रोहा तालुक्यातील घटना! 

डोळवहाळ धरणाच्या खाली पोहायला आलेल्या 21 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

  कोलाड/खांब  (विश्वास निकम, नंदू कळमकर) 

         रोहा तालुक्यातील  कोलाडच्या  नजीक असणाऱ्या डोळवहाळ धरणाच्या खालच्या बाजूस पुई गावाच्या हद्दीतील पोहायला गेलेल्या इसमाचा पोहत असतांना खोल पाण्यात भवऱ्यात अडकून पाण्यात बुडून मृत्यू झाला.

               सविस्तर वृत्त असे कि शुक्रवार दि.१० जून २०२२ रोजी डोळवहाळ धरणाच्या खाली पुई गावाच्या हद्दीत आपली मावशी मोमीन खातून, मावस भाऊ एजाज खान व अय्यज खान, मावस बहीण बुसरा हाफीजूर रहमान खान धारावी यांच्या सोबत फिरायला आलेला  मोहम्मद असिफ अब्दुल रहमान खान वय वर्षे २१, दुसरा मजला,गुलाब रबानी बिल्डिंग,९०/एच/४/१, डॉ. सुधीर बोस रोड, कोलकत्ता, वेस्ट बंगाल येथील इसम डोळवहाळ धरण्याच्या खाली पुई गावाच्या हद्दीतील  नदीच्या पाण्यात पोहत असताना खोल पाण्यात भावऱ्यात अडकून पाण्यात बुडून मयत झाला.

          या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ए. जाधव,पोहवा एन.जी.पवार ,बंदुगडे ,अशोक म्हात्रे ,सय्यद राऊळ यांनी तसेच स्थानिक ग्रामस्थ हरीश सानप संभे,अल्लाउद्दिन अधिकारी,जिक्रिया करणेकर ,रा कोलाड मोहल्ला ,संजय कोळी रा.पुई आदिवासीवाडी, चंद्रकांत दळवी रा.पुई गाव यांच्या मदतीने पाण्यात शोध घेऊन मयत झालेल्या तरुणाला  पाण्याबाहेर काढून दवाखान्यात आणले व डॉक्टर यांनी तपासले असता मयत झाल्याचे सांगितले त्यानुसार अकस्मात निधन नोंद झाले असून पुढील तपास सपोनि एस.ए, जाधव व त्यांचे सर्व सहकारी करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog