Posts

Showing posts from March, 2024
Image
जीवन व्यवहारातील प्रत्येक कृती ही राष्ट्र मंदिर निर्माण करण्यासाठी अर्पित करू या!:-मा.विठ्ठलराव कांबळे ( कल्याण (विशेष प्रतिनिधी) जीवनातील प्रत्येक कृती ही राष्ट्र मंदिर निर्माण करण्यासाठी अर्पित करूया!असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत कार्यवाहक मा.श्री  विठ्ठलराव कांबळे यांनी व्यक्त केले छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित  कै. रामभाऊ म्हाळगी स्मृतिदिन निमित्ताने नूतन ज्ञान मंदिर कर्णिक रोड कल्याण शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात  प्रमुख वक्ते श्री.विठ्ठलराव कांबळे यांनी राममंदिर ते राष्ट्रमंदिर  या विषयावर आपले विचार व्यक्त केले ते पुढे असे म्हणाले की साडेपाचशे वर्षांपासूनच्या हिंदुंच्या संघर्षाला आज यावर्षी यश आले. आयोध्येतील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना  आपल्या सर्वांच्या साक्षीने झाली. याचा *याचि देही याची डोळा* हा सोहळा मला पाहता आला या करिता मी खूप भाग्यवान आहे असे समजतो. मी व माझे कुटुंब कृतार्थ झालो. श्रीराम सर्वांचे आहेत. राम केवळ मुर्ती नाही तर राम ही आपली प्रेरणा ,चैतन्य आहे.   1992 ला मज सहीत इथे उपस्थित असलेले अनेक कारसेवक आहेत की ज्यांच्या करसेवेने बाब