायगड वरील केलेले बांधकाम जोवर चंद्र सुर्य नांदतील तोवर ह्या गडाचे बांधकाम अबाधित राहील असे ठामपणे सांगणारे स्वराज्यातील दुर्ग बांधकाम सिव्हिल इंजिनियर श्री हिरोजी इंदलकर यांची स्वराज्यापायी असणारी निष्ठा ही गडावरील पायरीच्या शिलालेखातुन समजते. "तो नुसता पायरीचा दगड नसुन स्वराज्याप्रती असणाऱ्या निष्ठेचा, स्वाभिमानाचा पायरीचा  दगड आहे" तो घराघरात पोहचला पाहीजे असे मनात विचार करुन शिवसमाधीला नतमस्तक होवुन शिवरायांचे आशिर्वाद घेतले आणी पुण्यातील शि
Image
  शिवऊर्जा मित्र मंडळाची प्लॅस्टिक मुक्त घोसाळगड स्वच्छता मोहीम! उपक्रमाचे सर्वत्र कौतुक!   रोहा: (राजेश हजारे) मे महिन्यातील सुट्ट्यांमध्ये घोसाळगडाला असंख्य पर्यटकांची भटकंती सुरु असुन गडावर जाणाऱ्यांची संख्या शेकड्यात आहे. पण, आजचा रविवार घोसाळगड साठी हटके ठरला. प्लास्टिक कचऱ्याने वेढलेल्या घोसाळगडावरील खिंड दरवाजा तसेच घोड्याची पागा ह्या परीसराने रविवारी मोकळा श्वास घेतला.  सकाळ पासूनच मंडळाच्या सदस्यांनी तिन तासात सुमारे पाच बॅगा प्लॅस्टिकच्या बाटल्या तसेच बियरचे टिन हे एकत्र संकलीत केले. घोसाळगडाच्या खिंड दरवाजाच्या पायथ्याला सकाळी सात वाजता उपक्रमाला सुरुवात झाली. खिंड दरवाजा व घोड्याचा पागा अशा दोन भागात ही मोहीम राबविण्यात आली. पायवाटेवर, झुडुपांमध्ये कुठेही फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकिटे या वेळी उचलण्यात आली. पायथ्याला पाच पोती भरून प्लास्टिक जमा झाले. मंडळातील सदस्यांनी व लहान मुलांनी गडाच्या कानाकोपऱ्यात जाऊन कचरा गोळा केला. हा गड शिलाहार काळापासून वैभवाच्या खुणा जपत आहे कातळात कोरलेल्या सरळ पायऱ्या व गनिमांना चकवा देणारा खिंड दरवाजा ह्या किल्य