Posts

Showing posts from July, 2022
Image
  महाड तालुक्यातील  जुई गावातील दुर्घटनेत दिवंगत बांधवाना आदरांजली        गोवे-कोलाड (विश्वास निकम)  २५ जुलै २००५ रोजी मुसळधार पावसामुळे  दरड कोसळून देशाच्या  इतिहासात नोंद झालेल्या घटनेमुळे जी ९४ निष्पाप लोक डोंगराच्या कुशीत मृत्युमुखी पडली. त्या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी २५जुलै रोजी, मौजे  जुई ग्रामस्थ श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करतात यावेळी देखील कार्यक्रम आयोजित केला गेला होता.            या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून प्रमुख अतिथी म्हणून महाडचे तहसिलदार सन्माननीय सुरेशजी काशीद यानी उपस्थित राहून स्मारकाचे पूजन करून स्मारकास अभिवादन केले. त्यांच्या समवेत तुडील महसूल विभागाचे मंडळ अधिकारी वावेकर, जुई गावाचे सजाचे तलाठी भोसले, चिंभावे सजा तलाठी सुपेकर, प्रमुख सत्कार मूर्ती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गंगाधर साळवी सर, ग्रामपंचायत सरपंच मिनाज करबेलकर , ऍड राजेश देवळे, ग्रामस्थ अध्यक्ष प्रकाश देवळे, गजानन दवंडे, सूर्यकांत दवंडे, अरविंद घरटकर, अश्विनी घरटकर,जावेद दुस्ते, इनायत करबेलकर, महमदअली करबेलकर, मिलिंद चिविलकर, लक्ष्मण पेंढारी,गणेश बेर्डे तसेच सर्व ग्रामस्थ महिला मंडळ व शा
Image
  सायबर सुरक्षित, साक्षर गाव, मोहिमेंतर्गत सायबर गुन्ह्यांविषयी समाजात जनजागृती व्हावी म्हणून गोरेगाव पोलिसांचा स्तुत्य उपक्रम!   विद्यार्थ्यांची रॅली काढून केली जनजागृती नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद रायगड(प्रतिनिधी) सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत विद्यार्थ्यांसह नागरिकांसह पुरेपूर माहिती व्हावी त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून गोरेगाव पोलीस ठाण्याचे कार्यतत्व कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांनी तसेच त्यांचे सहकारी यांनी दहिवली कोंड येथे शालेय विद्यार्थी रॅलीचे आयोजन परिसरातील यांची रॅली काढून सायबर जनजागृती करण्यात आली या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  सर्वसामान्य नागरिकांचा आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत ऑनलाइन व्यवहार पद्धतीकडे जास्त कल दिसून येतो अशा व्यवहारात त्यांची फसवणूक झाल्याचेअनेक प्रकार देखील समोर आले आहेत, आपल्या बँक खात्याबाबत सर्व गोपनीय माहिती काही भामटे माहिती करून घेतात व याचा गैरफायदा काही भामटे घेऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक करतात तसेच तरुण-तरुणी आपल्या खाजगी माहिती छायाचित्र समाज माध्यमांवर टाकतात मात्र काही भामटे या चित्रा
Image
  गोवे येथे कोलाड रोहा लायन्सक्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवे येथे लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा यांनी सामाजिक सेवेची जाण लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी गोवे शाळेतील ३५ विद्यार्थ्यांना लायन्स क्लब कोलाड रोहा च्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकला वह्या,व पेन्सील बॉक्स, इत्यादी.शैक्षणिक साहित्याचे वाटप गोवे शाळेत करण्यात आले. यावेळी क्लबचे सेक्रेटरी रविंद्र लोखंडे,खजिनदार डॉ श्यामभाऊ लोखंडे,उपाध्यक्ष डॉ. मंगेश सानप, लायन महेश तुपकर, विश्वास निकम, सामाजिक कार्यकर्ते विजय पवार,गोवे ग्रामपंचायत सदस्या रंजिता जाधव, अंगणवाडी सेविका सुजाता जाधव,
Image
  वरसगांव नाका येथील उषा शिंदे यांचे दुःखद निधन कै.उषा मारुती शिंदे      गोवे-कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील वरसगांव नाका येथील रहिवाशी उषा मारुती शिंदे यांचे शनिवार दि.१६ जुलै २०२२ रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ वर्षांचे होते. त्या  प्रेमळ व शांत स्वभावाने त्या सर्वाना परिचित होत्या.त्या सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय होत्या.                त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सामाजिक, राजकीय,शैक्षणिक अशा  विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्यात प्रकाश,सुरेश,नरेश,हे तीन मुलगे,तीन मुली, सुना,जावई, नातवंडे, व मोठा शिंदे परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी सोमवार दि.२५ जुलै तर उत्तरकार्य विधी बुधवार दि.२७ जुलै २०२२ रोजी त्यांच्या वरसगांव नाका येथील राहत्या घरी होतील .
Image
प्रत्येक व्यक्तीने  वृक्ष लागवड जतन संवर्धन केले तरच माणसाचे अस्तित्व टिकेल :-वनपाल पी.एस. वाघमारे   इंदापूर नवजीवन विद्यालयात वन महोत्सव साजरा  माणगाव (प्रतिनिधी ) कोरोना काळामध्ये ऑक्सिजन साठी माणसाची चाललेली धडपड आपण सर्वांनीच पाहिली आहे. वृक्ष लागवड जतन संवर्धन केले तरच माणसाचे अस्तित्व टिकेल. प्रत्येक वर्षी लहान थोर सर्वांनीच एकतरी झाड लावून त्याचे जतन संवर्धन केले तरच पर्यावरनाचे संतुलन राहील असे प्रतिपादन वन परिमंडळ इंदापूरचे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष वनपाल पी. एस. वाघमारे यांनी केले. ते वन परी मंडळ इंदापूर यांच्या विद्यमाने  दिनांक १४जुलै रोजी  यांच्या विद्यमाने नवजीवन विद्यालय इंदापूर येथे घेण्यात आलेल्या वन महोत्सवात ते बोलत होते ते पुढे म्हणाले की  जंगल झाडे वाचविण्याची जबाबदारी शासनाची नसून समाजातील प्रत्येक व्यक्तीचीही जबाबदारी आहे. या उदात्त भावनेने आपण या वन महोत्सवाचे आयोजन केलेले आहे.    यावेळी वृक्षारोपण करण्यासाठी  मौजे इंदापूर येथे वृक्षरोपण करण्यासाठी  ग्रुप ग्रामपंचायत तळाशेत सरपंच  सौ. नवगणे मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उद्घाटन करण्यात आले. तसेच नवजीवन विद्य
Image
  मांजरवणे शिवसेना माजी उपविभाग प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते सुरेश तटकरे यांना मातृशोक कै. पार्वतीबाई पांडुरंग तटकरे  माणगाव (प्रतिनिधी )  माणगाव तालुक्यातील बाट्याचीवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच मांजरवणे शिवसेना माजी उपविभाग प्रमुख सुरेश पांडुरंग तटकरे यांच्या मातोश्री कै. पार्वतीबाई पांडुरंग तटकरे यांचे 90 व्या वर्षी 9जुलै2022 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.  कै. पार्वतीबाई तटकरे यांचा परोपकारी व प्रेमळ स्वभाव सर्वांना परिचित होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी राजकीय, सामाजिक, व विविध क्षेत्रातील  मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, जावई, पुतणे नातवंडे, असा मोठा परिवार आहे. त्यांची दशक्रिया विधी  सोमवार 18 जुलै रोजी तर उत्तर कार्य वार बुधवार 20 जुलै रोजी राहत्या घरी बाट्याची वाडी ता. माणगाव इथे होणार आहेत. कै. पार्वतीबाई तटकरे यांच्या निधनाने मांजरवणे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. 
Image
  कोलाड हायस्कुल येथील सन१९८७/८८ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांकडून विद्यालयास स्कॅनर भेट     कोलाड(विश्वास निकम) कोलाड हायस्कूल मधील सन १९८७-८८ मधील दहावीच्या बॅच मधील विद्यार्थ्यांनी,स्नेहबंध म्हणून गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुदक्षिणा म्हणून द. ग. तटकरे उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कुल येथे जाऊन,प्राचार्य शिरीष येरुणकर सर,सदानंद तांडेल सर,उदय घोसाळकर सर,प्रदीप नागोठकर सर,विजय साखरले सर, अविनाश माळी सर व इतर शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत स्कॅनर भेट दिला. यावेळी माजी विद्यार्थी नलिनी जंगम(गुरव), ,प्रमिला गायकवाड(मोरे),जितेंद्र जैन, उद्धव आव्हाड यांनी शाळेत जाऊन स्कॅनर भेट दिला. या दहावी  मधील सर्व विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करीत आहेत याचे मुख्य कारण कोलाड हायस्कूल मधील सर्व शिक्षकांनी या विदयार्थ्यांवर चांगले संस्कार व मार्गदर्शन केले होते. १९८७-८८ मधील माजी विद्यार्थी निशिकांत पाटील,अश्विनी भगत, दिलीप पाबरेकर,दिपक जाधव,जितेंद्र घोणे,पंकज साटम, अजित शिंदे, नरेश शिंदे,द
Image
 खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुगाव गावचे युवा नेते प्रमोद म्हसकर यांच्या तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्य वाटप खांब (नंदकुमार कळमकर) रायगडचे लोकनेते तथा लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुक्यातील रा. जि. प केंद्रशाळा पुगाव येथे तसेच गावचे सुपुत्र युवा नेते प्रमोद म्हसकर यांच्या तर्फे येथील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य व क्रीडा साहित्य,वाटप करण्यात आले तसेच गावातील बचत गट,व भजन मंडळ, गणेशोत्सव मंडळ,बौद्धवाडी,आदिवासी बांधवांना यांना देखील विविध प्रकारचे साहित्य यावेळी वाटप करण्यात आले .रोहा तालुका सरचिटणीस नारायणराव धनवी,युवा नेते प्रमोद म्हसकर, शैलेश मकानी (बांधकाम व्यसायिक नवी मुंबई),कांचन घरत (सरपंच ग्रामपंचायत ओवले करंजाडे) धर्मा मुगाजी (सामजिक कार्यकर्ते) यांच्या शुभहस्ते रविवार १० जुलै रोजी शालेय शैक्षणिक साहित्य व स्पोर्ट्स साहित्य,तसेच बैठक व्यवस्थेतील सतरंजी वाटप करण्यात आले. यावेळी कोलाड खांब विभागातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नारायणराव धनवी,युवा नेते प्रमोद म्हसकर,शैलेश मकानी (बांधकाम व्यसाय
Image
 * खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुगाव गावचे युवा नेते प्रमोद म्हसकर यांच्या तर्फे शालेय साहित्य, खेळ साहित्य,बचत गट, गणेशोत्सव मंडळ, भजन मंडळ,आदिवासी,बौद्धवाडी बांधवांना साहित्य वाटप खांब (नंदकुमार कळमकर) खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रा. जि. प केंद्रशाळा पुगाव मध्ये युवा नेते प्रमोद म्हसकर यांच्या तर्फे शालेय शैक्षणिक साहित्य व स्पोर्ट्स साहित्य,बचत गट,भजन मंडळ, गणेशोत्सव मंडळ,बौद्धवाडी,आदिवासी बांधवांना रोहा तालुका सरचिटणीस नारायणराव धनवी,युवा नेते प्रमोद म्हसकर, शैलेश मकानी (बांधकाम व्यसायिक नवी मुंबई),कांचन घरत (सरपंच ग्रामपंचायत ओवले करंजाडे) धर्मा मुगाजी (सामजिक कार्यकर्ते) यांच्या शुभहस्ते रविवार दि.१० जुलै रोजी शालेय शैक्षणिक साहित्य व स्पोर्ट्स साहित्य,सतरंजी वाटप करण्यात आले. यावेळी नारायणराव धनवी,प्रमोद म्हसकर,शैलेश मकानी (बांधकाम व्यसायिक नवी मुंबई),कांचन घरत (सरपंच ग्रामपंचायत ओवले करंजाडे) धर्मा मुगाजी (सामजिक कार्यकर्ते)पुगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच राम धुपकर,रचना कळमकर, अदिती झोलगे,नीलम कलमकर स्कूल कमेटी अध्यक्ष, सुधीर शेळके तंट
Image
  पुगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प.शंकर (किसन)भोईटे यांचे निधन कै. ह.भ.प.शंकर(किसन )भोईटे  खांब (नंदू कळमकर) रोहा तालुक्यातील मौजे पुगांव गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा आध्यत्मिक वारकरी संप्रदायाचे वारसा वारसा जोपासणारे  ह. भ. प. शंकर विठ्ठल भोईटे यांचे मंगळवार ५ जुलै २०२२ रोजी वृद्धपकाळाने व अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे ते ९६ वर्षांचे होते. ह.भ.प. शंकर विठ्ठल भोईटे यांचा स्वभाव प्रेमळ शांत आणि मनमिळाऊ सर्वांच्या  परोपकारी पडणारे तसेच  ते किसन या नावानेच सर्वांच्या सुपरिचित होते.तर त्यांचा सामाजिक कार्यात नेहमी मोठा सहभाग असत.त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील असंख्य नातेवाईक व नागरिक तसेच समस्त पुगांव ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते तसेच असंख्य मान्यवरांनी त्यांच्या निवास्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन पर भेट घेतली.त्यांच्या पश्चात एक मुलगा अरुण शंकर भोईटे व तीन मुली, सुना,पुतणे,नातवंडे व मोठा भोईटे परिवार आहे.ह.भ.प.शंकर भोईटे यांचे पुढील दशक्रिया विधी गुरुवारी १४ जुलै पुगाव येथील श्री
Image
  भाताण हायस्कूलमथ्ये अवतरली पंढरी!   विद्यार्थी रंगले पायी दिंडीत!   नागोठणे (प्रतिनिधी) रविवार दिनांक  १० जुलै २०२२ रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय भाताण , ता. पनवेल येथे दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला . यावेळी '  ज्ञानोबा - तुकाराम ' च्या गजरात शालेय परिसर दुमदुमून गेला . टाळ - मृदुंगाच्या तालावर नाचत , फुगड्या खेळत संपूर्ण गावातून शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण  पायी दिंडी काढली . विशेष म्हणजे या दिंडी सोहळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांसोबत भाताण गावातील ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा केल्यामुळे शाळेत पंढरी अवतरल्यासारखे वाटत होते. या दिंडी सोहळ्यात विठ्ठलाच्या भूमिकेत इयत्ता नववीतील विद्यार्थी कु. हर्ष राम भोईर तर रखुमाईच्या भूमिकेत कु. अक्षता आत्माराम काठावले ( इ. ९ वी  )तर वासुदेवाच्या भूमिकेत इयत्ता दहावीतील विद्यार्थी कु. निखिल किशोर ठाकूर व कु. यश अनिल काठावले अवतरले होते.  या दिंडी सोहळ्याचे भाताण ग्रामस्थांनी ठिकठिकाणी स्वागत केले व या सांस्कृतिक उपक्रमाचे कौतुक केले.
Image
  झाडे लावण्यास नाही सीमा! झाडे हाच, जीवन विमा! रोहा अंधार आळी ग्रामस्थ मंडळाचा वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम,   रोहा (राजेश हजारे ) रोहा शहराचे झपाट्याने होणारे शहरीकरण त्यासाठी होणारी वृक्षतोड मिळेल तिथे इमारती उभ्या करण्याचा सपाटा या सर्व परिस्थितीत रोह्याची निसर्ग संपन्न अशी असलेली ओळख पुसली जाते की काय अशी परिस्थितीत निर्माण होत असताना तसेच जंगल झाडे वाचविण्याची जबाबदारी शासनाची नसून समाज्यातील प्रत्येक व्यक्तीचीही जबाबदारी आहे. या उदात्त भावनेने आज आषाढी कार्तिकी एकादशी निमित्त अंधार आळी येथील युवकांनी व जेष्ठ मंडळीं एकत्र येऊन संत तुकारामांच्या अभंगातील वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ही ओळ सत्य रूपात आणत  अंधाराळीयेथील होळीचा माळ या नऊ गुंठे मोकळ्या जागेत कडुलिंब, बदाम, वड, पिंपळ, नारळ, बकुळी, शमी, सोनचाफा, अशा विस झाडांची लागवड करून एक आगवेगळा उपक्रम राबवून निसर्गाला हातभार लावण्याचे महत्वाचे काम या युवा वर्ग व जेष्ठ मंडळींनी करून आजच्या एकादशीचे महत्व विषद केले आहे वृक्ष हाच पांडुरंग त्याची जोपासना, संगोपन हीच भक्ती हा संदेशच जणू अंधार आळी ग्रामस्थानी देऊन आजची देव शयनी एकाद
Image
  सतत जोरदार पडणाऱ्या पावसामुळे सुतारवाडी धरण भरले!   सुतारवाडी : (हरिश्चंद्र महाडिक) ४ जुलै २०२२ पासून सतत जोरदारपणे पडणाऱ्या पावसामुळे सुतारवाडी येथील लघु पाटबंधारे योजनेचा धरण तुडुंब भरला आहे. दि. २ जुलै २०२२ रोजी पाण्याची पातळी ९३.३४  मी. एवढी होती. त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा २.२६४ द.ल.ध.मी. व विसर्ग (क्यूरेक्स) ८९४.७६४ एवढा आहे. धरण पूर्ण भरले असून पूर्ण सुरक्षित आहे.          सुतारवाडी येथे लघु पाटबंधारा योजने अंतर्गत सन १९७७ साली धरण पूर्ण बांधून तयार झाले. या धरणाची लांबी ३२५ मीटर असून उंची १६.३९ मीटर एवढी आहे. येथील धरणामध्ये एकूण पाणीसाठा २.३२० दशलक्ष घनमीटर एवढा असून उपयुक्त पाणीसाठा २.२६४ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. या धरणामध्ये निरूपयोगी पाणीसाठा ०.०५६ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र ९.८४ चौरस किलोमीटर एवढे आहे. तर भूसंपादन क्षेत्र ५८.२० हेक्टर एवढे आहे. धरणातील पाण्याची साठा पातळी ९३.३५ एवढी आहे. जोरदार पाऊस पडला की पाण्याची पातळी ९३४.५२८ क्यूरेक्स एवढी असते. सुतारवाडी धरणाचा परिसर हा  अवाढव्य असून निसर्गाच्या सानिध्यात आहे. वर्षाच्या बाराही महिने या धरणाला म
Image
  कोलाड परिसरासह रोहा तालुक्यात पावसाची तुफान फटकेबाजी,भिरा,डोळवहाल सुतारवाडी येथील धरणाची पातळी वाढली,नागरिकांना सतर्कतेचा इशारा!   गोवे- कोलाड (विश्वास निकम) सतत दोन दिवसापासून कोलाड सह रोहा तालुक्यात पावसाची जोरदार फटकेबाजी सुरु असून यामुळे भिरा, डोळवाल, सुतारवाडी येथील धरणाची पातळी वाढली असून कुंडलिका, महिसदरा नद्यानी धोक्याची पातळी ओलांडली असून नदिकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.          जून महिन्यात ऊन पावसाचा खेळ सुरू होता जुलै महिन्याच्या तीन तारखेपर्यंत अशीच स्थिती होती. मात्र पावसाने ऊन पावसाचा खेळ खेळायला सुरुवात केली होती. त्या दिवसापासून बळीराजा धास्तावला होता. नांगरणीची काम उरकून पेरणी केली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे असताना दिनांक ४ जुलैपासून दुपारनंतर पावसाने तूफान पर्जन्यवृष्टी केल्यामुळे रोहा तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.परंतु असाच पाऊस दोन दिवस पुढे सुरु राहिला तर भात शेतीचे नुकसान होऊ शकते असे ही शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.        सतत पडणाऱ्या पावसामुळे कोलाड परिसरातील शेती ही पाण्याखाली गेली असून कोलाड कडून गोवे गावाकडे जाणार
Image
  सामाजिक वनीकरण विभागामार्फत वांगणी हायस्कूलमध्ये वनमहोत्सव साजरा   नागोठणे (प्रतिनिधी) सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय वांगणी , तालुका रोहा या शाळेत सामाजिक वनीकरण विभाग रोहा यांच्या सहकार्याने बुधवार दिनांक ६ जुलै २०२२ रोजी वनमहोत्सव व वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  यावेळी सामाजिक वनीकरण विभाग रोहा येथील वनक्षेत्रपाल आशिष पाटील, वनपाल दिलीप वाघे , वनपाल शंकर कराडे , वनरक्षक धिरेश थळकर  , शाळेचे मुख्याध्यापक जयहिंद ठाकूर, हरितसेना प्रमुख टिळक खाडे , शाळेतील शिक्षक अरविंद शेळके , नरेंद्र पाटील, विकास म्हात्रे , वन कर्मचारी सुरेश वाघमारे , सुनिल लांगी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेच्या परिसरात करंज , चिंच , कदंब , फणस , पिंपळ , जांभूळ , फणस आदी स्थानिक प्रजातींची पन्नास वृक्षांची रोपटी लावण्यात आली . या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी ' पर्यावरणाचे ठेवा भान , तरच बनेल देश महान ' , ' झाडे लावा , चैतन्य फुलवा ' अशा आशयाचे फलक हातात घेऊन वृक्षसंवर्धनाचा व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला . शाळेतील विद्यार्थीनींनी  पारंपरिक वेशभूषा
Image
  शिवराज्यभिषेकदिनी 'बा रायगड'सदस्यांना गवसलेली तोफ तिच्या मूळ महादेवमाळ ठिकाणी विराजमान करण्यास बा रायगड टीमला यश छत्रपती संभाजी राजांनी केले कौतुक! कोलाड (श्याम लोखंडे) बहुजन प्रतिपालक वंदनीय महाराष्ट्राचे आराध्य दैवत शूर वीर पराक्रमी योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून रोजी रायगड किल्ल्यावर भव्य असा 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न करण्यात आले . औत्सुक्याने आणि आदराने हा सोहळा जगभर पाहिला जातो .या सोहळ्याचे ऐतिहासिक मूल्य पाहता शिस्तबद्धतेच्या काळजीसह प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक असा हा अभूतपूर्व सोहळा रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. मात्र, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा ' गड किल्ले संवर्धन बा रायगड परिवाराला मोठा प्रेरणादायी, उत्साह ,व सर्वांच्या मनात आनंद वाढवणारा ठरला असून छत्रपती शिवराय हे मनामनात शिवराज्याभिषेक घराघरांत' ही संकल्पना घेऊन किल्ले रायगडावर अत्यंत भव्यदिव्य प्रमाणात हा सोहळा साजरा झाला. या सोहळ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे शिवराज्याभिषेक शुभदिनी गडावर बा रायगडच्या सदस्यांना किल्ले रायगडावरती दृष्टीस पडली ऐतिहासिक तोफ ,राज्यभिषेक
Image
   माझं गाव माझी जबाबदारी ' संस्थेतर्फे वरवठणे येथे करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन!   नागोठणे (प्रतिनिधी)' माझं गाव माझी जबाबदारी ' या सामाजिक संस्थेतर्फे वरवठणे येथे दहावी - बारावी नंतरच्या पुढील शिक्षणाची नेमकी दिशा विद्यार्थी व त्यांच्या पालकांना ठरवता यावी यासाठी निःशुल्क करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.  हे शिबिर रविवार दिनांक १० जुलै २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत वरवठणे येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात संपन्न होणार आहे. या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ठाणे सेवानिवृत्त केंद्रीय उपायुक्त तथा दैनिक लोकसत्ताचे स्तंभलेखक सुहास पाटील हे विद्यार्थी व पालकांशी सुसंवाद साधणार आहेत. सुहास पाटील हे दैनिक लोकसत्तातील ' संधी नोकरीची ' या स्तंभातून गेली २० वर्षे महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करत आहेत. या मार्गदर्शन शिबीरात सुहास पाटील हे प्रामुख्याने दहावी , बारावी व पदवीनंतरच्या करिअरच्या वेगळ्या वाटा , युपीएससी - एमपीएससी , रेल्वे व बॅका यांद्वारे घेतल्या जाणा-या स्पर्धा परीक्षा , स्टाफ सिलेक्शन कमिशन, संरक्षण दलातील नोकरीच्या संध
Image
  रायगड जिल्ह्यात कासार उद्योजक सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपण  कार्यक्रम संपन्न    इंदापूर (प्रतिनिधी) रविवारी ३ जुलै २०२२ रोजी अ.भा.सो.क्ष.कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळाच्या आवाहनाने संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपण उपक्रम आयोजित करण्यात आला होता या अनुषंगाने रायगड मध्ये "कासार उद्योजक सामाजिक संस्थेच्या वतीने" संस्थेचे सदस्य श्री.वामनजी रांगोळे यांची मेहनत,आधुनिक शेती करण्याची पद्धत हे सर्व पाहून त्यांच्या कार्यास हातभार लावण्याच्या उद्देशाने काजू,फणस,कोकम,लिंबू,सोनचाफा,अशी  विविध लवकर उत्पादने देणारी  रोपे त्यांना भेट देऊन त्यांच्या कुटुंबा समवेत वृक्षरोपन  कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष व मध्यवर्तीचे रायगड जिल्हा युवा अध्यक्ष श्री.गणेशजी साळवी,महिला अध्यक्षा रियाजी कासार ,संस्थेचे सह सचिव व मध्यवर्ती मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख  श्री.दिपकजी मांगले श्री.गोपीनाथजी वारे कु.हर्षल साळवी,कु. द्रोण मांगले हे उपस्थित राहून "कासार छाया" वृक्षरोपन कार्यक्रम संपन्न  केला.
Image
रोहयात नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया  शि बिर! १६३ जणांची केली तपासणी ५४ रुग्णांना मोतीबिंदू शास्त्रकियेसाठी पनवेलला पाठविले, रोहा तालुका सिटीझन फोरम आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलचा उपक्रम, रोहा (प्रतिनिधी) रोह्यातील सामाजिक संस्था रोहा तालुका सिटीझन फोरम ट्रस्ट (रजि.) आणि नविन पनवेल येथिल आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात १६३ जणांची तपासणी करण्यात आली तर ५४ रुग्णांना मोतीबिंदू शास्त्रकियेसाठी नवीन पनवेल येथिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.         रोहा येथिल ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित या सेवाभावी उपक्रमात रुग्णांची नेत्र तपासणी, अल्पदरात चष्मे वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आदींचे विनामूल्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात १६३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५४ रुग्णांना मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथिल आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.  हॉस्पिटलचे टीम मॅनेजर प्रकाश पाटील, डॉक्टर संदेश पाटील, प्रतिभा गावीत, गायत्री चौरसिया, तान्या कटियार, समृद्धी, नरेश आवलर, शिल्पेश
Image
  पुस्तक हाच खरा जीवनातील मित्र आहे,पुगाव येथील ग्रंथालय लोकार्पण सोहळ्यात शंकरराव म्हसकर यांचे प्रतिपादन! खांब (नंदकुमार कळमकर ) संस्कृती टिकली पाहिजे एकविसाव्या शतकात तसेच संगणकीय आणि इंटरनेट युगात वाटचाल करत असताना दुर्दैवाने वाचक संस्कृती ही लोकपावन झालेली आहे मर्दानी खेल देखील आता पूर्वीसारखे राहिलेले नाही खेळ म्हणून सध्याच्या युगात लहान मुलांना खेळायचा झाला तर मोबाईल हे हातात खेळणं झालेले आहे त्यामुळे जीवनात वाचाल तर वाचाल शिकाल तरच टिकाल पुस्तक हाच खरा जीवनातील मित्र असल्याचे प्रतिपादन कुणबी समाजनेते शंकरराव म्हसकर यांनी पुगाव येथील स्व.हरिभाऊ लक्ष्मण म्हसकर ग्रंथ लोकार्पण सोहल्याप्रसंगी केले. रोहा तालुक्यातील मौजे पुगाव येथे म्हसकर कुटूंबियांच्या वतीने पुगाव येथे शेकाप चे माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या आमदार फंडातून उभारण्यात आलेल्या सभागृहात स्व. हरिभाऊ लक्ष्मण म्हसकर ग्रंथालयाचे लोकार्पण सोहळा श्रीमती अनुसया म्हसकर तसेच रोहा तालुक्याचे कुणबी समाज तथा जेष्ट नेते मारुतीराव खरीवले तसेच शंकरराव म्हसकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न झाले यावेळे शंकरराव म्हसकर बोल
Image
  तळा येथे अंगणवाडी मदतनीस व पाच वर्षाची बालिका यांचा अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू            आणखी  दोन बालके जखमी त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक!   मद्यधुंद  अवस्थेत  वाहन चालक असल्याची चर्चा! तळा:-(कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील आनंदवाडी येथील अंगणवाडी सेविका प्रज्ञा प्रशांत सकपाळ हीचा व पाच वर्षे बालिका यांचा अपघातात जागीच दुदैवी मृत्यू झाला आहे. त्यातच आणखी दोन बालके  जखमी झाली असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.      याबाबत ची हकीकत अशी की प्रज्ञा प्रशांत सकपाळ वय वर्षे ३२ या अंगणवाडी आनंद वाडी येथे मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. त्या सकाळी १० वाजता वावेहवेली  फाटयानजिक असलेल्या आदीवासी पाडयावर असलेल्या  सारीका संदिप जाधव वय वर्ष ५, रियांश रमेश पवार वय वर्ष ५, रिया रमेश पवार वय वर्ष ४ अशा बालकांना घेऊन पायी रस्त्याने आनंदवाडी च्या दिशेने म्हणजे तळा रस्त्यावर प्रवास  करत असताना तळा कडुन इंदापूर कडे घेऊन जाणाऱ्या  इनोव्हा गाडी एम. एच. ४६ डब्ल्यू ५१७७ ही गाडी जयेंद्र  भागोजी पारावे बेदरकार पणे चालवित असताना हा अपघात घडला.        सदरच्या अप
Image
  गोवे गावच्या चंद्रभागा पवार यांचे दुःखद निधन   गोवे-कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील गोवे येथील रहिवाशी चंद्रभागा दगडू पवार यांचे बुधवार दि.२९ जून २०२२ रोजी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८० वर्षाचे होते.त्या परोपकारी व प्रेमळ स्वभाव सर्वाना परिचित होत्या.तसेच समाज कार्यात नेहमी सक्रिय होत्या. त्या स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांच्या सदस्या होत्या त्यांना भजन व किर्तन यांची आवड होती.                     त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्याच्या अंत्यविधीसाठी राजकीय, सामाजिक व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर व समस्त गोवे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पच्यात दोन मुले, तीन मुली, दोन सुना,तीन जावई,पुतणे, नातवंडे, पतवंडे व मोठा पवार परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.८ जुलै तर उत्तरकार्य विधी सोमवार दि. ११ जुलै २०२२ रोजी त्यांच्या गोवे येथील निवासस्थानी होणार आहेत.