
कुंडलिका व महिसदरा नदीनी धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा, भातशेती पाण्याखाली! कोलाड (विश्वास निकम) सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवार दि. १९ जुन रोजी सकाळी ९ वाजल्या पासुन कुंडलिका व महिसदरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असुन प्रशासना तर्फे नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा इशारा देण्यात आला आहे. तसेच दोन दिवस सतत पडत असलेल्या तुफान पावसामुळे महिसदरा नदीचे पाणी गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आल्यामुळे गोवे गावाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला असुन सर्व भातशेती ही पाण्याखाली गेली आहे तसेच आंबेवाडी बाजारपेठेत पाणीच पाणी साचून यातून मार्ग काढतांना नागरिकांची तारंबल उडाली. तुफान पडलेल्या पावसामुळे कुंडलिका, महिसदरा, तसेच गोदी नदिनी धोक्याची पातळी ओलांडली असुन पुराचे पाणी गोवे येथील आदिवासीवाडी,बौद्धवाडी,तसेच रस्त्यावर असणाऱ्या दुकानात तसेच गावातील काही घरात पुराचे पाणी शिरूर मोठे नुकसान झाले आहे.तसेच आंबेवाडी येथील बाजारपेठेतील दुकानात पाणी शिरूर दुकानदारांचे ही मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही दिवसापूर्वी भात पेरणी केलेल्य...