Posts

Showing posts from February, 2022
Image
  प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी तर्फे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम ५२ गांव ६५ वाड्यांत मोहिम सुतारवाडी :  (हरिश्चंद्र महाडिक) प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी यांच्या मार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी अंतर्गत असलेल्या 52 गांव, 65 वाड्यांमध्ये ही मोहिम राबविण्यात येणार असून 69 बुथची व्यवस्था करण्यात आली आहे.              जर काही लाभार्थी 27 फेब्रुवारीला लाभ घेवू शकणार नाहीत. अशांसाठी 28 फेब्रुवारीला घरोघरी जाउन पल्स पोलिओ मोहिम यशस्वी केली जाणार आहे. गावोगावी ही मोहिम यशस्वी व्हावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी ची रुग्णवाहिका घेवून कर्मचारी वर्ग पल्स पोलिओचे महत्व पटवून देत आहेत. यासाठी प्रचार मोठ्या प्रमाणावर गावो गावी केला जात आहे.                  ही पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडीचे वैद्यकिय अधिकारी डॉ. महेश वाघ, डॉ. वैभव तिवळे, डॉ. दर्शना वरुटे तसेच आरोग्य सहाय्यक एस. आर. गायकवाड, पी.एम.वारे, आर. आर. पानसरे, आरोग्य सेवक एम. जी. पवार, ज
Image
  महाशिवरात्र' व्रताचे महत्त्व         गोवे-कोलाड (विश्वास निकम) शिव ही सहज प्रसन्न होणारी देवता असल्यामुळे शिवाचे भक्त पृथ्वीतलावर मोठ्या प्रमाणात आहेत. महाशिवरात्र हे शिवाचे व्रत असून या व्रताचे महत्त्व, व्रत करण्याची पद्धत आणि महाशिवरात्र व्रताचा विधी यांविषयीची शास्त्रीय माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून जाणून घेऊया. १. तिथी - महाशिवरात्र हे व्रत माघ वद्य चतुर्दशी या तिथीला करतात. २. देवता - महाशिवरात्र हे शिवाचे व्रत आहे. ३. महत्त्व: महाशिवरात्र या दिवशी शिवतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. शिवतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी महाशिवरात्रीला शिवाची भावपूर्णरित्या पूजाअर्चा करण्यासह ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. ४. प्रकार : काम्य आणि नैमित्तिक. ५. महाशिवरात्र व्रत करण्याची पद्धत : उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत. ६. महाशिवरात्र व्रताचा विधी : माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त रहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा. सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे. भस्म आणि
Image
  रायगड जिल्हा विविध स्पर्धा व गणित संबोध परीक्षेत यशस्वी विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा संपन्न   गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रायगड जिल्हा व पनवेल तालुका गणित विज्ञान अध्यापकमंडळातर्फे चालू शैक्षणिक वर्षात आयोजित विविध स्पर्धा व जिल्हास्तरीय गणित संबोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ बुधवार दि. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी सु.ए. सो. चे के. अ. बांठिया विद्यालय पनवेल येथे संपन्न झाला . या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी महेश खामकर, वरिष्ठ विस्तार अधिकारी एस. आर. मोहिते. रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बी. एस्. माळी , पनवेल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पंकज भगत , मुख्याध्यापक संदेश पाटील, प्रशांत मोकल , पांडुरंग हंबीर , पनवेल तालुका गणित विज्ञान अध्यापक मंडळ अध्यक्ष अनिल पाटील, रोहा तालुका समन्वयक टिळक खाडे , सुधागड तालुका समन्वयक विक्रम काटकर , उरण तालुका प्रतिनिधी व्ही. एम्. बिंदू मॅडम , बांठिया हायस्कूलचे पर्यवेक्षक जे. के. कुंभार आदी मान्यवर तसेच शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात गणित संबोध परीक्षे
Image
  रोह्यात    राजभाषा दिनानिमित्त "निवडक कुसुमाग्रज" हा कार्यक्रम संपन्न   रोहा (राजेश हजारे) कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहा व भाटे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २७ फेब्रुवारी 2022 रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त " निवडक कुसुमाग्रज" या कार्यक्रमाचे आयोजन भाटे वाचनालय रोहा येथे करण्यात आले. रायगड भुषण श्री सुखद राणे व भाटे सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष श्री . किशोर तावडे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सौ . संध्या दिवकर यांनी सांगितले . को.म. सा. प.शाखा रोहाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ संध्या दिवकर यांनी प्रास्ताविकात कुसुमाग्रजांचे साहित्य आपल्याला जगण्यास शिकवते, प्रेरणा देते असे सांगितले .  श्री बाबाजी धोत्रे, श्री विजय दिवकर, श्री सुधीर क्षिरसागर , सौ . वृशाली देशमुख ,सौ वर्षाराणी मुंगसे , श्री घागसर सौ . सुप्रिया क्षिरसागर , कु .निकीता बोथरे कु . वृद्धी भगत कु . स्वराज दिवकर . यांनी कुसुमाग्रजांचे निवडक लेख व कविता सादर करून रसिकांची मने जिंकली . श्री किशोर तावडे , अध्यक्ष, भाटे सार्वजनिक वाचनालय रोह
Image
    किशोर मालूसरे आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित तळा (कृष्णा भोसले)  तळा तालुक्यातील सोनसडे सजाचे तलाठी किशोर मालुसरे यांच्या कामाची दखल घेत माणगाव तालुका पत्रकार संघाचे वतीने कुणबी भवन माणगाव येथे शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी  सन्मान पुर्वक त्यांना गौरविण्यात आले.    माणगाव तालुका पत्रकार संघाचे वतीने पालकमंत्री अदिती तटकरे,आ.भरतशेठ गोगावले यांचे हस्ते मानपत्र,शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर सभापती अलका जाधव, संजय ढवळे भाजपा तालुकाध्यक्ष माणगाव, राजीव साबळे अध्यक्ष माणगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव, आनंदशेठ यादव माजी नगराध्यक्ष माणगाव, सुभाष केकाणे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दिलदार पुरकर संपादक दैनिक रायगड चां आवाज,बाबुशेठ खानविलकर अध्यक्ष महाड मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस, सचिन बोंबले उपनगराध्यक्ष ,रचना थोरे सदस्या पं.स.अलिबाग, रामभाऊ टेंबे जेष्ठ नेते कुणबी समाज,योगीता चव्हाण माजी नगराध्यक्ष माणगाव,दिपकशेठ जाधव प्रदेश युवक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस,विजयशेठ मेथा उद्योजक, सुभाषशेठ दळवी मराठी उद्योजक, दिनेश रातवडकर , राजेश
Image
  रोहा डोळवहाल येथे आधार ग्राम संघाची स्थापना मिळणार विविध योजनेचा लाभ कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील ऐनवहाल ग्राम पंचायत हद्दीतील डोळवहाल येथे ' उमेद 'महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान ग्राम संघाच्या वतीने 20 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत येथील बचत गटातील महिलांना उमेद अंतर्गत आधार ग्राम संघाला वर्धा येथून आलेल्या वर्धिनीन कडून प्रशिक्षण देत या ठिकाणी आधार ग्राम संघाची स्थापना करण्यात आली आहे त्यामुळे आता येथील बचत गटांना विविध योजनेचा लाभ घेता येईल . उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती संघ अभियान अंतर्गत तालुक्यातील ऐनवहाल ग्राम पंचायतील मौजे डोळवहाल येथे आधार ग्राम संघाची स्थापन करण्यात आल्या तसेच त्यांच्या समित्या यावेळी नेमण्यात आल्या.20 ते 23 फेब्रुवारी 2022 रोजी वर्धा येथून आलेल्या ग्राम संघाच्या वरिष्ठ वर्धिनी जयश्रीताई ठोबंरे सविताताई नेहारे,संध्याताई विरखडे,यांनी येथील उपस्थित व प्रशिक्षणार्थी बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण दिले. यावेळी आधार ग्राम संघाची स्थापना त्या अंतर्गत त्यांच्या दहा बचत गटांच्या समित्या यावेळी तयार करून सदरच्या महिलांना
Image
  एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे दिव्यांगांना आवश्यक साहित्य वाटपासबंधीचे तपासणी शिबिर संपन्न   रोहा (समीर बामुगडे)  दिव्यांगाना आवश्यक साधन साहित्य वाटपासाठीचे दोन दिवसांचे तपासणी व नोंदणी शिबिर महानगर गॅस लिमिटेड मुंबई यांच्या सी आर एस योजनेतंर्गत व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को ) यांच्या मदतीने सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्र, कुलाबा दिव्यांग क्रिडा असोसिएशन महाराष्ट्र आणि एम जी एम हॉस्पिटल कामोठे यांच्या सहयोगाने एम जि एम हॉस्पिटल कामोठे पनवेल येथे संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन संयुक्तांग एवं ऋग्वांग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ उत्तरा देशमुख आणि सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्रचे सचिव शिवाजी पाटील ,गौरीच साळुंखे पी अँड ओ, कृष्णा मौर्या ऑडियोलोजिस्ट यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ उत्तरा देशमुख मॅडम यांनी दिव्यांगानीं या आवश्यक साधनाचा वापर केला तर कोणाच्यावर अवलंबून राहणार नाही व तो स्वावलंबी होइल असे मार्गदर्शन केले. पनवेल तालुक्यातील आणि नवी मुंबईतील दिव्यांगाना कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता आहे याची तपासणी अलिम्कोचे गौ
Image
  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित विविध देशातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सन्मान सोहळा!     रोहा ( समीर बामुगडे)   प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे  यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि २९ व्या वर्धापन दिनानिमित्त इंडो मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या दोन आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने द पिल्लर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी २०२१-२०२२ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सोहळा ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे सचिव डॉ. संजय भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी ओल्ड रॉयल मुंबई याच क्लब गेटवे ऑफ इंडियाच्या समोर, मुंबई येथे पार पडला. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून मेजर जनरल श्री शिशिर महाजन, एच ई ॲम्बासॅडर श्री वलशन वेथोडी ( श्रीलंका) श्री ओलहास अलिपबायव ( कझाकीस्थान), श्री क्रिस हाँग( कोरिया), श्री ब्रुनो ब्रॉंकॉर्ड ( फ्रेंच चेंबर), श्री परेश मेहता, श्री स
Image
  पोलीस मिनीबस घुसली चहाच्या टपरीत खांब कोलाड मार्गावर घडली घटना , चार कर्मचारी जखमी, धारकाचे मोठे नुकसान   कोलाड ( श्याम लोखंडे ) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील नागोठणे कोलाड मार्गावरील खांब नजीक पुगाव गावाजवळ व स्टॉपवर असणाऱ्या रुपेश अधिकारी यांच्या चहा च्या टपरीत घुसून हा अपघात घडला असून यातील प्रवास करणारे चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून मिनीबस सह टपरीचे अतोनात नुकसान झाले आहे . या बाबत सविस्तर माहिती खांब कडून कोलाड कडे जाणारी पोलीस मिनीबस गाडी क्र. एम. एच.०६ के ९९३० ही शुक्रवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सदरच्या मार्गावरून प्रवास करीत असता यावरील वहान चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे सदर घडलेल्या आपघात घटनेत चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर कोलाड आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ताबडतोब उपचारासाठी हलविण्यात आले. जखमीचे नाव- १) पोहवा /९१ चव्हाण किरकोळ २)पोशी /८२५ बोरकर किरकोळ ३) पोशी ८५९ पांचाळ किरकोळ ४) पोशी/९९२पोशी पांचाळ किरकोळ ५)पोशी /८४८६ दळवे मुकामार ) पोशी /१४२६ धुळगडे मुकामार ७)पोशी /९८६ चव्हाण मुकामार ८)पोशी ८९9 ल
Image
  ग्रुप ग्रामपंचायत मेढा उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रविंद्र जाधव बिनविरोध मेढा ( राजेंद्र जाधव) रोहा तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ग्रु. ग्रा.पं. मेढा या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सरपंच स्नेहा महेंद्र खैरे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली. यामध्ये उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रविंद्र एकनाथ जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर रविंद्र एकनाथ जाधव यांचा अर्ज वैध ठरवून त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणुक अधिकारी तथा सरपंच स्नेहा खैरे यांनी केली. या झालेल्या निवडणुक प्रक्रियेत सरपंच स्नेहा खैरे मावळते उपसरपंच उदय मोरे, सदस्या नम्रता सुतार, नम्रता महाले, श्रेजल उंबरे, ज्ञानेश्वरी गोवर्धने, समिक्षा जवके शेवंती शिद यांनी सहभाग घेऊन उपस्थिती दर्शवली. मावळते उपसरपंच उदय मोरे यांनी आपला उपसरपंच पदाचा कार्यकाळ पुर्ण केल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने सदर उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली.  उपसरपंचपदी रविंद्र जाधव यांची निवड झाल्यानंतर सरपंच स्नेहा खैरे, मावळते उपसरपं
Image
सामाजिक कार्यकर्ते  प्रभाकर आंबेकर यांचे दुःखद निधन कै. प्रभाकर आंबेकर  गोवे-कोलाड (विश्वास निकम ) कोलाड येथील ईशा गार्डन को.ऑप.हाऊसिंग सोसायटी मधील रहिवासी व मुळगाव सायगाव श्रीवर्धन येथील असणारे प्रभाकर पांडुरंग आंबेकर यांचे बुधवार दि.१६/२/२०२२ रोजी दुःखद निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ६० वर्षे होते. ते धाटाव येथील निरलॉन कंपनीत कामाला होते.या कंपनीतुन निवृत्त झाल्यानंतर ते कोलाड येथेच वास्तव्याला होते. ते कुणबी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते होते. तसेच कोलाड येथील सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय होते. ते परोपकारी व शांत स्वभावाने सर्वाना परिचित होते. त्याच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.२५/२/२०२२ तर उत्तरकार्य विधी रविवार दि.२७/२/२०२२ रोजी त्याच्या मुंबई-गोवा हायवे वरील ईशा गार्डन को. ऑप.हाऊसिंग सो
Image
  सप्तसुत्री कार्यक्रमाअंतर्गत आदीवासी बांधवांना दाखले वाटप       तळा तालुक्यात कातकरी उत्थान अभियानाअंतर्गत महागाव आदीवासीवाडीत प्रभावी अमंलबजावणी तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील महागाव आदी वासी वाडीवर  सप्तसुत्री कार्यक्रमाअंतर्गत कातकरी उत्थान अभियानाची प्रभावि अमंलबजावणी रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर यांचे आदेशाने तळा तहसिलदार अण्णाप्पा कन्नशेटटी यांचे मार्गदर्शनाखाली दाखले वाटप करण्यात आले    स्वातत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या तालुक्यातील आदी वासी बांधवांना दाखले वाटप करताना महागाव आदीवासीवाडी येथे जातीचे दाखले -१५०, सातबारा उतारा १७५, उत्पन्नाचे दाखले त्याचबरोबर शिधापत्रिका यांचे वाटप करण्यात आले.   यावेळी महसुल सहाय्यक विश्र्वास पाटील यांनी आदिवासी बांधवांना, महसुल,कृषी योजना, याविषयीविस्तृत माहिती दिली.यावेळी सर्वहराजनआदोंलनाचेज.वि.गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,   महागाव तलाठी बी.जी.बासांबेकर यांनीही मार्गदर्शन केले.गावचे पोलीस पाटील कमलाकर मांगले, निवृत्त शिक्षक अनंत वारे आदी मान्यवर उपस्थित होते.
Image
  कातकरी उत्थान अभियानाअंतर्गत आदिवासी बांधवांना दाखले वाटप तळा (कृष्णा भोसले)  देशाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय रायगड व तळा तहसिल यांचे संयुक्त विद्यमाने मेढा आदीवासीवाडी येथे कातकरी उत्थान कार्यक्रमाअंतर्गत आदीवासी बांधवांना दाखले वाटप करण्यात आले.   या कार्यक्रमाला तळा नायब तहसीलदार स्मिता जाधव, सरपंच मधुकर वारंगे मेढा तलाठी प्रविण महाडिक, प्रविण गवई,मंडळ अधिकारी विनायक सुतार, युवा कार्यकर्ते नागेश लोखंडे,मंगेश भगत, उपसरपंच मुकण मॅडम,आदी वासी बांधव उपस्थित होते.     या कार्यक्रमाअंतर्गत जातीचे दाखले, सातबारा वाटप,शिधा पत्रिका, त्याचबरोबर उत्पन्नाचे दाखले आदी वासी बांधवांना वाटप करण्यात आले.
Image
  कासार उद्योजक सामाजिक संस्था  आयोजित   "कोकण कासार प्रिमिअर लीग" 2022 पोलादपूर पि.टि.पि.एल ग्राउंडावर नुकतीच संपन्न इंदापूर (प्रतिनिधी ) कासार उद्योजक सामाजिक संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष गणेशजी साळवी यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी कोकण विभाग सो.क्ष. कासार व मध्यवर्ती मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण कासार प्रिमीअर लिग ची सुरूवात केली. या वर्षी समाजबांधवानी उत्तम प्रतिसाद देत भरघोस निधी उपलब्ध केला या लिगचे व्यवस्थापन गोपाळकृष्ण मंडळ,ग्रामस्थ व महीला मंडळ चरई यांनी केले...जिल्हा परिषद सदस्य मा.चंद्रकांतशेठ कळंबे,मा.यशवंत कासार,अ.भा.मध्यवर्तीचे कोकण विभागीय अध्यक्ष मा.विलासजी कासार, सो.क्ष.कासार समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष मा.दगडूशेठ साळवी,सचिव कमळाकर मांगले, यांच्या हस्ते दिप प्रज्वलन तर प्रिमीअर लीगचे उद्घाटन पोलादपुर पंचायत समिती सदस्य मा.यशवंतजी कासार व प्रमुख पाहुणे मा. चंद्रकांतशेठ कळंबे साहेब यांनी केले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.अशोक गुरूजी,कमळाकरजी मांगले यांनी केले तर क्रिकेट काँमेंट्री मा.पत्रकार संदीप जाबडे, मा.प्रदीप वरंधकर, मा.उतेकर सर यांनी केले, स्कोर रे
Image
  सुतारवाडी येथे संजय मित्र मंडळातर्फे शिवजयंती साजरी सुतारवाडी:-  (हरिश्चंद्र महाडिक ) सुतारवाडी नाक्यावर गेल्या 22 वर्षापासून संजय मुंबरे मित्र मंडळातर्फे शिवाजी महाराज यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी केली जाते. प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित श्रीं ची पुजा, भजन आदि कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून करण्यात आले.               संजय मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय मुंबरे, उपाध्यक्ष राजूबुवा दळवी, सचिव प्रशांत तटकरे, खजिनदार वसंत मुंबरे तसेच सदाशिव कोदे आदिंनी शिवजयंती पार पाडण्यासाठी खूपच मेहनत घेतली.
Image
  खांब चिल्हे देवकान्हे विभागात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील खांब चिल्हे देवकान्हे विभागात खांब देवकान्हे विभागातील मौजे खांब, नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे, बाहे, देवकान्हे,सह विभागात ठीक ठिकाणी बहुजन प्रतिपालक ,कुळवाडी भूषण जगविश्वविख्यात छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल महामानव जातीचे उद्गाते होय सर्व धर्म समभाव ,समतेचे प्रतीक म्हणून लौकिक मिळवलेल्या एकमेव उद्वितीय छ. शिवरायांची शिवजयंती भारत वाशियांचा राष्ट्रीय उत्सव आहे ,आणि या उत्सवाचे औचित्य साधून स्वा.सु.नि.अलीबागकर महाराज,गोपालबाबा वाजे,धोंडू बाबा कोल्हटकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खांब पंचक्रोशीतील मौजे चिल्हे येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा ३९२ वे जन्मोत्सव सोहळा शनिवार दि.१९/२/२०२२ रोजी खांब देवकान्हे विभागात राजे शिवरायांची जयंती विविध कार्यक्रमानी साजरी करण्यात आली,  ज्ञानांकुर इंग्लिश मेडिअम स्कूल खांब,राजिप शाळा खांब,नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित रा ग पोटफोडे मास्तर विद्यालय व कै द ग तटकरे कनिष्ठ महाविद्यालय खांब,राजिप शाळा नडवली,
Image
      रा.जि.प.शाळा सोनसडे येथे शिवछत्रपती जंयती उ त्साहात साजरी तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील बिट शाळा सोनसडे येथे शिवछत्रपती जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  दिपप्रज्वलन करून मुख्याध्यापक वंदन सापळे, उपशिक्षक तानाजी साळुंखे, गौतम मनवर, स्नेहा तार  यांनी विद्यार्थ्यांसमवेत दर्शन घेतले.      बहुजन पालक, रयतेचा राजा छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त सर्वाच्या उत्साहाला उधाण येतं असते.विदयार्थी, विद्यार्थीनीने आपल्या राजांच्या जिवनावर कुणी गिते कुणी भाषणे अशी जय्यत तयारी केली होती.यावेळी विद्यार्थीनीने शिवगित गाऊन अंगावर शहारे आणले.तर विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या  जिवनावर भाषणे केली.     शेवटी शिक्षकांनी छत्रपती शिवराय यांचे सर्वधर्म समभाव, अठरापगड जातींना घेऊन स्वराज्याची केलेली उभारणी, युद्ध निती, याविषयी अमोल असे  मार्गदर्शन केले.
Image
  ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी, कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील खांब विभागातील ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब यांच्या वतीने शिवजयंती मोठया उत्साहात वातावरणात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली,         बहुजन प्रतिपालक ,कुळवाडी भूषण जगविश्वविख्यात छ. शिवाजी महाराज हे अखिल महामानव जातीचे उद्गाते होय सर्व धर्म समभाव ,समतेचे प्रतीक म्हणून लौकिक मिळवलेल्या एकमेव उद्वितीय छ. शिवरायांची शिवजयंती भारत वाशियांचा राष्ट्रीय उत्सव आहे आणि त्या प्रित्यर्थ १९ फेब्रुवारी रोजी या स्कूलच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते,             बहुजन प्रतिपालक वंदनीय महाराष्ट्राचे आराध्य दैवत शूर वीर पराक्रमी योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी रोजी कोलाड खांब देवकान्हे विभागातील नामवंत शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मंजुळा नारायण लोखंडे एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजन्मोउत्सव सोहळा मोट्या उत्साह वातावरणात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला यावेळी छ. शिरायांची मिरवणूक तसेच मूर्तीची प्
Image
    प्रगतीशील शेतकरी तथा  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,   पहूर ग्रामपंचायत माजी सरपंच मारुती वाळंज यांचे दुःखद निधन कै. मारुती वेटू वाळंज  गोवे-कोलाड (विश्वास निकम )  रोहा तालुक्यातील वाळंजवाडी येथील ज्येष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते,प्रगतशील शेतकरी तसेंचव पहुर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, मारुती वेटू वाळंज यांचे गुरुवार दि.१७/२/२०२२रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी आकस्मित निधन झाले.ते बळीराजा शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष, कुणबी समाजाचे पदाधिकारी, तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी होते. मारुती वाळंज हे समाजाचा न्याय निवडा करणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडने तर शेतकरी वर्गाला व त्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे या करिता अनेकदा निस्वार्थी पणे काम केले आहे. त्यामुळे ते वाळंजवाडी सुतारवाडी पंचक्रोशी सह कोलाड विभागात सर्वांनी सुपरिचित होते.                                                                                    त्याच्या अंत्यविधीसाठी असंख्य जनसमुदाय उपस्थित होता. त्यांचा पुढील दशक्रिया विधी दि. २६ फेब्रुवारी रोजी पहुर येथे तर उत्तर कार्य दि.२८ फेब्रुवारी२०२२ रोजी त्यांच्या राहत्या
Image
  शिक्षण प्रसारक मंडळ शिहू तर्फे 'नीट' परीक्षेतील टाॅपर संयुजा खाडे हिचा सत्कार    रायगड (भिवा पवार ) राष्ट्रीय स्तरावरील ' नीट ' परीक्षेत ९९.१० पर्सेंटाइल गुण मिळवून मुंबईतील नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविल्याबद्दल नागोठणे येथील कु. संयुजा टिळक खाडे ह्या विद्यार्थीनीचा शिक्षण प्रसारक मंडळ शिहू या संस्थेतर्फे शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी सत्कार करण्यात आल्या. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ शिहूचे अध्यक्ष डाॅ. आर. एन्. शेळके , उपाध्यक्ष श्री. के.के. कुथे , मुख्याध्यापक श्री. जे.जे. पाटील, विज्ञान शिक्षक श्री. आर. एल्. जाधव तसेच कु. संयुजाचे वडील श्री. टिळक खाडे व आई सौ. गीता खाडे उपस्थित होते. विशेष म्हणजे ग्रामीण भागात शिक्षण घेऊन कोणताही खासगी कोचिंग क्लास न लावता स्वयंअध्ययन व कठोर परिश्रम करुन संयुजाने हे दैदीप्यमान यश मिळवले आहे . या यशाबद्दल सर्वच स्तरांतून संयुजाने कौतुक होत आहे. दहावीमध्ये ही संयुजाने ९८ टक्के गुण मिळवून ती रायगड जिल्ह्यात अव्वल ठरली होती. भविष्यात न्यूरो सर्जन होण्याचा मानस यावेळी संयुजाने व्यक्त केला.
Image
  रोहा तालुका चर्मकार समाजाच्या वतीने जामगाव येथे संत रोहिदास जयंती साजरी संत विचारांच्या उजळणीने समाजबांधव झाले मंत्रमुग्ध! कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुका चर्मकार समाजाच्या वतीने जामगाव येथे संत रोहिदास जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात संत रोहिदासांच्या मौलिक विचारांची उजळणी करण्यात आली. यंदा छोटेखानी स्वरूपात आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संतवाणीच्या उजळणीने एक वेगळी ऊर्जा निर्मिती केली, तर संतांच्या मौलिक विचारांनी उपस्थित समाजबांधवांचे प्रबोधन झाले.      रोहा तालुका चर्मकार संघटना व संत रोहिदास नगर जामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संत रोहिदास जयंतीउत्सवाचे छोटेखानी स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर चर्मकार समाजाचे रोहा तालुकाध्यक्ष समीर नागोठकर, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत म्हशीलकर, सरचिटणीस गणेश चांदोरकर, जामगाव स्थानिक पंचायतीचे अनंत जांभळे, सहचिटणीस राजन बिरवाडकर, जगदीश नागोठकर, ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश पाबरेकर, उमेश चिपळूणकर, परेश सिलिमकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची प्रतिमापूजन व दिपप
Image
    पालकमंत्री आदिती तटकरे यांची द्रोणागिरी पर्वताला भेट       कामांबाबत अधिकारी वर्गाशी चर्चा     खाबंवली,मालाठे ग्रामस्थांन समवेत संवाद! तळा(कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील द्रोणागिरी पर्वत विकासासाठी राज्य सरकारने पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत १.५० कोटी रुपये मंजूर केले असुन  पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून या विकासकामांना गती मिळणार आहे.त्याअनुषगांने त्यांनी या भागातील ग्रामस्थांशी चर्चा करुन त्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला.आणि अधिकारी वर्गाशी या कामाबाबत चर्चा केली.  यावेळी ग्रामस्थांचे वतीने त्यांचे शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.ग्रामस्थांचे वतीने  नरेंद्र     लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी तळा उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपसभापती गणेश वाघमारे,जि.प.सदस्य बबन चाचले,      निकिता गायकवाड सरपंच शेनवली, गोविंद हिरवे ग्रा.पं.सदस्य, नागेश लोखंडे युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तळा तालुका, जगदीश शिंदे विभागिय अध्यक्ष मंगेश भगत, तन्वीर पल्लवकर, युवा कार्यकर्ते देविदास रामाणे, मालाठे ग्रामस्थ, मालाठे धनगरवाडी, खांबवली धनगरवाडी ग्रामस्थ उपस्थित हो