Posts

Showing posts from September, 2023
Image
डाॅक्टरांच्या संगीत प्रेमी म्युझिकल ग्रुपचा वर्धापन दिन संपन्न,   सुरेल आठवणीत वर्ष सरले कळलंच नाही! उतेखोल/माणगांव (रविंद्र कुवेसकर) माणगांवातील हौशी डाॅक्टरांच्या संगीत प्रेमी म्युझिकल गृपचा प्रथम वर्धापन दिन  दि. ८ सप्टेंबर २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाला. हौशी लोकांना एकत्र जोडण्यात संगीताचे खरे सौंदर्य असते. 'संगीतम् सर्वत्र भ्राजते' म्हणजे संगीत सर्वाना प्रकाशमय करते. संगीत प्रेमी ॲड. मोहन मेथा, डॉ. सुकेशनी डोंगरे, डॉ. श्रीकांत वैद्य, डॉ. स्नेह राऊत, सौ. राऊत, डॉ. अजय मेथा, डॉ. अमीत मेथा, स्नेहल परांजपे, सौ. रजनी शेठ, सौ. दिक्षा देसाई, डॉ.सचीन चव्हाण, डॉ.अक्षरा चव्हाण, डॉ.अनुजा पाटसकर, राजा पोवार यांनी एकत्र येऊन माणगांवात एक समुह स्थापन केला याला एक वर्ष झालं हे वर्ष अनेक आनंददायक सुरेल आठवणीत कधी सरल ते या संगीतप्रेमींना कळलंच नाही अस त्यांनी म्हटल आहे. आपल्या संगीताच्या वेडापायी हा एक सुंदर, ग्रुप एकत्र येवून स्वत:ला आणि समाजाला आपल्या गायनाच्या कलागुणांतुन निखळ आनंद देण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्व सहभागातून एक वर्षापूर्वी त्यांनी आपल्या या सुरेल मैफीलीचा पहिला कार्यक