
नवजीवन विद्यामंदिर कल्याण येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न! डंबेल्स,कवायत,थरार प्रात्यक्षिक तर, विद्यार्थिनींनी नऊवारी साडी परिधान करून देशभक्तीपर गीतावर लेझीम नृत्याने जिकंली कल्याणकरांची मने! कल्याण (प्रतिनिधी ) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित नवजीवन विद्यामंदिर कल्याण व शिशू रंजन प्राथमिक विद्यालय कल्याण यांच्या विद्यमाने नुकताच भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे कल्याण शहर सचिव प्रकाश पाटील उपस्थित होते. या वेळी प्रकाश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणा नंतर विद्यालयामध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख प्रकाश पाटील यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले, यावेळी नवजीवन विद्यालयातील विद्यार्थी व शिशुरंजन प्राथ...