Posts

Showing posts from October, 2022
Image
  रोहा वरसे ग्राम पंचायत कचरा डंपिंग ग्राउंड प्रश्न ऐरणीवर, लवकरात जागा उपलब्ध करून मिळावी रोहा तहसीलदार यांना दिले निवेदन! कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील वरसे ग्राम पंचायत हद्दीतील कचरा डंपिंग समस्या गेली पंधरा दिवसांपासून मोठी अडचणीची ठरली आहे जागे अभावी घनकचरा कोठेही फेकता येत नसल्याने ही गंभीर समस्या ग्राम पंचायतीसमोर झाली असून शासनाकडून जागा उपलब्ध करून मिळावी याकरता सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी ग्राम पंचायतीच्या वतीने रोहा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. ग्रामपंचायती हद्दीतील वाढती लोखंसंख्या पाहता दिवसेंदिवस घनकचऱ्यात देखील वाढ झाली आहे त्यामुळे शासनाकडून कचरा डंपिंग ग्राउंड याकरता जागा उपलब्ध करून मिळावी यासाठी ग्राम पंचायतीचे विद्यमान सरपंच नरेशशेठ पाटील,उपसरपंच अमित मोहिते,रामाशेठ म्हात्रे ,सह ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी रोहा तहसीलदार यांना निवेदन दिले व यासाठी मागणी केली आहे. सदरच्या निवेदनात ग्रामपंचायत वरचे हद्दीतील मौजे वरसे निवी भुवनेश्वर गावांची साधारणपणे लोकसंख्या 20000 आहे तरी दररोजचा कचरा एक ते दीड टन पेक्षा जास्त कचरा निघतो कचरा घंटागाडीमार्फत उचल
Image
  ओबीसी संघटना वाढीला बळ,तर अन्याया विरोधात लढा उभारणार:-सुरेश मगर यांचे रोह्यात रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चा सभेत प्रतिपादन! कोलाड (श्याम लोखंडे) राज्यासह देशभरात ओबीसीचे संख्याबल अधिक आहे त्यामुळे ओबीसीला त्यानुसारच आरक्षण दिले गेले पाहिजे सन 1931 नंतर संपूर्ण देशात ओबीसींची जनगणना सरकारने केली नाही त्यामुळे काहीसा हा ओबीसी समाज व त्याला शासनाच्या मिळणाऱ्या सोयी सुविधा या पासून वचिंत राहिला आहे गेली अनेक वर्षे देशातील राजकीयदृष्ट्या पाहिले तर देशात बहुसंख्येने असलेला ओबीसी समाज हा राजकीयदृष्ट्या मागासलेला आहे आर्थिक बळ नाही निवडणुकीत त्याला पुरेसा आरक्षण नसल्याने त्याची पिछेहाट होत आहे तर उच्च वर्णीय समाज त्याचा गैरवापर करत आहे त्यामुळे येत्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांना एकत्रित गठित करून ओबीसी समाजाच्या वाढीवर भर देत त्यांना बळ देऊन समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढा उभारला जाणार असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती व ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष सुरेश मगर यांनी रोहा येथील आयोजित केलेल्या जिल्हा कार्यकरणी
Image
  रोहिणी महाबळे यांचे अल्पशा आजाराने निधन कै. रोहिणी महाबळे   कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण)   रोहा तालुक्यातील पाले बु. येथील रहिवाशी रोहिणी गोविंद महाबळे यांचे बुधवार दि.२६/१०/२०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्षाचे होते. त्या अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वरूपाने सर्वाना परिचित होत्या.त्यांचे पती शिक्षक होते. परंतु ते अनेक वर्षे आजारी होते.परंतु त्यांनी न डगमगता पतिसेवा केली.पतीच्या निधनानंतर त्यांनी आपले कुटुंब संभाळले.    त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली,जावई,दिर,जावा,पुतणे, नातवंडे व मोठा महाबळे कुटुंब आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.४ नोव्हेंबर तर उत्तर कार्य विधी रविवार दि.६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांच्या निवास्थानी होणार आहे.
Image
  पेणचा स्वरूप शेळके अभियांत्रिकी पदवीका परीक्षेत राज्यात प्रथम  ९९.७०% गुण मिळविले स्वरूपवर अभिनंदनाचा वर्षाव! कोलाड (श्याम लोखंडे) रायगड जिल्ह्या पेण तालुक्यातील व पेण शहरातील स्वरूप सुदर्शन शेळके या विद्यार्थ्याने अभियांत्रिकी पदविका परीक्षेत ९९.७०% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे तर याच्या या यशस्वीपणे कामगिरी बद्दल स्वरूपवर सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रायगड जिल्ह्यातील नामांकित व नावलौकिक असलेल्या लोणेरे येथील इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअरिंग ( बाटू ) या कॉलेज मधुन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या स्वरूप शेळके ह्या विद्यार्थीने पदविका परीक्षेत तब्बल ९९.७०% मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावुन कॉलेजच्या नावाची तसेच आपल्या आई वडिलांची प्रतिष्ठा अधिक उंचावत प्रकाशमान केली आहे. 27 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या निकालात स्वरूप ने उत्तमरीत्या यश प्राप्त झाले आहे अशी प्रतिक्रिया बाटू कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. मधुकर दाभाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोणत्याही खाजगी क
Image
  दिवाळी पहाट असंख्य दिव्यांनी उजळून निघाला अवचितगड शिवशंभु प्रतिष्ठाने ऐतिहासिक महत्त्व जपत केला दीपोत्सव  साजरा कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील गडसंवर्धनातील अग्रमानांकीत शिवशंभु प्रतिष्ठान या संस्थेमार्फत अवचितगडावर दिवाळी पहाट निमित्ताने औचित्य साधून येथील शिवप्रेमी शिलेदारांनी व ३५० मावळ्यांच्या उपस्थितीत दिपावली पहाटचा ऐतिहासिक असा दिव्यांच्या ज्योत पेटवत दीपोत्सव कार्यक्रम करत मोठ्या उत्साहात साजरा केला तर संपूर्ण अवचितगड हा दिव्यांनी सजल्यानी उजळून निघाला होता .त्यामुले एक ऐतिहासिक स्वरूप याप्रसंगी या गडावर आल्याचे सर्वांना पहावयास मिळाले. शिव छञपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील अवचितगडावर शिवशंभु प्रतिष्ठान मार्फत गेली आठ वर्ष गडकोट संवर्धन मोहिमांचे आयोजन केले जाते. त्याच सोबत पहिले तोरण गडाला या भावनेतून दसरा गडपुजन तथा पहिला दिवा गडकोटांच्या चरणी या भावनेने दिपावली पहाटचे आयोजन केले जाते. दिपावली पहाटचे औचित्य साधून या कार्यक्रमाला रोहा तालुक्यातील असंख्य शिवप्रेमी शिलेदार युवक तरुण आवर्जून उपस्थित असतात. या राञी गडावर शिवकालीन
Image
  ओबीसी जनमोर्चाच्यावतीने जातीनिहाय जनगणनासाठी रायगडात १० नोव्हेंबर रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा निघणार! न्यायी हक्कासाठी,भावी पिढीच्या उत्कर्षासाठी हजारो समाज बांधव उपस्थित राहणार! कोलाड (श्याम लोखंडे) ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना होत नाही तो पर्यंत ओबीसींची संख्या कळणार नाही.त्यामुळे ओबीसीचे अपेक्षीत हक्क मिळणार नाही.यासाठी जातीनिहाय जनगणना ची मागणी घेत ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चा च्या वतीने १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जातीनिहाय जनगणना सह अन्य मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांचा धडक मोर्चा काढणार असल्याचे रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न जनमोर्चा यांची जिल्हा कार्यकरणी बैठकीत ठरविण्यात आले. रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न जनमोर्चा या संघटनेची सभा नुकतीच शासकीय विश्रामगृह रोहा येथे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश मगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आली यावेळी सर्व ओबीसी बांधव यांच्या समावेत ही घोषणा करण्यात आली आहे  यावेळी प्रमुख उपस्थितीत ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर,ओबीसी जनमोर्चा उ
Image
  आनंदाच्या दिवाळीचा शिधा किट आधारभूत धारकांना पोहचलेच नसल्याने स्वस्त धान्य दुकानदारांसह धारक प्रतीक्षेत!   देता येत नसेल तर फुशारक्या  मारायच्या कशाला?   शिधा धारकांचा सरकारला सवाल! कोलाड (श्याम लोखंडे) राज्य सरकारने ऐन दिवाळी तोंडावर येताच तसेच  राज्यातील सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी स्वस्त स्वरूपात व फक्त १०० रुपयांमधे प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला. राज्यातील सात कोटी शिधापत्रिका धारकांना  याचा फायदा होईल असं सांगण्यात आलं. त्यासाठी घाईघाईत एका संस्थेला ५१३ कोटी रुपयांचं याकरिता कंत्राट देखील देण्यात आलं. मात्र दिवाळी तोंडावर आलेली असताना देखील हा आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानापर्यंत ऐन दोन दिवस दिवाळीला शिल्लक असून काळ रविवारपर्यंत ग्रामीण भागात पोहोचलेला नाही तर रेशन धान्य दुकानदाराने यासाठी पैशाचा देखील भरणा शासनाकडे भरला त्यामुळे धान्य दुकानदारांसह रेशन धारकही या आनंदाच्या शिधा किटकडे डोळे लावून बसले आहेत. दिवाळीला एक दोन दिवसच शिल्लक राहिले आहेत त्यात राज्य सरकाने जाहीर केलेले दिवाळी सणासाठी  शि
Image
  एसटी बस सेवा वेळापत्रक झाले बेभरवशाचे वेळेवर बस सुविधा मिळत नसल्याने प्रवाश्यांचा संताप तर एकच झुंबड, कोलाड(श्याम लोखंडे) राज्याच्या सत्ता संघर्ष नाट्यात सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत तर एकीकडे नेतेमंडळी एकमेकांचे वस्त्रहरण करण्याच्या नादात तर सत्तेची खूर्ची ही आपल्याकडेच ठिकून राहिली पाहिजे यासाठी मोठं मोठया उपाययोजना आखल्या जातात त्या किती अमलात तर किती अर्धवट याचे कोणालाही गणित नाही त्यामुळे सर्व सामान्य जनता ही त्यात कायम भरडली जात आहे तर कोकणातून मुबंईकडे तर मुबंईतुन कोकणाकडे धावणाऱ्या महामंडळाच्या प्रवासी एसटी बस सुविधा सेवा बेभरवशाच्या झाल्या आहेत कोणतीच एसटी बस वेळेवर मिळत नसल्याने महाडकडून मुबंईकडे जाणारे व मुबंई पनवेल कडून महाडकडे प्रवास करणारे प्रवाशी अक्षरशः संतापले असून दीड दोन तासाने एखादी बस आली रे आली की त्या बसवर प्रवाश्यांची एकच झुंबड होत आहे.तर तीच अवस्था पनवेल बस स्थानकात प्रवाशी वर्गाची होत असून पनवेलहुन नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव,महाड कडे येणाऱ्या प्रवासी वर्गाची होत आहे.तर खाजगी वाहने मनमानी प्रमाणे इंदापूर ते पनवेल तसेच पनवेल हुन कोलाड इंदापूर
Image
  परोपकारी वृत्तीच्या पुगाव गावच्या श्रीमती सुनीता देवकर यांचे दुःखद निधन खांब(नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील पुगांव गावच्या रहिवासी श्रीमती सुनीता देवकर यांचे मंगळवार दिनांक 11/10/22 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धपकाळात व अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाने देवकर परिवारांवर दुःखाचे डोंगर व पुगाव परिसरात शोककळा पसरली आहे . श्रीमती सुनीता देवकर या सर्वांना भीमा या नावाने सुपरिचित होत्या तसेच त्यांचा स्वभाव शांत संयमी प्रेमळ असा होता सर्वांच्या परोपकारी पडणाऱ्या संयमी वृत्तीच्या,मित भाषी,नम्र स्वभाव,व दयाळू अंतःकरणाच्या,पशु प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या होत्या. त्यांच्या निधानाची वार्ता समजतात समाजातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय आप्त-स्वकीय मित्र परिवार व नातेवाईक सगेसोयरे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेत त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.त्यांच्या पश्चात दोन मुलगे,एक मुलगी,नातवंडे,असा मोठा देवकर परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी पुगांव येथील श्री कमलेश्वर मंदिर शेजारील तलावावर होतील तर अंतिम धार्मिकविधी तेरावे रविवार दिनांक
Image
  पुगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निलम कळमकर यांची बिनविरोध निवड               खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील पुगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ नीलम कळमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या ग्राम पंचायत मधील पदावर कार्यरत असलेले उपसरपंच राम धुपकर यांनी आपल्या ठराविक ठरलेल्या कार्यकाळ प्रमाणे व दिलेल्या वचनाप्रमाणे या पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झालेल्या उपसरपंचपदी कार्यरत असलेल्या सदस्या सौ नीलम कळमकर यांची सर्व सदस्यांच्या उपस्थितीत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादी पक्षाचे रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे ,यांच्या कृपाआशीर्वादाने ,रायगडच्या माजी पालकमंत्री तथा आमदार कु. अदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस जेष्टनेते नारायणराव धनवी यांच्या प्रमुख उपस्थितीत यांची निवड करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक गोविंद शिद, पवार मॅडम ,व पुगांव गावचे जेष्ठ नागरिक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ट नेते नारायणराव धनवी, यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. प्रसंगी यावेळी आंबेवाडी ज
Image
  राज्यातील 0 ते 20 पटसंख्येच्या शाळा बंद करू नका-राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाची मागणी ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ राज्य सरचिटणीस अनिल नाचपल्ले    माणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने 21 सप्टेंबर 2022 रोजी एक पत्र निर्गमित करणेत आले असून त्या पत्रानुसार राज्यातील *0 ते 20 पटसंख्येच्या शाळा बंद करनेच्या सूचना शिक्षण आयुक्तांना देणेत आल्या आहेत.* त्यानुसार राज्यातील शिक्षणाधिकारी यांचे मार्फत ही कार्यवाही राज्यभर सुरू ही करण्यात आली आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व बालकांचा शिक्षण हा हक्क आहे. सर्व बालकांना  शिक्षण देणे,तेही मोफत व त्यासाठी व्यवस्था करने ही शासनाची जबाबदारी असताना, आर्थिक कारण समोर करून या शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. एकीकडे शाळांची स्थिती सुधारण्याऐवजी त्या बंदच करणे हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. तसेच बालकांच्या संविधानिक हक्काचे उल्लंघन ठरेल. यासाठी सामाजिक लढा उभारणे गरजेचे आहे. कारण  राज्यातील ग्रामीण भागात वाडी, वस्ती, तांडे याठिकाणासह  अवघड क्षेत्रात, पेसा व नक्षलग्रस्त भागात ज्या शाळा
Image
  रोहा चिल्हे येथे धाक्सुद महाराज पालखी सोहळा मोठ्या उत्साहात, पुष्पवृष्टीची उधळण करत धाक्सुद महाराजांचा जयघोष!  कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आराध्य ग्रामदैवत धाक्सुद महाराज यांचा नवरात्रोत्सव हा रोहाचे आराध्यदैवत धावीर महाराज यांच्या प्रमाणेच साजरा केला जातो नवरात्रीचे नव दिवस येथील ग्रामस्थ व धाक्सुद क्रीडा मंडळाचे युवक विविध कार्यक्रम व उपक्रम करत दासराउत्सव साजरा करतात तर अकराव्या दिवशी श्री धावीर महाराज यांच्या पालखी सोहळ्याबरोबरच येथील या देवाचा पालखी सोहळा येथील ग्रामस्थ महिला युवक व युवती एकत्रितपणे साजरा करतात तर पालखीवर फुलांची उधळण करत तसेच फटाक्यांची आतषबाजी लेझीम पथक ,फुगडी,नाच गाणे ,धार्मिक तथा आध्यत्मिक सतं महातम्यांच्या अभंगाने नामघोष करत हा सोहळा मोठ्या आनंदात साजरा झाला. या उत्सवानिमित्त मंदिराचा संपूर्ण व गाव परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले होते,प्रत्येकाने आपल्या अंगणात धाक्सुद महाराज,भैरव,चिल्लाई माता,जोगेश्वरी, हनुमंत राय या देवांची पालखी येणार असल्य
Image
  रोहयात सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या भव्य नवरात्रोत्सवात हजारो गरबा रसिकांनी धरला ठेका  भक्तीचा जागर अबालवृद्धांचा उत्साही सहभाग,   नवदुर्गांचा सन्मान! माजी पालकमंत्री आदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे यांनी धरला ठेका! खांब (नंदकुमार कळमकर) रायगडचे लोकप्रिय खा.सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली खास रोहेकर गरबा रसिकांसाठी माजी पालकमंत्री आमदार आदिती तटकरे, व आ.अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून रोहा शहरात कुंडलिका नदी संवर्धन येथे भव्य स्वरुपात आयोजित नवरात्रौत्सवात रोहा शहरासह ग्रामीण भागातील आलेल्या गरबा प्रेमीनी अॅर्केस्टच्या सुरेल गीतांवर ठेका धरला.तरुणाई थिरकत असताना महीला व ज्येष्ठांनीही याचा भरभरून आनंद लुटला.ऐरवी राजकीय पदाधिकारी असलेल्या कार्यकर्ते ही ठेका धरताना दिसले‌ ही संकल्पना भव्य स्वरुपात साकरणारे दस्तुरखुद्द माजी पालकमंत्री आ.आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांनी देखील गरबा प्रेमींनमध्ये सामील होत गरबा खेळताना ठेका धरत दिसले.मोठया शहरातील उत्सवाची भव्यता रोहा शहरात दिसल्याने तरुणाईत आगळा वेगळा उत्साह दिसून आलेचे पहावयास मिळाले. रोहा शहरासह समस्त रायगडकरांना रायगडचे लोकप्रिय खा
Image
  नवरात्रोत्सवात चिल्हे येथे खेळ रंगला पैठणीचा धाक्सुद मंडळाने आयोजित केलेल्या पैठणी खेळाच्या मानकरी ठरल्या सौ.ममता महाडिक खांब (नंदकुमार कळमकर) नवरात्रोत्सवाची धामधूम सर्विकडे भक्तिमय वातावरणात सुरू आहे या काळात स्थानिक पातळीवर ग्रामस्थ युवक मंडळ यांच्या वतीने विविध उपक्रम राबिवले जातात याच अनुषंगाने रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील धाक्सुद क्रीडा मंडळाने एक अनोखा उपक्रम राबवून येथील महिला भगिनींसाठी खास खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते याला येथील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला तर खेळ रंगलेल्या अटीतटीच्या व चढाओढीच्या पैठणीच्या खेळातील पैठणीच्या विजेत्या ठरल्या त्या सौ ममता नरेश महाडिक वहिनी तर उपविजेत्या सौ मानसी लोखंडे ,सौ मीनाक्षी शिंदे व सौ अश्विनी शिंदे या वहिनी ठरल्या आहेत उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेला नवरात्रोत्सव काळात येथील धाक्सुद मंडळांनी आराध्यदैवत धाक्सुद महाराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या अनोखा उपक्रम व विशेष खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर रंगलेल्या पैठणीच्या खेळासाठी येथील महिला वर्गानी मोठा सहभाग नोंदवून विविध खेळांचा आनंद घेत रसि
Image
  रोह्यात ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चाची बैठक, संघटना वाढीवर जोर!  रोहा तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अध्यक्षपदी अनंत थिटे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी नंदकुमार म्हात्रे यांची निवड खांब(नंदकुमार कळमकर) रोहा तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चाची तालुका कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी रोहा शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका अध्यक्षपदी अनंत थिटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी नंदकुमार म्हात्रे यांची निवड करण्यात आली. या बैठकीस ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चा जिल्हाअध्यक्ष सुरेश मगर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य मधुकर पाटील,अॅड मनोजकुमार शिंदे,संतोष खटावकर,शिवराम महाबळे,उपाध्यक्ष अमोल पेणकर,सरचिटणीस महादेव सरसंबे,सल्लागार काशीनाथ धाटावकर,रामचंद्र सकपाळ,अनंत जंगम,खजिनदार दत्ताराम झोलगे,सहचिटणीस महेश बामुगडे,मंगेश रावकर,विभागीय अध्यक्ष भातसई नंदकुमार म्हात्रे,धाटाव अमित मोहीते,खांब शाम लोखंडे,चणेरा संतोष देवळे,नामदेव सुतार,विनायक धामणे,राजेश क