सुतारवाडी हायस्कूलचे विद्यार्थी १२ वर्षांनी एकत्र
सुतारवाडी :- ( हरिश्चंद्र महाडिक ) सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडीच्या सन २००९-२०१० च्या बॅचचे विद्यार्थी १२ वर्षानंतर एकत्र जमले आणि त्यांनी जुन्या आठवणींना उजाला दिला. मोबाईल व्हाट्सअप द्वारे ग्रुप करून नियोजन केल्यानंतर सर्वांनी एकत्र येण्याचे ठरविले. त्याप्रमाणे प्रथम सर्वजण द. ग. तटकरे विद्यालयाच्या इमारती समोर एकत्र आले. (त्या वेळी इमारत बांधलेली नव्हती) आपल्या शाळेची भव्य इमारत सभोवताली संरक्षक कठडे आणि ज्या मैदानात अनेक खेळ खेळून इयत्ता पाचवीतुन दहावीत गेलो त्या मैदानाकडे पाहुन सर्वांना जुन्या आठवणी आणि आपले शिक्षक आठविले.
जुन्या इमारतीसमोर फोटो काढल्यानंतर धगडवाडी येथील निसर्गरम्य असलेल्या फार्ममध्ये जाऊन प्रथम सर्वांच्या उपस्थितीत केक कापला आणि विविध खेळ खेळून जुन्या आठवणींना उजाळा देत.
आणि गेट टुगेदर चा आनंद द्विगुणीत केला. मिथुन रेवाळे, स्वप्निल घाडगे, अक्षय कोरपे, प्रसाद गायकवाड, जागृती चंदने, श्वेता शिंदे, प्रिया पवार, मिनाक्षी तवटे, उर्मिला शेपोडे, कल्पेश शिर्के, स्वप्नील शिर्के, सागर पालांडे, नयना कोदे, संपदा कोदे, सुरज सानप, कृष्णा येरम , संकेत खेडेकर, वैभव सालसकर, सागर खैर, अक्षय चव्हाण, नितेश मुंबरे, भावेश सावंत, शिल्पा तवटे, काजल पवार, वर्षा लकेश्री, सुशांत सावंत आदिनी सहभाग घेवून आपला आनंद द्विगुणीत केला. विविध खेळ खेळण्यासाठी वैभव भोईर आणि मनोज भोईर यांनी विशेष सहकार्य केले.
गेट टुगेदर साठी जमलेल्या मित्र-मैत्रिणींमध्ये काही जण विविध कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. तर काही जणी उत्तम गृहिणी आहेत. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी काहीतरी करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वजण विविध ठिकाणी असले तरी एकत्र येऊन एकमेकांना भेटुन पुन्हा एकदा भेटू असे सांगून निरोप घेतला.
Comments
Post a Comment