पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अमलबजावणी करा, रोह्यातील पत्रकारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन रोहा (प्रतिनिधी) राज्यात दिवसेंदिवस पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे.पत्रकारांच्या प्रदीर्घ लढाईनंतर अखेर २०१९ रोजी हा कायदा राज्यात अमलात आला. मात्र त्यानंतरही राज्यात पत्रकारांवरील हल्ले कमी न होता ते दिवसेंदिवस वाढतच राहिलेले पहायला मिळत आहे.नुकतेच पाचोरा येथे पत्रकार संदीप महाजन यांचेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला.मात्र पत्रकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत याप्रकरणी ही शासनाने कारवाई केली नाही. पाचोरा येथील घटनेमुळे राज्यभरातील सर्वच पत्रकारांचे मध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. आज याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटनांनी या कायद्याची होळी करत अमलबजावणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदने दिली. रोहा शहरातील सर्व सक्रिय पत्रकारांनी तहसीलदार डॉ.किशोर देशमुख यांचेमार्फत मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी पत्रकार महादेव सरसंबे, महेंद्र मोरे, अमोल पेणकर, जितेंद्र जोशी,नितीश सकपाळ,मारुती फाटक,महेश मोहिते आदी पत्रकार उपस्थित होते.
Posts
Showing posts from August, 2023
- Get link
- Other Apps
संत श्री चंद्राननसागर सुरीश्वरजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते उदघाटन रोहा :( राजेश हजारे) जैन समाजाचे परम पूज्य आचार्य भगवंत राष्ट्रीय संत श्री चंद्राननसागर सुरीश्वरजी यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिरात ८२ पिशव्या रक्त जमा करण्यात आले. ओसवाल भवन येथे भारतीय जैन संघटना, सकल जैन संघ रोहा आणि चंद्रदर्शन युवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने परम पूज्य आचार्य भगवंत राष्ट्रीय संत श्री चंद्राननसागर सुरीश्वरजी यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जैन सकल संघ अध्यक्ष दिलीप सोळंकी, भारतीय जैन संघटना जिल्हाध्यक्ष दिवेश जैन, गटनेते मह्रेंद्र गुजर, मा. उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, महेश कोलाटकर, मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र जैन, अखलाक नाडकर, मयुर पायगुडे, भाजपा शहराध्यक्ष यज्ञेश भांड, राष
- Get link
- Other Apps
जगात जर सर्वश्रेष्ठ कोणती संस्कृती असेल, तर ती वाचन संस्कृती:- शंकरराव म्हसकर रोहा :(प्रतिनिधी)जे थे वाचन होते, तिथे विचार होतात आज हेच विचार आपली ध्येय ठरवायला आणि गाठायला मदतही करतात. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातून संपत्ती निर्माण होते. वाचनामुळे आपले भावविश्व अनुभव विश्व विस्तारते. वाचन संस्कृतीची नाळ प्रत्येक माणसाची प्राचीन काळापासून जोडली गेली आहे आताच्या प्रगत व दमछाक करणाऱ्या युगामधे वाचनाची सवय मागे पडत चालली आहे ती वाढावी,रुजावी विशेष करून ग्रामीण भागातील जनतेत वाचनाच महत्त्व पटाव वाचन संस्कृती ग्रामीण भागात रूजावी व गावाचा शैक्षणिक सांस्कृतिक विकास व्हावा तसेच" जगात जर कोणती संस्कृती श्रेष्ठ असेल तर ती म्हणजे वाचन संस्कृती आहे, असे प्रतिपादन जेष्ठ शेकाप नेते शंकरराव म्हसकर यांनी केले. आपल्या निवासस्थानी ठेवलेल्या छोट्या कार्यक्रमात केली यावेळी त्यांच्या भगीनी सौ.सुप्रियाताई क्षीरसागर यांनी आपले विचार मांडताना सांगितलेली की आमचे वडील हरिभाऊ म्हसकर यांना पुस्तक वाचनाची खुप आवड होती मुंबई येथे कापड मिलमधे काम करत असताना त्यांनी आपला वाचन छंद जोपासताना सामाजिक कार