कोलाड-रोहा रस्त्यावर ट्रॅक्टरचा चाक साईड पट्टीत रूतला!

 निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुनाच समोर आला!

सुतारवाडी ( हरिश्चंद्र महाडिक)मे महिन्यात कोलाड-रोहा या रस्त्याच्या साईट पट्या भरण्याचे काम वेगाने सुरु होते. रस्त्याच्या दोन्हीही बाजुंनी साईड पट्टा भरल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले होते,  मात्र या साईड पट्ट्या भरताना माल वापरला की नाही याची शाश्वती आली असून , वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.या बाबतीत सविस्तर माहिती अशी की,पहूर ( ता. रोहा ) येथील श्री प्रेम चव्हाण यांच्या मालकीचाट्रॅक्टर क्र. एम. एच. 06 सी.डी. 4095 हा रोहा कडे जातअसताना , संभे बस थांब्या पासून अर्धा कि.मी.अंतरावर गेल्या नंतर ट्रॅक्टरचा चाक साईड पडीत रूतला जवळ-जवळ निम्या पेक्षा जास्तच चाक साईड पट्टीत रूतला गेला होता. ट्रॅक्टरच्या ऐवजी ट्रक क्रेन एस. टी.असती तर पलटी झाली असती असेअनेकांनी बोलून दाखवले. साईड पट्टी मध्ये रूतलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाला वर काढण्या करिना क्रेन बोलवूनअर्थिक तोटा सहन करून चाक वर काढण्यात आले.

ज्या ठिकाणावरुन साईड पट्टी टाकलीआहे आणि जीथ पर्यंत साईड पट्टी टाकली आहे तिथपर्यंत काम कसे झाले असेल हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Comments

Popular posts from this blog