रा.ग.पोटफोडे विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के कु.प्रज्वल झोलगे 88.60% गुण मिळून सर्व प्रथम 

 कु.प्रज्वल झोलगे 

खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ संस्था खांब संचालित रा.ग.पोटफोडे (मास्तर) विद्यालय खांब या शाळेचा यंदाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयातील कु.प्रज्वल अशोक झोलगे हिने 88.60% गुण मिळवून सर्व प्रथम क्रमांकाने आला आहे.

एस एस सी बोर्डाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेचा इयत्ता दहावीचा निकाल 17 जून रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून या वर्षीचा रा.ग.पोटफोडे (मास्तर) विद्यालय खांब हायस्कूल चा निकाल हा शंभर टक्के जाहीर झाला आहे.सदर जाहीर झालेल्या निकालात कु. प्रज्वल अशोक झोलगे 88.60% याने गुण मिळवून सर्वात प्रथम आली आहे तर कु.नम्रता नंदकुमार कापसे 87.80% गुण मिळवून ही द्वितीय क्रमांकाने आली तर कु.संचिता हरिश्चंद्र मोरे 87.40% गुण मिळवून तृतीय तसेच कु.नीलम नामदेव वरगुडे 87.20%  हिने गुण संपादित करत चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाली .

या संस्थेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याने येथील विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक सुरेश जंगम यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तर इयत्ता दहावीच्या निकालात येथील विद्यार्थ्यांनी यशस्वी परंपरा कायमस्वरूपी टिकवून ठेवल्याने विविध स्तरांतून विद्यार्थी वर्ग तसेच शिक्षकांचे कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog