एस.एस सी. परीक्षेत झळकल्या वांगणी हायस्कूलच्या 'पंचकन्या' 

 नागोठणे (प्रतिनिधी)  रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय वांगणी या शाळेने दहावीच्या उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. या वर्षी झालेल्या एस.एस. सी. परीक्षेचा या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून पहिल्या पाच क्रमांकावर मुलींनीच बाजी मारली आहे. या ' पंचकन्यां ' चे सर्वत्र कौतुक होत आहे. या पंचकन्या पुढीलप्रमाणे आहेत : प्रथम - कु. रिया सुभाष मोरे ( ९२.२० % ) , द्वितीय- कु. पायल संदीप भोसले ( ९० .८० % ) , तृतीय - कु. प्रज्ञा अनिल सुतार ( ८६.८०% ) , चतुर्थ - कु. श्रुती वसंत जाधव ( ८६.४० % ) , पंचम - कु. सानिका शांताराम भिसे ( ८३. ६० % ) कु. रिया मोरे ही नागोठणे केंद्रात पहिली आली आहे.

 विशेष म्हणजे ही शाळा ग्रामीण भागात असून कोणतीही खासगी शिकवणी न लावता या मुलींनी हे दैदीप्यमान यश मिळवले आहे. कोरोनामुळे उशीरा सुरु झालेल्या शाळा , कोरोना संक्रमणामुळे धास्तावलेले पालक व विद्यार्थी या सर्व गोष्टींवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करून जादा अभ्यास वर्ग व भरपूर सराव परीक्षा घेऊन हे उज्ज्वल यश संपादन केले आहे. शाळेचे मुख्याध्यापक जयहिंद ठाकूर , दहावीचे वर्गशिक्षक व गणित विज्ञान शिक्षक टिळक खाडे तसेच विषय शिक्षक अरविंद शेळके , नरेंद्र पाटील, विकास म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले . या यशाबद्दल सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, उपाध्यक्ष रवींद्र लिमये , कार्याध्यक्ष गीता पालरेचा , सचिव रविकांत घोसाळकर तसेच स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष मधुकर ठमके , रोहा पंचायत समिती सदस्य संजय भोसले , माजी सभापती सदानंद गायकर , शाळा समिती सदस्य सुरेश शिनगारे , अनंत कोतवाल , हरिश्चंद्र तेलंगे , चंद्रकांत जांबेकर आदी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.


 एस.एस.सी.परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनींचे पेढा भरून कौतुक करताना दहावीचे वर्ग शिक्षक टिळक खाडे सर 

Comments

Popular posts from this blog