जिथे कमी तिथे आम्ही, तटकरे पँटर्न युती काळातील पालदाड पुलाला राष्ट्रवादीकडून मुलामा

  कोलाड़ नाका  (शरद जाधव)ग्रामीण विकासाच्या बाबतीत फक्त बोला, कमी तेथे आम्ही हा विकासाचा तटकरे  पँटर्न   चा अनुभव धामणसाई उडदवने, देवकान्हे परिसरातील ग्रामस्थाना आला आहे. साहेब, ताई, भाई याना फ़क्त शब्द टाकला.अणि अनेक वर्षाच्या पालदाड़ पुलाच्या रस्त्याचा गंभीर प्रश्न मार्गी लागला असुन युती काळातील झालेल्या पालदाड पुलाला मुलामा      

  लावन्याचे काम राष्ट्रवादी ने  केल्याने परिसरातील नागरिकांत आनंदाचे वातवरण पसरले असल्याची माहिती राष्ट्रवादी कार्यकर्ते महेश तुपकर यानी दिली        पुर्वी कुंडलिका नदीच्या अलिकडील अनेक गावतील लोकाना धाटाव, रोहा येथे जाण्याकरिता नदीवरील छोट्या पकटीवरुन जावे लागत असे त्यामूळे पावसाळी लोकाना कसरत करावी लागत असे या पकटी वरुन अनेकजन वाहवुन गेल्याच्या घटना घडल्या होत्या अखेर त्यावेळी उडदवने व या परीसरातिल ग्रामस्थांच्या पुढाकारातून युती सरकारच्या काळात पालदाड पुलाचा प्रश्न मार्गी लागला होता. 

             मात्र कितेक वर्ष या पुलावरिल रस्त्याचा प्रस्न मार्गी लागला नव्हता. दर पावसाळी येथील नागरिकांना रस्त्याचा खुप त्रास होत होता.सदर बाब सुनिलजी तटकरे, आदितीताई, व अनिकेतभाई यांच्या कानावर घालताच क्षणाचा विलंब न लावता डांबर ठेकेदारासहीत सर्व यत्रंना हालवुन एका दिवसात सदर रोड  कारपेट रोड  बनवीला. कामाचा दर्जा इतका आहे की भविष्यात  या रोडला खड्डा मिळनार नाही.

सदर कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे सुनिल तटकरे दिल्लीत आहेत तर आदितीताई व अनिकेतभाई महारास्ट्रातील दोन सभागृहात आहेत.त्यामूळे आपल्याला मिळालेल्या पदाचा ,सत्तेचा ते रायगड च्या विकासाकरिता पूरेपुर वापर करिताना दिसत आहेत. लोकाना काम करणारी माणसे हवीत हा राजकारणातील गणित आहे या जोरावर तटकरे यांचे  राजकारण अनेकवर्ष टिकून आहे.

     त्यामूळे पेण मतदार संघात काम करणारी माणसे तटकरेंच्या माध्यमातून येथील मतदारांनी हेरले असुन विकासाच्या माध्यमातून साहेब, ताई, भाई, हे येथील जनतेचे कैवारी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Comments

Popular posts from this blog