अहिल्या कन्येची गरुड झेप कुमारी दर्शना राजू आखाडे पेण तालुक्यात अव्वल!

 पेण (महेश झोरे )पेण तालुक्यातील मीरा डोंगर भागातील देऊळवाडी या गावात धनगर वाडी वस्तीत जन्मलेली कुमारी दर्शना राजू आखाडे ही वस्ती शाळेत व वेताळ पट्टी देऊळवाडी या शाळेत शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या कुमारी दर्शना राजू आखाडे या विद्यार्थिनीने एस.एस.सी. २०२२ मध्ये ९२.४०% गुण मिळवून शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेची कामगीरी केली. पेण तालुक्यात असणारे शाळा सार्वजनिक विद्यामंदिर व जूनियर कॉलेज यामध्ये प्रथम क्रमांकाने येऊन तालुक्यात बाजी मारली. अत्यंत डोंगराळ भागात असणाऱ्या पेण तालुक्यातील महाल मिर्‍या डोंगर भागातील देऊळवाडी या गावात धनगर वस्ती जन्मलेली कुमारी . दर्शना राजु आखाडे प्राथमिक शिक्षण रा. जि. प. शाळा तरणखोप व माध्यमिक शिक्षण सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज पेण या विद्यालयात झाले. महाल मीरा डोंगर देऊळवाडी हा भाग अत्यंत डोंगराळ असून सोयी-सुविधांचा अभाव नसताना सर्व परिस्थितीवर मात करून कुमारी दर्शना राजू आखाडे हिने एस. एस. सी. मध्ये ९२.४०% गुण मिळवून शाळेत प्रथम येऊन गावाचे व समाजाचे नाव रोशन केल्यामुळे सर्व समाज बांधवांकडुन तिच्यावर शुभेच्छा वर्षा होत आहे.

Comments

Popular posts from this blog