रोहा मेहेंदळे हायस्कूल "दहावीचा वर्ग" माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्सहात संपन्न

स्नेहसंमेलनात सामाजिक बांधिलकी म्हणून आपत्ती काळात सर्वाना सहकार्य करण्याचा निर्णय!

रोहा (राजेश हजारें )"दहाविचा वर्ग" या समूहातील मेहेंदळे हायस्कूल माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळा 19 जून रोजी समूहातील मित्र नितीन पिंपळे याच्या यशकांचन फार्महाऊस येथे आनंदी, उत्साही वातावरणात संपन्न झाला.

      सदरील कार्यक्रमात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते समूहातील कोरोना काळात मृत्यू पावलेल्याना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाड येथें निसर्ग आपत्तीच्यावेळी  समूहाने सामाजिक बांधिलकी राखत केलेले उत्स्फूर्त कार्य त्याप्रती निभावलेलं कर्तव्य, आणि ज्या, ज्यावेळी असे प्रसंग समूहातील मित्र मैत्रिणीवर, समाजावर येतील त्यावेळी आपण सारे एकत्र येऊन अशीच मदत करत राहू असा विचार मांडण्यात आला. त्या नंतर आपापली ओळख करून देत असताना सरून गेलेल्या जीवनामद्ये घडून गेलेले सुख, दुःखाचे अनुभव या माजी विद्यार्थांनी कथन करून कधी हसवले कधी भावानिक केले. त्या नंतर गाणी, भेंड्या, खेळ, भोजन समूहातील मित्र नितीन पिंपळे याने आठ्ठावीस एकरमध्ये मेहनीतीने उभा केलेल्या फार्म हाऊसची सैर  करून लावलेल्या विविध झाडांची माहिती दिली.

 त्यानंतर थोड्या विश्रांतीनंतर चहा, कांदे भजीचा आस्वाद घेऊन उन्हे उतरू लागली तसे, तसे एकमेकांचा भावुक होऊन पुन्हा भेटूया चा कान मंत्र देत गेट टुगेदरच्या आठवणी सोबत घेऊन आपल्या चेहऱ्यावर आनंद घेऊन मित्र मैत्रणी घरी परतत होते.

सदरील गेटटुगेदर यशस्वी करण्यासाठी ऍडमिन डॉक्टर विनोद किणीकर, जयसिंग बुरुणकर, राम कडव, राजेश साळुंके,सुदु शिलदन कर,वसुधा पालवणकर,  नितीन पिंपळे, मनोज बोराणा,रोहिदास पाशिलकर,नरेश सकपाळ सुवर्णा प्रभू, डॉ मेघना गुजर,अभया पाटिल,वैशाली, अनिता कडू, रणदिवे, आसावरी, दिलीप शेट्टी, समिर दर्जी, डॉ. नदीम नाडकर, योगेश कांबळे, जितेंद्र गायकवाड, संजू गोसावी, प्रशांत पेणकर, योगेश मोहरे, प्रशांत देशमुख, अमर पोरे, शरद नारखेडे, दिनेश कांबळे आदी मित्र मैत्रिणी या स्नेह संमेलनात उपस्थित होते काही कारणास्तव येऊ न शकलेल्या मित्र मैत्रिणींनी शुभेच्छा देऊन संमेलनाचा आनंद द्विगुणित केला.आदी सर्वच मित्रानी हे गेट टुगेदर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

     

Comments

Popular posts from this blog