Posts

Showing posts from February, 2025
Image
रिक्षा चालकाची मुलगी बनली मर्चंट नेव्ही!    पुगांव गावची सुकन्या तन्वी लहाने हिची दक्षिण कोरिया येथे मर्चंट नेव्ही मध्ये नियुक्ती!   जिद्द,चिकाटी, परिश्रम करण्याची तयारी असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही :-कु.तन्वी मिलिंद लहाने    कोलाड: (विश्वास निकम) रोहा तालुक्याततील कोलाड परिसरातील  पुगाव गावची सुकन्या तन्वी मिलिंद लहाने हिची मर्चंट नेव्ही मध्ये दक्षिण कोरियात नियुक्ती झाली आहे.यामुळे तन्वी लहाने हिने केलेली मेहनत व जिद्द यामुळे खेडेगावातील मुली कमी नाही हे सिद्ध केले आहे.         प्रत्येक आई-वडिलांच्या मनात आपली मुलगी शिक्षण घेऊन मोठी व्हावी हे स्वप्न असते. हे स्वप्न अंगी बाळगणाऱ्या आई वडिलांचे स्वप्न पुगांव येथील तन्वी लहाने या मुलीने पूर्ण केले आहे. तन्वीचे दहावी पर्यंतचे शिक्षण हे कोलाड मधील महात्मा फुले संस्था येथे झाले. तर पुढील  शिक्षण कोलाड हायस्कूल येथे पूर्ण झाले,तिच्यातील जिद्द चिकाटी व अथक परिश्रमाने तन्वीने यशाचे शिखर गाठले असून तिने मिळवलेल्या यशाचे आज तिची तालुक्यातीने पहिली मुलगी म्हणून नेव्ही मध्ये दक्ष...
Image
  कोलाड जवळील खांब गावानजीक घटना! मुंबई-गोवा हायवेवर उभ्या असणाऱ्या ट्रेलरला मोटारसायकल स्वाराची पाठीमागून जोरदार धडक,मोटारसायकल स्वार गंभीर जखमी,    मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच!       कोलाड (विश्वास निकम ) मुंबई-गोवा हायवेवरील खांब गावानाजिक हायवेवरील रस्त्याच्या साईडपट्ट्याच्या खाली उभ्या असणाऱ्या ट्रेलरला मोटारसायकल स्वराने जोरदार धडक हा अपघात झाला या अपघातात मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे.    पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार गुरुवार दि. २०/२/२०२५ रोजी रात्री २०.२० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा हायवे वरुन पोस्को कंपनी विलेभागाड एमआयडीसी येथे जात असतांना मौजे खांब गावाच्या हद्दीत आल्यानंतर मुंबई-गोवा हायवे वर गोवा बाजुकडे जाणाऱ्या रस्त्याच्या साईडपट्टीच्याखाली ट्रेलर गाडी  क्र.एम. एच. ४६/बी. एफ./५३३९ ही गाडी उभी केली असता पाठीमागून येणारी मोटार सायकलस्वार गाडी क्र एम. एच. २०/एफ. डी./१४८९ या मोटारसायकल स्वराने ट्रेलरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला या अपघातात मोटारसायकलस्वार विराट तिवारी हा गंभीर जखमी झा...
Image
ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूल खांब येथे शिवजयंती उत्सव उत्सहात साजरा,या निमित्ताने टी.डब्लू.जे. फाउंडेशन वतीने वक्तृत्व स्पर्धा! कोलाड (विश्वास निकम )   रोहा तालुक्यातील मंजुळा नारायण लोखंडे एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी खांब येथील ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम येथे रयतेचा राजा,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मउत्सव सोहळा मोठया उत्सहात साजरा करण्यात आला या निमित्ताने टी.डब्लू.जे. फाऊंडेशन खारघर यांच्याकडून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विष्णुभाई लोखंडे,लायन्स क्लब कोलाडचे अध्यक्ष डॉ.मंगेश सानप, टी. डब्लू. जे.फाउंडेशनच्या मॅनेजर ऐश्वर्या मोहिते, संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे, मुख्यध्यापिका रिया लोखंडे, उपमुख्याध्यापिका सुप्रिया पाशिलकर,शिक्षिका ऋतुजा पवार, प्रतिक्षा धामणसे,रुपाली मरवडे,निलम दळवी, प्रियांका चिकणे, प्रज्ञा माने, दर्शना धनवी, मदतनीस श्रुती वाजे उपस्थित होत्या.              कार्यक्रमाच्या सुरवातीला शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर सर्व विद्यार...
Image
  देवाने दिलेला देहरूपी चंदन,याचा कोळसा करू देऊ नका:-ह.भ.प.विकास महाराज देवडे अहमदनगर   कोलाड (विश्वास निकम ) देवाने दिलेला देहरुपी चंदन ,त्या देहाचा कोळसा करुन देऊ नका असे मत वैजनाथ येथील विठ्ठल रखुमाई  मूर्ती स्थापनेचा २९ व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित किर्तन सेवेत ह.भ.प विकास महाराज देवडे,अहमदनगर  यांनी व्यक्त केले.       सांगतो तुम्हांसी भजा रे विठ्ठला l नाही तरी गेला जन्म वाया ll१ll  करिता भरोवरी दुरावसी दुरी l भवाचिया पुरी वाहावसी ll२ll कांही न लगो एक भावची कारण ll तुका म्हणे आण विठ्ठलाची ll                 या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभांगाच्या आधारे स्पष्ट करतांना ह.भ.प.विकास महाराज देवडे यांनी सांगितले की एका प्रांताचा राजा शिकारीसाठी जंगलात गेला त्यांनी एका प्राण्याची शिकार करण्यासाठी धनुष्याला बाण लावणार तेव्हा राजाचा पाय चुकून एका विषारी सापावर पडणार एवढ्यात एका लाकडाची मोळी विकणाऱ्यांनी पहिले त्यांनी राजाला ढकलून दिले आणि राजाचे प्राण वाचवले त्यामुळे राजांनी त्याला सांगितले ...
Image
  रायगड जिल्हा क्रीडा व व्यक्तिमत्व विकास जिल्हास्तरीय स्पर्धेत रा जि प शाळा पुगांव शाळेची नेत्रदीपक कामगिरी!     कोलाड  (विश्वास निकम ) रायगड जिल्हा क्रीडा व व्यक्तिमत्व विकास जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक १४ व १५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार विजेती शाळा वडगाव ता खालापूर येथे पार पडली. या स्पर्धेत लहान गट समूहगीत गायन  या गटात रायगड जिल्हा परिषद शाळा पुगांव ने रोहा तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना द्वितीय क्रमांक पटकावला. पुगांव शाळेच्या या दैदिप्यमान  कामगिरीत  शाळेचे विध्यार्थी  आराध्य देशमुख,  श्रीयोग सुतार,रुही देशमुख, आरोही देशमुख, विभा बर्जे, समर्थ धूपकर, शौर्य मासक,अनन्या देशमुख,शुभ्रा देशमुख, साई बामणे,ओमकार देशमुख या विदयार्थ्यांनी गायन, वादन व आकर्षक वेशभूषा या तिन्ही उत्कृष्ट सदरीकरण करून स्पर्धेचे उपविजेते पद पटकावले. या सर्वाना उत्कृष्ट मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री निवास थळे व उपशिक्षक श्री प्रसाद साळवी यांनी केले. या स्पर्धेसाठी शाळेस  माजी विदयार्थी श्री राजेंद्र धनवी यांनी नेपथ्य साहित्य,...
Image
  बाहे गावातील कलिंगडे निघाली परदेशाला,जगदीश थिटे यांनी घेतले कलिंगडचे उत्तम पिक! कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यात बाहे गाव हे भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव आहे गावातील असंख्य शेतकरी अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात  भाजीपाला व्यवसाय करीत आहेत. एवढेच नाही तर १९८९ च्या पुरामुळे गावाचे पुनर्वसन झाले यामुळे आपल्या शेतीपासून येथील गावकऱ्यांना दूर रहावे लागले परंतु तरीही येथील शेतकऱ्यांनी कधीही हार मानली नाही. उन्हाळी शेतावर झोपडी बांधून भाजीपाला व्यवसाय सुरु ठेवला आहे.  परंतु बाहे येथील शेतकरी जगदीश थिटे यांनी भाजीपाला पिक सोडून यावर्षी कलिंगड यांचे पिक घेण्याचे ठरविले.सर्व मेहनत करुन कलिंगड याचे पिक उत्तम प्रकारे आले आहे तसेच कलिंगडचे फळ ही मोठे झाले आहे शिवाय कलर लालसर व त्याची चव अतिशय गोड असल्यामुळे या कलिंगडला परदेशातून मागणी आल्यामुळे ही कलिंगड परदेशात रवाना झाली आहेत.यामुळे शेतकरी जगदीश थिटे यांनी केलेली मेहनत कामी आली असुन त्यांना या कलिंगड पिकापासून फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे.
Image
  ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूलच्या चार विद्यार्थिनीनी  राज्यपुरस्कारासाठी दिली परीक्षा! कोलाड (विश्वास निकम):-  रोहा तालुक्यातील मंजुळा   नारायण लोखंडे एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी खांबचे ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम चार विद्यार्थीनी स्काऊट व गाईडच्या राज्य पुरस्कारासाठी परीक्षा दिली. विशेष म्हणजे रायगड मधील ४ स्कूलच्या विद्यार्थीनीनी परीक्षा दिली असुन यामध्ये रोहा तालुक्यातील ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूल खांब येथील एकमेव स्कूलच्या मुलींनी सहभाग घेतला.व आर्या चितळकर,आराध्या कचरे,श्रुती धनावडे,आर्या कनघरे या चार मुलींनी परीक्षा दिली.   या राज्यपूरस्कारासाठी रायगड, ठाणे, पालघर, या जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. यामध्ये नियम, वाचन, इतिहास, स्काऊट गाईडची प्रार्थना,झेंडा गीता, राष्ट्रगीत,राष्ट्रध्वज, जागतिक ध्वज  यांच्या तोंडी परीक्षा तसेच प्रात्यक्षिक,लेखी, परीक्षण अशा विविध प्रकारच्या परीक्षा घेण्यात आल्या.     दादर,मुंबई येथे घेण्यात आलेल्या परीक्षेत दादर येथील परीक्षक औटी मॅडम,हेमांगी मॅडम,मार्गदर्शक जिल्हा संघटक आयुक्त ...
Image
  कोलाड इंदापूर दरम्यात रखडलेल्या कामांची युवा नेते अनिकेतभाई तटकरे यांनी केली पाहणी, तळवली येथील ग्रामस्थाना दिलासा! कोलाड( विश्वास निकम ) मुंबई गोवा महामार्गावरील कामाचा पेच दिवसेंदिवस ठेकेदारांकडून अडचणीचा ठरत असल्याने त्यांचा अंधाधूनी कारभार आणि ठेकेदाराची मनमानी दिवसेंदिवस मार्गालगत असलेल्या ग्रामस्थ नागरीकांना डोकेदुखी ठरत असल्याने अशा या ठेकेदाराच्या गलथान कारभारावर तळवली तर्फे दिवाली येथील ग्रामस्थ नागरिकांची गेली बारा वर्षे काम रखडल्याने मोठी हेळसांड होत असल्याने ते कमालीचे आक्रमक होत.त्यामुळे ठेकेदार विरोधात मोठा एल्गार करत येथील पादचारी उड्डाण पूल आणि सर्व्हिस रोड त्याच बरोबर त्याला जोडला गेलेला गावाकडे जाणारा मार्ग याचे काम अर्धवट त्यामुळे अनेकदा शासन दरबारी तसेच आमदार खासदार यांच्याकडे ग्रामस्थानी पाठपुरावा केला त्याची दखल घेत शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी युवा नेते तथा माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी पाहणी केली.तर पाहणी दरम्यान येथील कामासंदर्भात पादचारी उड्डाण पूल तसेच गावाला जोडला गेलेला रस्ता सर्व्हिस रोड त्याला जोडली गेलेली गटार लाईनच्या कामात कोणतेही हायगय करू नका...
Image
  लायन्स क्लब कोलाड रोहा आयोजित आंबेवाडी येथील  मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! ६४ जणांची तपासणी १२ जणांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया!     कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील हनुमान मंदिरात लायन्स क्लब कोलाड लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग तसेच जय हनुमान मित्र मंडळ  यांच्या वतीने बुधवार दि.१२ जानेवारी २०२५ रोजी मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याला येथील रुग्णांनी भरभरून प्रतिसाद देत सदरच्या शिबिरात ६४ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून १२ जणांवर मोती बिंदू शस्त्रक्रिया होणार आहे.      लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए ४ यांच्या कृपाछत्राखाली तसेच क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ सागर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गेली चार वर्षे अविरतपणे कोलाड विभाग परिसरात कोलाड लायन्स क्लब ही सेवा भावी संस्था सामजिक शैक्षणीक कला क्रिडा सांस्कृतिक आरोग्य पर्यावरण अशा विविध क्षेत्रात काम करत ग्रामीण भागातील तळागाळातील गोर गरीब कष्टकरी शेतकरी जनतेच्या हितासाठी विविध उपक्रम राबवत आहे. आंबेवाडी...
Image
  पुई गावची समिक्षा लहाने मुंबई पोलीस व कारागृह पोलीस दोन्ही परीक्षा एकाच वेळी उत्तीर्ण   विविध स्तरावरून अभिनंदन!    कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यात कोलाड परिसरातील पुई गावची सुकन्या समिक्षा सूर्यकांत लहाने हिने प्रतिकुल परिस्थिती वर मात करीत प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर मुंबई पोलीस व कारागृह पोलीस या दोन्ही परीक्षा एकाच वेळी उत्तीर्ण झाली या यशाबद्दल तीचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.                  समिक्षा लहाने हिच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी मृत्यू झाले आहे.त्यामुळे तीच्या वडिलांचे छात्र हरवले आहे. परंतु ती न डगमगता तिने मुंबई पोलीस व कारागृह पोलीस दोन दिल्या व कठोर मेहनत व जिद्दीने ती उत्तीर्ण झाली. या यशाबद्दल तीचे कोलाड लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर सानप,अध्यक्ष डॉ.मंगेश सानप, उपाध्यक्ष डॉ.विनोद गांधी,उपाध्यक्ष डॉ. श्यामभाऊ लोखंडे,सचिव रविंद्र लोखंडे,खजिनदार राजेंद्र कप्पू,गजानन बामणे,नरेश बिरगावले,अलंकार खांडेकर,नंदकुमार कळमकर, विश्वास निकम,विठ्ठल सावळे,दिनकर सानप,दिलीप मोहिते तसे...
Image
  गोवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निशा जवके यांची बिनविरोध निवड  कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील गोवे  ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदी गोवे गावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ.निशा नितीन जवके यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रशासनाच्या नियमांचे पालन करून मोठ्या उत्साहात पार पडत सौ निशा जवके यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.    खासदार सुनिल तटकरे,कॅबिनेट मंत्री आदितीताई  तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे,यांच्या माध्यमातून तसेच सरपंच महेंद्र पोटफोडे यांच्या प्रयत्नाने या ग्रामपंचायती मधील असंख्य विकास कामे मार्गी लागली आहेत यामुळे या  ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाचे गेली पंधरा वर्षांपासुन बिनविरोध वर्चस्व आहे,त्यामुळे ठरलेल्या ठराविक कालावधीनंतर राष्ट्रवादीचे उपसरपंच सुमित गायकवाड  यांचा कार्यकाळ संपल्यानंतर या ग्रामपंचायतीवर सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी ठरवल्या प्रमाणे सौ. निशा जवके यांना संधी देत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.   ...
Image
  कोलाड येथे नव्या कायद्यांच्या कार्यशाळा प्रशिक्षणाला सामाजिक संस्था,विद्यार्थी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,   दैनिक पुढारी रायगड आयकॉन उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेते विश्वास निकम यांचा सत्कार!  कोलाड- हेटवणे (संतोष निकम) कोलाड पोलीस ठाणे व ऍडो. समिर सानप यांच्या विशेष सहकार्यातून द.ग. तटकरे माध्यमिक हायस्कूल येथील सभागृहात कोलाड विभाग परिसरातील सामाजिक संस्था, विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी नवे लागू करण्यात आलेल्या नवीन कायद्यांचे अनुषंगाने कार्यशाळा प्रशिक्षण आयोजित करण्यात आली होती याला परिवारातील सामाजिक संस्था विद्यार्थी व नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कोलाड पोलिस स्टेशन आणि ऍड.समिर सानप  यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळा प्रशिक्षणास कोलाड पोलिस निरिक्षक नितीन मोहिते, ॲड. समिर सानप,पो.उपनिरीक्षक नितीन चौधरी, तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा प्रितमताई पाटील,कोलाड हायस्कूलचे प्राचार्य तिरमिले, गोवे तंत्रनिकेतन कॉलेजचे प्रा.देशमुख, विनायक पोटफोडे,संजय कुर्ले,विजय सानप,सहदेव कापसे,चिल्हे हाय.मुख्याध्य...
Image
  कोलाड हायस्कूल कोलाड मधील माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा उत्साही वातावरणात संपन्न!  सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी वर्ग यांचा केला सत्कार!  कोलाड (विश्वास निकाम)  कोलाड हायस्कूल कोलाड मधील १९८० ते २००५ पर्यंत शिक्षक घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी द.ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक कोलाड येथील सभागृहात मोठया उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी रोहा तहसीलदार किशोर देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र दौंडकर, सेवा निवृत्त पोलीस अधिकारी संजय धुमाळ, कोलाड सपोनि नितीन मोहिते, संस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र लिमये, रविकांत घोसाळकर, माजी सरपंच सुरेश दादा महाबळे, यांच्यासह असंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते.        मेळावा संस्कारांचा, मेळावा गुरुजनांच्या ऋणमुक्ततेचा, मेळावा गुरुजनांच्या आदर सत्कारांच्या या ओवी प्रमाणे सर्व गुरुजन व कर्मचारी वृंद यांना स्टेज पर्यंत पुष्प वर्षाव करीत आणण्यात आले.यानंतर वाघ सर,ओंकार पाटील सर,अष्टेकर मॅडम,महाबळे मॅडम, एच. डी. पाटील सर, सय्यद सर, विद्वांस मॅडम, थोरबोले सर, गा...
Image
  छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित "अविष्कार कल्पकतेकडून कृतीकडे" राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत विज्ञान प्रकल्प सादरीकरण स्पर्धा उत्साहात संपन्न!   पुढील काळात अंतराळातील संशोधन  टेक्नॉलॉजीचे नेतृत्व छत्रपती शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थी करेल  तर खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती होईल! :- डॉ. नंदकिशोर जोशी    कल्याण प्रतिनिधी)नुकत्याच अविष्कार कल्पकतेकडून कृतीकडे, या राष्ट्रीय शिक्षक धोरण 2020 अंतर्गत विज्ञान प्रकल्प सादरीकरण स्पर्धा दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण येथे संपन्न झाली.   छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार करून व माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन करण्यात आले.  या वेळी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुभाष पाटील विज्ञान भारती प्रांत कार्यकारिणी सदस्य हे  म्हणून उपस्थित होते. विज्ञान प्रतिकृतीचे उद्घाटन  कार्यक्रमाचे अतिथी सुभाषजी पाटील यांच्या हस्ते तसेच विद्यार्थ्यांनी विज्ञान गीताने करण्यात आले. या व...