Posts

Showing posts from April, 2025
Image
रोहा तालुक्यातील घटना! आंबेवाडी नाका येथे  रस्त्यावर आढळला  मृतदेह सर्वत्र एकच खळबळ!   कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील   तसेच मुंबई गोवा महामार्गालगत आंबेवाडी नाका येथे बुधवार दि. ९ एप्रिल रोजी ९.३० वाजता आंबेवाडी गावाच्या हद्दीत बँक ऑफ महाराष्ट्र इमारती शेजारी असणारे गणेश मंदिरासमोर बायपास रोडच्या शेजारी उताने स्थितीत कोणत्याही प्रकारची हालचाल न करता मयत इसमाचा मृतदेह आढलून आल्याची खळबळजनक घटना घडली त्यामुळे कोलाड आंबेवाडी नाक्यावर एकच खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते घटनास्थनी धाव घेत दाखल होऊन त्याला आंबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत्यू घोषित करण्यात आले.असुन मयत झालेल्या इसमाचे नाव लालूलाल सोनजी रेबाली वय वर्षे ४१ रा. बिछोरा जि. चितोडगड,राजस्थान येथील असल्याचे तपासादरम्यान समजले असुन त्याचा मृत्यू कोणत्या तरी आजाराने झाला असल्याचे समजते मात्र अधिक तपास कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली एन. झेड. सुखदेवे  करीत आहे...
Image
  भारत स्वतंत्र, स्वावलंबी, समृद्ध आणि विकसित खेड्यांचा आणि संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारा जगद्गुरुपदावर पुन्हा प्रतिष्ठापित होणारा असा देश उभा करू या! :-विनयजी कानडे    कल्याण येथे कै.रामभाऊ म्हाळगी  स्मृतिदिन मोठ्या उत्साहात संपन्न!   स्मृतिदिनाच्या निमित्ताने संस्थेत उत्कृष्ट काम करणाऱ्या गुणीजणांना पुरस्कार देऊन केला गौरव!   कल्याण( प्रतिनिधी) भारत हा स्वतंत्र खेड्यांचा स्वावलंबी समृद्ध खेड्यांचा आणि विकसनशील व जगाला मार्गदर्शन करणारा जगद्गुरु पदावर प्रतिष्ठापित होणारा असा भारत देश उभा करू या  असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  ग्रामविकास  पश्चिम क्षेत्राचे प्रमुख देविदासजी कानडे यांनी केले  ते छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित कै.रामभाऊ म्हाळगी स्मृतिदिना निमित्ताने नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण  येथे आयोजित करण्यात आलेल्या  'ग्रामविकासातून राष्ट्रविकास,या विषयावर ते आयोजित व्याख्यान पर बोलत होते. ते पुढे म्हणाले की  विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीचे कार्य खूप मोठे आहे त्यांचे चिंतन करणे महत्त्वाचे आहे आजही भारत...
Image
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील घटना! कानसई येथील महापारेषणच्या सबस्टेशनमध्ये स्फोट होऊन भीषण आग,लाखो रुपयांचे नुकसान!     कोलाड (विश्वास निकम )  रोहा तालुक्यातील कानसई येथील गावानजिक ४०० केव्ही क्षमता असलेल्या महापारेषच्या सबस्टेशनमध्ये बुधवार दि.२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग लागली यावेळी येथे बाजूला असलेल्या ऑइल मुळे काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले.यामुळे या सबस्टेशनचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या सबस्टेशनच्या समोर प्राथमिक शाळा आहे या शाळेच्या परिसरात स्फोट झालेल्या जळाऊ आगीचे गोळे उडून आल्यामुळे शाळेच्या आजूबाजूला असलेल्या सुकलेल्या गवताने पेट घेतला व ही आग पसरत गेली यावेळी या शाळेत विद्यार्थ्यांचे पेपर सुरु होते.या आगीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी येथील स्थानिक नागरिक यांनी धाव घेतली त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.     परंतु आगीने रौद्र रूप धारण केले होते.यामुळे तातडीने जवळच असलेल्या जिंदाल कंपनीला पाचारण करण्यात आले.घटनास्थळी त्वरित अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रज्व...
Image
  रोहा तालुका कुणबी समाजाची सभा मोठ्या उत्साहात संपन्न कोलाड (विश्वास निकम) कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा तालुका रोहाची सभा शनिवारी २९ मार्च रोजी कुणबी समाज नेते तथा माजी आमदार स्व.पां.रा. सानप कुणबी भवन रोहा येथे रोहा तालुका अध्यक्ष रामचंद्र सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली तर आयोजित सभेस तालुक्यातील कुणबी समाज कार्यकारणी पदाधिकारी व कुणबी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. सदर यावेळी कुणबी समाज समन्वय समिती मुंबई संघ सदस्य नेते सुरेश मगर, उपाध्यक्ष अनंत थिटे, माजी अध्यक्ष शिवराम शिंदे, शिवराम महाबळे,संतोष खेरटकर, सतिश भगत, मारुती मालुसरे, सुहास खरिवले, शशी कडु, मोरेश्वर खरिवले, गृप अध्यक्ष.खेळु  ढमाल, निवास खरिवले, पांडुरंग कडु, दिलीप अवाद, राजेश कदम , पांडुरंग कोंडे  जेष्ठ नेते बाबुराव बामणे, वसंतराव मरवडे, दगडु शिगवन, नरेंद्र सकपाळ, गोपिनाथ गंभे,तसेच  अनंता वाघ,परशुराम भगत, मंगेशशेठ सरफळे, महेश ठाकुर,चंद्रकांत लोखंडे.सह तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी व आदी कुणबी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. तर आयोजित करण्यात आलेल्या या कुणब...