Posts

Showing posts from April, 2022
Image
  विद्यार्थी भारती, जिनियस मैत्रकूल, आयोजित नाळ महाराष्ट्राशी संस्कृतीशी निजामपूरात कार्यक्रमाचे आयोजन!    निजामपूर (प्रतिनिधी) नाळ महाराष्ट्राशी.. संस्कृतीशी.विद्यार्थी भारती संघटना घेऊन येत आहे महाराष्ट्र दिनानिमित्त नाळ महाराष्ट्राशी.संस्कृती शी.हा कार्यक्रम १ मे २०२२ रोजी संध्याकाळी ५ ते ९ ह्या वेळेत रसिक भाई मेहता कंपाउंट,निझामपूर बस स्टॉप समोर  इथे हा कार्यक्रम होणार आहे, असे राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष तेजस भोसले ह्यांनी सांगितले.  वैभव संपन्न असलेल्या महाराष्ट्राच्या वैविध्याचे सांस्कृतिक दर्शन घडवून आणत लोप पावत चाललेल्या कलांना उजाळा देत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे पूर्णजीवन करण्याचा निर्मळ प्रयत्न म्हणजेच,नाळ महाराष्ट्राशी संस्कृतीशी असे संघटनेच्या राज्यकार्यध्यक्ष साक्षी भोईर ह्यांनी सांगितले.     (आकाश तायडे)गार्गी लावणी सम्राट थेट नागपूर हुन आपल्या नृत्य आविष्काराने महाराष्ट्राची संस्कृती ढोलकीच्या तालावर आणि त्याच्या अदाकारी ठेक्यावर सादर करण्यासाठी येत आहे.त्याचबरोबर नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे तसेच लोकशाहीर दत्ताराम मात्रे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उ
Image
  जय भवानी पतसंस्थेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न कोलाड (श्याम लोखंडे ) सहकार क्षेत्रात अग्रगन्य असलेल्या जय भवानी पतसंस्था रोहा चा 27 वा वर्धापनदिन सोहळा संस्थेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला .  यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष पी. बी सरफळे  उपाध्यक्ष शंकरराव भगत. संचालक मनोहर मेहत्तर, विनायक पवार. रामशेट कापसे, सुहास खरिवले महेश बामूगडे,दिपक जाधव,मनोहर सकपाळ, वेवस्थापिका बंदींनी धनावडे, निता सिंगृत, आदी मान्यवर उपस्तीत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी.बी सरफळे यानी गेली 27 वर्ष संस्था उभी करताना संचालक मंडळ कमेटी ला किती मेहनत घ्यावी लागली. याची उदाहरने देत संस्थेच्या कार्याचा लेखाजोगा मांडला. तर पतसंस्था चालवने, टीकवने,जिकरिचे असते. कारण आर्थिक वेवहार त्या ठिकानी असते. वसुली हा पतसंस्थेचा कणा असतो. जय भवानी पतसंस्थेचा कारभार हा गेली 27 वर्ष पारदर्शक आहे.या संस्थेच्या माध्यमातून.अनेक गरजू आर्थिक दुर्बल घटकाना पतपुरवठा केला आहे. ज्यावेळी कर्जदार अम्हाला येऊन सांगतात की चेरमन साहेब माझी मुल  पतसंस्थेने अर्थसहाय्य  केले म्हणून  शिकली.  आम्ही घर बांधले, वेवसाय उभा केला. हे जेव्हा सभासद सां
Image
  पिंगळसई गावचे सामाजिक कार्यकर्ते अंकुशराव देशमुख यांचे निधन कै. अंकुशराव देशमुख  कोलाड नाका (शरद जाधव) रोहा तालुक्यातील पिंगळसई गावचे सामाजिक कार्यकर्ते अंकुशराव बाळकृष्ण देशमुख यांचे नुकतेच वृध्दपकालाने निधन झाले. मृत्यू समयी   ते 93 वर्षाचे होते.             पिंगळसई गावचे राजकीय अधारस्तंभ, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनंतराव देशमुख यांचे ते वडिल होते  अंकुशराव देशमुख यांना समाजकारणाची विशेष आवड होती. त्याकाळात धामणसई विविध कार्यकारी सोसायटीवर 10 वर्ष चेरमन पदावर होते त्यामूळे शेतकरी वर्गाला ते नेहमी सहकार्य करित होते .परिसरात एक सृजनशील व्यक्त्तीमत्व म्हणून परिचीत  होते.      स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे यांच्याशी त्यांची  विशेष जवळीकता होती.अणि आजही त्यांचे चिरंजीव तटकरे परिवाराशी स्नेह संबंध जपुन आहेत . शेवटच्या क्षणापर्यन्त अंकुशराव देशमुखांची सेवा  त्यांच्या मुलांनी उत्तमरित्त्या केली .त्यांच्या  अंत्ययात्रेस प्रचंड जनसमुदाय जमला होता .त्यांच्या मागे  2 मुले 4 मुली, सुना , नातवंडे,असा मोठा परिवार आहे. दशक्रियाविधी गुरवार दिनांक. 5 मे रोजी तर उत्तरकार्य रविवार दिनांक 8 मे रोजी राहत्या
Image
  ओबीसी जनमोर्चाच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी रोहाचे सुरेश मगर यांची   तर   सरचिटणीस पदी माणगाव चे अशोक पाटिल यांची एकमताने निवड कोलाड नाका  (शरद जाधव) आपले अनेक वर्षाचे प्रस्न सोडवण्याकरिता संघटन महत्वाचे आहे.याची जाणिव ओबीसी समाजाला होत असुन त्या गतीने जिल्ह्यात संघटना कार्यरत असुन, सदर संघटना अधिक बळकट कशी होइल, संघटन चळवळ अधिक व्यापक गतिने कशी पुढे नेता येईल याकरिता तितक्याच ताकतीच्या लढाऊ नेत्याची गरज असताना रोहा तालुक्यातील कुणबी समाजाचा एक बुलंद आवाज,अभ्यासू लढाऊ नेता सुरेशजी मगर यांची ओबिसी जनमोर्चा च्या रायगड जिल्हा आध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडी ने ओबीसी समाजात आनंदाचे वातावरण तयर झाले आहे.         सदर कार्यक्रम माणगाव येथील कुणबी सामाजिक सभागृहात घेण्यात आला होता.      यावेळी ओबिसी जनमोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष चंद्रकांतजी  बावकर, सरचिटणीस अरविंद डाफळे, सचिव कृष्णा वने, राजकिय नेतृत्व अनिल नवगणे, नगराध्यक्ष पवार,कुणबी संघाचे सचिव आशोक करंजे, महिला मंडळा चे सचिव स्नेहा खापरे, जिल्हा समन्वयक उदय कठे, कुणबी समाज नेते शिवराम महाबळे महादेव स
Image
  विज वितरण कंपनीचा मनमानी कारभार, महागाईत भरीत भर म्हणून अतिरिक्त सुरक्षा रकमेच्या नावाखाली विज ग्राहकाला दोन बिले   जनतेतून तीव्र संताप!    गोवे-कोलाड (विश्वास निकम)  या अगोदरच महागाईच्या आगीत जनता पूर्णपणे होरपळत असतांना यात भरीत भर म्हणून विज वितरण कंपनी कडून मार्च महिन्यात विज ग्राहकांना दोन बिले देण्यात आली असून एक बिल मिटर रिडींग प्रमाणे आहे तर दुसरा बिल अतिरिक्त सुरक्षा ठेव या नावाखाली देण्यात आला आहे. जर रिडींग प्रमाणे ५००/- रु. असेल तर अतिरिक्त सुरक्षा ठेव बिल हा ५००/-रु देण्यात आला आहे म्हणेजच विज ग्राहकाला एकूण १०००/- रु. भरावे लागणार आहे. अशी लूट विज वितरण कंपनी कडून सुरु केली आहे.               दहा वर्षांपूर्वी विज ग्राहकाला लाईट बिल हा दोन महिन्यातून एकदा येत होता व केव्हा लाईट जात नव्हती. कोणताही भारनियम नव्हता.आता वारंवार लाईट ही खंडित केली जात आहे. व प्रत्येक महिन्याला येणारा लाईट बिलाची रक्कम ही दुप्पट झाली आहे. अगोदरच भरमसाठ येणाऱ्या लाईट बिलाने जनतेचे कंबरडे मोडले आहे यात भरीत भर अतिरिक्त सुरक्षतेच्या नावाखाली दुसरा बिल आल्यामुळे विज ग्राहकांची झोप उडाली आहे.      
Image
  निगुडशेत प्राथमिक शाळेत शाळा पुर्व तयारी मेळावा संपन्न कोलाड (श्याम लोखंडे ) तळा तालुक्यातील प्राथमिक शाळा निगुडशेत येथे शाळा पुर्वतयारी मेळावा मोठ्या उस्ताहात संपन्न झाला यावेळी शाळा व्यवस्थापन कमेटीच्या नुतन अध्यक्षा सौ संगीता संदीप मंचेकर. यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.शाळेय कामकाजाचा आढावा देताना मुख्याध्यापिका गवळी यानी संगितले की या पुर्व तयारी मेळाव्यात कु विषयराज रामदास मोरे, कुमारी दिया देवजी सरफळे या दोन मुलांचा शाळेत प्रवेश झाला आहे. शाळेची पटसंख्या शासणाच्या निकषानूसार वाढविने गरजेचआहे .बहुसंख्य ग्रामस्थ हे नोकरीनिमित्त बाहेर गावी असल्याने मुलेही बाहेरगावी आहेत. शालेत मुळे वाढावी याकरिता ग्रामस्थ, व्यवस्थापन कमेटीने लक्ष घालने गरजेचे आहे असे मुख्याधिपीका शिक्षिका   गवळी यानी आपले मत व्यक्त केले तर यावेळी विचार व्यक्त करताना  व्यवस्थापन समितीचे शिक्षण सल्लागार सदस्य पांडूरंग सरफळे (रावसाहेब) यानी मराठी शाळांची दिवसेंदिवस परिस्थीथी गंभीर होत चालली आहे.अनेक जन नोकरी निमीत्त कुटुंबीया सोबत बाहेरगावी असल्याने गावातील शाळा ओस पडत आहेत. निगुडशेत शाळेच्या हद्दित निगुडशेत
Image
  विज ग्राहकांना अतिरीक्त अनामत रक्कमेसाठी सक्ती करू नये :- भाजप युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष अमित घाग यांची निवेदनाद्वारे मागणी  रोहा (प्रतिनिधी) महाराष्ट्र विज वितरण कंपनीचे माध्यमातुन माहे मार्च २०२२ च्या बिला सोबत अनामत सुरक्षा रक्कमेचे बिल देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिटरची सुरक्षा ठेव / अनामत रक्कम यापुर्वीच ग्राहकांनी भरलेली आहे . असे असताना देखील विज वितरण कंपनीच्या माध्यमातुन जाणीवपुर्वक अनावधानाने दिलेली सुरक्षा ठेव ही अतिरिक्त बिले ग्राहकांना दिलेली आहेत . त्यामुळे विज वितरण कंपनीने या महीन्यात दिलेली अनामत / सुरक्षा ठेव रकमेबाबत खुलासा करून ती रद्द करावी व कोणत्याही ग्राहकावर सक्ती करू नये अशी मागणी भायुमो जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात विज वितरण कंपनीने सुरक्षा ठेव अतिरिक्त बिलासंदर्भात खुलासा करून नागरीकांना अनामत / सुरक्षा रक्कमे बाबत सक्ती न करता त्याला ती न भरण्याचे आव्हान करावे . तसे न झाल्यास भाजपाकडून नागरीकांना ते न भरण्याचे आवाहन करण्यात येईल, तसेच विज वितरण कंपनीने अतिरिक्त
Image
  लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाच्या मोफत नेत्र तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद 18 रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, खांब (नंदकुमार कळमकर ) लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा, लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग , समता फाऊंडेशन मुबंई,व निलिकॉन फूड्स डाइज लिमिटेड धाटाव रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने व लायन्सक्लबचे मार्गदर्शक तथा चेअरपर्सन लायन रविंद्र घरत यांच्या विशेष मार्गदर्शनातून ग्रुप ग्राम पंचायत खांब व ग्रामस्थ महिला मंडळ खांब यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया या शिबिराचे आयोजन राजिप शाळा खांब येथे करण्यात आले होते . सदरच्या आयोजित शिबिराला येथील रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतीसाद लाभला यात बहुसंखे रुग्णांची मोफत तपासणी व प्राथमिक उपचार करण्यात आले तर 18 गरजू रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली . यावेळी अध्यक्ष डॉ सागर सानप, लायन्सक्लबचे चेअरपर्सन लायन रविंद्र घरत,लायन्सक्लब ऑफ कोलाड चे प्रमुख मार्गदर्शक पराग फुकणे,निलिकॉन लिमिटेडचे एच आर मॅनेजर गजानन बामणे ,कोलाड लायन्सक्लब चे सचिव रविंद्र लोखंडे, खजिनदार डॉ श्याम लोखंडे, उपाध्यक्ष प्रो.माधव आग्री, डॉ मंगेश सानप
Image
  पुगांव येथे पंचायत राज दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार     पुगांव-खांब (नंदकुमार कळमकर ) रोहा तालुक्यातील पुगांव येथे सालाबाद प्रमाणे २४ एप्रिल २०२२ रोजी 'पंचायती राज दिन' ग्रामपंचायत पुगाव येथे साजरा करण्यात आला.या अगोदर केंद्र व राज्य शासनानी ११ ते १७ एप्रिल २०२२ हा सप्ताह आयकॉनीक सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये ग्रामपंचायत पुगांव येथे शाश्वत विकास ध्येयांच्या बालस्नेही गाव,जल समृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव या संकल्पना निवडले आहेत त्यावर ग्रामपंचायत वर्षभर काम करणार आहे त्या संकल्पनेतून ग्रामपंचायत पुगाव यांनी रा.जि.प. केंद्र शाळा पुगाव येथे पोस्टर, निबंध, वकृत्व स्पर्धाचे आयोजन केले होते त्यामध्ये काही विध्यार्थी नी बाल स्नेही गाव, जल समृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव विषयांवर पोस्टर तयार केले होते काही विध्यार्थीनी निबंध व वकृत्व स्पर्धेत भाग घेतला होता.या स्पर्धेत १ ते ३नंबर आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवार दि.२४ एप्रिल २२ रोजी सत्कार करण्यात आला याव
Image
  शिवसेने तर्फे पाले बुद्रुक येथे जिल्हा स्तरीय भगवा चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन   संग्रहित छायाचित्र       गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील आंबेवाडी जिल्हा परिषद मतदान संघातील कोलाड विभाग कबड्डी असोसिएशनच्या पाले बुद्रुक येथील मैदानावर रविवार दि.१मे २०२२ रोजी संध्याकाळी ५ वा. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून शिवसेनेचे रोहा तालुक्याचे उपतालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेने तर्फे जिल्हा स्तरीय भगवा चषक कबड्डीचे आयोजन करण्यात येणार आहे.                   या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक ५१०००/- रु.व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक २५०००/- रु.व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक १५०००/- रु. व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक १५०००/- रु.व आकर्षक चषक, मालिकावीर सायकल, उत्कृष्ट पक्कड कुलर, उत्कृष्ट चढाई कुलर, पब्लिक हिरो टॉवर फँन अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.अधिक माहितीसाठी रमेश सानप ७८०९१२२९९९, मिलिंद पवार ९८६०२५०२८७, चंद्रकांत लोखंडे ९४२११६८०३३, ज्ञानेश्वर खांमकर ९९७५६८४७५३ यांच्याशी संपर्क साधावा.                       सर्व कबड्डी स्पर्धा यशश्विकरण्यासाठी विभ
Image
  रोहा पाण्यासाठी तळाघर बौद्धवाडी ग्रामस्थांचा मंगळवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा   पाण्यासाठी ग्रामस्थांनी दिले निवेदन! मंत्र्यांच्या गावात पाणी टंचाई!   कोलाड (श्याम लोखंडे ) रायगड जिल्ह्यात तसेच पालकमंत्री यांच्या गावात तसेच दस्तुरखुद्द त्यांच्या मतदारसंघात आता नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे पाण्यासाठी कायम वंचीत राहणाऱ्या तळाघर रोहा बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी अखेर यासाठी मंगळवारी निषेध मोर्चा काढला. रोहा एसटी स्टँड ते तहसील कार्यालयावर मोर्चेकरांनी धडक देत रोहा तहसीलदार यांना याबाबत निवेदन देत समक्ष माहिती दिली. प्रसंगी संतप्त मोर्चात ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा जोरदार उदो उदो करीत समाचार घेतला.पाणी चोरणाऱ्या पालकमंत्र्यांचा धिक्कार असो, अशा घोषणा देत संतप्त मोर्चेकरांनी पालकमंत्र्यांनाही सोडले नाही तर मानवी जीवनाला पुरेसा पाणी पुरवठा करा अशी आग्रह मागणी या निषेधार्थ निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली. रोहा तळाघर ग्रामपंचायतीत आतापर्यंत अनेक पाणी योजना राबविल्या. त्यासाठी करोडो रुपयांचा निधी देखील खर्ची पडला. प्रत्यक्षात योजनेची कामे निकृ
Image
 श्री. संताजी जगनाडे महाराज मंदिर १३ वा वर्धापन सोहळा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन .  श्री संताजी जगनाडे महाराज सुतारवाडी : (हरिश्चंद्र महाडिक)  तमाम तेली बांधवांचे आराध्य दैवत श्री. संताजी जगनाडे महाराज यांचे रायगड जिल्हयातील ऊसर (बुद्रुक) ता. माणगाव, जि. रायगड  येथील बांधलेल्या मंदिराचा १३ वा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. २२ मे २०२२ रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्यास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने परिवारासह वेळेवर उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन असे अध्यक्ष श्री. वसंत कुशाबा निगडे आणि सचिव श्री. चंद्रकांत राम निगडे तसेच सर्व सभासद बंधू-भगिनींने केले आहे.  हे मंदिर बांधल्या पासून गेली १३ वर्षे सातत्याने (कोरोना कालावधी सोडून) विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.         यावर्षी ही सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहात मंदिराचा १३ वा वर्धापन दिन साजरा करणार असून दि. २२ मे २०२२ रोजी सकाळी ९ ते १०.३० श्री. सत्यनारायणाची पूजा सकाळी १०.३० ते १२.३० प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री. संताजी जगनाडे महाराज पादुका मिरवणूकसह पालखी सोहळ्याला सुरुवात दुपारी १२.३०
Image
  गोवे-खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा मानाचा चषक जय बजरंग हेटवणे संघानी पटकवला    गोवे-कोलाड (विश्वास निकम )  खा. सुनिल तटकरे,राज्यमंत्री तथा रायगडच्या पालक मंत्री अदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे यांच्या सहकार्याने व रोहा तालुका समन्वय समिती सदस्य राकेश शिंदे, रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विनोद भाऊ पाशिळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोवे-खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशचा मानाचा चषक संभे येथील क्रिडांगणावर आयोजित करण्यात आला.या स्पर्धेत जय बजरंग हेटवणे संघाने उत्तम कामगिरी करीत प्रथम क्रमांक प्राप्त करून मानाचा चषक पटकावला.          तर गावदेवी गावठाण महादेववाडी संघ द्वितीय, क्षेत्रपाळ पुई संघ तृतीय, तर श्री गणेश गोवे संघ चतुर्थ क्रमांकांचे मानकरी संघ ठरले.तर सामनावीर महादेववाडी संघाचा प्रतिक तिलटकर, उत्कृष्ट फलंदाज हेटवणे संघाचा देवेश वालंज, उत्कृष्ट गोलंदाज पुई संघाचा सामी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण श्री.गणेश गोवे संघाचा सार्थक दहिंबेकर तर पब्लिक हिरोचा किताब शिवशंभो गोवे संघाचा धनाजी शिगवण याला देण्यात आला.        या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन व बक्षीस समारंभ आ. अनिकेत तटकरे यांच्या श
Image
  ओबीसीचें राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार :- चंद्रकांत बावकर ओबीसी जनमोर्चाच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी सुरेश मगर यांची निवड!  कोलाड (श्याम लोखंडे ) ओबीसींच्या न्यायी हक्कासाठी लढा चालु आहे.ओबीसीचे राजकीय आरक्षणावर नाहीसे करण्यात आले आहे. आणि तो मिळविण्यासाठी आमचा लढा चालु आहे.आम्ही ओबीसींचे राजकीय आरक्षण निश्चितच पुनर्स्थापित करणार आहोत.परंतु बहुसंख्येने असलेल्या ओबीसींना सर्व राजकीय पक्षांनी प्रतीनिधीत्व देताना ८० ओबीसींचा विचार करावा असे ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी माणगाव येथील कुणबी भवन येथे आयोजित ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जमोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणी निवडी करण्यात आली या प्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ओबीसी जनमोर्चा उपाध्यक्ष जे.डी.तांडेल, सरचिटणीस अरविंद डाफळे, चिटणीस कृष्णा वणे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार,शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे,ओबीसी जनमोर्चा जिल्हा समन्वयक उदय कटे, माणगाव तालुका अध्यक्ष अरुण चाळके, ॲडव्होकेट  मनोजकुमार शिंदे,शिवराम महाबळे,तळा तालुका अध्यक्ष सचिन कदम,जिप सदस्य रमेश मोरे, मा.उपस
Image
  RDPL रायगड जिल्हा धनगर समाज कबड्डी प्रीमियर लीगचे मिळाले पहिले विजेते रायगड( महेश झोरे ) रायगड जिल्हा धनगर समाज कबड्डी प्रीमियर लीग RDPL यांचे यंदाचे पहिलेच वर्ष आसुन ही RDPL लीग पोयनाड अलिबाग येथे संपन्न झाली या लीगच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख उपस्थिती मा.श्री मधुकर मामु ढेबे अध्यक्ष जय मल्हार धनगर समाज रायगड  पांडुरंग गौरू आखाडे, .राजू रेखु आखाडे, पांडुरंग बाबू आखाडे, . बाळासाहेब आखाडे,  पांडुरंग बाबू आखाडे, मा.श्री भाऊ धाकल्या झोरे, मा.श्री आनंदराव कचरे,   संतोष झोरे, रामभाऊ केंडे ,  हरीश ढेवे,  आनंद हिरवे,  आनंद कोकळे, पत्रकार  महेश बबन झोरे धाऊ कोंडू केंडे संदीप धाऊ ढेबे .राया तुकाराम ढेबे झिमा गोविंद बोडेकर, इत्यादी मान्यवर व खेळाडू यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा पार पडला. RDPL च्या लीग मध्ये एकूण १२ संघ तसेच १२० ते १५० हुन अधिक खेळाडूंचा समावेश झाला होतो. पण RDPL या कबड्डी लिंग प्रथम मानकरी माथेरान वारीयर्स, द्वितीय क्रमांक वैभव वारीयर्स, तृयीय क्रमांक वेद चॅलेंजर, चतुर्थ क्रमांक मुद्रा बॉयस. यांनी फटकावले तसेच  उत्कृष्ट पकड याचा मानकरी कल्याण हाके,व उ
Image
  राजिप शाळा गोवे येथे शाळापूर्व तयारी मेळावा मोठया उत्सहात संपन्न    गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील राजिप.शाळा गोवे येथे बुधवार दि.२०/४/२०२२रोजी शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन मोठया उत्सहात संपन्न झाले.यावेळी गोवे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नितीन जाधव, ग्रामपंचायत सदस्या सौ. रंजिता जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग जाधव, उपाध्यक्ष प्रदीप पवार,अंगणवाडी सेविका सौ.सुजाता जाधव,मदतनीस सौ.अल्का जाधव, महेंद्र जाधव, गावातील सर्व जेष्ठ नागरिक,तरुण वर्ग,महिला मंडळ उपस्थित होते.            या कार्यक्रमाची सुरुवात लेझीम, ढोल आणि ताशांच्या गजरात गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरी मध्ये सर्व दाखल पात्र विद्यार्थी, इयत्ता पहिली ते चौथी चे सर्व विद्यार्थी तसेच माता -पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक जयेश महाडिक सहशिक्षिका श्रीम. रंजना गांधारे मॅडम यांनी शाळेमध्ये विविध प्रकारच्या शैक्षणिक प्रदर्शनाचे स्टाॅल उभारून विद्यार्थ्यांना सामाजिक, शैक्षणिक, बौद्धिक आणि भाषिक ज्ञान मि
Image
  पालीत आदिवासींनी केला ऐतिहासिक कार्यक्रम.प्रथमच साजरी केली बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, दिनेश कातकरी आदिवासींची बुलंद तोफ यांचे लाभले मार्गदर्शन गोवे -कोलाड ( विश्वास निकम ) पाली आदिवासी कातकरी समाजाचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत वाघमारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पाली मध्ये प्रथमच बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आदिवासी कातकरी समाज हॉल पाली सुधागड येथे साजरी करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आदिवासी कातकरी समाज कधीच करत नाही हा प्रथमच प्रयत्न असल्यामुळे सदरचा जयंतीचा कार्यक्रम हा ऐतिहासिक कार्यक्रम असल्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. सदरच्या ऐतिहासिक आदिवासी कार्यक्रमाबद्दल सविस्तर सांगायचे झाले तर या आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पाली सुधागड तालुक्याचे तहसीलदार दिलीप रायन्नावार लाभले होते. त्यांचे मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, उपेक्षित लोकांकडून ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. प्रथम जयंती साजरी करून आपण मोठे काम केलेले आहे. उद्धारली कोटी कोटी कुळे, भिमातुझ्या जन्मामुळे. आपण कातकरी समाजाने चांगली सुरुवात केलेली आहे. बाबासाहेबांचे विच
Image
  परमेश्वराच्या नामचिंतनाने जिवन धन्य होते:-ह.भ.प.उदय बंद्री महाराज    कोलाड (विश्वास निकम ) हनुमंत राया ज्या अंजेनी मातेच्या उद्री जन्माला आले त्या अंजनी मातेने हनुमंत राय जन्माला येण्याच्या अगोदर भगवान शिवाची आराधना केली तेव्हा भगवान शिव म्हणजेच शंकर प्रसन्न होऊन अंजली मातेला सांगितले तुला काय वरदान पाहिजे त्यावेळी अंजली मातेने सांगितले ऐसा पुत्र व्हावा कि ज्याचा तिन्ही लोकी असेल झेंडा असा वर मागितला या वराप्रमाणे हनुमंत राय यांचे उपकार आहेत हे धन्य अंजनीच्या सूत l नाव त्याचे हनुमंत ll१ll याने सीता शोध केली l रामे सीता भेटविली ll २ll द्रोणागिरी तो आणियेला l लक्ष्युमन वाचवीला ll३ll ऐसा मारुती उपकारी l तुका लोळे चरणावरी ll या जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या आधारे ह.भ प.बंद्री महाराज यांनी व्यक्त केले        यावेळी गायनाचार्य रविंद्र मरावडे, किरण ठाकूर,गणेश दिघे,सुनिल भऊर राम महाराज आंबेकर, अनिल महाराज सानप,हरिचंद्र धामणसे,देवजी मरवडे,अक्षय ओव्हाळ, राजा म्हसकर,पुई महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ, तरुण वर्ग उपस्थित होते.या अगोदर श्री हनुमान जयंती निमित्ताने सकाळी श्री सत्यनारायणाची पूजा, नंत
Image
  जय मल्हार धनगर समाज जय मल्हार सेवाभावी संस्था रायगड यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा 23 एप्रिलला होणार रायगड (महेश झोरे)  जय मल्हार धनगर सेवाभावी संस्था रायगड यांच्या वतीने सालाबादा प्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मु.धामणसई धनगरवाडा, ता. रोहा, जि. रायगड या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट म्हणजे धनगर बांधवांना व युवा पिढी साठी नवीन योजनेचे नियोजन व अंमल बजावणी पहिल्यांदा करण्यात येणार आहे. याचा पुरपुर फायदा धनगर बांधवांनी व युवा पिढीने घ्यावा. युवा पिढी साठी पोलीस भरती एम.पी.एस.सी / यु.पी.एस.सी स्पर्धा विषयी मार्गदर्शन करियर, पशू संवर्धन किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेच्या विषयी मार्गदर्शन , वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजने विषयी मार्गदर्शन, तांडावस्ती सुधार योजना विषयी मार्गदर्शन, समाजात राबवणाऱ्या धनगर योजने विषयी मार्गदर्शन, या सर्व विषयाचे मार्गदर्शन हे उच्च पदावर असलेले आधिकारी देणार आहेत. याचा अर्थ आपल्याला खूपच मोलाचे मार्गदर्शन ठरणार आहे. या मार्गदर्शनाचा लाभ धनगर बांधवांनी व युवा पिढीने घ्यावा अशी जय मल्हार सेवाभावी संस्थेच्य
Image
  जय हनुमान मित्र मंडळ गोवे आयोजित कबड्डी स्पर्धेत स्वयंभू वरसगांव संघ अंतिम विजेता     गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील मौजे गोवे येथील निसर्ग रम्य परिसरात व विद्युत प्रकाशाच्या रोषणाईत खेळविण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत स्वयंभु वरसगांव व जय बजीरंग आंबेवाडी यांच्या झालेल्या अटीततीच्या व शेवट पर्यंत रंगतदार ठरलेल्या सामन्यात अखेरच्या क्षणी स्वयंभु वरसगांव संघाने जय बजीरंग आंबेवाडी संघाचा पराभव करुन विजेते पद पटकावले.तर आंबेवाडी संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.                 जय हनुमान मित्रमंडळ गोवे यांच्या तर्फे व कोलाड विभागीय असोसिएशनच्या मान्यतेने गोवे येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्धघाटन गोवे ग्रामपंचायत आदर्श सरपंच महेंद्र पोटफोडे, खांब विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव, माजी सरपंच सुप्रिया जाधव, माजी उपसरपंच नितीन जाधव,संदीप जाधव, युवानेते राकेश कापसे,राजेंद्र जाधव, नितीन जवके, महाडिक सर,कोलाड विभाग असोसिएशनचे अध्यक्ष गणेश सानप यांच्या शुभहस्ते करण्यात आले.            यावेळी गोवे गावाकमेटी अध्यक्ष नामदेव जाधव,सचिव श्रीधर गुजर,
Image
  नम्र पणाने भक्ती केली तर सुख मिळतो :-ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील   खांब- पुगाव (नंदू कलमकर ) आळंदी मध्ये जोग महाराजांचा स्वतंत्रपूर्वीचा काल त्या काळात जोग महाराजांकडे एक सावकार आला व जोग महाराजांना म्हणाला मी तुम्हाला एक लाख रुपये देतो त्या पैश्याचे तुम्ही काही करा त्या पडत्या काळात ही जोग महाराजांनी ते पैसे घेण्यास नाकारले तेव्हा तो सावकार जोग महाराजांना म्हणाला कि मी एक लाख रुपये देणारा जगात पाहिला माणूस असेल पण त्यावर जोग महाराज यांनी उत्तर दिले कि तुम्ही पैसे देणारे जगातील एकमेव माणूस आहात परंतु या पडत्या काळातही पैसे न घेणारा एकमेव माणूस आहे.त्याने नम्र पणाने भक्ती केली म्हणून ते सुखी झाले.या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज पाटील यांनी आयोजित किर्तन सेवेत स्पष्ट केले.                   यावेळी गायनाचार्य रविंद्र मरवडे, गणेश दिघे, दळवी महाराज, ज्ञानेश्वर दळवी, महादेव महाबळे, प्रदीप महाबळे, जेष्ठ नेते तानाजी जाधव,गोवे ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पोटफोडे, खांब विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव,माजी उपसरपंच नितीन जाधव, संदीप जाधव, ग्रामपंचायत
Image
                                                                                    चिल्हे गावचे सामाजिक कार्यकर्ते शांताराम लोखंडे यांचे दुःखद निधन कै.शांताराम तुकाराम लोखंडे  कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील कृषिनिष्ठ शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते शांताराम तुकाराम लोखंडे यांचे 13 एप्रिल रोजी वयाच्या 76 व्या वर्षी दुःखद निधन झाल्याने लोखंडे कुटूंबियांवर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे . शांताराम लोखंडे हे शेतकरी कुटूंबात जन्माला आलेले आई वडील व कुटूंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी मुबंईत मिळेल ती चाकरी केली अत्यंत मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचे लोखंडे यांनी आई वडिलांच्या पश्चात वडिलोपार्जित शेतीत लक्ष केंद्रित करत सह पत्नीक भात शेती लागवड करत असत कष्टाने आणि मेहनतीने आपल्या कुटूंबाचा व मुलांचा संभाळ करत मुलांना उच्च शिक्षण दिले गावासह परिसरात ते शांताराम पाटील म्हणूनच सुपरिचित होते असे लोखंडे यांचे आकस्मित निधन झाल्याने सर्वत्रच दुःख होत आहे  त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांचे नातलग तसेच हितचिंतक व विविध क्षेत्रातील मान्यवर आदी चिल्हे ग्रामस्थ उप
Image
  गोवे येथे हनुमान जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन    संग्रहित छायाचित्र        गोवे-कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील मौजे गोवे येथे सालाबाद प्रमाणे हनुमान जयंती उत्सवानिमित्ताने शुक्रवार दि.१५/४/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ६ ते ७ वाजता किल्ला व कोलाड विभाग वारकरी संप्रदाय यांचा हरिपाठ,रात्री ९ ते ११ ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील खानावकर (खोपोली )यांची किर्तन सेवा, नंतर हरि भजनाचा कार्यक्रम होईल.            तसेच शनिवार दि.१६/४/२०२२ रोजी दुपारी ३.०० पालखी सोहळा आयोजित करण्यात येणार असून सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी गावकमेटी अध्यक्ष नामदेव जाधव, सचिव श्रीधर गुजर, उपसचिव प्रवीण पवार, खजिनदार कमलाकर शिर्के, उपखजिनदार सुरेश जाधव, सदस्य बळीराम जाधव, राजेंद्र जाधव, शंकर दहिंबेकर, शांताराम घरट, नथुराम मांजरे, तसेच ग्रामस्थ मंडळ, तरुण वर्ग, महिला मंडळ मेहनत घेत आहेत.
Image
रोहा कस्टडीत आदिवासी कैदी आत्महत्या प्रकरणी विविध आदिवासी संघटना झाल्या आक्रमक!    रोहा पोलीस निरीक्षकांसह संबंधितांवर तत्काळ कारवाई करा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन !   आदिवासी संघटनांना आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही दोषींवर लवकरच कारवाई होईल :- पोलीस अधीक्षक अशोक दुधे    रायगड (भिवा पवार ) रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील शेनवई आदीवासीवाडीतील पत्नीच्या खून प्रकरणी अटकेत असणारा रोहा पोलिस कस्टडीतअसणारा रविंद्र वसंत वाघमारे वय २५ वर्षे रा. शेनवई ता. रोहा या कैद्यांनी चादरीच्या किनारीने लॉकअपमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. घटनेचे वृत्त समजताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.  आदिवासी तरुण कैद्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने रायगड जिल्ह्यामध्ये खळबळ माजली असून याप्रकरणी आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील व संबंधित कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे असे पत्र जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांना दिले आहे.  या प्रकरणी आदिवासी संघटनाच्या आक्रमक झाल्या असून आदिवासी संघटनाच
Image
  आदर्शगाव भातसई येथील श्री महादेवी मातेचा १५ एप्रिल पालखी सोहळा १६ एप्रिल रोजी यात्रा उत्सव!     सर्वत्र भक्तीमय वा तावरण! कोलाड (श्याम लोखंडे ) भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी रोहा तालुक्यातील आदर्शगाव भातसई येथिल श्री महादेवी मातेचा पालखी व यात्राउत्सव शुक्रवारी १५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता पालखी मिरवणुकीला भातसई गावातुन येशीच्या मंदिरातुन सुरुवात होणार आहे. पालखी नतंर झोलांबे कोपरे या गावात जाते.त्यानंतर पालखी झोलांबे गाव ,लक्ष्मीनगर आदी ठिकाणी मिरवणूक करत सायंकाळी ७ वाजता आदर्शगाव भातसई गावातील भक्तगणांच्या घरोघरी भक्तीमय वातावरणात या महादेवीची पूजा करत मंदिरात येते.   तर दुस-या दिवशी शनिवारी १६ एप्रिल रोजी महादेवी मातेचा यात्राउत्सवाला सुरुवात होणार असून सकाळ पासुनच या ठिकाणी भक्त आपली मनोकामना पूर्ण झाल्याने नवस घेऊन मंदिरात वाजत गाजत हजेरी लावतात . रोहा तालुका तसेच रायगड जिल्ह्यातुन भक्तगणांचे अलोट जनसागर या महादेवी आईच्या यात्रेमध्ये सहभागी होतात. यात्रेचा मुख्य कार्यक्रम म्हणजे येथे आजही देवीचा पुजारी याला गळ लावून प्रदक्षिणा घातली जाते.  यावर्षीचा गळ सायंकाळी
Image
      अंगणवाडी सेविका सौ. स्मिता लाड यांचे आकस्मित निधन खांब-पुगांव (नंदु कळमकर ) रोहा तालुक्यातील हेदवली गावच्या सासरवासिन व वरवडे पाले येथील सुकन्या तथा अंगणवाडी सेविका सौ स्मिता श्रीनिवास लाड यांचे मंगळवार दि.५ एप्रिल रोजी आकस्मित दुःखद निधन झाल्याने लाड व खांडेकर कुटुंबावर दुःखाचे डोंगर तर हेदवली व वरवडे पाले गावावर शोककळा पसरली आहे.  ३५ वर्षीय होतकरू आणि उच्च शिक्षित कर्तबगार महिला ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण निमशासकीय सेवेत असल्याने त्या आपल्या माहेरील वरवडे पाले येथील अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या.तसेच त्या सेवेत असल्यामुळे तेथेच आपल्या परिवरसमावेत आपल्या त्या वास्तव्याला होत्या. त्या कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेल्या असता विहिरीला कठडे नसल्यमुळे विहिरीत तोल गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अत्यन्त प्रेमळ स्वभाव सर्वांना परोपकारी पडणाऱ्या तसेच महिलांसाठी त्या बचत गटाचा प्रतिनिधित्व करत अनेक बचतगट तयार करून त्यांना सदैव मार्गदर्शन करत होत्या.           त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी विविध क्षेत्रातील मान्
Image
  जेथे स्त्रीचा सन्मान होतो, तेथे स्वराज्य घडत असतो:-ह.भ.प.शितलताई साबळे महाराज     गोवे-कोलाड (विश्वास निकम)  प्रेयशीसाठी ताजमहाल बांधणारे तुम्ही कितीतरी बघितले असतील पण रयेतेसाठी व आईसाठी स्वराज्य निर्माण करणारे एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा होता. म्हणूनच जेथे स्त्रीचा सन्मान होतो. तेथेच स्वराज घडत असतो.ज्यांच्या मुळे धर्म आहे.ज्यांच्यामुळे मी किर्तन करू शकते असे मत ह.भ.प. शितलताई साबळे महाराज (नगर ) यांनी महादेववाडी येथील अखंड हरीनाम सप्ताहात आयोजित किर्तन सेवेत देव जाणता देव जाणता l आपुलिया सत्ता एकाएकी ll १ll देव चतुर देव चतुर l जाणोनी अंतर वर्ततसे ll धु ll देव निराळा देव निराळा l अलिप्त विटाळ तुका म्हणे ll २ll या जगद गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे स्पष्ट केले.                       जगात चार प्रकारची माणसे चतुर असतात एक नंबर देव, दोन छत्रपती शिवाजी महाराज, तीन नंबर बिरबल, चार नंबर माणूस, आरोपीला जेव्हा फाशीची शिक्षा होते. तेव्हा त्याला आदल्या दिवशी न्यायाधीश व वकील त्या आरोपीला कोणतेही शेवटची इच्छा विचारतात व ती पुर्ण करतात तेव्हा आरोपी न्यायाधिशाला बोलतो.
Image
  येरळ ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ. संध्या प्रकाश मोरे सुतारवाडी ग्रामस्थांतर्फे सत्कार   सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडिक) येरळ ग्रामपंचायतीच्या पूर्वीच्या उपसरपंचांचा कार्यकाळ संपल्यामुळे उपसरपंच पदाच्या रिक्त झालेल्या पदाकरीता सुतारवाडी येथील सौ. संध्या प्रकाश मोरे यांची येरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी येरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.विमल दळवी तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. सौ. संध्या प्रकाश मोरे यांची येरळ ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी निवड होताच सुतारवाडी ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.                   सौ. संध्या मोरे यांनी उपसरपंच पदाचा कार्यभार स्विकारल्या नंतर सांगितले. खासदार सुनिल तटकरे साहेब, रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे आणि आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी सर्वांना बरोबर घेवून यशस्वी करेन.
Image
मराठी उद्योजक   रामशेठ कापसे यांच्या निवास स्थानी राम नवमी उत्सव मोठया उत्सहात साजरा         गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील मौजे मूठवली येथील मराठी उद्योजक तथा गोवे ग्रामपंचायत माजी सरपंच रामशेठ कापसे यांच्या निवास्थानी सालाबाद प्रमाणे रविवार दि.१०/४/२२ रोजी राम नवमी उत्सव मोठया उत्सहात साजरा करण्यात आला.             गेली दोन वर्षी पासून कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आला होता. त्यामुळे सर्व कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली होती.त्यामुळे विविध प्रकारचे कार्यक्रम घरच्या घरी केले जात होते. परंतु यावर्षी सर्व नियम शिथिल करून सर्व कार्यक्रम साजरे करण्यासाठी परवानगी मिळाल्या नंतर सर्व कार्यक्रम मोठया उत्सहात संपन्न होत आहेत. यनिमित्ताने रामशेठ कापसे यांच्या निवास्थानी गेली २१ वर्षांपासून राम नवमी उत्सव सुरु असून सकाळी साईबाबांच्या मूर्तिचे पूजन व आरती,नंतर दुपारी श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ६ ते ७ महिला मंडळ पुगांव यांचा हरिपाठ,नंतर महाप्रसाद व रात्री महिला मंडळ पुगांव यांच्या हरि भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणराव
Image
  शेकाप नेते आ. जयंतभाई पाटील यांची पुगांव येथे सांत्वनपर भेट   कार्यकर्त्याच्या दुःखात समरस होणारे एकमेव सच्चे नेते आ.जयंतभाई  पाटील जनतेत चर्चा              पुगांव-कोलाड (नंदु कलमकर ) रोहा तालुक्यातील मौजे पुगांव गावातील तीन कुटूंबातील व्यक्ती मयत झालेल्या कुटुंबात व त्यांच्या दुःख अश्रू सावरण्यासाठी शेकापचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जयंतभाई पाटील यांनी शनिवार दि.९/४/२०२२ रोजी सांत्वनपर भेट घेतली.               रोहा तालुक्यातील काही दिवसापूर्वी तसेच आ पाटील यांचे हितचिंतक पुगांव येथील नारायण शंकर खांमकर, रविकांत सदाशिव शेळके, विमल रामचंद्र देशमुख यांचे आकस्मित निधन झाले त्या प्रित्यर्थ या तिन्ही कुटूंबातील व्यक्तींच्या घरी जाऊन शेकापचे नेते तसेच आमदार जयंतभाई पाटील यांनी सांत्वनपर भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी होऊन सांत्वन केले.  यावेळी पुगांव गावचे जेष्ठ नेते नारायणराव धनवी, ग्रामपंचायत सदस्य गणेश म्हसकर, बबन म्हसकर, खांब विभागीय नेते मारुती खांडेकर सर रोहा तालुका चिटणीस राजेश सानप,माजी सरपंच मनोहर महाबळे, नारायणराव अधिकारी, जनार्दन खामकर, महादेव खामकर, आनंता खामकर, रुपेश अधिकारी, आन