Posts

Showing posts from January, 2024
Image
  शारदा विद्यालय पडघा येथे भारताचा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा  भिवंडी (प्रतिनिधी) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित शारदा विद्यालय पडघा येथे भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  भिवंडी तालुक्यातील शारदा विद्यालय पडघा येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी पंचायत समितीचे उपसभापती गुरुनाथ जाधव  तसेच समाजसेवक व उद्योजक  सचिन बिडवी  हे उपस्थित होते.यावेळी ध्वजारोहण उपसभापती गुरुनाथ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.  दीप प्रज्वलन व भारत मातेचे पूजन समाजसेवक सचिन बिडवी यांच्या हस्ते करण्यात आले विद्यालयातील शिक्षक श्री.केदार सरांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल भालेराव यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या विभूतींची माहिती प्रस्ताविकेत करून दिली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन, पोवाडे, सादर केले. तसेच डोळे दिपवणारे मानवी मनोरे, कवायती, यांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक  ठाकूर सर यांनी केले तर कवयात,मानवी मनोरे संपूर्ण तयारी दिवाकर वाघ सर य