. एस.ए.६ आसनी रिक्षा पासिंग संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांना निवेदन
गोवे-कोलाड (विश्वास निकम )जे.एस.ए.६ आसनी रिक्षा ही गाडी पासिंग होण्यासाठी परवानगी मिळावी या संदर्भात मंगळवार दि.१४ /०६/२०२२ रोजी मिनिडोअर चालक मालक संघटना रायगडचे सदस्य विश्वास मधुकर बागुल, सुरेश जगनन्नाथ घरत व इतर सदस्य यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण,रायगड यांना निवेदन देण्यात आले.
शासनाने आदेशपारित केलेली इको फोर व्हिलर गाडी ही सर्वसामान्य माणसाला न परवडणारी असल्यामुळे या गाडीला पर्याय म्हणून जे.एस.ए. निर्मित पेट्रोल व सि. एन. जी गाडी पासिंग होण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मिनिडोअर चालक-मालक संघटना रायगडचे सदस्य विश्वास बागुल (८४४६८८४५१)व सुरेश घरत (९२०९६४४०७१)यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण, रायगड यांना नुकताच देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment