रोहा खरबाची आदिवासी वाडी ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळाले, वृत्तपत्रासह तहसीलदारांचे मानले ग्रामस्थांनी आभार,

 जे लबाड पुढाऱ्यांनांही जमले नाही ते पत्रकारांनी केले आदिवासी बांधवांनी केले पत्रकारांचे खास अभिनंदन!



कोलाड (श्याम लोखंडे ) जेव्हा बंदुकीतील गोळ्या संपतात, तलवारीची धार काहीच काम करत नाही, तेव्हा लेखणीच कामाला येते. याची प्रचिती रोहा तालुक्यातील खरबाचीवाडी येथील आदिवासी बांधवांच्या बाबतीत पाणीटंचाईच्या संदर्भात आली. आदिवासी बांधवांना वर्षानुवर्षे पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. पाण्याबाबत पुढार्‍यांच्या दाराचा उंबरठा झीजवताना हे सर्व आदिवासी बांधव मेताकुट्टीला आले. परंतु गेंड्याची कातडी असलेल्या पुढाऱ्यांना  ना जनाची, ना मनाची, यांच्या हृदयाला पाझर फुटलेच नाही. अखेर या ग्रामस्थांनी पत्रकारांशी संपर्क साधला माहिती मिळताच सदर  ठिकाणी पत्रकार श्याम लोखंडे,पत्रकार विश्वास निकम, व न्यूज आज तक मराठीचे संपादक भिवा पवार यांनी खरबाचीवाडी येथे भेट देऊन सदर पाणीटंचाई बाबत न्यूज आज तक मराठीने सर्व प्रथम बातमी प्रसिद्ध केली. तसेच पत्रकारांनी सुद्धा वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध केल्या. याची दखल संबंधित विभागाने घेऊन सदर खरबाचीवाडी आदिवासी बांधवांना बोअर द्वारे  सुरळीत पाणीपुरवठा केला. सदर आदिवासी बांधवांनी संबंधित पत्रकारांची अभिनंदन केले असून तुम्ही आमच्या मुलाबाळांसाठी धावून आलेले देवदूतच आहेत अशा शब्दात आभार मानले.


 याबाबत सविस्तर वृत्त अशी की रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे आतोने ग्राम पंचायत हद्दीतील खरबाची आदिवासी वाडी ,वडाची वाडी,धनगर माळ, मोठी वाडी,आशा या आदिवासी वाड्यांवरील नागरिकांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत एवढेच नव्हे तर तळ गाठलेल्या विहिरीतील चिखळयुक्त पाणी येथील नागरिकांना ना इलाजाने प्राशन करावे लागत होते त्यामुळे त्यांना तीव्र पाणी टँचाई ला सामोरे जावे लागत होते त्यातच स्थानिक ग्राम पंचायत यंत्रणा व पुढारी यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले अखेर ग्रामस्थांनी आमच्या स्थानिक प्रतिनिधिशी संपर्क साधला आणि याबाबतची सर्व हकीगत होत असलेल्या अन्यायाची व पाणी टंचाईची माहिती दिली.

 तसेच याबाबत न्यू आज तक मराठीने सर्व प्रथम बातमी प्रसिद्ध केली होती  बरोबर लगेचच सर्व ग्रामस्थ महिलांनी ताबतोब रोहा तहसीलदार व रोहा पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन देत आम्हा ग्रामस्थांना ताबतोब पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावे याबाबतचे निवेदन दिले.मात्र पाणी टंचाईचे व चिखलीयुक्त पिण्याच्या पाण्याचे प्राशन येथील ग्रामस्थांना करावे लागत होते याचे वृत्त आजतक मराठी न्यूजमध्ये प्रसिद्ध होताच याची दखल संबधित अधिकारी वर्गाने घेत सदरच्या ग्रामस्थांना येथील बोरवेल ची तातकाल दुरुस्ती करत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संबधित तहसीलदार व गट विकास अधिकारी वर्ग यांनी करून दिल्याने येथील ग्रामस्थ व महिलांनी आमचे स्थानिक वृत्त प्रतिनिधी व वृत्त पेपरचे त्याच बरोबर रोहा तहसीलदार व गट विकास अधिकारी प्रशासन यांचे आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog