रोहा वनविभागाची धडक कामगिरी अवैद्यरित्या लाकडी कोळसा वाहतूक करणारा पिकअप टेम्पो केला जप्त,

कोलाड (श्याम लोखंडे ) अवैध वृक्षतोड करून तयार केलेल्या लाकडी कोळशाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती रोहा वनविभागाला मिळताच विभागाने तातडीने घटना स्थळावर जाऊन लाखो रुपये किंमतीचा लाकडी कोळशासह पिकअप टेम्पो गाडी जप्त करून या बाबतचा गुन्हा नोंदविला आहे.

        याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उपवनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल रोहा मनोज वाघमारे व स्टाफ प्रमोद पवार वनपाल मेढा,निलेश वाघमारे वनपाल गोफण, तेजस नरे वनरक्षक शेणवई,ज्योती मिरगणे वनरक्षक निडी,योगेश देशमुख वनरक्षक मेढा, जयवंत वाघमारे वनरक्षक यशवंतखार,वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम,पोपट करांडे, वनरक्षक रोहा विकास राजपूत,वनरक्षक ताम्हणशेत वैभव बत्तीसे,लेखापाल प्रदीप इनामदार यांनी दिनांक 25 जून 2022 रोजी रात्री 09.00 वाजता मिळालेल्या गुप्त माहितीवरून वरून रोहा तालुक्यातील मौजे अष्टमी येथील एच पी पेट्रोल पंपासमोर बोलेरो पीकअप क्रमांक MH/06/AG/5975 ची तपासणी केली असता अवैध वृक्षतोड करून तयार केलेले कोळसा पोती 13 वजन 260 किलो,किंमत 4420/- रुपये व जप्त वाहन क्रमांक MH/06/AG/5975 अंदाजे किंमत 3,00,000/- रुपये विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला आहे. 

सदर वाहनावर रोहा वनविभागाच्या वतीने भारतीय वनअधिनियम 1927 अंतर्गत वन गुन्हा दाखल करून वाहन व कोळसा पोती असा एकूण एकंदर 3,04,420/- रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हे प्रकरणी वाहन चालक अन्सार शेख रा.नागोठणे तालुका.रोहा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून उपवनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog